अमेरीकेतून भारतामध्ये नेण्यासारख्या भेटवस्तू

सखारामगटणे's picture
सखारामगटणे in काथ्याकूट
3 Jun 2015 - 5:50 am
गाभा: 

भारत आता जागतिक बाजारपेठ बनत आहे त्यामुळेच बर्याचदा विदेशामधून परत येताना आपल्या आप्त्यस्वकियांसाठी काय भेटवस्तू घ्यावा असा मोठा यक्ष प्रश्न पडतो आणि उत्तराची गाडी चोकलेट्स, इलेक्ट्रोनिक्स, कपडे इत्यादीवर येऊन थांबते..

ह्यावर उपाय म्हणून मी अशी एक यादी crowdsource मार्गाने संकलित करत आहे. ह्या यादी मध्ये भारतामध्ये मिळणार्या पर्यायी वस्तूंपेक्षा स्वस्त व दर्जेदार असतील किंवा अजूनही भारतात उपलब्ध नाही अश्याच गोष्टींचा समावेश करण्याचा मानस आहे e.g. लिंट रोलर (http://www.amazon.com/3M-836R-OS-Lint-Roller/dp/B00006IA8Q)

ही यादी अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
यादी पहाण्यासाठी : https://goo.gl/SOshTC
यादी मधले तुमचे सजेशन टाकण्यासाठी : https://goo.gl/cSxuNt

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

3 Jun 2015 - 6:13 am | श्रीरंग_जोशी

थोडा वेळ द्या निवांतपणे टंकतो. तुम्ही दिलेल्या दुव्यावरही डकवीनच.

सखारामगटणे's picture

3 Jun 2015 - 7:41 am | सखारामगटणे

दुव्यावर डकवणे कठीण वाटत असेल तर इथे दिलेत तरी चालेल, मी तिकडे नंतर ह्या धाग्यावर येणार्या वस्तू एकत्र करून टाकेन. :)

श्रीरंग_जोशी's picture

3 Jun 2015 - 8:32 am | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत आल्यावर माझ्या पहिल्या भारतवारीत इतरांप्रमाणेही मी बहुतांश चॉकलेट्स वगैरे नेली. माझ्यापेक्षा वयाने लहान असणार्‍या चुलत भावंडांसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे स्पोर्ट्सवॉच, गॉगल, एमपी३ प्लेयर्स वगैरे.

आज्यांसाठी घरात घालायच्या मऊ चपला नेल्या होत्या.

पण दुसर्‍या वेळपासून चॉकलेट्स वगैरे नेण्याचे प्रमाण कमी केले. आजकाल भारतातही ही चॉकलेट्स मिळत असतात. भारतातल्या लोकांना फारसे अप्रुप राहिले नाही.

त्याऐवजी इथल्या बर्‍याच स्टोअर्समध्ये मिळणार्‍या गृहोपयोगी किंवा घर सजावटीच्या वस्तु नेऊ लागलो. फार महाग नसल्या तरी त्या वस्तु कल्पक असल्याने व भारतात सहजपणे मिळत नसल्याने सर्वांना खूप आवडल्या.

हे स्टोअर्स म्हणजे

एकदा मी लेडीबग्जच्या आकारातील सॉल्ट शेकर्स नेले होते. दिसायला एकदम लोभस असल्याने त्याचे फार कौतुक झाले होते.

तसेच लहान मुलांसाठी लहान सहानच पण कल्पक खेळणी. टॉइज आर अस हे स्पेशलाइझ्ड स्टोअर असले तरी खेळण्यांसाठी कुठलेही स्टोअर चालू शकतेच. तसेच बार्न्स अ‍ॅन्ड नोबल या बुकस्टोअरमध्ये देखील लहान मुलांसाठी उत्तम खेळणी व पुस्तकं मिळतात.

अशाच काही लहानसहान पण कल्पक गोष्टी वॉलग्रीन्समध्ये पण दिसतात.

माझ्या वडिलांसाठी नेलेला बाथरूम रेडिओ त्यांना फार आवडला होता. हेडफोन्स लावून रेडिओ ऐकण्याची सवय नसणार्‍यांसाठी फार उपयुक्त गोष्ट आहे.

तसेच ट्रेडर जो'ज मधले वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, मेक्सिकन केसर. कॉस्टकोमध्ये मिळणारे स्किनी पॉप पॉपकॉर्न.

