सध्या सुट्टया चालू असल्यामुळे मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत आहे. १३ जून ते १९ जून या कालावाधीत. मग कोकणात जाणे योग्य ठरेल कि विदर्भात? कारण पावसाळा चालू आहे आणि दोन्ही ठिकाणाकडील सद्यस्थितीतील हवामानाची माहिती मला नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
10 Jun 2015 - 10:21 am | श्रीरंग_जोशी
विदर्भात थंड हवेचे ठिकाण म्हणून जायचे असल्यास चिखलदरा उत्तम आहे. परंतु या कालावधीत हिरवाई निर्माण झालेली नसेल. गेल्या वर्षी मी ११ जुनला चिखलदर्याला गेलो होतो. अजिबात हिरवाई नसल्यामुळे लहानपणी पाहिलेले चिखलदरा हेच का असा प्रश्न पडला.
कोकणात मी प्रथम गेलो होतो तेव्हा तारखा होत्या ३१ मे व १ जून. संध्याकाळी थोडा वेळ जोराचा पाऊस पडल्याने दिवे आगरच्या बीचवर सूर्यास्ताच्या वेळी आल्हाददायक वातावरण होते.
10 Jun 2015 - 10:32 am | चिनार
चिखलदरा जर निसर्गरम्य म्हणून बघायचे असल्य्यास जुलै किंवा ऑगस्ट मध्ये उत्तम आहे ..आता नाही..पण जंगल फिरायचे असल्यास आता सगळ्यात चांगली वेळ आहे.
उन्हाचा जास्त त्रास होत नसल्यास जरूर जावे..३ दिवसात चिखलदरा,सिमाडोह आणि आसपासचे जंगल अगदी व्यवस्थित ट्रिप होईल..
चीखालादार्यात फारसे हॉटेल्स नाही. खालील होटेल सगळ्यात चांगले
http://www.satpuraretreat.com/
अमरावतीला जाऊन गाडी करून जावे..
10 Jun 2015 - 5:45 pm | श्रीरंग_जोशी
सिमाडोह की सेमाडोह?
मी तर सेमाडोह वाचले अन ऐकले आहे.
स्व. इंदिरा गांधी जंगलाचा अनुभव घेण्यासाठी इथे राहिल्या होत्या असे ऐकले आहे.
10 Jun 2015 - 5:49 pm | चिनार
मलाही नक्की माहिती नाही. स्व. इंदिरा गांधी यांच्यासाठी बांधलेला गेस्ट हाउस अजूनही आहे तिथे.
10 Jun 2015 - 10:42 am | पैसा
तुमच्या तारखा बघता जोरदार पाऊस कोकणात नक्कीच भेटेल. इथे गोव्यात एक तारखेपासून रोज पडतो आहे. परवा रत्नागिरीतही विजा बिजा कडकडून जोरदार पाऊस होता.
10 Jun 2015 - 10:56 am | नीलकांत
मेळघाट फिरण्यासाठी तुम्ही म्हणताय ती वेळ चालण्यासारखी आहे. त्यातही वन विभागाने चिखलदर्याहून खास जंगल सफारीकरीता गाडी सुरू केली आहे. त्यामुळे जंगल बघायचे असेल तर मेळघाटात जाऊ शकता. चिखलदर्याचे खास वैभव खुप पाऊस पडल्यावर मस्त दिसते. मला चिखलदरा बाराही महिने जायला आवडतं. नुकताच वैराट देवीला भेट देऊन आलो.
10 Jun 2015 - 11:26 am | सुनिल साळी
खुप पाऊस सुरु आहे.
10 Jun 2015 - 5:39 pm | गवि
.कोंकण की अन्य काही असा प्रश्नच कसा पडू शकतो?
10 Jun 2015 - 5:41 pm | सूड
कोकण, त्यातही दिवेआगर आणि श्रीवर्धन!!
10 Jun 2015 - 5:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुम्हाला पाऊस हवाय का वाइल्ड लाइफ हे ठरवा, सद्ध्या चिखलदरा जरासे गरम असेल पण बाकी लोकांनी सांगितल्या प्रमाणे सर्वोत्तम सीजन आहे हा वन्यजीव दर्शनाला! ऑफबीट जागा म्हणुन हिट आहे इकडे कॉफ़ी प्लांटेशन सुद्धा पहायला मिळतील!!
10 Jun 2015 - 6:52 pm | प्रचेतस
लोकांना विदर्भ म्हटला की फ़क्त चिखलदराच का आठवतो ते कळत नाही.
विदर्भ म्हटले की वर्ध्यातील पवनारचा विनोबांचा आश्रम, तेथील वाकाटककालीन मूर्ती, रामटेकची भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी काही मंदिरे, केवल नरसिंह मंदिर, गडचिरोलीतील मिनी खजुराओ म्हणून समजलं जाणारं मार्कंडी मंदिर, आनंदवन आश्रम, हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प अशी कित्येक तीर्थक्षेत्रे आहेत. जितके पाहू तितके कमीच.
10 Jun 2015 - 8:07 pm | श्रीरंग_जोशी
आयुष्याची पहिली एकवीस वर्षे विदर्भात राहूनही फारसे पर्यटन केले नसल्याने नेमकेपणाने काय सांगणार?
तुमच्या प्रतिसादामुळे लहानपणी एकदा सेवाग्राम आश्रम पाहिल्याचे आठवले.
तसे पाहिले तर नागपूर शहरही पाहण्यासारखे आहेच. मी ठरवून फारसे फिरलो नसल्याने त्याबाबतही नेमकेपणाने सांगू शकत नाही.
10 Jun 2015 - 8:12 pm | श्रीरंग_जोशी
अमरावतीपासून दिड तासाच्या अंतरावर पण मध्य प्रदेशात मुक्तागिरी हे जैन देवळांचे नयनरम्य ठिकाण आहे.
डोंगरातून पडणार्या धबधब्याच्या अवतीभवती अनेक मंदिरे आहेत. बहुधा काही शे किंवा काही हजार पायर्या चढून वर जाता येते. उन्हाळ्यात जाऊन मात्र फारसा उपयोग नाही. गेल्या जूनमध्ये मी खालूनच पाहिले होते.
10 Jun 2015 - 8:53 pm | मित्रहो
हे तुम्ही ठरवा. दोन्ही भागात सुंदर ठीकाण आहेत. विदर्भात अजूनही उन खूप आहे. ४४ डिग्रीच्यावर तापमान आहे.
विदर्भातली काही ठिकाणे
अमरावती, मुक्तागिरी, चिखलदरा, शेगाव, लोणार
पवनार, सेवाग्राम, नागपूर, रामटेक, तोतलाडोह
वरोरा आनंदवन, मार्कंडा, हेमलकसा
बुकींग मिळत असल्यास आता ताडोब्यासारखी जागा नाही. वाघ दिसण्याची शक्यता. नाहीतर चंद्रपूर जिल्ह्यातले उन सहन करण्यासारखा त्रास नाही.
वेळ असेल तर पचमढीला जा. मस्त जागा आहे. गॅरंटी.