आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

ग्रेटथिंकर's picture
ग्रेटथिंकर in काथ्याकूट
4 Jun 2015 - 12:08 pm
गाभा: 

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,

मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.

उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते.
परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.

जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

प्रतिक्रिया

शास्त्रोक्त प्रतिसाद एक्का काका !
विषयच संपला असे म्हणायचे..
लेखक महाशय पुढचे काहीदिवस तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या लिंका शोधतील हे निश्चित

ग्रेटथिंकर's picture

8 Jun 2015 - 9:58 am | ग्रेटथिंकर

लिंक्स धाग्यात दिलेल्या आहेत, एक्का काकांनी वाचल्या नसतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखातला पहिला संदर्भ टिव्ही न्युज आयटेमवर आहे आणि दुसरा National Gardening Association चा आहे (म्हणजे झाड्यापाल्यावरचे अनुभव तुम्ही माणसांच्या "सर्वांगिण विकासात" एक्स्ट्रॉपोलेट करू पाहता आहात) !

जर हा विषय मानववंशशास्त्रात इतका महत्वाचा नसता तर कोणताही हे दोन संदर्भ सबळ जनुकशास्त्रिय पुरावे आहेत हे मत मी विनोदी म्हणुन सोडून दिले असते ! :)

१. टिव्ही न्युज आयटेमच्या धाग्यातले हे वाक्य परत वाचा...

Dr Prasad travels to Brazil, a country where mixed-raced children have been born since the colonization of the country around 500 years ago and account for 86 per cent of the population.

हे उदाहरण, संकराने किती विकास होऊ शकतो, याचा विचार केला की नेहमीच पुढे येते. तथाकथित उत्तम कॉकेशियन जनुके आणि तथाकथित कमी प्रतिची अमेरिकन मूलवासी इंडियन जनुके यांचा गेली ५०० वर्षे सतत संकर चालू आहे. तुमचे म्हणणे खरे धरले तर आज ब्राझील हा देश जगातल्या सर्वोत्तम विकसित जमातीचे वस्तिस्थान असायला हवा होता !!!

२. दुसर्‍या जेनतेम पानभर लांबीच्या "त्रोटक" धाग्यावरून डायव्हर्सिटी/युनिफॉर्मिटीची पूर्ण संकल्पना आणि त्यावरून गंभीर मानववंशशास्त्रीय विधाने करणे म्हणजे दुसरीचे गणिताचे पाठ्यपुस्तक वाचून मंगळावर पाठवायच्या रॉकेटची गणिते मांडल्यासारखे होईल !!!

महत्वाचे...

कोणत्याही महत्वाच्या शास्त्रिय दाव्यासाठी पियर रिव्ह्युव्हड जर्नल्समधले अनेक कोरॉबोरोटिव्ह पुरावे असले तरच तो दावा त्याविरुद्ध शास्त्रिय पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आणि तोपर्यंतच विश्वासू समजावा असा दंडक आहे.

वरच्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर तुमचे संदर्भदुवे आणि तुमचा लेख परत वाचल्यास बर्‍याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.

थोडक्यात, तुम्ही ते सगळे दुवे वाचलेत. तुमच्या सहनशीलतेला सलाम करावा की त्या दुव्यांमधून खरोखरच काही निघेल या आशावादाला याचा विचार करतोय.

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 9:43 am | ग्रेटथिंकर

त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस पॉप्युलेशन जेनेटीकली जास्त फीट आहे, असेही लिहले आहे ,ते वाचलेले दिसत नाही.
सध्याच्या काळात अमेरिका हा देश mixed population असलेला प्रगत देश आहे.स्पॅनीश ईटालियन फ्रेंच अँग्लोसॅक्सन यांचा एक मिक्सड रेस अमेरिकेत तयार झाला आहे व तो देश जगातला सर्वात प्रगत देश आहे.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 9:53 am | टवाळ कार्टा

मग पप्पू???

परवाच कट्ट्यावर या विषयावर चर्चा झाली,भारत आणि इटलीच्या संकरातून निर्माण झालेल्या एका अद्वितीय बुद्धीमत्ता,अतुलनीय कर्तुत्व असलेल्या मुलाविषयी..
मी ,ब्याट्या न धन्या खो खो हसलो हो..

gogglya's picture

9 Jun 2015 - 12:35 pm | gogglya

आणी कोम्प्लान मध्ये असलेल्या शीशामुळे काही बालकांची मानसीक वाढ खुंटली आहे!

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 10:36 am | संदीप डांगे

भारताबद्दल आपले काय मत आहे? कारण आंतरजातीय/धर्मीय विवाह होण्यास भारतात खूप म्हणजे खूपच विरोध आहे हो.

भारतात वंश-मिश्रण झालेले नाही असे आपले मत आहे का?

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 10:38 am | ग्रेटथिंकर

भारतामध्ये वांशिक मिश्रण झालेले नाही.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 10:39 am | टवाळ कार्टा

खिक्क

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 10:39 am | संदीप डांगे

मग आता कसले मिश्रण करायचे?

सुनील's picture

9 Jun 2015 - 11:01 am | सुनील

भारतीयांत आढळणार्‍या मिश्रा ह्या आडनावाची व्युत्पत्ती काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

भारतामध्ये वांशिक मिश्रण झालेले नाही.

वाचन वाढवा !

थिंकिंग ग्रेट करा !!

अनेकानेक शुभेच्छांचा स्विकार करा !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

त्या दुव्याच्या (नसलेल्या) एकंदर शस्त्रिय पात्रतेबद्दल वर लिहीलेले वाचायला विसरलेले दिसताय !

