बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू---------
अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग.
वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी. परत 5 मिनिट शिजवून भरपूर कोथंबीर टाकुन वरण बट्टी खायची.
प्रतिक्रिया
16 Apr 2015 - 9:55 am | स्पंदना
वांगी अशी घोटलेली पहिल्यांदाच ऐकली!!
आम्ही डाळ वांग्यात सुद्धा वांग ताटात कुस्करतो.
बाकी चुरचुरीत,दणदणीत !! __/\__!!
लय भारी. करुन पहातेच आता!
16 Apr 2015 - 9:56 am | Maharani
तोंपसु...करून बघते मी पण...
16 Apr 2015 - 11:51 am | सविता००१
तुला वांगं रेसिपी क्वीन हा किताब देते मी आता.
ही रेसिपी नाही माहीत. आता करते.
बरं झालं अजून एक पद्धत कळली.
पण वांगं घोटून म्हणजे भरीतच होईल की ;)
16 Apr 2015 - 11:52 am | त्रिवेणी
नाही ग भरीत नाही होत.
16 Apr 2015 - 12:07 pm | आदूबाळ
इथे रिक्वेष्ट करू शकतो का?
गोडी बटाटी असा काहीतरी पाठारे प्रभूंचा खास रस्सा असतो. त्याची पाकृ कोणाला माहीत आहे का?
16 Apr 2015 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा
@गोडी बटाटी असा काहीतरी पाठारे प्रभूंचा खास रस्सा असतो. त्याची पाकृ कोणाला माहीत आहे का?>> व्हय जी व्हय! चालत असेल तर सांगा कुणी तरी!
16 Apr 2015 - 12:45 pm | स्पंदना
पाठारे प्रभू हे वेगळे असतात का?
मलातरी कोकणस्थ, घाटावरचे, कायस्थ असे माहीती आहेत.
अर्थात मग गोडी बटाटी तर अजिबातच नाही माहीत.
16 Apr 2015 - 3:28 pm | आदूबाळ
येस. पाठारे प्रभू वेगळे असतात. मुंबईचे मूळचे भूमिपुत्र (अर्थात कोळी समाजाव्यतिरिक्त).
एकदम देखणे लोक. उदा. श्रेयस तळपदे, अनिकेत विश्वासराव.
आणि सगळ्या प्रभूंप्रमाणे स्वयंपाक तर काय असतो, वा!
16 Apr 2015 - 3:31 pm | सूड
स्मिता जयकर पण, इफ आयाम नॉट राँग!
16 Apr 2015 - 6:47 pm | रुस्तम
CKP आहेत ना त्या?
16 Apr 2015 - 6:52 pm | सूड
एका मुलाखतीत पाठारे प्रभू म्हटल्या होत्या, प्लस मोत्याचा गणपती (अक्षता वापरुन रेखलेला) वैगरे पण एका गणेशोत्सवात दाखवत होते त्यांच्या घरचा!
16 Jun 2015 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
होय, पाठारे प्रभू आहेत त्या.
पाठरे प्रभूंना ओळखायचे म्हणजे लग्नकार्यात त्यांच्या बायका पाहाव्यात. सोन्याने मढवलेल्या असतात. सोनाराची चालती बोलती शो रुमच म्हणाना. दुसरे, ह्यांची आडनांवे भव्य दिव्य असतात. अजिंक्य, धुरंधर, तळपदे, जयकर, नवलकर, विजयकर वगैरे वगैरे.