डेल्टाच्या फ्लाइटमध्ये विकत घेता येणारे सुक्या मेव्यापासून बनलेले हे स्नॅक.

बरेचदा फ्लाइटमध्ये पण काही कल्पक वस्तु मिळतात. जेटच्या फ्लाईटमध्ये आम्ही एकदा रांगणार्‍या गणपतीची चांदीची मुर्ती घेतली होती.

पुढच्या भारत वारीमध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी अन डीक्स स्पोर्ट्समधून घरच्या घरी अ‍ॅरोबिक्स प्रकारचे व्यायाम करण्याची हलकी फुलकी साधने नेणार आहे.

सध्या एवढेच, अजुन आठवले की पुन्हा टंकीनच.

बाकी पॉवर सप्लाय लागणार्‍या वस्तु भारतात नेणे शक्यतो टाळा. मी फार उत्साहाने मिनी शिलाई मशीन, खूर्चीवर ठेवायचे मसाजर वगैरे नेले होते पण बरेचदा ते भारतात चालत नाही.

आदूबाळ's picture

3 Jun 2015 - 8:43 am | आदूबाळ

ग्रीन कार्ड?

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2015 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

५ किंवा १० पेटी गुंतवल्यास मिळू शकते :-) .

अधिक माहिती | संबंधीत बातमी

कपिलमुनी's picture

19 Jun 2015 - 6:57 pm | कपिलमुनी

५ किंवा १० पेटी $$

मृत्युन्जय's picture

3 Jun 2015 - 11:04 am | मृत्युन्जय

http://www.amazon.com/s/ref=nb_sb_noss?url=search-alias%3Dhpc&field-keyw...

बिक झेड ४+ पेन्स अमेरिकेत स्वस्तात मिळतात असे ऐकुन आहे. भारतात ते मिळतच नाहित. अमॅझॉन वर मिळतात पण बरेच महाग आहेत. कुणाला आवश्यकता असल्यास तिथुन आणुन देता येतील तुम्हाला गिफ्ट म्हणून.

मदनबाण's picture

3 Jun 2015 - 2:54 pm | मदनबाण

बिक झेड ४+ पेन्स
याची काय खासियत आहे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

आदूबाळ's picture

3 Jun 2015 - 3:13 pm | आदूबाळ

रोलरबॉल ०.७

लोण्यावरून घसरत गेल्यासारखं वाटतं...

पिलीयन रायडर's picture

3 Jun 2015 - 11:16 am | पिलीयन रायडर

धागा उपयुक्त आहे. काय काय मागवु शकते ह्याची आयती लिस्ट मिळेल. वा!!

पाटील हो's picture

3 Jun 2015 - 11:40 am | पाटील हो

Black Friday ला काय काय स्वस्त मिळतंय तेपण कळूदे .
mobile & कॅमरा चा काही अनुभव / details असतील तर तेपण सांगा .

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 12:04 pm | संदीप डांगे

चॉकलेटस हा पदार्थ मला वाटतं कधीच काढू नये या यादीतून. भारतात मिळणार्‍या चॉकलेटपेक्षा युरोप-अमेरिकेतली चॉकलेट्स दर्जा आणि चवीला उत्कृष्ट असतात. आणि त्याचे भरपूर वेगवेगळे प्रकारही असतात. भारतातल्या लोकांना इतकी चांगल्या दर्जाची चॉकलेट्स खावुन कंटाळा आलाय का?

असहमत. डार्क चॉकलेट ही एक अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. भारतातल्या बहुसंख्य जन्तेला "गोड नाही ते चॉकलेट कसले" असे वाटते. मीही त्यातलाच. त्यामुळे डार्क चॉकलेट आवडणार्‍यांपेक्षा न आवडणारेच जास्त पाहिलेत.

मृत्युन्जय's picture

3 Jun 2015 - 2:38 pm | मृत्युन्जय

पण डांगे डार्क चॉकोलेट्स बद्दल कुठे काही बोलले रे बॅट्या?

डार्क चॉकोलेट प्रेमी

डार्कुन्जय.

हम्म रैट्ट. तत्रस्थ चॉकलेट = डार्क असे समजल्यामुळे अंमळ घोळ जाहल्या गेला आहे.

