पुरंदरला जायचे प्रयोजन आहे ..माहिती मिळेल का ?

कहर's picture
कहर in भटकंती
22 May 2015 - 11:03 am

उद्या सकाळी दुचाकीवरून पुरंदरला जायचे प्रयोजन आहे … या आधी कधी योग आलेला नाही. खालील बाबींची माहिती मिळेल का ?

१. ट्रेक व्यतिरिक्त वाटेवर आणि गडावर पहाण्यासारखे काय काय आहे ?
२. खाली पार्किंगची काय सोय आहे ?
३. गडावर खाण्याची आणि पाण्याची काय व्यवस्था आहे ?
४. वज्रगड पाहायचा झाल्यास एकूण किती वेळ लागेल दोन्ही गड फिरण्यासाठी ?
५. सोबत सौ असल्याने काही खास काळजी घ्यावी लागेल ?

प्रतिक्रिया

पुरंदर किल्ल्यावर जाताना एकतर पुरंदर पायथ्याला गाडी लावून वर जाणे किंवा घाटरस्त्याने पुरंदर माची पर्यंत थेट गाडीने पोहोचणे हे दोन मार्ग आहेत. माचीवर पार्किंगची सोय आहे. माचीपर्यंत दुचाकीने जाणे हे सर्वात बेस्ट कारण माची गडाच्या निम्म्या उंचीपर्यंत आहे. तेथून पुरंदरचा बालेकिल्ला केदारेश्वरपर्यंत जायला पाऊण तासाची चढाई आहे. केदारेश्वर बघणे अगदी मस्ट. यादवकालीन शिवमंदिर आहे. आणि तिथे जाण्याचा मार्ग अगदी स्वर्गात जाण्याची अनुभूती देतो. दोन्ही बाजूंना खूल दर्‍या आणि मध्ये उभ्या धारेवरुन भक्कम दगडी जिना.

माचीवरुन गेलात तर सुरुवातीस मुरारबाजी पुतळा, बिनी दरवाजा व त्यापुढे गडावर ब्रिटिशकालीन चर्चेस आणि पडिक अवस्थेतले निवासी बंगले आहेत. पुरंदरेश्वराचे यादवकालीन मंदिर आहे. तिथेच थंड पाण्याचे टाके आहे. पुरंदरेश्वर मंदिरासमोरून उजव्या बाजूने गेलात तर दिल्ली दरवाजातून आपला प्रवेश बालेकिल्ल्याच्या दिशेने होतो. तिथून सरळ वर चढत केदारेश्वर आणि त्याआधी राजगादी. केदारेश्वरावर अगदी तुफ्फान थंडगार वारं असतं नेहमीच.

केदारेश्वर बघायचा नसल्यास सरळ गेलात तर राजाळे तलाव पार करुन वज्रगड. वज्रगडावर दोन दरवाजांतून प्रवेश होतो. वर भलेमोठे खडक आहेत नुसते.
हल्ली वज्रगडावर जाऊ देत नाहीत.

पुरंदर किल्ला भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात आहे त्यामुळे जागोजागी चेकिंग चालू असते. तेव्हा स्वतःची ओळखपत्रे आणि हेल्मेट आवश्यक. गडावर सैनिक असल्याने फिरणे एकदम सुरक्षित आहे. गडावर टवाळी, छेडछाड असले प्रकार होत नाहीत.

गडावर प्यायचे पाणी आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या बाजूला चहा नाश्ट्याची पण सोय आहे. मात्र केदारेश्वरला जातान पाण्याची बाटली सोबत असू द्यावी.

साधारण २.३०/३ तास पुरेसे आहेत माचीवरुन.

वल्ली ने सांगितले आहे, म्हणजे काही जास्त बोलणे नाहीच .. तरीही आपले १-२ मुद्दे जोडतो ..

१. कुठल्या मार्गे जात आहात हे महत्वाचे..
कारण हडपसर वरुन गेलात तर जाधवगड पाहता येइल ( आता हॉटेल ला दिला आहे चालवायला त्यामुळे जास्त नाही तरी पण आहे जाता जाता हे लक्षात राहुद्या.

२. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुंरदरावरील, मान्य तो पडका वाडा ओसाड वाटतो, पण आपल्या एका असामान्य राज्याच्या जन्मस्थळी जाता आहात, आणि ते ही मे महिन्यात म्हणुन सांगतो. १४ मे हा संभाजी राजांचा जन्मदिवस

३. नारायण्पुर मार्गे येणार असला, तर नारायनपुर, प्रतिबालाजी.. अआणि करायचे असल्यास बनेश्वर पण करता येवु शकते,

बाकी पावसाळ्यात/ त्या नंतर या गडावर जायला मला जास्त आवडते..

ह्या लिंकचा उपयोग झाला तर पहा
किल्ले पुरंदर

धन्यवाद… या प्रतिसादाची प्रतच घेऊन जातो सोबत. म्हणजे काही विसरायला नको

बाबा पाटील's picture

22 May 2015 - 12:54 pm | बाबा पाटील

केदाररेश्वराला जाईपर्यंत ज्याम भुक लागते.वाटेत करवंदाच्या जाळी आहेत.ती तोडुन खा.आर्मीवाल्यांचे सहकार्य उत्तम असते पण त्यांनी आखुन दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त इकडे तिकडे भटकुन देत नाही. मंदिराजवळील माकडांपासुन सावध रहा.

माम्लेदारचा पन्खा's picture

22 May 2015 - 1:50 pm | माम्लेदारचा पन्खा

५. सोबत सौ असल्याने काही खास काळजी घ्यावी लागेल

गड चढताना सौ च्या बडबडीकडे जास्त लक्ष देऊ नका !
(घसरायला होतं हो....)

गड चढतानाच काय पण घरचा जीना चढताना पण लक्ष देत नाही ;)

काय हिम्मत म्हणावी तुमची !!
पण जीना चढल्यावर सौ. घरात घेतात का तुम्हाला ?

काळा पहाड's picture

22 May 2015 - 4:40 pm | काळा पहाड

गड चढताना सौ च्या बडबडीकडे जास्त लक्ष देऊ नका !

कुणाच्या?

माम्लेदारचा पन्खा's picture

22 May 2015 - 4:58 pm | माम्लेदारचा पन्खा

त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या सौबद्द्ल बोलत आहेत असे समजून उत्तरण्यात आले आहे... बाकी आमचा पास !!

तुषार काळभोर's picture

22 May 2015 - 4:27 pm | तुषार काळभोर

सासवडः कर्‍हानदीवरची २ मंदीरे (संगमेश्वर + चांगावटेश्वर) + सोपानकाका समाधी
नारायण्पूरः एकमुखी दत्तमंदीर + नारायणेश्वर शिवमंदीर
केतकावळे: बालाजीमंदीर
नसरापूरः बनेश्वर मंदीर
कोंढवा मार्गे जाणार असाल तरः हिवरे-शिवमंदीर + कानिफनाथ समाधी

विशाल कुलकर्णी's picture

23 May 2015 - 12:06 pm | विशाल कुलकर्णी

सकाळी शक्य झाल्यास पहाटे लवकर निघा म्हणजे पुरंदर आणि वज्रगड दोन्ही करता येतील. हे दोन्ही जुळे किल्ले आहेत. किंबहुना वज्रगड ही पुरंदरची ढाल होती (आहे). वज्रगड तुलनेने सोपा आणि लवकर होतो.दोन तास पुरेसे आहेत माचीपासून.

पुरंदर
P

केदारेश्वराकडे जाताना टिपलेला वज्रगड . मागची जी दोन शिखरे दिसतात ती वज्रगडाची आहेत.
v

कहर's picture

25 May 2015 - 12:13 pm | कहर

धन्यवाद … आपल्या सर्वांच्या मदतीने पुरंदर मोहीम शनिवारी फत्ते झाली … अनुभव लेखात मांडला आहे