गाभा:
मंडळी
मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये.
शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा
प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर
फोटो-इन्डोअर्/आउटडोअर
बजेट-३०-४० हजार
एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको.
तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 1:18 pm | रवीराज
स्वॅप्स् यांचा सल्ला घ्या.
http://www.misalpav.com/node/29842
26 Apr 2015 - 7:59 pm | श्रीरंग_जोशी
डिएसएलाअरचा पर्याय बघताय तर मिररलेसचाही बघाच.
मी सोनी नेक्स ५एन वापरतोय तीन वर्षांपासून. सध्या सोनीचे ए६००० मॉडेल लोकप्रिय झाले आहे.
माझ्या नेक्स ५एन कॅमेर्याने नुकताच काढलेला एक फोटो.
26 Apr 2015 - 8:48 pm | टवाळ कार्टा
क्काय फोटो आहे...मी घेऊ का वालपेपर म्हणून? :)
26 Apr 2015 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी
मी काढलेला फोटो आवडत असल्यास कुणीही वापरला तर मला आनंदच होईल.
मी फार पूर्वी काढलेले सिंहगडाचे फोटोज कुणीतरी गारवाच्या गाण्याला स्लाइडशो म्हणून युट्युबवर वापरले होते.
हा घ्या मोठ्या आकारमानातील याच चित्राचा दुवा. वरचा चेपूवरून दिलाय.
27 Apr 2015 - 6:33 am | नेत्रेश
कुठे काढला आहे?
27 Apr 2015 - 7:21 am | श्रीरंग_जोशी
लेक सुपिरिअरच्या किनार्यावरील सिल्वर बे मरिना.
26 Apr 2015 - 11:59 pm | विनोद१८
...हे पाहिल्यावर केवळ शांतता जाणवतेय.
27 Apr 2015 - 7:27 pm | सौन्दर्य
खूप सुंदर फोटो. निळ्याची नवलाई एकदम मस्त टिपलेय.
26 Apr 2015 - 9:13 pm | कंजूस
असं करा -दोन चार दुकानांत जाऊन तुमच्या बजेटात बसणारे कॅम्रा मॅाडेल(नंबर +ब्रॅंड)लिहून आणा ,त्यात कायकाय येणार (बॅाडी,+लेन्स?).सर्वांचे रिव्ह्यु असतात आणि तुमच्या बजेटात त्यातल्या त्यात चांगला कोणता हे पटकन सांगता येइल आणि घोळ कमी होइल.-बघा पटतं का .तुम्हाला DSLRच पाहिजे हे नक्की आहे ना?
27 Apr 2015 - 6:31 am | नेत्रेश
निकॉन J1, J3 किंवा J4 चा पण विचार करता येईल. फोटो क्वालिटी डि. एस. एल. सारखीच असेल आणी खुप काँपॅक्ट. खुप सुंदर फोटो येतात. माझ्याकडे नि़कॉन व कॅननचे डि. एस. एल. आहेत, तरीही मी J1 सर्वात जास्त वापरतो.
27 Apr 2015 - 12:05 pm | सह्यमित्र
खरे सांगायचे तर उत्तम फोटो काढणे हा उद्देश असेल तर कॅमेरा ह्या tool वर जास्त लक्ष न देता frame composition, प्रकाशाचा वापर, ISO , shutter interval , aperture , white balance, dynamic range , डेप्थ ऑफ field, लेन्सेस चे प्रकार, इत्यादीची माहिती आणि effective वापर ह्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. ह्याची theorotical माहिती हि आंतरजालावर उपलब्ध आहेच. तसेच इथे swaps ह्यांनी सुंदर लेखमालिका लिहिली आहे त्यात देखील बरीच माहिती मिळेल.
सध्या बाजारात असणारे निकॉन आणि कॅनन ह्या दोन्ही कंपन्यांचे एन्ट्री level कॅमेरे उत्तम आहेत. त्यातला कुठलाही घेतला तरी फार फरक पडणार नाही (सुरुवातीला तरी ) पण वरील गोष्टींचा वापर करायची माहिती नसेल तर मात्र खूप फरक पडेल.
कॅमेरा हा तुमच्या साठी उत्तम छायाचित्र घेऊ शकत नाही, फोटोग्राफर ला प्रथम ते visualize करावे लागते. खरे तर असे म्हणतात की कॅमेरा shutter हा तुमच्या आणि उत्तम फोटो मधला अडथळा आहे.
सहजच फोटो काढायचे आहेत आणि फोटोग्राफि मधील काहीशा किचकट भासणाऱ्या वरील गोष्टीमध्ये पडायचे नसेल आणि जास्तीत जास्त वेळ ऑटो मोड वरच फोटो काढ्याचे असतील तर कोणताही चांगला point & shoot घेणे उत्तम. पण वरील गोष्टी शिकून उत्तम फोटो काढायचे असतील तर निकॉन आणि कॅनन ह्या पैकी कोणत्याही कंपनी चा एन्ट्री level DSLR घ्यायला हरकत नाही (Nikon D३२००, ३३००, ५३०० इ आणि कॅनन १२००D ,६००D ७००D )
27 Apr 2015 - 4:11 pm | अनुप कुलकर्णी
कॅमेरा पेक्षा लेन्स मध्ये इन्वेष्ट करा. 'entry level camera + pro lens' is better than 'pro camera + entry level lens' .
बाकी वरच्या प्रतिसादाशी सहमत
27 Apr 2015 - 4:20 pm | पॉइंट ब्लँक
अनुपशी सहमत.