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 2:52 pm | संदीप डांगे

:-)

आदिजोशी's picture

3 Jun 2015 - 2:09 pm | आदिजोशी

झिप्पो लायटर्स - इथे फार पॅटर्न्स मिळत नाहीत. जे मिळतात ते ठरावीक दुकानांतच.
परफ्युम्स - वरील प्रमाणेच प्ल्स भयानक महाग
घड्याळं - वरील प्रमाणेच

चौकटराजा's picture

3 Jun 2015 - 2:16 pm | चौकटराजा

लेक सुपॆरिअर आणा .यंदा 88 टक्के च पाउस पडणार म्हन !

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jun 2015 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

किमान दोन बाटल्या.

(नुकतीच आमच्या एका परममित्राने आमच्या साठी (मस्तानी या पेया ऐवजी ) बाटली आणली आहे याचा सुगावा लागलेला) पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 3:32 pm | श्रीगुरुजी

क्लॉक-रेडिओ ही एक उपयुक्त वस्तू आहे. भारतात ही वस्तू (बहुतेक) मिळत नाही. २२० व्होल्टवर चालणारे क्लॉक रेडिओ नेता येतील.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jun 2015 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी

हॉट अ‍ॅन्ड कोल्ड जेल पॅक - पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी यांचा सामना करण्यासाठी एक उपयुक्त साधन.

फ्रीझरमध्ये ठेवून गार करा, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १ मिनिट ठेवून गरम करा. आपल्या हॉटबॅगसाठी चांगला पर्याय.
मध्यमवयीन व वयस्कर लोकांसाठी खूपच उपयोगी वस्तू आहे.

नायकीच्या या चपला माझ्या आईला व सासुबाईंना आवडतात घरात व शतपावली वगैरे करताना...
आजकाल भारतातही मिळतात बहुधा पण महाग वाटतात.

Nike

मालविका's picture

4 Jun 2015 - 1:41 am | मालविका

माझ्या ४ वर्षाच्या मुलासाठी माझ्या नणंदेने अमेरिकेतून लीप रीडर आणला होत. डिजिटल पेन आणि त्याच्याशी रिलेटेड पुस्तक. खूप छान आहे ते . किंमत माहित नाही पण प्रकार छान होता .
http://www.leapfrog.com/en-us/products/reading-family

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 5:18 am | श्रीरंग_जोशी
  • डिजिटल लगेज स्केल - एकदा आम्ही नवी दिल्ली विमानतळावर स्वतःच्या बॅगांचे वजन चेक करत होतो. कुतूहलापोटी आजुबाजुचे दोनचार लोक येऊन चौकशी करून गेले. त्यांनी या कामासाठी वापरले जाणारे असे सुटसुटीत यंत्र कधीच पाहीले नव्हते.
  • सेलफोन स्टॅन्ड - काम करताना टेबलवर चतुरभ्रमणध्वनी ठेवायला अत्यंत उपयुक्त वस्तू.

डिजिट्ल लगेज स्केल भारी आहे. एक चांगला पर्याय जे वारंवार परदेशवारी करतात त्यांना. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

4 Jun 2015 - 7:33 am | मुक्त विहारि

स्कॉच

सखारामगटणे's picture

5 Jun 2015 - 8:35 am | सखारामगटणे

जगातली सर्वात कडक coffee!
http://www.deathwishcoffee.com/collections/death-wish-coffee

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 8:43 am | श्रीरंग_जोशी

कडक कॉफीप्रेमींसाठी कामाची गोष्ट.

यावरून आठवले - कुणाच्या तरी सूचनेवरून मी घरच्यांसाठी अमेरिकेतून टेस्टर्स चॉइस कॉफी नेली होती. माझ्या धाकट्या भावाला (तो चोखंदळ कॉफीप्रेमी आहे) खूपच आवडली. तेव्हापासून प्रत्येक भारतवारीमध्ये आवर्जून नेली जाते. यॉ कॉफीचे असेही पॅकेट मिळते की ज्यात छोटे छोटे सॅचेट्स असतात. त्यामुळे आर्द्रतेमुळे कॉफीचा गोळा बनण्याचा धोका टळतो.