अमेरिका हा देश प्रगत आहे, पण त्याचे कारण तो "लॅड ऑफ ऑपॉर्चुनिटीज" आहे हे आहे... अमेरिकेत लोक संधीच्या मागे जातात... संकरासाठी नाही... असे अमेरिका धरून सगळ्या जगाचे मत आहे. तुम्हाला काही नविन शोध लागले असल्यास जरूर एखाद्या मान्यवर शास्त्रिय जर्नलमध्ये पाठवा, छापून आल्यास तेवढे एकच कारण तुम्ही ग्रेट थिंकर आहात हे सिद्ध करून जाईल.

माहीत नसल्यास अजून एक सत्य समजाऊन घ्या : जालावरची सर्व माहिती सत्य / विश्वासू नसते. त्या लेखांची शास्त्रिय पात्रता ठरवायला सारासार विवेक आणि काही अधिक सबळ शास्त्रिय पुरावे (कोणते तेही वर लिहीले आहेच) लागतात.

तसेही, ग्रेट कल्पनाविलासालाही आमचा विरोध नाही. फक्त अश्या गोष्टी विनोद (कधी कधी काळा विनोद उर्फ ब्लॅक कॉमेडी) म्हणून ठीक आहेत, शास्त्रिय दावा म्हणून खपवू नका, इतकेच माझे म्हणणे आहे.

बाकी आमच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करा.

सुबोध खरे's picture

9 Jun 2015 - 11:13 am | सुबोध खरे

ग्रेट थिंकर साहेब
केविलवाणे समर्थन
मग आपल्या तर्क शास्त्राप्रमाणे चीन किंवा जपान किंवा जर्मनी पूर्णपणे मागासलेले असायला पाहिजेत. चीन मध्ये ९६ % लोक एकाच वंशाचे आहेत तशीच परिस्थिती जर्मनी किंवा जपान मध्ये आहे. पण मग तिथे तसे का होत नाही.
बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावणे सोडून द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावणे सोडून द्या.

हे 'खरे' ग्रेट थिंकिंग आहे ! =))

सुबोध खरे's picture

9 Jun 2015 - 11:21 am | सुबोध खरे

एक्का साहेब
आम्ही लष्करी माणसे
आम्हाला ग्रेट तर सोडाच थिंकिंग सुद्धा करता येत नाही. पण विरोधाभास मात्र जाणवतो.

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 11:28 am | संदीप डांगे

अगदी अगदी.

ग्रेट साहेबांचे थिंकींग नसलेले प्रतिसाद अधिकाधिक विनोदी होत चालले आहेत. समस्या अशी आहे की त्यावर हसावे की रडावे याबद्दल आमची जनुकं जरा संभ्रमात आहेत.

मृत्युन्जय's picture

9 Jun 2015 - 11:48 am | मृत्युन्जय

दोन डॉक्टरांनी मिळुन गेट्थुंकरांचे पार वस्त्रहरण करायचे ठरवले आहे काय?

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 11:52 am | ग्रेटथिंकर

चीन जपान जर्मनीमध्ये जातीपाती नाहीत, त्यामुळे त्यांचा जीन पूल आपल्यापेक्षा डायवर्स आहे.

सुबोध खरे's picture

9 Jun 2015 - 12:03 pm | सुबोध खरे

हि लोणकढी कुठनं आणलीत. काही विदा पुरावा वगैरे असतं हे माहित आहे का?

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 12:15 pm | ग्रेटथिंकर

जर्मनी जपान चीनमध्ये जातीव्यवस्था आहे याचा काही विदा आहे का तुमच्याकडे.

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 12:30 pm | संदीप डांगे

ग्रेटथिंकर,

तुम्ही आधी एक नक्की करा. जातींमुळे जीनपूल मर्यादीत होतो याला काय आधार आहे ते पुरावा, उदाहरणासकट मांडा. मग काय पुढे बोलता येईल. खरं तर बोलतीच बंद होईल.

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 12:35 pm | ग्रेटथिंकर

मांडलेले आहे नीट वाचल्यास सम्जेल,बाकी तुमची मर्जी.

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 1:50 pm | संदीप डांगे

मांडलेले नीटच वाचले.

जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात

कुठे आहे हे संशोधन?

आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार.
कुठे आहे पुरावा? जनुके जातीनुसार विभागली जातात याला आधारच काय? फारतर भौगोलिक किंवा वांशिक रित्या जनुकं विभागली जातात पण जाती/धर्म? जरा जास्त नाही होत आहे हे?


ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.

असं तुम्हाला कशावरून वाटलं?

जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर
कुठल्या जाती-धर्मात अशी जनुकीय दुर्बलता आली आहे? की तुम्ही म्हटलं म्हणून इतरांनी मान डोलावून हो म्हणायचं? इतकी बौद्धीक दुर्बलता अजून आमच्या जनुकांत आलेली नाही.

3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.

तो अलरेडी आहेच.

दादा, समस्या सामाजिक आहे. तुम्ही त्यावर नैसर्गिक उपाय करू पाहताय. म्हणजे स्वतः शाकाहारी आहेत म्हणून घरच्या पाळलेल्या कुत्र्या-मा़ंजरींना दूध-भातच खाऊ घालणार्‍या अमानुष लोकांसारखे आहे ते.

अजून काही नीट वाचायचे राहीले असेल तर सांगा.

सुबोध खरे's picture

9 Jun 2015 - 12:47 pm | सुबोध खरे

जर्मनी जपान चीनमध्ये जातीव्यवस्थानाहीच.तसे मी मुळीच म्हणालेलो नाही. उलट चीन मध्ये ९६ % एकाच वंशाचे आहेत.जपान मध्ये तर ९८.५% लोक एकाच वंशाचे आहेत. (जर्मनीत ८० टक्क्याच्या आसपास आहेत) म्हणूनच तेथील जीन पूल आपल्यापेक्षा डायव्हर्स नाही. तेंव्हा आपलेच म्हणणे खरे ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न सोडून द्या आणि अशा बौद्धिक कोलांट्या मारणे सोडून द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

विरोधाभासाचा कळस !