27 Apr 2015 - 6:37 pm | काळा पहाड
पहिलं म्हणजे entry level camera आणि pro camera मद्धे फरक आणी entry level lens आणि pro lens मधला फरक माहीती नाही. मुद्दलात अशा काही गोष्टी असतात हेच माहिती नाही. स्वॅप्स साहेबांचे लेख खूप म्हणजे खूपच चांगले दिसतायत पण ते लैच डिट्टेल मद्धे आहेत. तेवढं समजण्याचं डोस्कं असतं तर आधीच घेतला नसता का? आम्हा गावठी लोकांना कुणीतरी "हा" घे म्हणून सांगितलं की आवडतं. ८ जीबी रॅम आणी ३.७ जीएचझेड चा काँप्युटर हा ४ जीबी रॅम आणी ४ जीएचझेड चा काँप्युटरपेक्षा चांगला असं सांगितलं तर आम्ही तेवढं पाठ करू शकतो. पण मग दुकानदारानं ६ जीबी रॅम आणि ४.२ जीएचझेड चा काँप्युटर आहे म्हटलं की आम्ही ब्लँक होतो. त्यातून या कंपन्यांची मॉडेल एकाची ३१००, ३२०० अशी. त्याच कंपनीचं डी ७०० पण मॉडेल असतं. दुसर्या कंपनीचं जे १, जे २. मग ३१०० पेक्षा नवीन आलेलं ३२०० कसं वाईट आहे, मग त्यापेक्षा जे ७ काय वाईट आहे अशा चर्चा. अरे काय हे.
27 Apr 2015 - 6:45 pm | पॉइंट ब्लँक
असू दे भाऊ , फुकटचा वेळ आणि जास्त पैसा असलेल्यांचा खेळ हाय डी. एस. ला र. जास्त त्रास करून घेवू नका. मार्केटात जावून सगळयात महाग पॉईंट अँड शूट घेवून या. कुठल्याबी कंपनीचा चालल. हाय काय आन नाय काय.
27 Apr 2015 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!!
@ कंजूस- दुकानात तर जातोच आहे. पण कॅनन चा डीलर कॅननची स्तुती करतो तर निकॉनचा त्याची. DSLR च घ्यायचे हे नक्की आहे.
@ श्रीरंग जोशी- मिररलेससुद्धा बघेन.नेत्रेश यांनी J1 सुचविलाय. सोनी नेक्स ५एन थोडा बजेटबाहेर जातोय :(
@सह्यमित्र- आज कॅनन ड७०० आणि निकॉन ३३०० बघितले. शॉर्टलिस्ट केलेत. पण विचार बदलु शकतो. :)
@काळा पहाड--एकदम बरोबर बोल्लात. असंच काहीसं झालाय माझं. पण "हा घे" असं कुणी सांगतच नाहीये :(
@पॉइंट ब्लँक- DSLR घेतला तरी सुरुवातीला ऑटो मोडवर पॉईंट अँड शूट म्हणुनच वापरणार. पण घेणार DSLR च
27 Apr 2015 - 7:42 pm | श्रीरंग_जोशी
सोनी नेक्स ५एन आता जुना झालाय. मी जाने २०१२ मध्ये घेतला होता. सध्याचे मॉडेल आहे सोनी ए६००० अमेरिकेतल्या अॅमेझॉनवर त्याची किंमत आहे $४४८ (केवळ बॉडी) अन $५९८ (बॉडी + १६-५० मिमि लेन्स). याखेरीज टॅक्स (जिथे मागवला जातोय तिथे स्टेट टॅक्स असल्यास).
त्या तुलनेत अॅमेझॉन.इन वर ₹४७,९९०/- + ₹३००/- डिलिव्हरी चार्ज एवढी किंमत आहे.
सोनी नेक्स ६ हे मॉडेल ₹३६,९९०/- अॅमेझॉन.इन वर उपलब्ध आहे.
अवांतर - सोनीचे लेन्स फाइन्डर ऑनलाइन अॅप, लेन्सची निवड करण्यासाठी फारच उपयुक्त आहे.
27 Apr 2015 - 8:02 pm | पॉइंट ब्लँक
त्याला एक कारण आहे. तुम्ही कुठल्याप्रकारची फोटोग्राफी करणार आणि काय क्वॉलिटीचे फोटो काढणार ह्यावर फार गोष्टी अवलंबून आहेत. उदा. तुम्हाला कन्सर्ट किंवा डान्स शो असे फोटो काढायचे असतील तर कॅमेरा आणि लेन्स दोन्ही चांगल असनं गरजेचं. पक्षांचे फोटो काढायचे असतील तर जास्त फोकल लेन्स्ची फास्ट लेन्स, आणि जास्ती एफपीएस ( ८ ) वाला कॅमेरा लागेल. तुम्हाला बागेत जावून फुलांचे फोटो काढायचे आहेत किंव लोकांचे फोटो काढायचे आहेत तर कॅमेरा एंट्री लेव्ह्लचा असेल तर चालू शकत पण लेन्स चांगली पाहिजे. असे अनेक काँबिनेशन करता येतात.
तुम्हाला अजून काय करायचं हे ठरवता येत नसेल एक इंट्री लेव्ह्ल कॅमेरा आणि प्राईम लेन्स घ्या. किट लेन्स काही काळ बा़जूला ठेवा (किट लेन्स घेतेली नाही तरी चालेल मी घेतली नाही.) फक्त प्राईम लेन्स वापरून सहा एक महिने सराव करा. उत्साह राहिला तर मग पुढे इन्व्हेस्ट करा. आणि कॅनॉन, निकॉन आणी आजकाल सोनी हे चांगले कॅमरे बनवतात. प्रत्येकाची काही वैशिष्टे आणि तोटे आहेत ते लक्षात घ्या. निकॉनची डायनॅमिक रेंज चागंली आहे पण त्यांची व्हिडियो क्वॉलिटि खास नाही. कॅनॉनची व्हिडियो छान आहे. सोनी कॅमेरे फोटो आणि व्हिडिवो दोन्ही चांगले असले तर कमी लेन्सेन भारता उपलब्ध आहेत.
तुमचा खंबीरपना आवडला. पण अजून चांगल्या प्रकरे दाखवता आला असता. उदा. "ऑटो मोड्ला लवकरात लवकर बिट करून दाखवणार!" असो तुम्ही सुज्ञ आहात.
28 Apr 2015 - 1:30 pm | कपिलमुनी
तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्यायचा !
