लेपाक्षी - एक अदभुत स्थापत्य

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in भटकंती
30 May 2015 - 3:44 pm

सुचना : धाग्यात फोटो खुप जास्त आहेत, पूर्ण उघडण्यास वेळ लागू शकतो

भारतातील सर्वात मोठा नंदी, लटकणारा खांब, मुरल पेंटिंग आणि सुंदर शिल्पकाम इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायची संधि मिळते लेपाक्षीला. लेपाक्षी हे आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यातील एक गाव. बेंगलोरपासून जवळपास १५० किमी अंतरावर. ह्या गावात विजयनगर काळातील विरभद्राचे मंदिर आहे.

लेपाक्षीचे पौराणिक महत्व असे सांगितले जाते की, रावण ज्यावेळी सीतेचे हरन करून नेत होता तेंव्हा जटायूने त्याच्याशी युद्ध केले. रावणाने जटायुचे दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायु जमिनीवर कोसळला. आणि ती जागा लेपाक्षी. पुढे राम सितेच्या शोधात इथे आले आणि त्यांना जखमी अवस्थेतील जटायुने सर्व व्रुतांत सांगितला. रामाच्या आशीर्वादाने त्याला इथे मुक्ती मिळाली. सती आणि महादेवाचा विवाह इथेच झाला. आणि अगत्स्या मुनींनी इथे वीरभद्राची स्थापना केली.

मंदिराचा इतिहास. विरुपन्ना आणि विरान्ना नायक हे दोघे भाऊ विजय नगर साम्राज्याचे खजिनदार होते. त्यांनी विरभद्र स्वामींची मूर्ती सापडल्यावर त्यांनी मंदिराचे निर्माण करायचे ठरवले. आणि त्यासाठी राज्याचा खजिना राजाची परवानगी ने घेता वापरला. मंदिराचे बांधकाम अर्ध्याहून अधिक पूर्ण झाल्यावर राजाला ही बातमी समजली. चिडलेल्या राजाने विरुपन्नाचे डोळे फोडण्याची सजा सुनावाली. विरुपन्नला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने स्वत:च चाकून आपले डोळे काढले. मंदिराचा निर्माण अर्ध्यावरच थांबला. मंदिराचे तीन मुख्य भाग आहेत. गर्भगृह, नाट्य मंडप आणि कल्याणमंडप. कल्याणमंडपाचे बांधकाम पूर्ण झाले नाही.

मंदिर एका उंच चबुर्‍यावर बांधले आहे.
DSC_0378

थोड्या पायर्‍या चढून वर गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते
DSC_0387

आत गेल्यावर मुख्य मंदिर
building

प्रवेशद्वारावरील अप्सरांचे फोटो.

DSC_2131

entrance

DSC_2209

प्रवेशद्वारातून आतील नजारा
DSC_2138

नाट्यमंडप
DSC_2144

नाट्यमंडपातील सर्व खांबांवर विविध मूर्त्या कोरल्या आहेत. आणि इथच दडलं आहे एक आश्चर्य. हँगिंग पिलर अर्थात छतातून लटकनार एक खांब. त्याचा थोडासा इतिहास पाहूया. ह्या मंदिराचे रचनाकार होते विश्वकर्मा ब्राह्मण. विजयनगर साम्राज्यातील बर्याच मंदिरांचा निर्माण विश्वकर्मा ब्राह्मण करत. ह्या मंदिरात प्रत्येक खांबावर विविध मूर्त्या कोरल्यामुळे निर्माण मंदिराचा समतोल बिघड्ला. तो पूर्ववत करण्यासाठी हा खांब छतामधून लटकवण्यात आला. हा खांब पूर्वी सरळ होता. इंग्रजांच्या काळात कुण्या एका इंजिनियर अधिकार्याने मंदिरा भेट दिली, हा लटकता खांब काय त्याला पटेना. त्याने अव़जड यंत्रे वापरून खांब हलवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर मंदिरातील इतर खांब हलू लागले. काहि तिरपे झाले तर काही जागच्या जागी फिरले. खालच्या फोटोतील हाच तो मधला खांब. आजही कापड किंवा कागद खांबाखालून आरपार नेता येते.

DSC_0897

मंदिरच्या बाजूला असणारा अर्धवट राहिला कल्याण मंडप. इथे शिव-सतीच्या विवाह सोहळा उभारण्यात येणार होता.
ruins

मंदिराच्या मागे एक भव्य नाग आणि शिवलिंग आहे. हे कामगारांनी त्यांच्या फावल्या वेळेत बनवले होते.
DSC_2321

आणि मंदिराबाहेर असलेला प्रचंड मोठ नंदि.