Coffee

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2015 - 9:18 am | पिवळा डांबिस

इथल्या चॉकोलेट्स, इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे आता भारतात सहज मिळतात!! जय हो इंडिया!!!!
इथून कपडे तिथे नेण्यात काहीच पॉईंट नाही कारण ते तिथूनच इथे येतात!! :)
आमच्या कॅलिफोर्नियात तयार होणारे बदाम-पिस्ते वगैरे जर कौतुकाने नेले तर देशी निवासी लोकं जाहीर संस्थळांवर सरळ खुशाल नांवं ठेवतात! जसं काही ते रोज जेवणानंतर बदाम-पिस्तेच खातात!!!!
दारू वगैरे नेण्यात काही पॉइंट उरलेला नाही कारण,
नेलेली दारू (स्कॉच वगैरे) सगळी जवळचे नातेवाईकच हडप करतात, मिपाकर मित्रांना द्यायला काहीही शिल्लक उरत नाही, हा एक स्वानुभव!!! :(
मागे इथून नेलेल्या चार स्कॉच घरच्या घरीच हडप झाल्यामुळे माझ्या एका दिल्लीतल्या अत्यंत जवळच्या, केन्द्रिय मंत्रिमंडळात असलेल्या, मित्राला देण्यासाठी मला इथे रु. १२०० मध्ये मिळणारी शिवास रीगल तिथे रु. ५००० देऊन घ्यावी लागलेल्याची एक दु:ख्खद आठवण!!!!
(संपादित)
सारांशः इथून काहीही नेऊ नका, तिथेच मिळणारी काजू-कतली वगैरे घेऊन किलोभर द्या! बॅगेजवर पडणारा एक्स्ट्रॉ चार्ज वाचवा!!

सहमत.....

असे होवू शकते, म्हणून मी नातेवाईकांबरोबर दारू प्यायला बसत नाही.(अगदी मेहूणा असला तरी.)

पहिल्यापासूनच हे धोरण असल्याने, ते त्यांच्या घरी खूष आणि आमच्या घरी.

सुबोध खरे's picture

5 Jun 2015 - 10:06 am | सुबोध खरे

पि डां साहेब
कसा बोललात. १९८० साली आमचा मामा काश्मीरला गेला होता. तेंव्हा काश्मीरची सफरचंदे हे नाविन्य होते. प्रत्यॆकि अर्धा किलो आणायची ठरवली तरी वजन फार झाले असते. आमच्या मामाने क्रोफर्ड मार्केटला जाऊन तेंव्हा असलेली महागातली सफरचंदे घेऊन नातेवाईकांना दिली. सर्वांनी काश्मीरची आहेत म्हणून इतकी रसाळ आहेत म्हणत मिटक्या मारत खाल्ली. तसाच काहीसा प्रकार आहे. दोन पैसे जास्त गेले तरी तीच गोष्ट इथे विकत आणून देणे परवडते. बर्याच वेळेस या गोष्टी इथे स्वस्त मिळतात असा अनुभव आहे. डार्क चॉकलेट पासून टेस्टर्स चोईसपर्यंत --(रुपये १४८०/- २०० ग्राम साठी) सर्व गोष्टी येथे मिळतात) शिवाय इलेक्ट्रोनिक वस्तूंची ग्यारंटी इथे विकत घेतली असता मिळू शकते. जी जी गोष्ट तिथे मिळते ती जालावर गुगलून पहा भारतात मिळत असेल तर इथे येऊनच घ्या. बाकी जे वजन उचलायचे ते अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी उचला.

मराठी_माणूस's picture

5 Jun 2015 - 12:23 pm | मराठी_माणूस

संपादक मंडळ वर आलेल्या भारत सरकार बद्दलच्या अतिशय असभ्य प्रतिक्रियेबद्दल काही करणार आहे का ?
का , काहींच्या बाबतीत वेगळा न्याय आहे

बॅटमॅन's picture

5 Jun 2015 - 1:59 pm | बॅटमॅन

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मराठी_माणूस's picture

5 Jun 2015 - 3:10 pm | मराठी_माणूस

तुम्ही संमं वर आहात का ?

अरे मीच माझ्या अभिप्रायात संपादन करायला तयार आहे ना!!!
पण् असं बघ, की माझं ५००००- १२०० = रु. ३८०० चं नुकसान झालं, भारतीय सरकारच्या स्वार्थी आणि निर्लज्ज एक्साईज पॉलिसीमुळे!
जर तो कोण की कायसासां 'मराठी माणूस' ते नुकसान भरून द्यायला तयार असेल आणि मला त्या रकमेचा चेक पाठवायला तयार असेल तर तो चेक मिळताक्षणी मी स्वत:च माझा अभिप्राय दुरुस्त करायला तयार आहे.
पण ते जर करायची 'मराठी माणूस' याची तयारी नसेल आणि त्याला जर उगाचच फुकटची बोंबाबोंब करायची असेल तर त्यालाही तीच सदिच्छा जी मी भारतीय सरकारला केली होती!!!! ती म्हण आहे ना,
"पुट युवर मनी व्हेअर युवर माउथ इज!!!!!"
(इथे मधले बोट वर केलेली स्मायली कल्पावी!!)