उद्या हिच्याशी / याच्याशी लग्न कर म्हणला तर कोणी करणार नाही. आपापल्या आवडीनुसार ,गरजेनुसारच आणि 'झेपेल' तेच मॉडेल निवडणार
27 Apr 2015 - 8:00 pm | सह्यमित्र
ऑटो मोड वापरायची सवय सुरुवातीला तरी लावू नका. सुरुवातीलाच जितके जास्त manual controls बरोबर खेळून बघाल तितके ते क्लिष्ट न वाटता सोपे वाटतील आणि कॅमेऱ्याच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता येईल.
सुरुवातीला ऑटो मोड वापरण्याची सवय हि डबा बांधून पोहाण्यासारखी आहे त्याने पोहण्याचे कौशल्य फारसे विकसित होणार नाही.
खरे तर DSLR घेण्या पूर्वी आपल्याकडील point & shoot चे सर्व manual कंट्रोल वापरून त्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे मग DSLR नक्की का घ्यावा आणि त्याने काय काय जास्त गोष्टी करता येतील हे समजेल.
27 Apr 2015 - 9:27 pm | अनुप कुलकर्णी
"पहिले १०००० फोटो वाया गेले तरी चालतील पण automode वापरणार नाही" असा बाणा ठेवा.
बाकी पॉइंट ब्लँकशी सहमत.
मी बऱ्याच जणांना सल्ला दिला आहे कि पॉईंट अँड शूट वर एवढे फोटो काढा कि तुमच तुम्हालाच कळेल कि DSLR कॅमेराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत.
28 Apr 2015 - 10:53 am | सुबोध खरे
काही बाबतीत असहमत
१) पहिले १०००० फोटो वाया गेले तरी चालतील हे ज्याला छायाचित्रकार बनायचे आहे त्याच्या साठी ठीक आहे. परंतु आमच्या सारख्या फावल्या वेळातील क्लिक करणार्यांसाठी नाही. कारण आपण एखाद्या सहलीला जाता तेंव्हा तेथील प्रकाश चित्रे या आपल्या आठवणी असतात त्या वाया जाऊ देणे हे परवडणारे नसते. तेंव्हा डी एस एल आर मध्ये ऑटो मोड वापरून फोटो काढावेतच आणि शिवाय तेच फोटो मैन्युअलमध्ये काढावेत आणि मग येउन तुलना करून पाहाव्या.
२) महागातील पॉइंट अंड शूट कॅमेरा वापरून काढलेले फोटो आणि डी एस एल आर ने काढलेले फोटो जेंव्हा आपण मोठ्या पडद्यावर उदा २१ इंची संगणकाच्या किंवा ४२ इंच टीव्हीच्या पडद्यावर पाहता तेंव्हा त्यातील फरक जाणवण्या एवढा आहे. (त्यात ऑटो मोड असली तरी चालेल).
माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसाला ऑटो मोड आणि मन्युअल मोड मधील बारकावे काळात नाहीत परंतु मोठ्या पडद्यावर दिसणारे फरक नक्कीच जाणवतात. "ऑटो मोड्ला लवकरात लवकर बिट करून दाखवणार!" हे मात्र एकदम परफेक्ट.
३) मी निकॉन D ३३०० बरोबर १८-५५ आणि ५५ - २०० mm हि भिंगे घेतली आणि त्याची किंमत मला flipkart आणि snapdeal मिळून रुपये ३५,०००/-ला मिळाले. डी एस एल आर साठी हि किंमत कोणत्याही पॉइंट अंड शूट कॅमेरापेक्षा चांगली आहे असे मला वाटते.
४) प्राईम लेन्स चा खरा अर्थ प्रायमरी किंवा बेसिक लेन्स असा आहे म्हणजे एकच फोकल लेंग्थ. याउलट झूम लेन्स घेतली तर आपल्याला फोटोग्राफीची जास्त मजा लवकर लुटता येते. बहुतांश लोकांना फोटोग्राफीच्या तांत्रिकतेचा फार लवकर कंटाळा येतो उदा. मी स्वतः त्यामुळे जास्त त्याच्या तांत्रिकतेमध्ये न पडता फोटो काढता येतील असा कॅमेरा घ्यावा.
५) पॉइंट अंड शूट कॅमेरा हा सहलीसाठी किंवा वन्य प्राणी आणि पक्षी यांच्या फोटोग्राफी साठी अतिशय उपयुक्त आहे. स्वस्तात ६० ते ७० X ऑप्टीकल झूम पर्यंत यात येते. ६०X ऑप्टीकल झूम म्हणजे डी एस एल आरच्या १०८० mm इतके टेली फोटो लेन्स ज्याची लांबी फूट दीड फूट येईल. हे फार अवडंबर होते आणि हौशी फोटोग्राफर साठी नक्कीच झेपणारे नाही.
जसे शास्त्रीय संगीतात वर्ग आहेत त्या तसेच वर्ग फोटोग्राफी मध्ये आहेत
उदा -- १) बैठकीची गायकी -- या वर्गात उच्च दर्ज्याचा डी एस एल आर घेऊन फक्त मन्युअल मोड वर फोटोग्राफी करणारे प्युरीस्ट याला उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान लागते आणि ते येरागबाळ्याचे काम नोहे
२) शास्त्रीय संगीताच्या आधारावर असलेले फिल्मी किंवा नाट्य संगीत -- हे म्हणजे चांगला डी एस एल आर घेऊन ऑटो मोड वर किंवा मर्यादित मन्युअल मोड वर काम करणारे
३) उत्तम दर्ज्याचे फिल्मी संगीत किंवा गझल -- येथे उत्तम दर्ज्याचा पॉइंट अंड शूट कॅमेरा येतो यात कोणतेही तांत्रिक ज्ञान अपेक्षित नाही तरीही उत्तम दर्ज्याची फोटोग्राफी जमू शकते
४) आयटेम सॉंग किंवा भांगडा -- हे म्हणजे बर्या मोबाईल कॅमेर्याने सेल्फी काढणे
आपल्यातील बहुसंख्य लोक दुसर्या किंवा तिसर्या गटात मोडतील असे वाटते. तेंव्हा आपल्याला काय पचते आणि काय रुचते ते पाहून कॅमेरा खरेदी करावा
है शाबास -- मी आहे त्या गोंधळात अधिक भर घालू शकलो असे मला वाटते
28 Apr 2015 - 11:21 am | काळा पहाड
संपूर्ण सहमत. दुसरं म्हणजे माझे मॅन्यूअल मधले सगळे फोटो (डिजिटल कॅमेर्यातल्या) धूसर येतात. बरेच प्रयत्न करून मग मी कॅमेरा ऑटोवर ठेवायला सुरवात केली. तेवढं शिकण्याची बॅन्ड विड्थ पण नाही आणि संयम पण.