Nandi

आता मंदिरातील इतर फोटो

पुन्हा एकदा नागलिंगेश्वर

Nagalingeshwar

मंदिराचे भव्य पटांगण
lepakshi4
अर्धवट बांधकाम
lepakshi2

मंदिराचा कळस
lepakshi1

कार्तिकेय
kartikeya

मंडपातील खांबावर कोरलेले देव
gods

लक्ष्मीची मूर्ती
godess

लक्ष्मीचा क्लोज अप
godess2

नागलिंगेश्वराच्या मागे असलेला मोठा गणपती
ganesh

मंदिराचा आवार
DSC_2365

अर्धवट मंडप
DSC_2345

DSC_2341

DSC_2337

DSC_2296

DSC_2284

DSC_2247

DSC_2236

DSC_2230

आता मंदिराच्या आतील फोटो

DSC_2228

DSC_2224

नर्तिका
DSC_2195

तीन पायांचा भृंगी. हा देवांचा नृत्य शिक्षक.
DSC_2172

किती मस्त पोझ आहे पाहा
DSC_2170

बाजूने फोटो
DSC_2152

महादेव भिक्षुकाच्या वेषात.
DSC_2164

चंद्रदेव
DSC_2158

सती महादेवाला भिक्षा देताना
DSC_2148

मंदिराच्या आवाराचे फोटो
DSC_2127

DSC_2126

DSC_2120

DSC_2110

DSC_2107

DSC_2100

DSC_0655

मंदिराच्या छतावरील रंगकाम
DSC_0736

DSC_0735

DSC_0734

DSC_0733

DSC_0732

DSC_0731

DSC_0728

DSC_0727

DSC_0725

DSC_0724

DSC_0723

DSC_0722

DSC_0721

DSC_0720

DSC_0719

DSC_0718

DSC_0717

DSC_0716

DSC_0715

DSC_0713

DSC_0711

DSC_0710

DSC_0707

DSC_0706

लेपाक्षी फारच छोटं गाव आहे. जेवणाची फारशी सोय इथं नाही. बेंगलोर हैद्रबाद हायवेवर जेवण करणे जास्त सोईस्कर राहील.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

30 May 2015 - 3:59 pm | सस्नेह

अतिभव्य आणि अतिसुंदर !
पूर्वजांच्या कलादृष्टीला आणि कसबाला सलाम . आणि इथे हे नयनरम्य शिल्प दाखवल्याबद्दल धन्यवाद !

एस's picture

1 Jun 2015 - 4:01 pm | एस

मेजवानी!

ज्योत्स्ना's picture

30 May 2015 - 4:38 pm | ज्योत्स्ना

हे ठिकाण माहितच नव्हते.खूप सुंदर ठिकाण आणि खूप सुंदर फोटो.

नाखु's picture

30 May 2015 - 5:00 pm | नाखु

मस्तच ! "साले आम्हीच कपाळ करंटे नविन निर्माण करणे दूर आहे तेच विद्रूप करण्यात आणि हेळसांड करण्यात धन्यता मानत आलो आहे."

लेण्याद्रीला भिंतीवर अनामिक प्रेम्-वीर खुणा वाचलेला
प्रत्यक्षदर्शी नाखु

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 9:50 am | पॉइंट ब्लँक

सुदैवाने दक्षिणेत हे खुळ फारसं पोचलेलं नाही. काय आनंद मिळतो लोकांना असं करून?

स्पंदना's picture

30 May 2015 - 5:04 pm | स्पंदना

किती सुंदर मुर्त्या आहेत?
अन त्या दिडशहाण्या इंग्रजाचा फार राग आलाय. वर्षानुवर्षे उभे राहीलेले हे मंदिर जणु त्याच्या शहाणपणाशिवाय पूर्णत्वाला जाणारच नव्हतं.

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 9:52 am | पॉइंट ब्लँक

एकदा सत्ता हातून गेलीकी, असा अपमान सहन करावा लागतं. मुघल, पोर्तुगिज आणि ईंग्रज ह्यांनी सर्वांनी नासधुस केली आहे आपल्या देशात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 May 2015 - 5:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो सुंदर आलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2015 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा

नंदी आणि नागोबा ए वन!

