माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-२

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in भटकंती
10 Jun 2015 - 12:37 pm

भाग-१
मागील भागात :- तेव्हा कळले की याच मरिन ड्राईव्हला जावुन तिथुन बोटीने शिपयार्ड, डचपॅलेस, पाहुन संध्याकाळी मुन्नारसाठी रवाना व्हायचे आहे. अशा रितीने पहिला दिवस पार पडला.>>>>>

मग सकाळी ८.०० वाजता सर्वांना कालच्या मरिन ड्राईव्हवर घेवुन गेले. तिथे एक बोट उभी होती. माणशी काहीतरी रुपये १५०/- घेतले. त्या बोटीत वरच्या डेकवर एकंदर १०० खुर्च्या होत्या त्यावर स्थानापन्न झालो.
आता आमच्या व्यतिरिक्त तिथे अजुन दुसरा तामिळनाडुचा एक मोठा २० लोकांचा ग्रुप होता. तर इतरही काही लोक होते. जशी बोट चालु झाली तसे बोटीवरिल माणसांतर्फे गाण्याचा कार्यक्रम चालु झाला. मधुनच आजुबाजुच्या परिसराची माहिती दिली गेली. खालील फोटो बोटीतुन घेतले आहेत.

हे आहे एक शिपयार्ड तिथे अनेक कंटेनरर्सचे चढ उतार होत होते.
1

1
समुद्रातुन एक बोट बंदराकडे येत होती. जसजशी ती जवळ आली तसा तिचा अवाढव्य आकार दिसु लागला. सगळे मग बोटीचे व्हिडीयो शुटिंग आणि फोटो घेण्यात मग्न झाले. मग ती बोट आमच्या समोरुन पुढे निघुन गेली व पलिकडे असलेल्या धक्क्याला लागली.

1

मग यात्रेकरुंपैकी कोणाला गाणी नृत्य येते का ते विचारले असता, आमच्या ग्रुप मधल्या एका ४ थीतल्या मुलीने गाणे म्हंटले.

हे आहे बोलघाटी बेटावरचा बोलघाटी पॅलेस,

मट्टनचेरी पॅलेस पाहिला पण इथे फोटो काढुन देत नाहीत.
हा पॅलेस पोर्तुगीजांनी केरळच्या राजाला बांधुन दिला होता. पॅलेसमध्ये राजाची वंशावळ त्याने वपरलेली वस्त्रे, हत्यारे मोठ्या तसबीरीतली छित्रे चित्रे तसेच देवदेवतांच्या दंतकथे वर आधारित काही भित्तीचित्रे आहेत.
पॅलेस पाहुन झाल्यावर बाहेर पडलो आणि पुन्हा धक्याला येईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खेळणी, कि-चेन, वॉलपीस वगैरेची दुकाने होती तिथले थोडेसे फोटो काढले.
1
हे विविध रंगातील हत्तीं. किंमत साधारण ६०० रुपयापासुन पुढे. मी २.१/२ फुट उंचीच्या हत्तीची किंमत विचारली असता अबब त्याने २ लाख रुपये आहे असे सांगितले.
1

मग बोटीतुन परत दुसर्‍या बेटावर येताना आशियातील एक मोठे शिपयार्ड लांबुन दाखवले. जिथे सध्या भारतीय बनावटीच्या विमानवाहु नौकेची बांधणी होत आहे.त्यांनतर त्यांनी एका बेटावर चायनीज फिशींग पहायला उतरवले.

बेटावर जाण्यासाठी असलेला छोटासा धक्का.

1

खाली उतरुन धक्याच्या काठाकाठाने पहात गेलो तो दिसले की, तिन चार ठिकाणी एका ४ बांबुच्या तिकाटण्याला खालच्या बाजुने जाळी लावलेली दिसली की ज्याला आरीच्या सहाय्याने वर खाली कराता येते. थोडा वेळ पाण्यात सोडल्यानंतर पुन्हा आरीच्या साहाय्याने वर घेतले जाते. आम्ही पाहिले असता काही जास्त मासे सापडल्याचे दिसले नाही कदाचीत काठावर जास्त मासे मिळत नसावेत.

