साहित्यः
ब्रॉकोलीच्या एका गड्ड्याचे तुरे काढून रफली चिरुन घेणे
१ अंडे
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरूम
२-३ लसूण बारीक चिरलेले
१/२ टीस्पून काळी-मिरीपूड
१ टीस्पून मिक्स ड्राईड हर्ब्स
मीठ
१/२ वाटी चीझ (कुठलेही चालेल, आवडीप्रमाणे घ्यावे)
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ:
ब्रॉकोलीला वाफवून घेणे किंवा मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात थोडे पाणी स्प्रे करुन हाय पॉवरवर ३-४ मिनिटॅ वाफवून घ्या.
वाफवलेल्या ब्रॉकोलीला मॅशरने मॅश करुन घ्या.
दुसर्या भांड्यात अंडे फोडून घ्या, त्यात चिरलेला लसूण, चिरलेली मिरची, हर्ब्स, काळी-मिरीपूड व मीठ घालून फेटॄन घ्या.
हे अंड्याचे मिश्रण, चीझ व थोडा मैदा ब्रॉकोलीच्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करा.
तळहातावर छोटा गोळा घेउन त्याचे पॅटिस तयार करा.
नॉन-स्टीक तव्यावर थोडे तेल गरम करून तयार पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.
हे ब्रॉकोली फ्रिटर्स तुम्ही मिंट-योगर्ट डिप आणि टोमॅटो सॉससोबत गरमचं सर्व्ह करा.
नोटः
ह्यात जर अंडे घालायचे नसेल तर तुम्ही दुधाचा हबका मारून ही इतर जिन्नस मिक्स करु शकता.
ब्रॉकोलीच्या देठाचा भाग जाडसर असल्यामुळे तो कीसून घ्यावा जेणेकरुन वाफवल्यावर मॅश होईल, नुसते तुरे घेतले तरी चालतील.
मैद्याऐवजी बेसन ही बाईंडिंगसाठी वापरु शकता.
प्रतिक्रिया
21 May 2015 - 12:46 am | कपिलमुनी
_/\_
21 May 2015 - 12:49 am | स्रुजा
माते दंडवत घे. लगेच करणार आहे वीकांताला. अंड्याशिवाय सुद्धा करता येईल त्यामुळे झकास च.
21 May 2015 - 1:22 am | सुहास झेले
.. !!
21 May 2015 - 2:28 am | मधुरा देशपांडे
नवीन शब्द काही सुचत नाहीत सादरीकरणाचे कौतुक करण्यासाठी. तेच ते आपले नेहमीचे सुंदर, छान, अप्रतिम वगैरे वगैरे.
21 May 2015 - 2:39 am | श्रीरंग_जोशी
आणखी काय लिहिणार, नेहमीप्रमाणेच खास.
21 May 2015 - 3:25 am | मयुरा गुप्ते
प्रेझेंटेशन खासच.. नेहेमीप्रमाणे.
--मयुरा.
21 May 2015 - 4:04 am | रमेश आठवले
चविष्ट वर्णन आणि रुचकर फोटो. शेवटच्या फोटो कडे पाहिल्यावर या पदार्थाचे नाव ब्रॉकोली चीझ फ्रिटर्स लगोरी असू शकते असे वाटले .
21 May 2015 - 4:05 am | जुइ
केले जाइल, शिवाय अंडे न घालता सुदधा हे करता येते ते बरे झाले ;-)
21 May 2015 - 4:05 am | रुपी
सादरीकरणाच्या अशा नेहमी वेगवेगळ्या कल्पना कशा येतात बरं?
बाकी, बरंय, ब्रोकोलीचा आणखी एक उपयोग मिळाला!
21 May 2015 - 6:00 am | रेवती
काय भारी फोटू आलाय. नवीन कल्पना कशा सुचतात ते एकदा सांगच!
पाकृही वेगळी आणि छान. अंड्याऐवजी काय वापरावे हे सांगितल्याने पुढील चर्चा खुंटली. ;)
21 May 2015 - 9:05 am | अजया
ब्रोकोली यापुर्वी एकदाच कुठल्याश्या विमानात सॅलड म्हणून खाल्ली होती,वाफवलेली.काहीतरीच लागत होतं ते.आता तू लिहिलं आहेस तर धाडस करुन आणीन म्हणते ब्राॅकोली!
