प्रथमस्थानी (लग्नस्थानी) एकटा शुक्र असलेले व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
19 Aug 2008 - 4:13 pm
गाभा: 

ज्यांच्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) एकटा शुक्र आहे ( मग तो वेगवेगळ्या राशीत असु शकतो) अशा व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये काय असतात? हा या चर्चेचा उद्देश आहे.
एकटा शुक्र म्हणजे शुक्रासोबत आणखी एखादा ग्रह नसणे. युती नसणे. मग त्यावर दृष्टी असेल तर हरकत नाही.
माझ्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) मीन राशीतील एकटा शुक्र आहे व माझी रास ही योगायोगाने वृषभच आहे. (वृषभ राशीत चंद्र).
मला चित्रकला चांगली जमते. तसेच माझी व्यंगचित्रे ही प्रकाशित झालेली आहेत. संगीत, अभिनय, कॉमिक्स लिहिणे, विनोदी कथा लिहिणे मला आवडते.

आपल्या पैकी कुणाच्या कुंडलीत प्रथमस्थानी शुक्र आहे का? विषेशकरून मीनेचा शुक्र?
कारण माझ्या पाहाण्यातील एकाही नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या कुंडलीत असा योग नाही.
कुणाच्या कुंडलीत तसा योग असल्यास सांगावा. तसेच जे ज्योतिष जाणतात, त्यांनी उपयुक्त माहिती याबाबत द्यावी, ही विनंती...!! धन्यवाद.

---- निमिष सोनार, पुणे

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

19 Aug 2008 - 4:16 pm | मृगनयनी

माझ्या नवमांश कुण्डलीत लग्नी म्हणजे प्रथम स्थानी... कुंभ राशीत "शुक्र" आहे. (एकटा)
त्याचे फळ सांगू शकाल काय?
:)

सन्दीप's picture

19 Aug 2008 - 4:39 pm | सन्दीप

काय राव लग्नासाथी मुलगी शोध चालू आहे काय?

माझी लग्न कुंडली आणि जन्म पत्रिका एकच आहे.( ज्या दोन वेगवेगळ्या असतात)
रास वृषभ लग्नस्थानात वृषभेचा चंद्र आणि राहु
कुंभेचा शुक्र आहे. मिथुनेच गुरु . मीनेचा मंगळ , कुंभेचा शनी बुध आहे
हे सगळे असते म्हणजे काय असते ते मला कधीच उमजले नाही
कुंडलीत कालसर्प योग आहे.
त्याची शान्त करावी लागते म्हणे. इथल्या इथे नारायणनाग बळी वा तत्सम विधी करुन शुक्र शनी मंगळ त्यांच्या जागा कशा बदलणार आहेत हे मला कळत नाही.
( कोणी समजावुन सकारण सांगत असेल तर बरे होईल)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अवलिया's picture

19 Aug 2008 - 4:59 pm | अवलिया

कुंभेचा शुक्र आहे. मिथुनेच गुरु

काहितरी चुक होत आहे तुमच्या टंकण्यामधे
कुंभेचा शुक्र आहे. मिथुनेच गुरु असेल तर वृषभेच्या राहु वृश्चिकेच्या केतु मुळे कालसर्प होणारच नाही
जरा तारीख वेळ ठिकाण व्य नी करा
बघतोच तुमच्या(कुंडली)कडे :)

सर्किट चेंगट
(हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)

निमिष सोनार's picture

19 Aug 2008 - 6:38 pm | निमिष सोनार

मी फक्त चर्चा करू इच्छितो आहे. माझे लग्न झालेले आहे. मला चार वर्षाचा मुलगा आहे.
आणि एक अजून: "मला फक्त जन्मकुंडलीत असलेल्या प्रथम स्थानच्या शुक्राबद्दल (वरील उल्लेखीलेल्या) चर्चा अपेक्षीत आहे.
राशी कुंडली कींवा नवमांश कुंडली यांत असलेल्या प्रथम स्थान च्या शुक्राबद्दल नाही.

एक's picture

19 Aug 2008 - 10:32 pm | एक

कुंडलीत प्रथमस्थानी वृषभेचा शुक्र आहे.

असं म्हणतात की लग्नस्थान शारिरीक स्थिती दाखवतं आणि लग्नंस्थानातील शुक्र देखणेपणा देतो.
तू दिसायला कसा आहेस माहित नाही पण तुझ्या पर्सनालिटीची छाप पटकन पडते का?

माझा मुलगा दिसायला गोड आहे ("पण तशी सगळीच मुलं या वयात गोड दिसतात "- असं इतर लोकांनी म्हणायच्या आधी मीच म्हणतो)
त्याला कोणी त्याच्या दिसण्यावर कॉम्प्लिमेंट दिली की मी लगेच म्हणतो ."माझ्यावर गेलाय" ;)

डिस्क्लेमर: माझं ज्ञान एकदम तुटपुंज आहे..आणि इथल्या ज्योतिषविरोधकांच्या दंग्यात उतरण्या इतपत नक्कीच बळकट नाही