लोक्स हो मदत करा. 30 एप्रिल ते 4 मे उटी-कोडईकॅनलची ट्रीप बूकिंग मिळाले तर करणार आहोत.
मी आपले भटकंतीचे धागे चेक केले पण काही माहिती नाही मिळाली.
तर तिकडे भेट दिलेल्या मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. जर कुणाकडे माहितीतील ड्रायवर किवा गाडी यांचे संपर्क क्रमांक असतील तर तेही द्या.
प्रतिक्रिया
16 Apr 2015 - 1:21 pm | त्रिवेणी
आता हे काय नवीन. प्रतिक्रीयात का दिसत आहे हे.
16 Apr 2015 - 2:13 pm | सविता००१
गं त्रि? करतील गं मदत लोक. टेंशन नको घेउस
16 Apr 2015 - 2:50 pm | कानडाऊ योगेशु
नावच त्रिवेणी आहे ना म्हणुन मोजुन ३ वेळा! ;)
16 Apr 2015 - 3:31 pm | सविता००१
:))
16 Apr 2015 - 2:28 pm | पिलीयन रायडर
मी उटी जवळ कुन्नुर आहे तिथे जाउन आलेय. सुंदर जागा आहे. उटीपेक्षा कुन्नुर कैक पटीने सुंदर आहे (आपले खरे काका हनिमुनला गेले होते ना.. ते कुन्नुर!! ;) )
आम्ही "अल दिवानो" नावाच्या छोट्याशा जागी राहिलो होतो. व्यवस्था नेटकी होती. जवळच क्वालिटी नावाचे अत्यंत फेमस हॉटेल आहे. तिथे बुफे मिळतो. तो ही अप्रतिम असतो.
कोडाईला मी गेलेले नाहीये. पण जमल्यास माहिती मिळवुन सांगते.
म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर (जमल्यास टॉय ट्रेनने मेटुपलायमपर्यंत जाणे.. जबरदस्त अनुभव!!) ही ट्रिप होऊ शकते. माहिती देते जर जाणार असशील तर.
5 May 2016 - 2:25 pm | विनअता पुजारि
म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर (जमल्यास टॉय ट्रेनने मेटुपलायमपर्यंत जाणे.. जबरदस्त अनुभव!!) ही ट्रिप होऊ शकते.
कुपयआ महिति द्यवि...
16 Apr 2015 - 2:32 pm | कपिलमुनी
उटीला हा सीझन योग्य नाही असा वाटते.
बराच गरम होइल
16 Apr 2015 - 2:35 pm | बॅटमॅन
कोडाईकनाल वाचून भूछत्री आणि गरम पाण्याचे कुंड आठवले उगीचच.
16 Apr 2015 - 2:36 pm | असंका
उटीला होटेल लेक व्ह्यु ला मी राहिलो होतो. जरा लांब आहे. कॉटेजेस टाइप बंगले आहेत सेपरेट. कुटंब त्या बाजूचं विरळ पब्लिक बघून जरा बावरलं होतं. पण अगदी निवांत आहे ते हॉटेल. हिरवळ वगैरे पण आहे. रेस्त्राँ अगदी सो सो. त्यांच्या रीसेप्शन वरूनच एक दिवसाची ट्रीप बुक केली होती, ती चांगली झाली.
तिथला लेक त्या हॉटेल्च्या अगदी शेजारीच आहे, त्यात बोटींगची सोय आहे. (माझं पहिलंच, त्यामुळे-) मला मजा वाटलेली. फार दिवस झाले, त्यामुळे बाकी काही आठवत नाही.
आपण कुठुन आणि कसे जाणार?
16 Apr 2015 - 5:08 pm | मी_आहे_ना
माफ करा पण मी मागच्या वर्षी २६-३१ मे मधे गेलेलो तेव्हा लेक-व्ह्यू चा अनुभव काही ठीक नव्हता (पूर्वी २००६ साली खूप छान होते आणि तश्याच अनुभवाच्या अपेक्शेनी गेलो, पण आता..) सगळे जुनाट फर्निचर / रंग उडालेल्या भिंती / इन-हाऊस रेस्टॉरंट मधले विनाकारण वाढलेले रेट्स आणि घसरलेली क्वालिटी ह्यामुळे रसभंग झाला.