माझ्या नुकसानाचं एक सोडा, ते झालं गेलं, मोदींच्या गंगेला मिळालं!
पण जर तो 'मराठी माणूस' त्या रकमेचा चेक मिपाच्या संपादकमंडळाच्या हाती देत असेल तर मी ती रक्कम भारतातल्या माझ्या पसंतीच्या एखाद्या चॅरिटीला द्यायला तयार आहे!!!
तेंव्हा होऊन जाऊंनच द्या एकदा!!!

बॅटमॅन's picture

7 Jun 2015 - 10:19 pm | बॅटमॅन

इंडीड. :)

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा पैसे द्या....आणखी भारी वाटेल ;)

द-बाहुबली's picture

5 Jun 2015 - 11:22 pm | द-बाहुबली

=))

काहीही नेऊ नका. भारतातल्या लोकांकडे जास्त महागामोलाच्या वस्तू असतात हा स्वानुभव आहे. एका शेतकरी घरातील (भावाच्या) मित्राने लाजेकाजेस्तव जावई लोकांना काय आणू म्हणून विचारले तर त्यांनी ल्यापटॉप मागितले. मक्काय, त्या मित्राच्या वडिलांनी सांगितले की आता तोंड वर करून विचारलयस तर जावयांना नाराज करू नकोस, अ‍ॅपल की काय म्हणतात त्याचे भारी कांपुटर घेऊन ये! या बिचार्‍याचे जे काय व्हायचे ते झाले. चेहर्‍यावर हसू आणत त्याने ते दोन्ही जावयांना दिले. आजपर्यंत उघडले नाहीत पण मागताना कायपण मागतात हा अनुभव ऐकून माझा भाऊ व आम्हीही चाट पडलो होतो.

जॅक डनियल्स's picture

5 Jun 2015 - 11:48 pm | जॅक डनियल्स

खूप चांगले पोस्ट आणि कोमेंटस आहेत.
मी अजूनही विद्यार्थी असल्याने माफक खरेदी करतो. पण माझ्या अनुभवातून इकडच्या लोकल गोष्टी भारतात आवडतात.
आमच्या गावात रसेल स्टोवर नावाची चॉकलेट कंपनी आहे त्याची चॉकलेटस भारतात मिळत नाहीत, ती आमच्या घरात जबरदस्त आवडतात.
दारूच्या बाबतीत, मागच्या वेळी टेनेसी ची देशी - मूनशाईन घेऊन गेलो होतो..२ बरण्या, एका बरणी मध्ये स्टोबेरी आणि दुसऱ्या मध्ये चेरी, १०० प्र्फू मध्ये मुरलेल्या.
अजूनही तीच बरण्यांची फर्माईश माझ्या मित्रांची नेहमी असते.

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2015 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

रसेल स्टोवर आमच्या घरी पण आवडतात.

त्याखेरीज मला स्वतःला खूप आवडणारे अन इतरांना खाऊ घालायला आवडणारे साधेसे चॉकलेट्स म्हणजे राफाएलो.

Rafaello

या चॉकलेट्सचे वैशिष्ट्य म्हणजे हे आकाराने अंगुरमलाईतल्या अंगुरांसारखे असतात. त्याखेरीज खीर कदम नावाची जी मिठाई असते तिच्या आत जसा पाक असतो तसाच या राफाएलो चॉकलेट्समध्ये असतो. वॉलग्रीन्समधे बर्‍यापैकी वाजवी किमतीत मिळतात.

भारतात ज्यांनीही हे खाऊन पाहिले त्यांना खूप आवडले.

मधुरा देशपांडे's picture

6 Jun 2015 - 12:16 am | मधुरा देशपांडे

राफाएलो साठी +१००. भारतात लहान मोठे सगळ्यांनाच खूप आवडतात हे.

राफाएलोबाबत सहमत.आम्हीही नेहमी ही चाॅकलेट्स देण्यासाठी आणतो.सर्वांना आवडतात आणि त्याच्या आकर्षक पॅकिंगमुळे द्यायलाही छान वाटतात.

हौ सहमत... काय जबरदस्त होती मूनशाइन.

