मॉकटेल: मँगो पॅशन

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
7 May 2015 - 12:01 pm

passion 1

साहित्यः
१. हापूस आंब्याचा पल्प - २ कप
२. फ्रेश ऑरेंज ज्युस - १/२ कप
३. सोडा - १/२ कप
४. व्हॅनीला आईसक्रिम - ३ मोठे चमचे
५. आईस क्युब्स - ८ ते १०
६. चवीनुसार पीठिसाखर **

कृती:

१. दिलेलं सर्व साहित्य ब्लेंडर मधे मिक्स करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
२. आपापल्या आवडिप्रमाणे सजवुन गाssssरेssssगार मँगो पॅशन पेश करा

** माझ्या मते मॉकटेल मधे साखर घालत नाहि पण ऑरेंज ज्युस मुळे पिताना जरा जरी आंबटपणा जाणवला तर सगळाच मुड जाईल म्हणुन पीठि साखर घातली आहे जेणेकरुन पटकन मिक्स होईल आणि पिताना साखरेचे कण लागणार नाहित.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 May 2015 - 12:02 pm | प्रचेतस

छळवादी माणूस.

काळा पहाड's picture

7 May 2015 - 12:14 pm | काळा पहाड

कुठे फेडतील ही पापं?

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू हत्ती!

दुत्त दुत्त दीपू!

किसन शिंदे's picture

7 May 2015 - 12:02 pm | किसन शिंदे

जबरडस्ट!
रच्याकने आंब्याचे तसे काप कसे केले??

नीलमोहर's picture

8 May 2015 - 11:42 am | नीलमोहर

आंब्याची मोठी फोड घेउन त्याला उभ्या आड्व्या चिरा द्याय्च्या,शंकरपाळी प्रमाणे, पूर्ण कापायचे नाही.
मग फोड थोडी मागून वाकवायची, झाले !!

दिपक.कुवेत's picture

8 May 2015 - 8:50 pm | दिपक.कुवेत

किस्न्याला हे विस्कटून कसं सांगायचं हाच प्रश्न होता. धन्यवाद माझं काम केल्याबद्दल.

वा!कसलं सही दिसतंय!!करुन पाहिल्या जाईल.

त्रिवेणी's picture

7 May 2015 - 1:54 pm | त्रिवेणी

क रु न झा ल की सां गा म ग च ये ई न मी.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 12:17 pm | टवाळ कार्टा

ऑरेंज ज्युस असायलाच हवा का?

सानिकास्वप्निल's picture

7 May 2015 - 1:01 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पेयाकृती.
आईसक्रिम + कोल्ड ड्रिंक (मिरिंडा वगैरे) असे काँबि ट्राय केले आहे ते छान लागतं पण मँगो पल्पसोबत ऑरेंज ज्युस असायलाच हवे का? नाही घातला तर चवीत फरक पडेल का?

दिपक.कुवेत's picture

7 May 2015 - 1:28 pm | दिपक.कुवेत

ऑरेंज ज्युस वगळला तरी चालेल. चवीत विशेष असा फरक पडणार नाहि. त्या एवजी फ्रेश क्रिम घालू शकता. अजून रिचनेस येईल.

क्रिम ची आयडिया जास्त आवडली. या महिन्याअखेर मिळणार आम्हाला पण हापुस चे आंबे, मग लगेच करणार. जीवघेणा फोटो आहे.

कविता१९७८'s picture

7 May 2015 - 12:48 pm | कविता१९७८

मस्तच

पैसा's picture

7 May 2015 - 1:13 pm | पैसा

तुला बॅन करायला सांगते थांब!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2015 - 3:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

जोरदार हणुमोदण

फार छळतो हा माणुस.

उन्हाळ्यात तर नको जीव करुन टाकतो.

पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. मी व्हॉट्सअ‍ॅप गृपवर पण हेचं ओरडतोय केव्हाचा. त्रास आहे हा माणुस. =))

सस्नेह's picture

7 May 2015 - 1:41 pm | सस्नेह

दु दु दीपक !!
मँगो दीवाना...

मधुरा देशपांडे's picture

7 May 2015 - 2:10 pm | मधुरा देशपांडे

झाली का मँगो सिरीज परत चालु, छळा आता अजुन.

विजुभाऊ's picture

7 May 2015 - 2:11 pm | विजुभाऊ

घ्या दिपक शेठ.
http://www.misalpav.com/node/1398
http://www.misalpav.com/node/6675
वाचत मस्त येन्जॉय करा

ते ठीकाय, ह्यात पनीर कधी घालायचं म्हणे? रेशिपी अर्धीच वाटत्ये. ;)

आपणाला अंडं असं म्हणायचं आहे काय ?

