साहित्य :
४ मध्यम आकाराचे पांढरे कांदे, दही, मिठ, साखर,पाव चमचा मिरेपुड,चिमुटभर कोथिंबिर
कृती :
कांदे सोलुन चिरुन घ्या. त्यात चविप्रमाणे मीठ ,साखर घाला. मीरेपुड घाला. वरुन हवी असल्यास कोथिंबिर पेरा. दही. सरसरित करुन घाला. कोशिंबीर तय्यार.
टिप :
दही आयत्या वेळेला घाला म्हणज़े पाणी सुट्णार नाही. कोणत्याहि पराठ्याबरोबर ही कोशिंबीर छान लागते.
प्रतिक्रिया
19 Aug 2008 - 6:49 pm | खादाड
हया मधे हिरव्या मिरच्या भाजुन घालुन खूप छान लगतात!
19 Aug 2008 - 7:05 pm | प्राजु
काकडी अगदी बारिक चिरून घातली की आणखी छान लागते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Aug 2008 - 9:46 am | चटोरी वैशू
ह्याच कोशिंबीर मधे डाळिंब दाणे आणि टोमॅटो बारिक चिरुन टाकले तर...?
20 Aug 2008 - 10:23 am | सुनील
पेण - अलिबाग पट्ट्यात पांढरे कांदे मुबलक मिळतात. यांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते लवकर खराब होत नाहीत तसेच ते लाल कांद्यांप्रमाणे फारसे उग्र वासाचे नसतात. त्यामुळे कच्चे खाण्यासाठी उत्तम!
वरील पाककृतीत दोन हिरव्या मिरच्यादेखिल बारीक चिरून घातल्या की एक झक्कस तोंडीलावणे तयार!
अवांतर - पाककृती आता कोशिंबीरीसारख्या पदार्थांपर्यंत उतरल्या आहेत. चहा आणि नेस्कॅफेची पाककृती कधी येतेय ते पहायचे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Aug 2008 - 5:25 pm | विसोबा खेचर
कोशिंबीर छान झाली आहे! :)