हिवाळ्यात व्हेगस

कोलबेर's picture
कोलबेर in काथ्याकूट
14 Nov 2007 - 11:13 pm
गाभा: 

मंडळी ह्या नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही लास व्हेगस आणि ग्रँड कॅन्यन असा दौरा करायचे ठरवले आहे. ह्यावरील मिसळपाव सदस्या 'प्रियाली' ह्यांच्या उपक्रमावरील लेखातुन बरीच माहिती मिळाली (किंबहुना तेव्हापासुनच व्हेगसचा किडा वळवळू लागला होता!) ती माहिती आणि जालावरचा शोध ह्यांची मदत घेउन फ्लाईट आणि स्ट्रीप वरील हॉटेलचे बुकींग केले.

पण ग्रँड कॅन्यन येथील नॅशनल पार्क मधील विश्रामगृह बुक करताना व्हेगसहून ग्रॅंड कॅन्यनला जाणारे रस्ते हिवाळ्यात बर्फ पडल्यास कधी कधी बंद असतात अशी माहिती मिळाली. आमचा वेगसहून कॅन्यनला स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचा विचार असल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली.

नॉर्थ रीम ही हिवाळ्यात बरेचदा बंद असते परंतु साऊथ रीम आणि 'झायॉन नॅशनल पार्क' इथपर्यंत पोहोचण्यास डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कितपत अडचण येऊ शकते? तसेच ह्यावर्षीचे त्या भागातील बर्फ पडण्याचे अनुमान जालावर कुठे मिळेल?
धन्यवाद
-कोलबेर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Nov 2007 - 11:32 pm | विसोबा खेचर

वरूणदेवा,

आपल्या दौर्‍याकरता आमच्या शुभेच्छा!

दौरा कसा झाला, काय काय मजा केलीत ते मिसळपाववर अवश्य लिहा बरं का! :)

तात्या.

कोलबेर's picture

15 Nov 2007 - 12:07 am | कोलबेर

तात्या शुभेच्छांबद्दल आभार! दौरा यशस्वी झाला की सचित्र लेख मिसळपाववर नक्की टाकतो.

नंदन's picture

15 Nov 2007 - 12:40 am | नंदन

मी दोन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री व्हेगसला होतो. रानडे किंवा लक्ष्मी रोडला दिवाळीच्या खरेदीसाठी जशी झुंबड होते, तशा रस्त्यावर फुललेल्या गर्दीमुळे धमाल आली होती. ग्रँड कॅन्यनचे रोड्स/नॉर्थ रिम बंद असण्याबरोबरच प्रत्यक्ष कॅन्यनमध्ये दृश्यमानता कमी असणे हाही एक मोठा धोका आहे. शिवाय त्याचा आगाऊ अंदाज बांधणेही अवघड आहे.

झायनबद्दलही काही सांगावेसे वाटते. व्हेगसपासून केवळ ३ तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे एका दिवसात पाहून होईल असे हे पार्क नाही. एकतर हिवाळ्यामुळे काही पॉइंट्स बंद असतील, शिवाय डे-लाईट सेविंग वेळ आणि एकंदरच डोंगराळ भाग असल्यामुळे सूर्यास्तही बराच लवकर होईल. त्यामुळे (माझ्या अंदाजाप्रमाणे) दुपारी फार फार तर चार पर्यंतच ट्रेकिंगला वेळ मिळू शकेल. अगदीच जर धावती भेट द्यायची असेल आणि ट्रेकिंगचा उत्साह असेल, तर 'एंजेल्स लँडिंग' हा ट्रेक नक्की करण्यासारखा आहे. जर उंचीची भीती वाटत असेल, तर शेवटचा भाग पार करणे अवघड आहे. पण जर तसे नसेल, तर तो भाग (तीन-एक फूट रुंदीची ट्रेल आणि दोन्ही बाजूंनी खोल दरी) ट्रेक करण्यासारखा. शिवाय वरून दिसणारे दृश्यही अप्रतिम. दुसरा पर्याय म्हणजे थोडेसे अधिक लांब असलेले ब्राईस कॅन्यन पार्क. हे झायन एवढे प्रेक्षणीय नसले तरी एका दिवसात ड्राईव्ह करून सहज पाहून होण्यासारखे आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर's picture

15 Nov 2007 - 2:01 am | कोलबेर

नंदन,
फारच छान माहिती! अनेक अभार.
शेवटच्य दिवशी परतीची फ्लाईट रात्री उशिरा व्हेगसहून असल्याने, ग्रँड कॅन्यन ते व्हेगस ह्या परतीच्या प्रवासात झायॉन पार्क आटपावी म्हणतोय. कारण तो पूर्ण दिवस हातात आहे.

सर्किट's picture

15 Nov 2007 - 12:44 am | सर्किट (not verified)

वरुण,

साउथ रीम बंद असल्याचे आजवर कधीही ऐकलेले नाही. मीही ग्रँड कॅन्यनला नाताळातच गेलो होतो काही वर्षांपूर्वी. नॉर्थ रीम ला जायचे असल्यास मात्र उन्हाळ्यातच जावे असे सगळे लोक सांगतात. मी आजवर तिथे गेलेलो नाही.

- सर्किट

धनंजय's picture

15 Nov 2007 - 12:53 am | धनंजय

मी हिवाळ्यात साऊथ रिमला गेलो. रस्ते उघडे होते आणि गर्दीही खूप होती! नॉर्थ रिम मार्च पर्यंत बंदच होती.

कोलबेर's picture

15 Nov 2007 - 1:58 am | कोलबेर

जलद प्रतिसादांबद्दल धन्यवाद! साउथ रीम १२ महिने उघडी असते हे खरे, पण व्हेगसहून तिकडे जाणारा रस्ता बर्फामूळे बंड पडतो का? गुगल मॅप्सवर हा रस्ता काढला असता शेवटचा भाग कधी कधी बंद असतो अशी नोंद आढळ्याने मला शंका आली. रस्ता बंद पडला तरी हॅलीकॉप्टर आणि ट्रेन च्या सफरी चालू असतात पण मला ड्राईव्ह करुन जायचे असल्याने ही शंका मनात आली. सगळे बुकींग केल्यावर ऐनवेळी रस्ताच बंद असल्याने सगळा विरस होऊ नये म्हणून ही उठाठेव. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!

सर्किट's picture

15 Nov 2007 - 2:12 am | सर्किट (not verified)

रस्ताही उघडाच असतो. एकदा आय-४० ला लागले की मग काहीच प्रश्न नाही.

- सर्किट

प्रियाली's picture

15 Nov 2007 - 2:05 am | प्रियाली

वेगासला मजा करा. मस्त ठीकाण आहे. पुन्हा पुन्हा जाण्यासारखे.