मी माझ्या वडिलांसाठी या प्रकारची ट्रॉली नेली होती. त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त वस्तू आहे. विकत आणलेले सामान जड असल्यास पार्कींगपासून घरी उचलून नेण्याऐवजी या ट्रॉलीच्या साहाय्याने नेतात.

मी थेट दुकानातून विकत घेतली असल्याने ते नेमके मॉडेल ऑनलाइन दिसले नाही.

Trolly

मी इथे सुचवलेल्या बर्‍याच वस्तु भारतातही मिळत असतील पण निम्न-मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे भारतात त्या खरेदी केल्या जात नाही. म्हणून अशा वस्तू भारतात जाताना घरच्यांसाठी मी आवर्जून नेतो.

स्वतःचेच उदाहरण सांगतो. मी अमेरिकेत स्केचर्स कंपनीचे जे बुट ४०-४५ डॉलर्सला घेतले होते तेच घालून साडेपाच वर्षांपूर्वी पुणे सेन्ट्रल मॉल मध्ये गेलो होते. तेच बुट तेथे सुमारे ₹५,००० ला उपलब्ध होते.

तेव्हा काय अन आता काय एवढ्या किमतीचे बुट मी स्वतःसाठीही घेऊ शकणार नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2015 - 10:28 pm | बिपिन कार्यकर्ते

फारसे कुणी सुचवणार नाही अशी वस्तू ... पुस्तकं!

अनेक पुस्तकं भारतात फार महाग मिळतात. तिथे सेकंड हँड पुस्तकं खूप स्वस्त मिळतात.

अतिशय सहमत. अर्थात पुस्तकांची किंमत असलेल्यांनाच अशा गिफ्टा द्याव्यात, बाकी कम्बख्तांना तो गूळ पचणारा नव्हे.

राघवेंद्र's picture

7 Jun 2015 - 8:06 am | राघवेंद्र

धागा काढल्याबद्द्ल व श्रीरंग साहेबांच्या प्रतिसादा मुळे.

क्राफ्टचे साहित्य खुप स्वस्त वाल-मार्ट मध्ये मिळते. पुष्कळ personalised gifts बनतात. फोटो फ्रेम, नेकलेस इ.
जर काहिच घायचे नसेल तर हा एक पर्याय आहे.

मराठी_माणूस's picture

7 Jun 2015 - 12:23 pm | मराठी_माणूस

ती असभ्य प्रतिक्रिया संपादीत केल्या बद्दल संंमं चे आभार .

सखारामगटणे's picture

10 Jun 2015 - 9:29 pm | सखारामगटणे

चेपु वरील एका विडीओला पहाताना डिजिटल डुड्ज ब्रंडबद्दल समजले.. त्यांची टिशर्ट्स ची रेंज वैविध्यपुर्ण आहे..विशेषकरून जर तुम्हाला भयपट आवडत असतील तर नक्कीच १-२ टिशर्टस घेऊ शकता..
http://www.morphsuits.com/digital-dudz

पिलीयन रायडर's picture

19 Jun 2015 - 3:30 pm | पिलीयन रायडर

भारतात मिळणार नाहीत अशी लहान मुलांसाठी कोणती खेळणी अमेरिकेतुन आणता येतील?
१. घरातल्या सर्व चिल्ल्या पिल्ल्यांसाठी (१५-१२ मुलं) बजेट मध्ये काहीतरी
२. घरातल्या मुख्य पिल्लु साठी काही तरी भारी (वय ३)

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2015 - 3:37 pm | टवाळ कार्टा

१२-१५ मुले?????

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 5:48 pm | श्रीरंग_जोशी

या प्रश्नाचं उत्तर तीच मंडंळी देऊ शकतील जी वर्षातले काही महिने भारतात अन काही महिने अमेरिकेत राहतात. अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहणार्‍यांना अमुक वस्तु भारतात मिळेल का याची खातरजमा करणे सोपे नसते.

आम्हाला जी भावतात ती खेळणी घेऊन भारतात सुटीवर आल्यावर लहान मुलांना भेट म्हणून देतो.

माझ्या मते भारतात आजकाल बहुतांश गोष्टी मिळत असल्या तरी किमतीमुळे त्या खरेदी कराव्याशा वाटतीलच असे नाही. उदा. भारतात ₹१५०० ते ₹२००० चे खेळणे खरेदी करणे जीवावर येईल पण तेच अमेरिकेत $२५ किंवा $३० ला असेल तर सहजपणे खरेदी केले जाईल (हे सर्वांनाच लागू होईल असे नाही, मला नक्की होते :-) ).