21 May 2015 - 9:12 am | सस्नेह
पदार्थाचे नाव आवडले नाही पण फोटो सादरीकरण लाजवाब !
22 May 2015 - 12:03 am | सानिकास्वप्निल
मी नाही ठेवले नाव ताई :)
ह्या पदर्थाचे हेच नाव आहे.
धन्यवाद.
21 May 2015 - 9:53 am | इरसाल
ब्रॉकोलीच्या एका गड्ड्याचे तुरे काढून रफली चिरुन घेणे
२/३ वेळा वरखाली जावुन शोधले हे "रफली" साहित्यात कुठे आहे. नंतर टुब पेटली बगा.
21 May 2015 - 10:58 am | अदि
हहपुवा!!!
21 May 2015 - 10:59 am | अदि
आली आली सानिकातै आली!!
21 May 2015 - 12:47 pm | स्नेहल महेश
नेहेमीप्रमाणे मस्त
21 May 2015 - 1:26 pm | Mrunalini
वा मस्तच... तसेही ब्रोकोली खुप आवडते.. आता हे करुन बघते एकदा.
21 May 2015 - 2:08 pm | दिपक.कुवेत
फोटो पाहून ह्र्द्यात बारीक कळ उठली....
21 May 2015 - 3:17 pm | पियुशा
孫大信 जापानी मध्ये तारीफ केली :)
22 May 2015 - 2:58 pm | रुस्तम
जापानी नव्हे चिनी ....
21 May 2015 - 3:21 pm | कविता१९७८
वाह मस्तच
21 May 2015 - 4:27 pm | कोकण कन्या
पाककृती झटपट आणि सोप्पी आहे...करून बघायला हवी लगेच च ....सादरीकरण खूपच छान आहे........
21 May 2015 - 4:44 pm | मोहनराव
ब्रोकोली खुप आवडते. करुन बघण्यात येईल.
बाकी नेहमीप्रमाणेच सादरीकरण लई भारी!!
21 May 2015 - 5:22 pm | नीलमोहर
ब्रोकोली ऐवजी अजून कशाचे करता येईल ?
21 May 2015 - 5:39 pm | सानिकास्वप्निल
फ्लाॅवर वापरूत करता येईल.
धन्यवाद.
21 May 2015 - 7:19 pm | सूड
मस्त!! बाकी अंड्याशिवाय काय वापरायचं हे आधीच सांगितल्यामुळे बाकी काय बोल्णार आता!!
21 May 2015 - 11:16 pm | इशा१२३
नविन पदार्थ कळला.फोटो नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.
21 May 2015 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा
21 May 2015 - 11:49 pm | स्नेहानिकेत
नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!!!!! सानिका तेरा जवाब नही !!!!
ब्रोकोली आवडतेच आणि सोप्पी पाकृ, नक्कीच करून बघणार.
22 May 2015 - 9:19 am | मुक्त विहारि
फोटो तर अजिबात बघीतले नाहीत.
22 May 2015 - 12:00 pm | मदनबाण
हे ब्रॉकोली फ्रिटर्स तुम्ही मिंट-योगर्ट डिप आणि टोमॅटो सॉससोबत गरमचं सर्व्ह करा.
हे आमच्यासाठी आयतं करुन मिळायला हवे बघा ! :)
च्यामारी...लयं भूक लागली आता !
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
22 May 2015 - 3:05 pm | अत्रन्गि पाउस
थोडा कुस्करलेला बटाटा घातला तर ?
22 May 2015 - 3:47 pm | उमा @ मिपा
नाव, पाकृ, फोटो सगळं tempting! नक्की करणार गं.
25 May 2015 - 2:26 pm | अनुप७१८१
नुसते फोटो अपलोड करु नका.... खायला पण बोलवा !
25 May 2015 - 10:32 pm | पद्मावति
फोटो.....एक नंबर...!!!
25 May 2015 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच ! अजून काय ?!
29 Jul 2015 - 3:49 pm | झंप्या सावंत
आपले चरण स्पर्श करावा म्हणतो माते