माहिती हवी आहे - राजस्थान, पंजाब भटकंती.

मोदक's picture
मोदक in भटकंती
19 May 2015 - 5:30 pm

नमस्कार मंडळी..

जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे.

सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्‍या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे.

एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत. राखीव दिवसही गृहीत धरले आहेत.

...तर या संदर्भात पुढील माहिती हवी आहे,

१) पुणे - अहमदाबाद - अमृतसर या रस्त्यावरून जाताना व येताना प्रवास होणार आहे.
अहमदाबाद नंतर जोधपूर मार्गे किंवा उदयपूर मार्गे असे दोन रस्ते दिसत आहेत. पुढेही वेगवेगळे रस्ते अमृतसर ला पोहोचत आहेत. यांपैकी कोणत्या रस्त्याने जावे..?

२) "पुणे ते अमृतसर - ३ दिवसात..!" असे काही ठरवले नाहीये. एखादा दिवस गुजरातमध्ये, एखादा राजस्थानमध्ये वाढला तरी हरकत नाहीये. त्यामुळे नेहमीची टूरीस्टछाप ठिकाणे टाळून एखाद्या वेगळ्या ठिकाणाची माहिती असल्यास अवश्य कळवावे.

३) या सफरी दरम्यान कोणती ठिकाणे आवर्जून पहावीत..?

४) खादाडी हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. अहमदाबाद, जोधपूर, उदयपूर आणि एकंदर पंजाबमध्ये विशेष अशी काय खादाडी करता येईल?

५) आणखी काही सुचना..?

**********************************************************
*वाघा बॉर्डरवर वेडेपणा सुरू असतो / तमाशा असतो वगैरे माहिती पूर्वी वाचली आहे - तरीही भेट द्यायची आहे.
**********************************************************

प्रतिक्रिया

अमृतसर मध्ये केसर दा धाबा मध्ये जेवण आणि गुरुदास राम दी जलेबी खाणे अज्जिबात न विसरणे. या दोन्ही जागा रात्री ९ पर्यंत सुरु असतात. केसर मधल्या सारखे पालक पनीर मी उभ्या आयुष्यात कुठेच कधीच खाल्लं नाही. अप्रतिम !
आणि भाई कुलवंत सिंग दी कुल्चीया- या फक्त सकाळी नाष्ट्यालाच मिळतात. या सगळ्या जागा सुवर्ण मंदिराच्या आसपासच आहेत. आणि खरेदी करायची असेल तर मेन मार्केट मधली बहुतेक सगळी दुकाने सोमवारी बंद असतात हे लक्षात ठेवणे. बाकी तुमच्या रोड ट्रिपला शुभेच्छा !

नेमक्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!

नोंद घेतली आहे.

अमृतसर मध्ये केसर दा धाबा >>> अगदी हेच टंकायला आले होते! शिवाय रस्त्यांत बर्‍याच गाड्यांवर मिळणारा मोसंबीच्या रसाचाही आस्वाद घ्या. वाघा बॉर्डरला लस्सी छान मिळते.

जोधपूर येथे एका मार्केट मध्ये कुर्त्या बर्‍याच स्वस्तात मिळाल्या होत्या. नाव आठवत नाही. घरी जाऊन सापडले तर सांगते. अहमदाबाद- जोधपूर रस्त्यात पावापुरी जैन तीर्थ आहे. मंदिर वगैरे छान आहेच, पण जेवणाचा थाट काय वर्णावा? बरेच रुचकर पदार्थ आणि वाढायला सारखी राजस्थानी वेषातल्या वाढप्यांची रांग! आठवूनच भूक लागली!

टवाळ कार्टा's picture

19 May 2015 - 5:46 pm | टवाळ कार्टा

उदयपूर, जयपूर चुकवू नये...जमल्यास शक्य तेव्हडे फिरावे...माऊंट आबू झालेतर आणखी मज्जा
रणथंबोर आहे

खंडेराव's picture

19 May 2015 - 6:01 pm | खंडेराव

सुवर्णमंदीर एक जबरदस्त अनुभव आहे. एक पहाटे दर्शन आणि एक रात्री, जरुर करा.
बाईकवर जाताय म्हणजे मजा येइल. अम्रुतसर मधे भर्वान दा धाबा ही उत्तम आहे.
जर वेळ असेल तर एक चक्कर धरमशालाला टाका, २०० किमी असेल अम्रितसर पासुन, मस्त जागा आहे. मॅकलोइडगन्ज ला रहा. एक अजुन राज्य होइल.