इंग्रजांच्या अमलाच्या काळात मुंबईतील पाठारे प्रभूंची इंग्रजांशी विशेष जवळीक होती ती इंग्रजी राहणीमान त्यांनी स्विकारले होते त्या मुळेच. रात्री पार्ट्या करणे ही विशेष आवड. पार्ट्यांमधून बायकाही मदिरापान करायच्या. पण समाजात उघडपणे नाही. तसे बोलायचे ही नाही. मदिरापान करताना नाकातील नथ जरा उचलून ग्लास तोंडाला लावावा लागायचा. त्यामूळे दुसर्यादिवशी महिलांमद्ध्ये आपापसात चर्चा करताना 'काल जरा नथ वर करून आले' असे सांकेतिक भाषेत बोलायचा प्रघात होता. (संदर्भः ऐक मुंबई तुझी कहाणी)
16 Jun 2015 - 3:42 pm | कपिलमुनी
कोडवर्ड भारीच !
16 Jun 2015 - 4:00 pm | प्रभाकर पेठकर
खाली मितान ह्यांनी दिलेली पाककृती पाहता त्यात गोड काही नाही हे समजलं. पाठारे प्रभूंचा मसाला खास असावा. करून पाहिली पाहिजे.
पण गुरुजी, आपली आमसुल-गुळ-काळामसाला वापरून केलेली भाजी मस्त आंबट-गोड-तिखट अशी चवदार लागते. जरा जास्त तेल आणि कोथिंबीर घालायची.
गोव्याकडेही आंबट-गोड बटाटा भाजी बनवितात.
16 Apr 2015 - 1:16 pm | मितान
http://www.vadanikavalgheta.com/2013/07/godi-batati-rassa.html#.VS9oQJMTXMw
16 Apr 2015 - 3:26 pm | आदूबाळ
हो हो हेच! फोटो पाहून खात्रीच पटली. बहुत धन्यवाद!
पूर्वी गिरगावातल्या फणसवाडीजवळच्या एका टपराट खानावळीत जायचा योग येत असे. तिथे हा रस्सा एकदोनदा खाल्ला होता. आणि "तेलपोळी" नावाचा एक पाठारे प्रभू पेशल गोड पदार्थ.
करून बघतो आता.
बाकी ही पाकृ मराठीऐवजी इंग्रजी ब्लॉगवर पाहून नवल वाटलं.
16 Apr 2015 - 12:13 pm | त्रिवेणी
रिक्वेष्ट कशाला हवी. हा धागा सर्वांसाठी आहे.
16 Apr 2015 - 1:34 pm | सविता००१
आता पाठारे प्रभू मसाला कसा करायचा ते सांग.
16 Apr 2015 - 1:57 pm | मितान
सवे, त्याच ब्लॉगवर उचकपाचक कर सापडेल..
16 Apr 2015 - 1:50 pm | स्मिता श्रीपाद
पाठारे प्रभु मसाला मिळतो विकत
माझ्याकडे होतं प्रमाण...घरी आहे वहीत...उद्या सांगते बघुन
16 Apr 2015 - 2:03 pm | सविता००१
मितान आणि स्मिता
16 Apr 2015 - 2:09 pm | स्मिता श्रीपाद
http://www.sanjeevkapoor.com/recipe/Pathare-Prabhu-Masala.html
घे ग हे....घरी काय वेगळं आहे बघते आज..
16 Apr 2015 - 2:25 pm | दिपक.कुवेत
धाग्याचं शिर्षक आणि आतली भाजी हे काँम्बीनेशन समजलं नाहि.
16 Apr 2015 - 2:32 pm | त्रिवेणी
आज सकाळी अप्पुताईला तिच्या नेहमेच्या पद्धती व्यतिरिक्त वेगळ्या चवीचे काही करायचे होते जेवायला. मग जर अशी काही वेगळी भाजीची पद्धत किवा रेसीपी हवी असेल तर इकडे मदत मागु शकतो आपण.
मी दिलेली भाजीची थोडक्यात रेसीपी होती, सुरुवात कुठून करावी म्हणुन ती भाजी दिली.
(वांगीप्रेमी त्री)
16 Apr 2015 - 2:36 pm | दिपक.कुवेत
खाउगल्ली असं नाव का?
16 Apr 2015 - 3:37 pm | प्रीत-मोहर
इथे वेगवेगळ्या खाउंच्या रेशिप्या येतील म्हणुन खाउगल्ली.