थिंकिंगचा ग्रेट अभाव !

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2015 - 6:15 pm | श्रीगुरुजी

वरील लेख व प्रतिसाद वाचून आईनस्टाईन व एक सुंदर असलेली पण साधारण बुद्धिमत्ता असलेली अभिनेत्री यांच्याविषयी प्रचलित असलेली एक दंतकथा आठवली.

शेम दंतकथा अभ्राम लिंकन आणि एका ललनेबद्दल वाचलेली होती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jun 2015 - 9:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लग्नाच्या धाग्यावर यमगर्निकरांचा प्रतिसाद फाउल नाही का हो?;)

यमगर्निकर's picture

6 Jun 2015 - 3:19 pm | यमगर्निकर

तुमचे लग्न झाले म्हणून तुम्ही रस्त्यावरुन जाताना समोरुन येनार्‍या स्त्रीकडे बघनार हि नाहि का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 3:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सीतेच्या पावलांची गोष्ट ऐकली आहात काय?

gogglya's picture

9 Jun 2015 - 12:40 pm | gogglya

म्हणे लक्श्मण सीतेला ओळखत असे, असे म्हणतात. त्यावरील प्रतीक्रिया : "काय पोहोचलेल असेल ना?"
ह.घ्या.हे.वे.सां.न.

कवितानागेश's picture

6 Jun 2015 - 3:05 pm | कवितानागेश

इथे हल्ली जातीतल्या जातीत पोरे लग्न करायला नक्को म्हणतात, आणि यांना आन्तर्जातीय लग्नसोहाळे सुचतायत!
ही अशी लग्न कुठल्या पद्धतीनी करायचे हे ठरवता ठरवताच ९९% लग्न मोडतील, असे भाकित करून ठेवते. ;-)

पिवळा डांबिस's picture

7 Jun 2015 - 10:17 am | पिवळा डांबिस

जनुकीय गरज जर असेलच तर भारतातल्या भारतात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करून काहीही साधणार नाही!!!
त्यासाठी आंतर वंशीय विवाह केले पाहिजेत!
म्हणजे दक्षिण आशियायी (भारतीय +पाकिस्तानी+ बांगलादेशी + श्रीलंकन) व्हर्सेस कॉकेशियन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, चायनिज (मंगोलियन) वगैरे......

ग्रेटथिंकर's picture

7 Jun 2015 - 10:44 am | ग्रेटथिंकर

पिंडा काका भारतियांचा जनुकीय पुल जातिमुले मर्यादीत होत नाही का?

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 12:09 pm | संदीप डांगे

कसा काय? भारतात हजारो जाती आहेत. पण राजस्थानी, गुजराती. सौथ इंडीयन, पंजाबी, पूर्वोत्तर अशी माणसांची वर्गवारी केल्या जाऊ शकते. म्हणजे चेहर्‍यावरून माणसाची जात ओळखू शकत नाही पण प्रांताचा अंदाज लावू शकतो. मग जीनपूल जातींमुळे मर्यादित होतो याला काय आधार? का जीनपूलच्या नावाखाली काही वेगळे मांडायचे आहे?

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 12:16 pm | संदीप डांगे

आमच्याच जातीत (कुठली ती सांगणार नाहीच) पार घारे डोळे पिवळ्या त्वचा वाल्यांपासून काळी कभिन्न बुटकी माणसेही आहेत. एकाच घराण्यातल्या तिसर्‍या पिढीतल्या तीन चुलतभावांची मुले पार वेगवेगळी दिसतात. एकाच फॅमिली फोटोमध्ये जगातले सगळे जीन्स आपआपल्या गुणवैशिष्ट्यांसह अवतरलेले दिसतात. कुठे मर्यादित होतोय जीनपूल? मला जरा विदा द्याल का?

जातींमुळे जीन पूल मर्यादित होईल का हा अभ्यासाचा मुद्दा असू शकतो. अगदीच टुकार मुद्दा नाही मांडलेला त्यांनी!

मेंडेलच्या थेअरी नुसार एक उदाहरण देतो, (चुका असतील तर जाणकारांनी कृपया सांगाव्यात)
आता पहा एखाद्या बेटावर एक प्रजाती राहाते असे मानूया. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे ब्रीडिंगसुद्धा त्याच लोकांपुरते मर्यादित राहणार. आता उदाहरणासाठी असा विचार केला कि तिथल्या सर्वांचे केस काळे आहेत तर सोनेरी केस असलेले अपत्य होण्याची शक्यता किती?
काळ्या केसांसाठी B जीन पकडू (जी डोमीनंट आहे) सोनेरी केसांसाठी b (जी रीसेसिव आहे)
आता पुरुष आणि स्त्री दोघेही हेटरोझाय्गस असतील तर, पुरुष - Bb आणि स्त्री- Bb
यांची पुढील combination होतील - Bb /bB /BB /bb
म्हणजे ३:१ शक्यता सोनेरी केस असण्याची, त्यातूनही पालकांपैकी कोणी होमोझाय्गस (BB) असेल तर पुढची पिढी हि फक्त काळे केस असलेलीच होणार.
पण जर पालकांपैकी कोणी एक व्यक्ती सोनेरी केस असणारी असेल तर हि अपत्याला सोनेरी केस असण्याची शक्यता ५०% होईल.
म्हणजेच बेटा बाहेरील कोणाबरोबर जर ब्रीडिंग झाला तर नवी लक्षणे दिसण्याची (चांगली/वाईट ) शक्यता वाढू शकेल.