28 Apr 2015 - 2:08 pm | सह्यमित्र
Manual मोड मध्ये कॅमेरा ऑटोफोकस करत नाही त्यामुळे तो आपल्याला करावा लागतो . तुमच्या कासे मध्ये फोकस नीट adjust होत नसेल. shutter release half-way प्रेस करून बीप आवाज झाला कि फोकस नीट झाला असे समजावे आणि मगच पुढे पूर्ण shutter release करावे. हे सरावाने सहज जमते.
Optical View Finder मध्ये बघून कुठला focus point हवा तो निवडावा (Right -लेफ्ट-Top-Down navigation keys वापरून ). आपण निवडलेला focus point shutter release halfway प्रेस केले असता रेड color मध्ये ब्लिंक होईल.
28 Apr 2015 - 2:32 pm | एस
चुकीचे विधान. मॅन्युअल मोड म्हणजे उद्भासनाचा (एक्स्पोजर) एक मोड. आणि मॅन्युअल फोकसिंग ते वेगळे. 'M' mode मध्येही ऑटोफोकस होऊ शकते. ते सर्वस्वी संकेंद्रीकरणाचा (फोकसिंग) मोड कुठला निवडला आहे त्यावर अवलंबून असते. ही सेटिंग लेन्सवर असते, कॅमेरा बॉडीवर शक्यतो नसते.
फोकसिंग मोडचे दोन-तीन प्रकार असतात. एक म्हणजे मॅन्युअल, दुसरा ऑटो. आणि तिसरा काहीकाही उत्पादकांनी इम्प्रोवाइज केलेला प्रकार ऑटो फोकस विथ मॅन्युअल ओव्हरराईड. म्हणजे कॅमेराच फोकस करणार, पण ऑटोफोकस अजून सुधारायचा असल्यास फोकसिंग-मोड न बदलता केवळ हाताने मॅन्युअल फोकसिंगची रिंग फिरवून स्वतःही फोकस करता येण्याची सोय.
28 Apr 2015 - 4:07 pm | सह्यमित्र
गडबडीत लिहिल्याने माझ्या विधानाचा भलताच अर्थ निघाला आहे. सुधारित विधान काहीसे असे पाहिजे:
manual मोड मध्ये तुम्हाला स्वतःला focus point select करावा लागतो. Auto मोड मध्ये त्याची गरज नसते .
28 Apr 2015 - 1:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
डॉक्टरसाहेब, तुमचे कॅमेरा आणि संगीत दोन्हीतले ज्ञान जाणवतेय. पोस्ट परत वाचतो.
28 Apr 2015 - 2:54 pm | सुबोध खरे
मेहेंदळे साहेब
उगाच काहीही काय?
मी आठवीतल्या मुलाने सातवीतल्या एखादी गोष्ट समजवावी तसे सांगितले आहे. इथे स्वॅप्स् साहेबांसारखे पी एच डी झालेले लोक आहेत. तुम्ही मला त्यांच्या रांगेत बसवू नका.
29 Apr 2015 - 10:59 am | एस
खरेसाहेब,
मी अजून छायाचित्रणातल्या प्लेग्रुपमध्ये आहे. :-)
29 Apr 2015 - 12:25 pm | सुबोध खरे
म्हणजे आमचा आत्ताच जन्म झाला असे वाटते
29 Apr 2015 - 2:47 pm | काळा पहाड
बापरे, म्हणजे आमचा अजून जन्मच झालेला नाहीये? जगदंब जगदंब.
28 Apr 2015 - 9:57 am | कंजूस
तुमचं बजेट पाहता बाकीचे सल्ले उपयोगाचे नाहीत.
१) इमिज रॅा फॅार्मेट मध्ये साठवता येणे,
२)मॅन्युअल कंट्र्रोल असणे
या दोन गोष्टी किमान असल्यास DSLRघेण्याचे समाधान मिळेल.
अ)HD Video, WIFI नसले तरी चालेल.,
ब)लो-लाइट CCD सेंसर अथवा बॅक-लिट CMOS सेंसर असावा.
फक्त दुकानातून बजेटमध्ये मिळणारे मॅाडेल नंबर आणा.
28 Apr 2015 - 9:59 am | कंजूस
डबल पोस्ट काढली.
28 Apr 2015 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
निकॉन ३३०० डी ३० हजार पर्यंत येतोय, निकॉन ५२०० -३०हजार(१८-५५ लेन्ससोबत)
कॅनन ७००डी ४० पर्यंत (सेम लेन्स),निकॉन ५३०० सुद्धा ४० हजार
यात बॅग,एक बॅटरी आणि चार्जर येणार. बाकी अॅक्सेसरीज वेगळ्या.
28 Apr 2015 - 2:09 pm | सह्यमित्र
बजेट चांगले असेल तर ७००D किंवा D ५३०० घ्या.
28 Apr 2015 - 2:51 pm | काळा पहाड
५३०० आणि ५२०० मधे साधारण १०,००० रुपयाचा फरक आहे. मी जेव्हा नेट वर शोधलं उदा: http://www.digitalcameraworld.com/2015/01/07/nikon-d5500-vs-d5300-vs-d52...
तेव्हा मला असं आढळलं की याच्या प्रोसेसर्स आणि सॉफ्टवेअर मध्ये (चांगले) बदल आहेत. फिल्टर्स मध्ये आहेत, ISO range (म्हणजे काय ते माहिती नाही) बदल आहेत इत्यादी.