मितान's picture

30 May 2015 - 6:35 pm | मितान

आहाहा !!! सुंदर !!!!

दुर्गविहारी's picture

30 May 2015 - 7:18 pm | दुर्गविहारी

अप्रतिम हा एकच शब्द सुचतोय !!!

कंजूस's picture

30 May 2015 - 7:28 pm | कंजूस

अप्रतिम!!!आणि धन्यवाद!!!

प्रचेतस's picture

30 May 2015 - 8:15 pm | प्रचेतस

सुंदरच आहे मंदिर.
टिपिकल विजयनगर शैली.
प्रवेशद्वारावरील मूर्ती अप्सरा नसून गंगा आहे. ती मकरारूढ असून डोक्यावर जलकुंभ धारण केलेला आहे.
भित्तीचित्रांवरील ब्रह्मा, विष्णू, महेश, तुंबरु आदी सहजच ओळखू येत आहेत. ह्याशिवाय विजयनगराच्या सम्राटांचे राजचिन्ह वराह असल्याने ते बर्‍याच ठिकाणी रंगवलेले दिसतेय. एव्हढेच नव्हे तर एका चित्रात वराह मुसलमानांवर चक्क हल्ला करण्याच्या पावित्र्यात दिसत आहे.

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 9:53 am | पॉइंट ब्लँक

प्रवेशद्वारावरील मूर्ती अप्सरा नसून गंगा आहे. ती मकरारूढ असून डोक्यावर जलकुंभ धारण केलेला आहे.

दुरुस्तीबद्दल धन्यवाद. :)

कपिलमुनी's picture

30 May 2015 - 8:30 pm | कपिलमुनी

सुंदर फोटो.

बाकी धागा २ भागात विभागून टाकला असता तर उत्तम झाले असते

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 9:54 am | पॉइंट ब्लँक

बरोबर आहे तुमचं. पुढल्या वेळेस काळजी घेइन :)

मुक्त विहारि's picture

30 May 2015 - 8:30 pm | मुक्त विहारि

वाखूसा....

जुइ's picture

30 May 2015 - 10:27 pm | जुइ

भव्य मूर्ती आणि मंदिराच्या आतले फोटो खूप चांगले आले आहेत.
माझ्या मते लेखनात पूर्णविराम व 'आणि' यांच्या जागा चुकल्या आहेत.

पॉइंट ब्लँक's picture

1 Jun 2015 - 9:55 am | पॉइंट ब्लँक

नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2015 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर आहे हे मंदीर. भरपूर फोटोंमुळे त्याचे मस्त दर्शन झाले. धन्यवाद !

पाच सात फोटो इथे देऊन बाकीचे कलादालनात दिले तर धागा लवकर उतरेल.

चौकटराजा's picture

31 May 2015 - 12:50 pm | चौकटराजा

हे ठिकाण माझ्या हित यादीत आहे .आपले फ़ोटो मस्त.

मुक्त विहारि's picture

2 Jun 2015 - 2:42 pm | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीचे पण नांव असू द्या.

(आपला मेहुणा) मुवि

पाटील हो's picture

1 Jun 2015 - 10:35 am | पाटील हो

भन्नाट

विशाल कुलकर्णी's picture

1 Jun 2015 - 10:50 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम ....

मधुरा देशपांडे's picture

1 Jun 2015 - 4:09 pm | मधुरा देशपांडे

फारच सुरेख.

रंगवलेली चित्रं आवडली.

सानिकास्वप्निल's picture

1 Jun 2015 - 9:21 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम आहे, चित्रे फार आवडली.

पद्मावति's picture

1 Jun 2015 - 9:43 pm | पद्मावति

खरच अद्भुत आहे हे मंदिर. तुम्हीहि छान वर्णन केले आहे.

अप्रतीम. नागलिंगेश्वर आणि हँगिंग पिलरचे फोटो पाहिले होते अगोदर, पण बाकी पहिल्यांदाच पाहतो आहे. शिवाञ म्यूरल्स शिल्लक आहेत हे अतिशयच भारी. बहुत धन्यवाद पॉइंट ब्लँक साहेब, लय आवडले फटू.

सौन्दर्य's picture

2 Jun 2015 - 4:01 am | सौन्दर्य

इतके सुंदर फोटो, माहिती आणि वर्णन पुरवल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या सोबत लेपाक्षीला फिरुनच आलो असे वाटायला लागले.

पैसा's picture

2 Jun 2015 - 4:31 pm | पैसा

अप्रतिम आहेत फोटो!