जनुके फक्त दिसणेच नियंत्रित करत नाहीत. वरच्या उदाहरणात केसांऐवजी एखादा जनुकीय आजारसुद्धा असू शकतो.

आपल्या इथे जातीसुद्धा बेटा प्रमाणेच आहेत, आपल्या जातीबाहेर लग्न लावली जात नाहीत(हल्लीचे अपवाद वगळता) त्यामुळे जीनपूल मर्यादित राहण्याची शक्यता असूही शकते आणि या गोष्टीचा अभ्यास होऊ शकतो. आता हे चांगले कि वाईट हा पुढचा मुद्दा होईल.

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 8:30 pm | संदीप डांगे

आपल्या इथे जातीसुद्धा बेटा प्रमाणेच आहेत, आपल्या जातीबाहेर लग्न लावली जात नाहीत.

त्या उदाहरणातल्या बेटांचा आणि प्रत्यक्ष समाजजीवनातल्या जातींचा तसा काही संबंध लावता येणार नाही. कारण लग्नाशिवाय झालेला/होणारा वर्णसंकर इथे लक्षात घेतलेला नाही. खरंच जाती बेटांप्रमाणे असत्या तर एकाच जातीत विविध शारिरिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्ये सापडली नसती. यात अपवाद नाहीत. सर्व जातींत हे वर्णसंकर झाले आहेत.

लेखात म्हटलेले जर तार्किक म्हणायचे असेल तर आधी वर्णसंकर अजिबात झालेला नाही आणि प्रत्येक जातीने 'आपले रक्त शुद्ध ठेवले आहे' हे सिद्ध करायला लागेल. (उदा.: पाटलांची ठेवलेली स्त्रीपात्रे, त्यांची संतती, त्या संततीने केलेले शारिरिक व्यवहार, इत्यादी इत्यादी हा फक्त एक भाग आहे हजारो पद्धतीच्या वर्णसंकराचा.) हे कुणीही सिद्ध करून दाखवावे, प्रस्तुत लेखाचा मी स्वतः पुरस्कार आणि प्रचार करीन.

जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आता भूतकाळात जमा झाली आहेत. घार्‍या डोळ्यांचा गोरी त्वचा असलेला कोब्राच असेल असं नाही तसेच काळा कभिन्न बुटका दलित जातीतला असेल असंही ठामपणे म्हणू शकत नाही. बौद्धीक किंवा शारिरिक क्षमतांचा जातिनिहाय असा गट नाही.

शतकानुशतके सुयोग्य जोडीदार निवडले जात आहेत असेही नाही. वयानुरुप, रंगरुपानुसार एकमेकांना पूरक जोडीदार फार अपवादाने आढळतात. अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही. एखाद्या जातीत किंवा धर्मात जनुकिय आजाराचा प्रादुर्भाव आढळल्याचा काही पुरावा आहे काय? केवळ 'असू शकतो' असे म्हणून अवैज्ञानिक कल्पनाविलास योग्य नाही.

जातीचे संस्कार हे रक्तात असतात हा भ्रम आहे. ते समाजाच्या, कुटूंबाच्या वागणुकीतून अजाण बालकाच्या कोर्‍या पाटीवर कायमचे रेखाटले जातात. त्यामुळे आंतरजातीय/धर्मीय विवाहाने जीनपूल वैगेरे समृद्ध होईल हे ताकाला जाऊन भांडे लपवणे प्रकार आहे. कारण जाती/धर्म अनैसर्गिक आहेत. जीनपूलावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि जुरासिक पार्क मधे म्हटल्याप्रमाणे

शब्दबम्बाळ's picture

7 Jun 2015 - 11:03 pm | शब्दबम्बाळ

आपण एकदम डिनायल मोड मध्येच जाताय. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णतः सिद्ध होत नाही तोपर्यंत विज्ञानदेखील तसे असण्याची शक्यता नाकारत नाही.

आपल्या प्रतिक्रियेमध्ये शास्त्रीय पुरावा किवा आकडेवारी काहीही नाही तरीपण तुम्ही तुमचे मत शास्त्रीय समजत आहात आणि लेखकाला मात्र आकडेवारी मागत आहात! हे पटत नाही.
आणि हो एका प्रजातीत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असू शकतातच, कारण शरीरात हजारो जनुके आहेत आणि त्यांची वेगवेगळी combination होऊन अपत्य जन्माला येणार! पण काही ठराविक वैशिष्ट्ये काही ठराविक समूहामध्ये आढळणारी देखील असू शकतात.

आता आपण म्हणालात वर्ण संकर! पूर्वी हे मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये भूतकाळात जमा झाली, असे मत आपण मांडले आहे.
१. म्हणजे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आधी अस्तित्वात होती हे आपले मत आहे का? तसे असेल तर आपण स्वतःच जातीनिहाय जनुकीय विभागणीला एक प्रकारे मान्य करताय. मी अजूनही तसे असू शकण्याची फक्त शक्यता व्यक्त करतोय.
२. आपल्या मते पूर्वी सर्व जातीत वर्णसंकर झाले म्हणजे लोकांनी दुसर्या जातीतल्या लोकांशी संबंध ठेऊन अपत्यप्राप्ती साधली(त्यांचे लग्न हा मुद्दा बहुधा इथे गौण आहे) आणि त्यामुळे भेद नाहीसा झाला. मग हे आत्ता का होऊ शकत नाही असे तुमचे मत आहे?

आपला पुढचा मुद्दा: "अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही."
याचा आपल्याकडे काय पुरावा आहे. पालकांच्याच जीन्स त्यांच्या अपत्यामध्ये येतात त्यामुळे त्यांच्या असण्याचा/दिसण्याचा प्रभाव मुलांवर असतोच.