त्रिवेणी ताई, ऊटी मधली बाकीची हॉटेल्स ट्रिप-अॅड्व्हाय्सर / मेक-माय-ट्रिप इ. वर रिव्ह्यू वाचून बघा असे सांगू इच्छितो. ऊटी सोबत कुन्नूर प्लॅन केलत तर जास्त आवडेल. शिवाय, म्हैसूर साठीही २ दिवस बाजूला काढता आले तर पहा. तिथे हॉटेल सिद्धार्थ (०८२१-२५२२८८८) मध्यवर्ती होते आणि मैसूर मधे सार्वजनिक वाहतूक अगदी 'व्यवस्थि'त आहे. (मैसूर मधे बघण्यासारखेही बरेच आहे. भारतातील सर्वात चांगले झू मैसूर मधे आहे असं माझं मत आहे.)
16 Apr 2015 - 5:25 pm | असंका
यस.. खाणं पिणं तेव्हाही बेतास बातच होतं...
म्हैसूरबद्दल सहमत.
16 Apr 2015 - 2:50 pm | त्रिवेणी
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
@पिरा अग मोजुन 5 दिवस आहेत हातात आणि आज सकाळी ठरलं जावू या म्हणुन. आता ट्रीप adivsor वर बघते हॉटेल्स पण आपले लोक्स जास्त चांगली माहिती देतील म्हणुन काढला धागा.
@कपिलमुनी- तुम्ही या सीजन मध्ये जावून आला आहात का? मला वाटल होते की थोडे तरी थंड असेल आता
@कन्फ्युज अक्कौंटट-मला ही शांतता नाही आवडत आणि अश्या विरळ वस्तीच्या जागी मलाही जरा भीतीच वाटते. तरी बघते एकदा चेक करून.
आम्ही पुण्यातून जाणार आणि आता एतक्या एनवेळी जातो आहे तर रेल्वे बूकिंग तर नाहीच मिळणार सो बाय प्लेन.
16 Apr 2015 - 3:26 pm | कपिलमुनी
कूर्ग थंड असते !
16 Apr 2015 - 3:43 pm | असंका
उटीला थंड होते हो....?
16 Apr 2015 - 6:08 pm | नांदेडीअन
पिलीयन रायडर यांच्याशी सहमत.
ऊटीपेक्षा कुन्नूरच चांगले !
आम्ही कुन्नूरच्या रिगा रेसिडन्सी या हॉटेलमध्ये थांबलो होतो.
रूम नंबर नेमका आठवत नाहीये आता, पण फार छान व्ह्यू होता.
रेल्वे स्टेशन, आसपासच्या टेकड्यांमधून धावणारी निलगिरी रेल्वे, रात्रीच्या वेळी शहरातली लाइटिंग असा मस्त व्ह्यू होता.
कुन्नूरच्या अलिकडेच मदुमलाई आणि बंदिपूर नॅशनल पार्क आहेत.
या दोन्ही जंगलांच्या सिमेवर मसिनागुडी नावाचे एक टुमदार गाव आहे.
मसिनागुडीलासुद्धा आम्ही दोन दिवस मुक्काम केला होता आणि तो आमच्या १२ दिवसांच्या प्रवासातला हासिल-ए-मेहफिल होता.
16 Apr 2015 - 8:00 pm | कंजूस
ही दोन्ही ठिकाणे तमिळनाडुत असली तरी उटिचा पर्यटन धंधा कर्नाटकवाले ढापतात { आणि कन्याकुमारीचा केरळवाले) या पत्रकांतल्या माहितीचा काही उपयोग होतो का पाहा.
१)
<img src="http://s5.postimg.org/v1j3zcjnr/WP_20150416_18_35_17_Pro.jpg" width ="240" />
२)
<img src="http://s5.postimg.org/5cd2j8qyv/WP_20150416_18_34_07_Pro.jpg" width ="240" />
5 May 2016 - 2:52 pm | राजकुमार१२३४५६
एक ड्रायवरचा नंबर आहे. तो खुद्द म्हैसूर चा आहे. तो स्वस्तात फिरून आणेल. माझ्या मते कोडाईकणाल , थेकडी आणि मुन्नार हे ठिकाणी जावा. (आजचे तिथले २ वाजताचे तापमान अनुक्रमे २४, २५ आणि २७ आहे). तीनही हिल स्टेशन आहेत. रेल्वेची बुकिंग करण्याची आवशकता नाही. स्वारगेट वरून संध्याकाळी बंगलोर ला वोल्वो धावतात. संध्याकाळी ४ ला बसलात तर बंगलोर सकाळी ८ पर्यंत पोहोचासाल. गाडी तून उतरल्यावर लगेच तिथे ड्रायवर आलेला असेल. संध्याकाळ पर्यंत तुम्ही कोडाईकणाल मध्ये असाल. राहिलेले बाकीचे दिवस तुम्ही तिन्ही हिल स्टेशन मस्त फिरू शकता.