माझा प्रश्न हा आहे, की मला अत्यंत हाय स्पीड प्रोसेसर आणि ब्रॅन्ड न्यू सॉफ्टवेअर नको असेल तर असा कोणता बेसिक एसएलआर कॅमेरा आहे का जो असेच उच्च प्रतीचे फोटो काढेल? की जर उच्च प्रतीचे फोटो काढायचे असतील तर जास्त पैसेच (जास्त अॅड्व्हान्स्ड कॅमेरेच घेवून) घालावे लागतील?
मी माझा मुद्दा जास्त स्पष्ट करतो. मला कार घ्यायची आहे आणि हजार पर्याय उपलब्ध आहेत. मला ब्लू टूथ, रिवर्स कॅमेरा, एबीएस, एलसीडी डिस्प्ले वगैरे प्रकार उच्च प्रतीच्या कार मध्ये मिळतात. पण कार लक्झरी न घेतासुद्धा मला त्याच प्रकारचं रायडींग प्लेजर इंडिका मध्ये पण मिळतं. म्हणजे हे बाकीचे सगळे फीचर्स आहेत. ते नस्ले तरी मला चालू शकतं. तसं एस एल आर कॅमेर्यात आहे का? तसं असेल तर सर्वात बेसिक आणि स्वस्त कॅमेरा कुठला जो चालवायला साधा सोपा आहे, फोटो तसेच देखणे येतात पण मला कर्ज काढायची गरज पडणार नाही?
दुसरा प्रश्नः एस एल आर मध्ये काय नसतं जे डी एस एल आर मध्ये आहे?
28 Apr 2015 - 4:16 pm | सह्यमित्र
SLR : Single Lens Reflex Camera
DSLR : Digital Single Lens Reflex Camera
पहिल्या प्रकारात फिल्म रोल वापरतात तर दुसऱ्या प्रकारात प्रतिमा digital sensor वर साठविली जाते. Single Lens Reflex mechanism हे दोन्हीत common आहे. पहिल्या प्रकाराला Film SLR असेही म्हणतात पण ज्याप्रमाणे जुने साधे फिल्म कॅमेरे आता digital कॅमेर्यांनी replace केलेत त्याप्रमाणेच फिल्म SLR हे DSLR ने replace झालेत.
Single Lens Reflex mechanism द्वारे तुम्ही कॅमेरा लेन्स मध्ये काय capture करतोय ते थेट तसेच optical viewfinder मध्ये बघू शकता. ह्याकरता pentaprism किंवा pentamirror वापरतात जो SLR सोडून इतर कॅमेर्यात नसतो. तसेच सहसा DSLR कॅमेर्यांचा sensor हा आकाराने आणि दर्जाने इतर कॅमेर्यान पेक्षा चांगला असतो .
28 Apr 2015 - 3:04 pm | सुबोध खरे
http://snapsort.com/compare/Nikon-D3300-vs-Nikon-D5300
या दुव्यावर जाउन कोणताही कँमेरा तपासून पाहता येईल
http://www.dpreview.com/reviews/nikon-d3300
मी या दोन तीन दुव्यांवर जाऊन पाहिले तेंव्हा ३३०० पेक्षा ५३०० मला फार जास्त चांगला वाटला नाही.
एक कारण- जो बेसिक डी एस एल आर घेतो तो साधारणपाने उच्च दर्ज्याचा प्रकाश चित्रकार नसतो. मग नवख्या माणसाला जर होंडा सिटी दिली तरी त्याला त्यातील बर्याच गोष्टींचा पूर्ण वापर करता येत नाही. मग अधिक पैसे खर्च करून होंडा अकोर्ड घेण्यात काय मतलब या विचाराने मी ३३०० घेतला. त्यांच्या किमतीत २०,००० रुपयांचा - ६० % अधिक किमतीत मिळणार्या गोष्टींचा ( वाकडे करता येणाऱ्या एल सी डी आणि wi fi )मला कितपत उपयोग आहे? दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेरा बाजारात येतो तेंव्हा त्याची किंमत जास्त असते उदा ३३०० आला तेंव्हा ४५,००० होता आणि आता ३०,००० च्या खाली आहे. तीच परिस्थिती ५३०० ची आहे. सुरुवातीला एक मोडेल जुने घेतले तर बरेच पैसे वाचू शकतात.
28 Apr 2015 - 2:52 pm | एस
snapsort मला अजिबात रिलायबल वाटलं नाही. dpreview आणि इतर काही संस्थळे जास्त चांगली आहेत.
28 Apr 2015 - 5:54 pm | सह्यमित्र
+१ सहमत
28 Apr 2015 - 3:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही टेक्निकल गोष्टी समजल्या नाहियेत, पण माझे मत निकॉन ३३००डी कडे झुकत चालले आहे :) खिशाला पण परवडतोय.
28 Apr 2015 - 11:56 pm | शैलेन्द्र
घेवुन टाका..
:)
(निकोन ५२००/ १८-५५/ ५५-३००)
28 Apr 2015 - 5:35 pm | कंजूस
मी आताच तुम्ही दिलेल्या कैमऱ्यांचे रिवह्यु वाचले ,कैनन 700D घ्या.वीसेक वर्षे भारतात कैनन ब्रैँडला रीसेल व्हैल्यु नव्हती म्हणून डोळे झाकून निकॉन घेत असत आता तसं नाहीयै विचार करून घेतात.