आपले मत : "जातीचे संस्कार हे रक्तात असतात हा भ्रम आहे"
हे असे मी कुठंच म्हणालो नाहीये. संस्कार वगैरे कुठून आले इथे? काहीच लॉजीक लागलं नाही!!
तुम्ही लेखकाचा उद्देश काय आहे या विचाराने लिहिताय पण मला त्यांच्या उद्देशात रस नाही. त्यांच्या कल्पनेला मी विरोध जरी केला असला तरी जातीनिहाय जनुकीय पूल असूच शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण त्यालाही पुरावे लागतील.

आणि उदाहरण म्हणून hollywood चित्रपटाचे व्हिडिओ दिल्यावर काय बोलणार! :)
त्या उक्ती नुसार जगातील सगळ्या मानवांनी ब्रीडिंग बंद केलं तरीही लोकसंख्या येन केन प्रकारेण वाढत राहीलच! कशाला मग इतकी झंझट!! :)

संदीप डांगे's picture

8 Jun 2015 - 1:24 am | संदीप डांगे

तुम्ही हा धागा किंवा धाग्यावरची सर्व चर्चा काळजीपूर्वक वाचलेली दिसत नाही. नाही तर आता इतके प्रतिसाद येऊन गेल्यावर हे प्रश्न विचारले नसते कदाचित. लेखाच्या मथळ्यातच हा लेख सपशेल अवैज्ञानिक आहे असं स्पष्ट दिसत असतांना त्याची भलामण करण्याचा आपला उद्देश कळला नाही. आधी जाती-धर्म आधारित जनुकीय विभागणी असते का ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. बाकीचे पुढे बघू.

असो.

आपल्या प्रतिक्रियेमध्ये शास्त्रीय पुरावा किवा आकडेवारी काहीही नाही तरीपण तुम्ही तुमचे मत शास्त्रीय समजत आहात आणि लेखकाला मात्र आकडेवारी मागत आहात! हे पटत नाही.

> लेखकमहोदय जातीय/धार्मिक निकषांवर विवाहाचा प्रस्ताव मांडत आहेत. त्याला आधार म्हणून वैज्ञानिक संदर्भ देत आहेत. जर जात/धर्म हे विज्ञान असेल तर प्रश्नच मिटला. एका अवैज्ञानिक गोष्टीसाठी दुसर्‍या वैज्ञानिक गोष्टीचा संदर्भ कितपत योग्य आहे तुमच्यामते?

आणि हो एका प्रजातीत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असू शकतातच, कारण शरीरात हजारो जनुके आहेत आणि त्यांची वेगवेगळी combination होऊन अपत्य जन्माला येणार! पण काही ठराविक वैशिष्ट्ये काही ठराविक समूहामध्ये आढळणारी देखील असू शकतात.
>> एखाद्या प्रजातीत असू शकतात. मी कुठे नाही म्हणतो. पण माणसांचा ठराविक समूह म्हणजे शास्त्रिय दृष्ट्या काय? जाती/धर्म आधारित समूह हे कृत्रिम आहेत. नैसर्गिक नाहीत. उदा. लेखकाने ब्राहमण हुशारच आणि दलित रेम्याडोक्याचेच असतात असं काही गृहित धरले आहे काय?

आता आपण म्हणालात वर्ण संकर! पूर्वी हे मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये भूतकाळात जमा झाली, असे मत आपण मांडले आहे.
१. म्हणजे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आधी अस्तित्वात होती हे आपले मत आहे का? तसे असेल तर आपण स्वतःच जातीनिहाय जनुकीय विभागणीला एक प्रकारे मान्य करताय. मी अजूनही तसे असू शकण्याची फक्त शक्यता व्यक्त करतोय.

>> आता असं बघा. सन २००० ते २०१५ या वर्षांमधे झालेले आंतरखंडीय्/वंशीय विवाहांची संख्या सन ०००० ते ००१५ मधे झालेल्या आंतरखंडीय/वंशीय विवाहांच्या तुलनेत प्रचंड जास्त असेलच. लोकसंख्येचे गुणोत्तर सोडा. एका भूभागातून शेकडो मैल दुसर्‍या भूभागात विवाह होणे तेही दुसर्‍या जातीत हे अनेक कारणांमुळे अशक्य होते. त्यामुळे विवाह, विवाहबाह्य संबंध आणि संतती त्याच भूभागात होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. म्हणून एका भूभागातल्या माणसांची चेहरेपट्टी, देहयष्टी एकसारखी असल्याचे आढळून येते. यात जाती/धर्माचा संबंध नाही. पण सांप्रत समाजाला 'असं वाटतं' की जातीनिहाय असे गुण असतात. जातीनिहायच काय देशनिहायही काही विशिष्ट गुण असतातच असंही लोकांना वाटत असतं. पण हे सर्व गुण जातनिहाय नसून भौगोलिक परिस्थिती, समाजजीवन, संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून असतात. ज्यांच्या पिढ्यांपिढ्या अभावात जगल्या त्यांच्या अंगी काटकसर येणारच. ती जातिनिहाय कशी असू शकेल? तेच विपुलतेत आयुष्य काढलेल्या लोकांचं. नाच, गाणे, मजा करणे हा काही प्रांतांचा स्वभाव आहे. तो जाती-धर्म आधारित आहे असे मानणे अवैज्ञानिक, अशास्त्रिय नाही का? युद्ध, देशांतर, व्यापारा-उदिमामुळे स्थलांतर यामुळे देशात बर्‍याच प्रमाणात लोकसंख्या आपली मूळ निवासस्थाने सोडून कायमची विस्थापित झालेली दिसून येतात. तरीपण त्यांच्यावर त्यांच्या भूभागाचे, सामाजिक संस्कारांचे छाप आहेत. जाती-धर्माचे नाहीत. एका मारवाड्या-गुजरात्याचा आय-क्यू एका वेदशास्त्रसंपन्न पंडिताएवढा असेल तरी दोहोंच्या सामाजिक, कौटूंबिक परिस्थितीत बदल असल्याने स्वभावगुण वेगवेगळे दिसून येतात. म्हणून जनुकं वेगळी असतील असं आहे का? आता अशा दोन घरांमधे विवाह झाल्यावर जनुकांची सरमिसळ झाली की सामाजिकतेची?