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 3:51 pm | टवाळ कार्टा

नै...दीपक भौ मिपावर दिपक पनीरवाले म्हणून वल्डफेमस आहेत :)

सूड's picture

7 May 2015 - 4:07 pm | सूड

बिंगो!!

पुण्याचं पाणी पोटात गेल्यावर पोरगं कसं हुशार झालंय बघा!!

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा

मी एकच दिवस पुण्याचं पाणी प्यायलोय म्हणून...तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))

तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))

असं का? बरं!!

स्वाती दिनेश's picture

7 May 2015 - 7:39 pm | स्वाती दिनेश

मॉकटेल टॉप दिसतय!
स्वाती

मोहनराव's picture

7 May 2015 - 9:06 pm | मोहनराव

फोटो बघुन खपल्या गेलो आहे... किती तो छळ!! (लाळ गाळणारी स्मायली...... )

नूतन सावंत's picture

7 May 2015 - 10:33 pm | नूतन सावंत

मस्त,दीपक.सुरेख पेयाकृती.अतिसुंदर सादरीकरण.केलीच पाहिजे.पण मीही ऑरेंज ज्यूस वगळून फ्रेश क्रीम वापरून करेन.सानिका पेयाकृती हा शब्द आवडला.

स्वाती२'s picture

8 May 2015 - 12:27 am | स्वाती२

मस्तच!

रुपी's picture

8 May 2015 - 12:37 am | रुपी

सुंदर सादरीकरण!

सुघोषा's picture

8 May 2015 - 7:30 am | सुघोषा

अगदी जानलेवा !!!

खतरनाक फोटो...पाकृ पण मस्त!!

पाकृ छानच...फ्रेश क्रीम घालून करुन पाहीन.

दिपक.कुवेत's picture

8 May 2015 - 8:51 pm | दिपक.कुवेत

पॅशन एकदा जरुर ट्राय करा...

केतकी_२०१५'s picture

8 May 2015 - 9:54 pm | केतकी_२०१५

सुन्दर!
मी जरूर प्रयत्न करीन.

पियुशा's picture

9 May 2015 - 10:42 am | पियुशा

वॉव !!

कवितानागेश's picture

9 May 2015 - 2:32 pm | कवितानागेश

अरे दुष्टा!

का रे आम्हा सामन्य मनुष्यांवर अत्याचार करतोस तू ? ;)
इथे डाळ विकत घेण्याचे वांदे आहेत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)

नगरीनिरंजन's picture

9 May 2015 - 5:49 pm | नगरीनिरंजन

नावावरुन मँगो आणि पॅशनफ्रुट असेल असे वाटले होते; पण हरकत नाही. झकास दिसतंय.

सविता००१'s picture

10 May 2015 - 10:17 pm | सविता००१

कसली मस्त पाकृ आहे....... झक्कास

भाते's picture

11 May 2015 - 8:12 pm | भाते

कालच आस्वाद घेऊन झाला.
फक्त 'सोडा - १/२ कप' ऐवजी मी 'थोडीशी… व्होडका' इतकाच बदल केला आणि... वरती आणखी बर्फाचे खडे टाकले. :)

दिपक.कुवेत's picture

12 May 2015 - 11:12 am | दिपक.कुवेत

आल्यावर सीजन असला तर व्होडका घालून परत प्यायचा आनंद लूटू. १५ जून ला बहूतेक डोंबोलीत असणार आहे. काहिही सबब न सांगता तू मला नंदी पॅलेस ला भेटतो आहेस.

मुक्त विहारि's picture

13 May 2015 - 6:30 pm | मुक्त विहारि

नक्की ना?

दिपक.कुवेत's picture

13 May 2015 - 8:07 pm | दिपक.कुवेत

हो निदान सध्याच्या कार्यक्रमानुसार. एनीवे पुणे कट्टयाला क्न्फर्म सांगीनच.

यशोधरा's picture

12 May 2015 - 10:52 am | यशोधरा

दुष्ट माणसा!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

13 May 2015 - 6:23 pm | ईश्वरसर्वसाक्षी

मँगो शेक घरी कसा करता येइल, इथे जर कोणि आधि क्रुति दिली असेल तर लिंक मिळेल का?

मुक्त विहारि's picture

13 May 2015 - 6:31 pm | मुक्त विहारि

बस्स इतना ही कर सकते हय.

प्यारे१'s picture

14 May 2015 - 12:00 am | प्यारे१

व्हॉट दी-पक????
काय हे छळवादी प्रकरण.

पाटील हो's picture

3 Jun 2015 - 11:53 am | पाटील हो

भारी …… कालच करून घोटलो , मज्या आली

पाकृ वर आणतोय हो.....