1.1

मग पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला.
1

येताना त्या बोटीच्या आयोजकांनी तळमजल्यावर जमायला सांगितले. तिथे बसायला चारी बाजुने कोच होते पण मध्यभागी मोकळी जागा होती. पहताच क्षणी समजले की आता इथे डिजे आहे आणि लवकरच डान्स सुरु होणार, जसा डीजे लावला गेला व लेझर लाईटस सोडले तसे मग आधी बच्चे कंपनी आणि नंतर आधी तु की आधी मी असे करत करत मोठ्यांनी पण पाय थिरकावत नाचायला सुरुवात केली. इथे मात्र सगळे एक झाले.
ज्या गृहिणींना खरे तर घरकामाच्या रगाड्यातुन म्हणा किंवा संकोचामुळे म्हणा ज्यांना नाचाता येत नाही, त्यांनी मनसोक्त काहीही संकोच न बाळगता मोकळेपणे नाचात भाग घेतला.

आपपल्या बायकांना नाचताना पाहुन प्रत्येक पतीला एक सुखद आश्चर्यचा धक्का बसला, पत्नीला नाचताना पाहुन मीही तिच्या बरोबर सहभागी झालो आणि एका बाजुला तिच्या चेहर्यावरचा आनंद कॅमेर्यात टीपायला सुरुवात केली.
एवढ्यात त्या तामिळ ग्रुपपैकी एक तामिळ महिला आमच्या ग्रुप सर्कल तोडुन आतमध्ये घुसली आणि माझ्या बायकोला ओढत ओढत त्याच्यात घेवुन गेली व आमच्या बरोबर पण जरा नाच ना असं खुणेने सांगु लागली मग काय ये धमाल चालु झाली ती बोट पुन्हा धक्क्याला लागे पर्यंत थाबलीच नाही. बोटीतुन खाली उतरलो तो या क्षणांची आठवण घेवुनच.

तिथुन पुन्हा हॉटेलात आलो. जेवण तयारच होते. १२.३० वा. जेवुन मग सगळ्यांना घेवुन बस मुन्नारच्या दिशेने निघाली. कोचीन ते मुन्नार हे १४० किमी. अंतर आहे उंची साधारण पणे ५००० फिट म्हणजे आपल्या महाबळेश्वरएवढी आहे. येथे ही जाताना रस्याच्या दुतर्फा छोटेखानी एक मजली टुमदार बंगले पहायला मिळाले.

मध्येच एक सुंदर धबधबा पहायला मिळाला.

1

थोडावेळ थांबुन पुढे निघालो. खरे तर ४ ते ४.३० तासांचं अंतर आहे. पण एकतर ड्राईव्हरला गाडी नविन आणि गाडीला ड्रायव्हर नविन. त्यात घाटातला रस्ता हा थोडा छोटा आहे. एखादे वहान समोरुन आले की तो गाडी थांबवायचा घाटात खुपच हळू गाडी चालवत होता. असं करत करत आम्हाला मुन्नारला पोहचायलाच रात्रीचे ७.०० वाजले.

क्रमश:

प्रतिक्रिया

वा म्स्तच!!आता तुमचयाकडून टिप्स घेऊन मुन्नारला जाणार.

आम्ही स्टेशनजवळच्या(एर्नाकुलम साउथ) जोस जंक्शन येते कोचि फोर्टला जाणारी एसि बस धरली होती.अर्धा तासात फोर्टात गेलो.(२२₹,२०१२फेब्रु).वेळ कमी होता म्हणून फार फिरलो नव्हतो. येताना लॅांचने एर्नाकुलम जेटीला आले ( अडीच रु ,पंधरा मिनिटे)त्या चाइनिज फिशिंग नेटमध्ये मासे गावायचे पंधरावीस वर्षांपुर्वीच बंद झाले आहे.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2015 - 1:25 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

मदनबाण's picture

10 Jun 2015 - 2:24 pm | मदनबाण
प्रचेतस's picture

10 Jun 2015 - 7:30 pm | प्रचेतस

सुरेख.
नेहमीच्या केरळव्यतिरिक्त ऑफ़बीट केरळ पाहायला मिळत आहे.

प्रीत-मोहर's picture

10 Jun 2015 - 8:33 pm | प्रीत-मोहर

सहमत :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

झक्क्कास हो एकदम!

जुइ's picture

11 Jun 2015 - 12:20 am | जुइ

हाही भाग आवडला!!

श्रीरंग_जोशी's picture

11 Jun 2015 - 6:01 am | श्रीरंग_जोशी

छानच रंगलाय हा भाग.
पुढचे भाग पटापट येउद्या.

खटपट्या's picture

11 Jun 2015 - 7:02 am | खटपट्या

खूप छान चित्रे आणि वर्णन...

गणेशा's picture

11 Jun 2015 - 12:52 pm | गणेशा

एक नविन केरळचे दर्शन ... आवडले...

मुन्नार च्या वृत्तांताची वाट पहात आहे...