जनुक विज्ञान काय आहे नेमकं जर मलाच कळलं नसेल तर जरूर सांगा. पण ते मानवनिर्मित जातीनिहाय नाही असे माझे मत आहे आणि ते अवैज्ञानिक आहे असे मला वाटत नाही. जाणकार अधिक सांगू शकतील.

२. आपल्या मते पूर्वी सर्व जातीत वर्णसंकर झाले म्हणजे लोकांनी दुसर्या जातीतल्या लोकांशी संबंध ठेऊन अपत्यप्राप्ती साधली(त्यांचे लग्न हा मुद्दा बहुधा इथे गौण आहे) आणि त्यामुळे भेद नाहीसा झाला. मग हे आत्ता का होऊ शकत नाही असे तुमचे मत आहे?

>> होण्याचे थांबले आहे असं कुठं म्हटलंय. आंतरजातीय/धर्मीय्/प्रांतीय्/वंशीय प्रेमविवाह होतच आहेत. विवाहाशिवायही संतती निर्माण होतच आहेत. पण कुणाला प्रयोग करायचे म्हणून असे अरेंज्ड विवाह शक्य आहेत का?

आपला पुढचा मुद्दा: "अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही."
याचा आपल्याकडे काय पुरावा आहे. पालकांच्याच जीन्स त्यांच्या अपत्यामध्ये येतात त्यामुळे त्यांच्या असण्याचा/दिसण्याचा प्रभाव मुलांवर असतोच.

>> या धाग्यावर इथल्या सन्माननीय डॉक्टरांनी याबद्दल पुरेसं स्पष्टीकरण दिले आहे. विधानाचा अर्थ एवढाच की दोन जीवांपासून नेहमी अपेक्षीत संतती निर्माण होईल याची कोणतीही खात्री कोणताही वैज्ञानिक देणार नाही.

जातीनिहाय जनुकीय पूल असूच शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण त्यालाही पुरावे लागतील.
>> मी काय म्हणतो. हे इतके नैसर्गिकरित्या स्पष्ट सत्य डोळ्यांना दिसत असतांना प्रयोगशाळेत जाऊन जनुक जनुक खेळण्यात काय हशील आहे? लेखकाने पुढे केलेली परिस्थिती मान्य केली तर असे म्हणता येईल की माणसांमधे पशूंसारखे वर्गीकरण झाले आहे. म्हणजे घोडा, झेब्रा, गाढव. तेव्हा घोड्याचे जीन्स खचितच गाढवापेक्षा वेगळे आहेत हे सिद्ध करायला प्रयोगशाळेत जायची काहीच गरज नाही. पण असे नाही आहे ना. दोन माणसांबद्दल असं ठामपणे प्रयोगशाळादेखील म्हणू शकणार नाही. त्यांचे जनुकीय प्रयोग करायची काय गरज आहे? त्यासाठी आंतरजातीय्/धर्मीय वैगेरे विवाहांची काय गरज आहे?

आणि उदाहरण म्हणून hollywood चित्रपटाचे व्हिडिओ दिल्यावर काय बोलणार! :)
त्या उक्ती नुसार जगातील सगळ्या मानवांनी ब्रीडिंग बंद केलं तरीही लोकसंख्या येन केन प्रकारेण वाढत राहीलच! कशाला मग इतकी झंझट!! :)

>> देअर यु आर...! मी पण हेच म्हणतोय केव्हापासून. कशाला मग इतकी झंझट. लाखो वर्ष माणूस उत्क्रांत होत आलाय. होत राहील. हे जाती धर्माचं प्रकरण मागच्या काही हजार वर्षात उपटलं असेल. अजून काही हजार वर्ष राहील. जनुकीय अभिसरण थांबलंय का? नाही. कारण ती अविरत चालणारी प्रक्रिया आहे. हेच त्या चित्रपटातही सांगितलंय. असं सांगणारा चित्रपट भोजपुरी असता तर त्याची लिंक दिली असती. पण बहुधा भोजपुरी लोकांमधे असले चित्रपट काढायला लागणारे बौद्धिक जनुकं नसतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 2:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्या ४० साइजच्या डेनिम जीन्सचा भाव काय असेल??

काळा पहाड's picture

7 Jun 2015 - 2:49 pm | काळा पहाड

पेपे ची की लेव्हाईज? इथे लेखकाच्या म्हणण्यानुसार पेव्हाईज ची जीन्स महाग असेल कारण ती स्ट्राँग वगैरे वगैरे असायला हवी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 3:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्यावरुन एक झॅक विनोद आठवला. पण इथे नको. =))

स्ट्राँग म्हणजे किती स्ट्राँग. आपल्याला स्ट्राँगपेक्षा मळखाउ पाहिजे. तीन-चार महिने धुतली नै तरी चालेल अशी पाहिजे =))

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2015 - 9:47 pm | टवाळ कार्टा

व्यनी कर

ग्रेटथिंकर's picture

7 Jun 2015 - 3:21 pm | ग्रेटथिंकर

क्रुपया सेन्सिबल चर्चा करावी.‌‍‌

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 4:02 pm | संदीप डांगे

त्याआधी सेन्सिबल लेख टाकावे.

मृत्युन्जय's picture

8 Jun 2015 - 12:51 pm | मृत्युन्जय

खिक्क .......

