रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मी बाहेरुन(चितळे,काका हलवाई,इ.) काही न आणता घरीच गोड काहीतरी बनवायचे ठरवले.
माझी ही पहीलीच गोड पा.कृ. आहे. तरी ह्यात काही बदल करुन अजुन चांगली कशी बनवता येईल हे सांगावे.
साहीत्य : नारळाचा चव(खोवलेला नारळ) १ वाटी,साखर १ वाटी ,दुध(सायी सकट),वेलदोडे पुड.
कृती : प्रथम नारळाचा चव आणि साखर एकत्र करुन घ्यावे त्यात सायीसकट दुध-साधारण आर्धी वाटी - घालावे.
हे मिश्रण शिजवत ठेवावे. आणि हलवत रहावे नाहीतर करपते. मिश्रणाचा रंग बदलला (चॉकलेटी दिसते) आणि त्याचा गोळा तयार झाला की
त्यात वेलदोडा पुड घालावी (लहान अर्धा चमचा). हे शिजलेले मिश्रण तुप लावलेल्या ताटलीत पसरावे.
ह्या झाल्या नारळाच्या वड्या तयार!!!
प्रतिक्रिया
18 Aug 2008 - 5:34 pm | विसोबा खेचर
वा! ही आमची अत्यंत आवडती पाकृ.
ती इथे दिल्याबद्दल टेल्कोच्या मालकीणीचे आभार... :)
अजूनही अश्याच पाकृ येऊ द्या प्लीज...
तात्या.
18 Aug 2008 - 6:05 pm | शितल
नारळाचा चव दोन चमचे तुप नाही तर लोणी ह्यावर १ मि. परतुन घेते मग सायीचे दुध, साखर घालते. :)
नारळाच्या वड्या एकदम मर्जीतील पदार्थ बर्याच जणांच्या.
18 Aug 2008 - 6:42 pm | प्राजु
दूध , साय आणि नारळाच चव मिक्सरमधून वाटून घेते. आणि मग आटवत ठेवते साखर घालून.. आणि मग ते घट्ट होऊ लागले कि वड्या थापते. कधी कधी यामध्ये अर्धा चमचा गुलकंद घालते. अशा वड्या तोंडात अक्षरशः विरघळतात आणि चव माव्यासारखी येते. गुलकंदाचा स्वाद अप्रतिम येतो. माझ्या सासूबाई खूप प्रकारच्या वड्या करतात त्याही अगदी उत्तम. त्यांच्याकडूनच शिकले मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Aug 2008 - 3:45 am | रेवती
प्रकार नुकताच करून बघीतला, नारळाच्या चवामध्ये साखर घातल्यावर दूध न घालता हापूस आंब्याचा दोन वाट्या रस (दोन नारळांसाठी) घातला. आंब्याच्या सुवासामुळे वेलदोडा नाही घातला तरी चालेल. बाकी कृती वर दिल्याप्रमाणे.
रेवती
19 Aug 2008 - 4:24 pm | मुन्नाभाई एम बी...
टीप :-
पाककृती मध्ये जर इंधन वाचवायचे सेल तर,
नारळ खवणुन झाल्या नंतर (खोवलेला नारळ)
उरलेल्या करवंटी वर हे मिश्रण शिजवत ठेवावे,
त्या मुळे इंधनाची बचत होते...