आदूबाळ's picture

19 May 2015 - 6:06 pm | आदूबाळ

गुजरातच्या उत्तर सीमेवर - माऊंट अबूपासून पन्नासेक किलोमीटरवर अंबाजी नावाचं देवस्थान आहे. खूप छान मंदिर आहे. मी गेलो होतो तेव्हा तिथे लंगर/प्रसाद मिळत असे. सध्याचं माहीत नाही. (कोणा गुजराथ्याला विचारणे - अंबाजी लय फ्यामस आहे.)

इरसाल's picture

19 May 2015 - 6:09 pm | इरसाल

अम्रित्सर के बाज्जुवाळा हुसैनीवाळा ब्बाड्डर भी देखके आईयो !

मोदक's picture

19 May 2015 - 6:16 pm | मोदक

हेच नाव हवे होते.

या ठिकाणाची आणखी माहिती आहे का..?

चिमी's picture

20 May 2015 - 12:39 pm | चिमी

इथे नक्की जा. इथे भगतसिंहची समाधी आहे.
हा धागा पहा : http://www.misalpav.com/node/28193

इरसाल's picture

20 May 2015 - 1:30 pm | इरसाल

अमृतसर जवळील हुसैनीवाला बॉर्डर वर गेलात तर कार्यक्रम तोच पण शांततेत, माफक घोषणा, संचलन (पाय आपटुनच याला पर्याय नाही) वर तिथेच भगतसिंह इ. च्या समाधी व्यवस्थित काळजी घेवुन राखलेल्या आहेत. तसेच पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात तिथल्या इमारतींवर पडलेल्या तोफगोळ्यांच्या खुणाही पहावयास मिळतात.
भगत सिंह व इतरांच्या समाधीवर उर अभिमानाने आणी डोळे पाण्याने भरुन येतात. ही तिच जागा आहे जिथे त्यांना "तडकाफडकी फाशी दिल्यानंतर" त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन आणुन अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला होता.

तुला सांगतो, जेव्हा त्या समाधीच्या जागी जाशील तेव्हा जर तुला आवंढा गिळवला नी मनात तिथे नतमस्तक न होण्याचा विचार आला तर तु म्हणशील ती पैज हरायला तयार आहे. हे टाईपतानासुद्धाडोळ्यात पाणी नी गळा दाटुन काटे येत आहे अंगाला. जाच नक्की.....तुला तुझ्या बुलेटची शप्पथ.

इरसालबुवा - नक्की जाणार...!!!

धन्यवाद चिमी!!

पिलीयन रायडर's picture

19 May 2015 - 6:12 pm | पिलीयन रायडर

प्लिझ नोट- शॉपिंगची लिस्ट देण्यात येउ शकते!

पुण्यात चांगली फुलकारी ओढणी न मिळाल्याने अमृतसरला जाणार्‍या बकर्‍याच्या शोधात होतेच!!
धन्यवाद!!

मोदक's picture

19 May 2015 - 6:14 pm | मोदक

कोण आपण? :)

टवाळ कार्टा's picture

19 May 2015 - 6:22 pm | टवाळ कार्टा

खाटकाला विचारले तर तो फ्लेक्स लावून सांगेल =))

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 May 2015 - 6:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

रुट माहीती नसल्याने जास्त बोलत नाही...आल्यावर प्रवासवर्णन टाकायला विसरु नका.

चौकटराजा's picture

19 May 2015 - 7:57 pm | चौकटराजा

पंजाब मधे पहाण्यासारखे म्हणजे चंदीगड अप्रतिम रॉक गार्डन,रोज गार्डन,व संग्रहालय ! वाघा बॉर्ड्रर ला काय पहायचे ?
मी पक्का महाराष्ट्रीयन जेवणाचा भोक्ता असल्याने माझे जेवणाचे पंजाबात फार हाल झाले. राजस्थान मधे जेवण ठीक. माउंट अबू चे जैन मंदिर ताज पेक्षा ही सुंदर . पण ते जाउन दे उदय पूर ला जाणार असल्यास इथे जवळच एक खादाडीला योग्य असे ठिकाण आहे जिथे खरेदी पण करता येते. त्याचे नाव आठवत नाही. अबू रोड ला रबडी भन्नाट. .