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jun 2015 - 4:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम चर्चा.

म्हणजे दक्षिण आशियायी (भारतीय +पाकिस्तानी+ बांगलादेशी + श्रीलंकन) व्हर्सेस कॉकेशियन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, चायनिज (मंगोलियन) वगैरे...

दक्षिण आशियायी एका पायावर तयार होतील पण गोरे लोकही तयार झाले पाहिजेत हो. असे झाले तर मग दीपाली अँडर्सन,प्राजक्ता हॅरिसन,कॅथरीन कुलकर्णी,क्रिस्तिना पवार,अँजेला चितळे,जॅकलीन खोब्रागडे अशी नामावली तयार.

संदीप डांगे's picture

7 Jun 2015 - 8:34 pm | संदीप डांगे

माईसाहेब, नावाचे संकर तर लय जुने आहेत. पण तुमच्या वयापेक्षा जुने नाहीत. तरी तुम्ही असली विधानं करता? आश्चर्य आहे.

सॅम्युअल पाटील, जॉन गायकवाड, जॉर्ज पट्टथरंबिल, इ. नावे आलरेडी पाहिलीत गं माई.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 6:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही म्हणजे केळ्याच्या आमिषाला भुलुन धर्मांतरित झालेली माकडं रे.

नाखु's picture

8 Jun 2015 - 10:00 am | नाखु

ह्या नावावरून काय बोध होतो ते पहा आणि ठरवा काय एकदाचे..

ब्दुल नारायण डिसुझा.

अनाडी

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2015 - 2:49 pm | श्रीगुरुजी

आशिष विन्स्टन् झैदी या नावाचा एक मध्यमगती गोलंदाज उत्तरप्रदेशच्या रणजी संघातून अनेक वर्षे खेळत होता.

http://www.espncricinfo.com/india/content/player/36137.html

ग्रेटथिंकर's picture

8 Jun 2015 - 3:32 pm | ग्रेटथिंकर

श्रीगुरुजी, धाग्याच्या मुद्द्यावर चर्चा करा कृपया.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धाग्यामधे मुद्दा दाखवा आम्ही चर्चा करुन दाखवतो.

ग्रेटथिंकर's picture

8 Jun 2015 - 9:20 pm | ग्रेटथिंकर

धाग्याचा हेडर 'नीट' वाचल्यास मुद्दा कळेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

५-६ वेळा वाचला. मुद्दा सापडला नाही. एकदा दाखवाल का म्हणजे पुढच्या वेळी पटकन सापडेल.

gogglya's picture

9 Jun 2015 - 12:44 pm | gogglya

म्हणजे 'नीट' लावून वाच असा अर्थ होतो रे.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2015 - 12:55 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

तुमच्याच वर दिलेल्या प्रतिसादातील खालील मुद्द्यावर हे उपप्रतिसाद आहेत हो.

"दक्षिण आशियायी एका पायावर तयार होतील पण गोरे लोकही तयार झाले पाहिजेत हो. असे झाले तर मग दीपाली अँडर्सन,प्राजक्ता हॅरिसन,कॅथरीन कुलकर्णी,क्रिस्तिना पवार,अँजेला चितळे,जॅकलीन खोब्रागडे अशी नामावली तयार."

बॅटमॅन's picture

8 Jun 2015 - 3:46 pm | बॅटमॅन

त्यावरून एक जोक आठवला....

एक माणूस देवाची प्रार्थना करतो, "हे देवा, मला जगातली सर्वांत सुंदर स्त्री पत्नी म्हणून दे".

देव प्रसन्न होतो आणि म्हणतो, "वा भक्ता! तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तू जर हिंदू असलास तर ऐश्वर्या, मुसलमान असलास तर कॅटरिना, आणि ख्रिश्चन असलास तर केट विन्सलेट देतो. आता सांग बघू तुझं नाव!"

माणूसः (पुरेपूर हावरेपणाने) "अब्दुल विजय फर्नांडिस".

देवः "लै शाणा बन्तो का बे, तुला तर आता राखी सावंतच मिळेल."

सुबोध खरे's picture

8 Jun 2015 - 9:08 pm | सुबोध खरे

नशीब राखी सावंत तरी
मायावती नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्कं!!

धर्मांतर कुणी कशाकरिता करावे हा ज्याचात्याचा चॉईस झाला...असा उल्लेख खटकला.

नाव आडनाव's picture

8 Jun 2015 - 10:12 am | नाव आडनाव

+१

जूलियस नागेन्द्रनाथ विल्फ्रेड सिंग

श्रीरंग_जोशी's picture

8 Jun 2015 - 1:36 am | श्रीरंग_जोशी

लेख अन चर्चा वाचून मिपाकर राजघराणं यांची ही ब्लॉगपोस्ट आठवली - विज्ञानाच्या चष्म्यातून जाती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आंतरराष्ट्रीय डी.एन.ए. मिलापाचे राष्ट्रीय पातळीवरचं फसलेलं उदाहरण देउ काय? उगीचं आयडीला पंख लागायचे म्हणुन मोह आवरतो.

ग्रेटथिंकर's picture

8 Jun 2015 - 9:24 pm | ग्रेटथिंकर

कृपया राजकिय पंख धाग्याला लावु नयेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण ते फसलेल्या डीएनए काँबिनेशनचाच परिणाम आहे ना?

संदीप डांगे's picture

8 Jun 2015 - 9:29 pm | संदीप डांगे

हा हा चिमणराव... लय म्होटा सिक्सर...

थे येक्दम 'व्हाट इफ माय ब्युटी युवर ब्रेन?' चं मूर्तिमंत उत्तर हाय बरंका... उगाच नाय ज्यूपीटरच्या येलोशीट्टी स्पीडने ब्रेनचालत तेंचा...