1)700D +18-55 mm STM LENS
नाही परवडला तर
2) NIKON 3300
डॉक्टरांचा रिव्ह्यु हा वापरकर्ताचा आहे आणि तोच कैम्रा घेतल्यास पुढे एकमेकांस पुरक माहिती मिळत जाईल हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
28 Apr 2015 - 7:21 pm | सुबोध खरे
EOS ७०० D हा EOS ६०० D पेक्षा थोडा जास्त चांगला म्हणून महाग आहे. ( हे दोन्ही FLIPKART/ SNAPDEAL वर निकॉन D ३३०० पेक्षा महाग आहेत)
परंतु माझ्या वैयक्तिक माहिती प्रमाणे कॅनन पेक्षा निकॉनचे सेन्सर्स थोडे मोठे असतात http://en.wikipedia.org/wiki/APS-C आणी याच गटातील कॅमेर्यात तुलनेत निकॉन D ३३०० हा वर म्हटलेल्या कॅनन कॅमेर्यांच्या तुलनेत जास्त चांगला आहे. (बर्याच वेबसाईटवर मि असे वाचलेले आहे). शेवटी आपण काय घ्यावा हा आपला प्रश्न आहे कारण दोन्हीही तुल्यबळ कंपन्या आहेत. जगभर निकॉनचे कॅमेरे कॅनन पेक्षा महाग आहेत परंतु भारतात नेमके याच्या उलट आहे. कारण माहित नाही. कदाचित येथे बाजारपेठ तयार करण्याचं दृष्टीने त्यांनी स्वस्त ठेवले असावेत.
28 Apr 2015 - 8:16 pm | कंजूस
कैननचा ७००डी चा व्हिडिओ "continuous autofocus "वाखाणण्यात आला आहे आणि STM LENS(18-55 ,18-135) असल्यास फोकसिंग होताना कोणताही आवाज होत नाही जो इतर कैमऱ्यांच्या रेकॉर्डीँगमध्ये(घुऽऽई) ऐकू येतो,
काही लेन्स ऑटोफोकस होताना पुढेमागे होतात आणि प्राण्यांचे फोटो /व्हिडिओ काढतांना त्यांचे लक्ष वेधतात तर काही हलताना दिसत नाहीत कैननचे असे किट लेन्स याप्रकारचे आहे असे लिहिले आहे तर खात्री करा.
28 Apr 2015 - 11:59 pm | शैलेन्द्र
www.jjmehta.com
इथे चक्कर टाका
29 Apr 2015 - 12:28 pm | सुबोध खरे
कॅमेरे फ्लिप कार्ट वर जे जे मेहता पेक्षा ५ ते १० टक्के स्वस्त मिळतात आणी बर्यच वेळेस तुम्हाला पाहिजे तो कॅमेरा त्यांच्याकडे नसतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
29 Apr 2015 - 3:06 pm | कंजूस
काळापहाढ, महागड्या कैम्रात काही गोष्टी फास्ट, मोठ्या, व्यापक वगैरे असतात आणि त्यामुळे किंमत वाढत जाते.
29 Apr 2015 - 3:25 pm | काळा पहाड
पण मी जर दोन फोटो उदा: ३३०० आणि ५२०० मधे काढले तर ५२०० मधला फोटो चांगला येईल का? की तो फक्त अंतर्गत ब्लूटूथ मुळे मला माझ्या मोबाईल मध्ये वेगाने ट्रान्स्फर करता येईल? ते असेल तर त्यासाठी एवढे पैसे घालायचं काय कारण? कारण किंमतीत लैच फरक आहे हो.
दुसरं असं की मी फार फार वर्षापूर्वी नॅशनल जिओग्राफीक मध्ये जे फोटो बघायचो, ते श्वास थांबवणारे असायचे. त्यावेळी तर इतके अॅडव्हान्स कॅमेरे नव्हते. म्हणजे माझ्या नवीन डिजिटल पॉईंट अॅन्ड शूट ने सुद्धा मी (निदान) त्याच क्वालीटी चे फोटो काढू शकतो का? उदाहरणार्थ, १९८५ मधे हा फोटो आला होता.
http://ngm.nationalgeographic.com/2002/04/afghan-girl/index-text
आत्ताचा कुठलाही लो-कॉस्ट डी एस एल आर नक्कीच याच्यापेक्षा चांगला फोटो काढू शकेल (उदा ३३००). मग २०,००० रुपये अधीक घालून मी सर्वात लेटेस्ट कॅमेरा (५२००) घ्यावा का?
उत्तर परवडेत असेल तर घ्या नाहीतर घेवू नका असं कुणीतरी देवू शकतो. किंवा तुमच्या आवश्यकते प्रमाणे घ्या नाहीतर घेवू नका असं दिलं जावू शकतं. पण असू शकत नाही. कॅमेरा घेतल्यानंतर मग मला त्याचे गुण दोष कळणार. परवडत असेल तरी जर फोटो क्वालिटी मध्ये फारसा फरक नसेल तर महाग ऑप्शन घ्यावा का असा प्रश्न आहे.
29 Apr 2015 - 4:00 pm | एस
याचे सोपे उत्तर असे आहे की, कॅमेरा चांगला फोटो घेऊ शकत नाही. छायाचित्रकार घेतो. कॅमेरा, लेन्सेस इत्यादी गोष्टी फक्त छायाचित्रकाराच्या अनुभूतीला वास्तवात आणण्यास मदत करतात.
एखादे प्रगत उपकरण (कॅमेरा/लेन्स/अॅक्सेसरी इ.) घेण्याआधी एक निकष नेहमी लावावा - हॅव यू आउटग्रोन यूअर एक्झिस्टिंग इक्विपमेंट? याचे उत्तर खरोखरच जर 'हो' असे असेल तरच वरच्या पातळीवरील उपकरण घ्यावे. तोपर्यंत अगदी तुमच्याकडे ढिगाने पैसा असेल तरी 'अपग्रेड' करण्यात काहीच अर्थ नाही.