अहमदाबादपासून १०० किमीच्या परिघात पाटणला राणी की वाव आणि मोढेरा गावात सूर्यमंदिर आहे. जमल्यास ते जरुर बघ.

चौकटराजा's picture

19 May 2015 - 8:06 pm | चौकटराजा

अगदी अगदी बरोबर !

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2015 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

धन्यवाद वल्ली, चौरा आणि बुवा. लिस्टमध्ये अ‍ॅडवले आहे. कसे जमते बघु!!

चित्रगुप्त's picture

19 May 2015 - 8:23 pm | चित्रगुप्त

राजस्थानच्या शेखावटी भागात अतिशय सुंदर, भव्य हवेल्या, मंदिरे, किल्ले, महाल वगैरे असून त्यांच्या भितीवर मोठमोठी चित्रे रंगवलेली आहेत. मोठे शहर 'मंडावा' हे आहे, अन्य लहान गावांमधेही खूप काही बघण्याजोगे आहे. वाटेत पडत असेल तर - वा जरा वाकडी वाट करूनही - बघण्यालायक जागा.
शेखावटीतील एक इमारतः
.

कपिलमुनी's picture

19 May 2015 - 8:56 pm | कपिलमुनी

प्रवासाला शुभेच्छा !

जयपुर्,उदयपुर्,चित्तोड,हल्दी घाटी सगळेच सुरेख आहे.जरूर जावे.
प्रवासाला शुभेच्छा!

विलासराव's picture

20 May 2015 - 9:56 am | विलासराव

Brothers dhaba mast aahe.
Sant namdev Samadhi aahe tikde ,aawad aslyas jawe.
१ Aug la mihi Leah_ladakh lady Janar aahe kahi mahiti asel tar share karawi.

विलासराव - तुम्हाला १ ऑगस्ट ला लेह लडाख "कडे" जायचे आहे ना..? ;)

तुम्हाला नक्की काय काय माहिती हवी आहे..? एक वेगळा धागा काढा म्हणजे बाकीचे लोक पण भर घालतील..

तोपर्यंत आपल्या मनरावची लेह वारी
आणि
माझा सायकलीस्ट मित्र केदार जोशी याचे "माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - १२ पासेस, ९ लेक्स अर्थात लेह-लडाख."
हे नक्की वाचा. भरपूर माहिती मिळेल.

आम्ही या एक दोन वर्षांमध्ये सायकलने लेह लडाख करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे ती माहिती मिळवण्याचेही काम सुरू आहेच.

विलासराव's picture

20 May 2015 - 2:42 pm | विलासराव

२ la jammu la utaru. Tithun kashmir , kargil, leah pahun yetana manali Marge १६ Aug la dilli ani parat.
Fakt jatana jammu ani yetana dilli te mumbai railway ticket book kele aahe. Baki prawas man manel tasa randomly.

सिरुसेरि's picture

20 May 2015 - 12:45 pm | सिरुसेरि

जेसलमेर , पुष्कर , हल्दीघाटी , चितोड , बिकानेर , पटवोंकी हवेली , अडाइ दिन का झोपडा , सहेलियोंकी बाडी , भरतपुर - केवलदेव अभयारण्य तसेच येथुन फतेहपुर सिक्रि सुद्धा जवळ आहे , करणीमाता मंदीर - येथे खुप उंदीर असतात व त्यांची काळजी घेतली जाते . पांढरा उंदीर दिसणे भाग्याचे मानले जाते . जयपुर मधील ऐतिहासिक स्थळांबरोबरच तेथिल राजमंदीर हे चित्रपटग्रुहही बरेचजणं आवर्जुन बघतात . हवामहल , स्थानिक कलाकारांचे सरकारी कलादर्शन केन्द्र ( न्रुत्य , गायन , बासरि वादन , पपेट शो ), जैन मंदिरे , गिरिधरजी मंदीर असे बरेच काही आहे .

सर्व प्रतिसादकांचे भरपूर आभार्स.

आणखी माहिती मिळवत आहे व कांही शंका असल्यास (येथेच) विचारेन.

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 6:18 pm | दिपक.कुवेत

नको रे जीव जळवूस.....एनी वे प्रवासास शुभेच्छा आणि प्लीज आल्यावर वर्णन वगैरे अजीबात टाकू नकोस