बॅटमॅन's picture

8 Jun 2015 - 10:47 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2015 - 12:58 pm | श्रीगुरुजी

>>> आंतरराष्ट्रीय डी.एन.ए. मिलापाचे राष्ट्रीय पातळीवरचं फसलेलं उदाहरण देउ काय?

ते उदाहरण सगळ्यांना माहिती आहे हो.

अजून एक दुसरं उदाहरण म्हणजे "चार्ल्स शोभराज".

अजया's picture

9 Jun 2015 - 10:03 am | अजया

चिमणराव =))
एक्का काका ____/\____

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 12:14 pm | बॅटमॅन

एक्का काका आणि बाकी जाणकारांना एक नम्र विनंती आहे - गूळवाटप आणि गीतापठण यांचा इफेक्ट सर्व ठिकाणी होईल असे नसते. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 12:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गाढवासमोर वाचली गीता आणि नंतर प्रसाद वाटप म्हणुन त्याच गाढवाल गुळाचा नैवद्य. मजाय बॉ गाढवाची. =))

gogglya's picture

9 Jun 2015 - 12:48 pm | gogglya

स्थितप्रज्ञ...

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 12:33 pm | संदीप डांगे

काय आहे ना बॅटमॅनभाऊ, धागाकर्त्यांच्या 'गंभीर चर्चा करा' या आव्हानाने प्रेरित होऊन आम्ही भयंकर प्रयत्न करतोय पण चामारी, सर्व चर्चा धमाल इनोदी होत जात आहे.

हम्म, गंभीरपणे विनोदी चर्चा करू मग, हाकानाका.

सुरवातीला हा धागा माहितीपूर्ण वाटला होता पण एक्का काकांच्या प्रतिसादानंतर त्यातला फोलपणा जाणवला.
एवढं झाल्यावर धागा कर्ता अजूनही लढतोय याचे आश्चर्य वाटते.

अरे अजून मिपाकरांचेच यावर एकमत नाही तर केंव्हा सुरु होणार आंतरदेशीय/आंतरधर्मीय/आंतरखंडीय विवाह ??? केंव्हा होणार जनुकांचा विकास ? केंव्हा जन्म घेतील ते आर्यभ्हट्ट, आइन्ष्टाआइन ,शेक्सपियर, अलेक्झांदर, नेपोलियन पार्ट २

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 12:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धागाकर्त्याचा डीएनए म्युटेशन मुळे गंडलेला असावा.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा

यांच्याऐवजी सगळे पप्पू झाले तर??? =))

तर काही नाही, लोक खाऊन टाकतील.

(तेलुगुमध्ये पप्पु = डाळ.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

केंव्हा जन्म घेतील ते आर्यभ्हट्ट, आइन्ष्टाआइन ,शेक्सपियर, अलेक्झांदर, नेपोलियन पार्ट २

आसं नाय काय.... त्यानला आर्यपियर, अलेक्भट्ट, शेक्सक्झांदर, अलेस्टाईन, नेपोलाईन, आसं कायबाय पायजेल, तेबी आख्ख्या होल जगाच्या कल्याणासाठी आणि जबरदस्तीने !

ग्रेटथिंकर's picture

9 Jun 2015 - 7:10 pm | ग्रेटथिंकर

जबरदस्तीने आंतरजातीय/धर्मीय विवाह करा असे मी लेखात कुठेच लिहीलेले नाही.

हो..पण तुमचा चर्चा करण्याचा सूर दिसत नाही.. मी लिहिलंय त्याला हो म्हणा असं चाललंय..

पण आंतरभाषीय जनुक मिश्रणाची सर्व परिचित उदाहरणे कसे विसरून चालतील
१. हिंग्लिश = हिंदी जनुक + इंग्लिश जनुक (उदा . रतनसिंग वाशिंग्टन )
२. हिम्मराठी = हिंदी जनुक + मराठी जनुक ( गजोधर शृंगारपुरे )
३ मिंग्लिश = मराठी जनुक + इंग्लिश जनुक ( लक्ष्मिबाइ टेलर )

and so on …

ग्रेटथिंकर's picture

10 Jun 2015 - 6:05 pm | ग्रेटथिंकर

आंतरधर्मीय /वंशीय संकरातुन जन्मलेल्या व्यक्ती असतात जास्त आकर्षक आणि genetical fit
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1265949/Mixed-race-people...

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 6:14 pm | संदीप डांगे

तुम्ही आहात का?

बरं आलाच आहात तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्याल का जरा.. प्लीज.?

ग्रेटथिंकर's picture

10 Jun 2015 - 10:43 pm | ग्रेटथिंकर

ही अजुन एक लिंक नीट् वाचा
http://www.wikipedia.org/wiki/Population_bottleneck

population bottleneck (or genetic bottleneck) is a sharp
reduction in the size of a population due to environmental
events (such as earthquakes, floods, fires, disease, or
droughts) or human activities (such as genocide ). Such
events can reduce the variation in the gene pool of a
population; thereafter, a smaller population (of animals/
people) with a correspondingly smaller genetic diversity,
remains to pass on genes to future generations of offspring.
Genetic diversity remains lower, only slowly increasing with
time as random mutations occur. [1] In consequence of such
population size reductions and the loss of genetic variation,
the robustness of the population is reduced and its ability to
survive selecting environmental changes, like climate
change or a shift in available resources, is reduced.

Conversely, depending upon the causes of the bottleneck,
the survivors may have been the fittest individuals, hence
improving the traits within the gene pool while shrinking it.
This genetic drift can change the proportional distribution of
an allele by chance and even lead to fixation or loss of
alleles. Due to the smaller population size after a bottleneck
event, the chance of inbreeding and genetic homogeneity
increases and unfavoured alleles can accumulate.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jun 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गै गै करा ओ जरा.