एखाद्या नवख्या छायाचित्रकाराच्या हातात D3300, D5200, D7000, D810, D4S यापैकी कुठलाही कॅमेरा दिला आणि फोटो काढायला सांगितला तर त्यात काहीच दृश्य फरक जाणवणार नाही. पण तेच जर एखाद्या अनुभवी, निष्णात छायाचित्रकाराला सांगितले तर यातील प्रत्येक मॉडेलच्या चढत्या भाजणीप्रमाणे त्या-त्या मॉडेलची गुणवैशिष्ट्ये वापरून ती उत्तमोत्तम प्रतिमा घेऊ शकेल. उदा. D5200 च्या जास्त ऑटोफोकस पॉइंट्सचा वापर अधिक कौशल्याने करून ती एखाद्या धावत्या हरिणाचा फोटो जास्त चांगल्या पद्धतीने टिपू शकेल, किंवा D5200 पेक्षा D7000 चा वापर एक्स्टर्नल फ्लॅश वापरायला कमांडर म्हणून करू शकेल, किंवा D7000 पेक्षा D810 च्या फुलफ्रेम संवेदकाचा आणि नॉइज कंट्रोलचा वापर उच्चतम डायनॅमिक रेंज मिळवायला करू शकेल, किंवा D4s सारखा 'वर्कहॉर्स' वापरून सातत्याने उच्च दर्जाच्या प्रतिमा घेऊ शकेल.
हा छायाचित्रकाराच्या कौशल्याचा भाग आहे. खरा छायाचित्रकार तीच, जी तिच्या हातात असलेल्या उपकरणांचा जास्तीतजास्त कौशल्याने वापर करून स्वतःचेच कौशल्य निरंतर सुधारण्याचा प्रयत्न करेल.
डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आहे. येथे प्रत्येकजण एक विद्यार्थी आहे. आणि राहतो.
29 Apr 2015 - 4:43 pm | सह्यमित्र
+१००
29 Apr 2015 - 5:27 pm | काळा पहाड
पटलं. धन्यवाद.
29 Apr 2015 - 7:20 pm | सुबोध खरे
पहाड साहेब
डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आहे +१०० याबद्दल दुमत नाहीच. ( मी कोण गोमाजी लागून गेलो ?)
D ३३०० ला WU १ A हा ADAPTAR लावून आपल्या प्रतिमा WI FI मार्फत आपण पाठवू शकता. याची किंमत ३८०० रुपये आहे. जर आपल्याला नंतर गरज पडली तर हा आपण लावू शकता. http://shopping.rediff.com/product/nikon-wu-1a-wireless-mobile-adapter/1...
राहिली गोष्ट वाकवता येणारा एल सी डी स्क्रीन. आपल्याला डोक्यावर धरून आडवे झोपून छायाचित्र काढण्याची किती हौस आहे यावर आपण ५३०० घ्यावा कि नाही हे ठरवा. मला तितकी हौस नसल्यामुळे मी आपला D ३३०० घेऊन मोकळा झालो. बाकी http://www.dpreview.com/reviews/nikon-d3300 येथे किंवा दुसर्या कोणत्याही दुव्या वर पाहिलेत तर एक लक्षात येईल कि या दोन्ही कॅमेर्यांचा २४.२ मेगा पिक्सेल चा APS- C CMOS हाच सेन्सर आहे दोन्हीचा प्रोसेसर EXPEED ४ हाच (नवीन) आहे. म्हणजे दोन्ही कॅमेर्यांची ग्रहणशक्ती आणी प्रतिमा प्रक्रिया करण्याची शक्ती एकच आहे
राहला एक फरक तो म्हणजे ऑटो फोकस मधील फरक. मी काही छायाचित्रकार नाही तेंव्हा कुठला फोटो उत्तम आहे आणी कुठला बरा आहे याचे मला काही विश्लेषण करता येत नाही ( तेवढ्या खोलात जायची इच्छाही आत्ता तरी नाही).
जसे मला राग अहिरभैरव आहे कि किरवाणी आहे हे समजत नाही कि त्यातील फरक काय हेही समजत नाही. गाणे ऐकायला श्रवणीय आहे कि नाही एवढे पाहणारा माणूस मी. या दृष्टीने २०, ०००/- रुपये जास्त वाटले म्हणून मी D ३३०० घेऊन मोकळा झालो. जर मला तेवढी दृष्टी आली तर मी एकदम वरच्या श्रेणीचा कॅमेरा घेईन. नाही तर आयुष्य सुखात चालले आहेच.
नव्याची नवलाई म्हणून D ५३०० ४५,०००/- ला आहे एक वर्षाने तो पण ३०,०००/- ला येईल. टच स्क्रीन वाला D ५५०० आलाच आहे. येथे मोबाईल सारखे आहे. सहा महिने थांबलात तर त्याच किमतीत तुम्हाला याहून चांगला कॅमेरा मिळेल.
29 Apr 2015 - 7:52 pm | श्रीरंग_जोशी
सुबोध खरे यांचे प्रतिसाद आवडले.
कॅमेरा, चतुरभ्रमणध्वनी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जी आपल्याला आवडतात अन महाग वाटतात ती सहा महिन्यांनी तुलनेत नक्कीच स्वस्त झालेली असतात. परंतु तेव्हा त्याच उपकरणांची काही नवे वैशिष्ट्य असणारी आवृत्ती बाजारात उपलब्ध झालेली असते.
मी माझा नेक्स ५एन साडेसातशे डॉलर्सला खरेदी केला अन काही महिन्यांतच त्याचे भाव सहाशे डॉलर्सपर्यंत खाली आले. अन त्याच वेळी सोनी ने नेक्स ६ बाजारात आणला ज्याची किंमत अंदाजे ६०० डॉलर्स होती.
त्यामुळे एका मर्यादेपलिकडे विचार करत बसू नये. आपल्याला परवडेल त्या किमतीत वर्ष दिड वर्षापूर्वी बाजारात आलेले उपकरण बिनधास्त खरेदी करून कामाला लागावे.
29 Apr 2015 - 11:30 pm | काळा पहाड
डॉक्टरसाहेब,
धन्यवाद. ३३०० चांगला ऑप्शन दिसतोय. पाहू आणखी कमी होतो का. पण अनुभव असा आहे की काही वर्षांनंतर कंपन्या स्वस्त मॉडेल डिस्कन्टिन्यू करून नवीन मॉडेल आणतात. तसेही घरातला "कशाला इतका महाग कॅमेरा घ्यायचा एक असताना" टाईप विरोध मोडताना एखादं वर्ष जाणारच.
29 Apr 2015 - 7:06 pm | मोहनराव
चांगली चर्चा चालु आहे. निवांत वाचतो.
30 Apr 2015 - 12:08 am | टवाळ कार्टा
णिकॉन एस ९९०० बघा
30 Apr 2015 - 12:35 am | काळा पहाड
तो डिजीटल कॅमेरा हाय. एस. एल. आर. नाही.
2 May 2015 - 11:39 am | पाटील हो
मी पण हाच विचार करत होतो.
खूप हुडका हुडकी केल्यावर माज्या बजेट माडले ३ मोडेल्स मिलले.
Canon 1200D
Nikon D3300
Sony SLT A58K
त्यातला मी…. डी ३३०० चा विचार कातातोय .
Mike Browne video आणि डी पी रेविएव सारक्या खूप उचापती करून ठरवलोय .
4 May 2015 - 6:53 am | कौन्तेय
निकोन डी ५३०० वा त्याखालील डी ३३०० डोळे मिटून घ्या. हे दोन्ही प्राथमिक दर्जाचे क्यामेरे आहेत. पण नुसते म्हणायला. जर व्यावसायिक कारणासाठी उपयोग करायचा नसेल तर ही आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते.
निकोन व क्यानन यांत डावं उजवं करायचं असेल तर बरंच काही लिहिता येईल. पण एक हिमालय एक आल्प्स. काय बोलणार. प्राथमिक दर्जाच्या क्यामेर्यांमधे निकोन थो....डा अग्रेसर म्हणता येईल.
4 May 2015 - 7:30 am | कंजूस
आताच्या ओनलाइन खरेदीच्या युगात विकणारा म्हणतो माझ्या वस्तुचे चांगले चित्र दिसायला हवे अशावेळी फोटोग्राफर नव्हे तर चांगला कैम्राच हवा. कित्येक मॉडेलात जवळचे फोटो नीट येत नाहीत ,हॉटेलची रूम कशी दिसते हे दाखवायचे असेल तर DSLR ला चांगले २४ अथवा २८ एम एम चे लेन्सच हवे . परंतू असे काही काम आपणास करायचे नसेल तर महागडा कैम्रा घेण्याची जरूर नाही .
सिनेमा कलावंतांचे फोटो घेण्यासाठी जायचे असेल तर गोष्ट आणखी वेगळी हातात चांगला कैम्रा(एनट्री लेवल नाही)दिसला नाही तर स्टुडिओत सोडणार पण नाही.
4 May 2015 - 9:36 am | कौन्तेय
आगस्ट २००८ला मी माझा पहिलावहिला डीएसेलार निकॉन डी-३००० घेतला. त्याआधी जो काही गृहपाठ केला तो खालील प्रमाणे.
डीएसेलारसाठी सामान्यतः ऑलिम्पस, सामसंग, सोनी, कॅनन, निकॉन, फ़ुजी असे विकल्प समोर असतात.
महाजालावरची विविध तौलनिक मूल्यांकने वाचली. सगळ्या बेरजा वजाबाक्या स्वतः वस्तुनिष्ठ पद्धतीने समोर तक्ते मांडून केल्यावर सगळ्यात शेवटी रहाता राहिले निकॉन व कॅनन.
निकॉन व कॅनन हे प्रकाशचित्रणातले दोन समांतर रूळ आहेत. गंतव्य एकच असले तरी दोन्हींच्या अनुयायांचे एकमेकांशी कधीच पटत नाही. त्यामुळे निकॉन की कॅनन हा प्रकाशचित्रणातला चिरंतन वैश्विक वाद आहे! मी निकॉन पार्टीत उडी मारली आहे. मला कॅनन बद्दल काहीही रोष नसला तरी मला त्यांच्या बारकाव्यांबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकणार नाही.
शेवटी चित्राची गुणवत्ता तपासून अंतिम निर्णय घ्यायचा होता. मला स्वतःला कॅननचे रंग ‘अधिक साजरे केलेले’ वाटतात, तर निकॉनचे अधिकाधिक नैसर्गिक व वास्तव. घेतलेल्या चित्राला आपण आजकाल पीसीवर घेऊन हवे तसे भडकवू शकतोच, त्यामुळे मी ठरवले की ती मुभा कॅमेऱ्याला द्यायची नाही व निकॉनकडे ओढला गेलो.
आणखी एका कारणासाठी निकॉन निवडला. प्राथमिक पायरीच्या डीएसेलार्समधे निकॉन कॅनन पेक्षा थोऽऽडा पुढे आहे हे मी म्हणालो त्याचं कारणही हेच आहे. कुठलाही डीएसेलार कॅमेरा दहा पंधरा फ़ुटांपर्यंतच्या अंतरासाठी एक प्रकाशशलाका समोर फ़ेकून तत्संबद्ध सेन्सरद्वारे अंतर नक्की करून बरोब्बर स्वयं-फ़ोकस करतो. ही सुविधा कमी क्षमतेच्या एका विशेष दिव्यासकट निकॉनच्या सगळ्या कॅमेऱ्यांमधे आहे, तर कॅननच्या फ़क्त वरिष्ठ श्रेणींच्या कॅमेऱ्यांमधे आहे (तेव्हा होती). कॅननचे कनिष्ठ श्रेणीचे कॅमेरे हे काम फ़्लॅशलाईट फ़्लिकर करून करत. पण त्यामुळे एखाद्या शांत ठिकाणी (उदा: म्युझियम, एखादी मैफ़ल, वर्गकक्षा) उगीचच थोडा व्यत्यय निर्माण होऊ शकतो.
तर चित्राचे रंग व ही स्वयंफ़ोकस यंत्रणा या दोन आघाड्यांवर मी निकॉनला विजयी घोषित करून त्यांच्या पार्टीत सामील झालो.
18 May 2015 - 2:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा प्रतिसाद आवडला ...म्हणण्यापेक्षा पटला. आपण कॅमेरा घेताना बराच चांगला अभ्यास केला आहे असे जाणवते आहे.
मी निकॉन ३३०० घेतोय.