16 Apr 2015 - 3:36 pm | स्पंदना
अहो दिपक खाऊगल्लीत कस सरमिसळ सगळ वेगवेगळ्या ठेल्यांवर मिळत, अन ते उभ्या उभ्या जादा उपचार न बाळगता खायच असत ना तस ह्या धाग्यावर चार ओळीत करायची पद्धत सांगायची.
अन मग ती पद्धत साधी आमटी फोडणीची असेल, ताक भाज्यांची असेल काहीही साध सोप्प, रोजच्या जेवणातलं. आता मेथीची भाजी कुणी कांदा घालून, कोणी मूग डालीत, तर आम्ही फक्त आणि फक्त तूर आणि लसणेच्या फोडणीचीच करतो. तर हे छोटे मोठे फरक येथे शेअर करायचे.
तुम्ही पनीर कश्याकश्यात वेगवेगळ्या पद्धतिने घालता येइल ते सांगा. ;) हाकानाका?
16 Apr 2015 - 6:13 pm | दिपक.कुवेत
सांगतो लवकरच...
16 Jun 2015 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर
'पाककृती' हा विभाग असताना ही वेगळी चुल मांडण्याचे प्रयोजन कळले नाही. हे पाककृत्या पाहण्यासाठी दोन वेगळ्या ठिकाणी उचकपाचक करणे त्रासदायक आहे.
संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील का?
16 Apr 2015 - 2:54 pm | त्रिवेणी
सगळेच प्रकार मिळतील इथे म्हणुन.आणि दुसरे काही नाव सुचलेही नाही मला.
16 Apr 2015 - 6:12 pm | जेपी
मला एका चटणी रेशीपी हवी.नाव म्हैत नै ..बहुतेक कर्नाटकी ..काही दाळी,चिंच खोबर आणी बहुतेक गुळ ही घालतात..
चटणी कोरडी असते.
16 Apr 2015 - 7:44 pm | स्रुजा
आहे आहे माझ्याकडे. झकास लागते. देते थोड्या वेळात. तुम्हाला तीच हवी आहे का नाही कोण जाणे पण याच साहित्यात होते ती चटणी.
17 Apr 2015 - 10:42 am | जेपी
द्या रेसीपी चटणी ची
17 Apr 2015 - 6:26 pm | मितान
उडीद डाळ, चना डाळ, सुके खोबरे प्रत्येकी १ कप
शेंगदाणे, धणे प्रत्येकी १/२ कप
३ चमचे जिरे, २ छो चमचे हिंग, १ छो च मेथीदाणे,१५-२० लाल सुक्या मिर्च्या,
पाव कप गूळ, पाव कप चिंच, चवीनुसार मीठ
डाळी आणि मसाले वेगवेगळे खमंग भाजून घ्यायचे.(गूळ आणि चिंच भाजू नका ;) ) आणि सगळं एकत्र करून दळायचं.
ही कर्नाटकी रेसिपी. अजून दक्षिणेकडे जाल तसतसं तिखट आंबट वाढून गोडपणा कमी होतो. काहीजण ही चटणी नुसत्या उडीद डाळीची करतात.
मी चिंच खात नसल्याने यात आमचूर पावडर वापरते. मस्त चव येते.
17 Apr 2015 - 7:08 pm | जेपी
धन्यवाद.शेंगदाण्याबद्दल सांशक आहे.बहुतेक नसतात.
16 Apr 2015 - 7:44 pm | स्रुजा
त्री, बरं केलंस खाऊगली सुरु केलीस गं.
16 Apr 2015 - 8:01 pm | आदूबाळ
ञी म्हणायचंय का तुम्हाला?
16 Apr 2015 - 8:03 pm | स्रुजा
:lol:
तेच हो तेच पण एवढं मला कुठे यायला?
16 Apr 2015 - 9:40 pm | सस्नेह
ज्यांनी कुणी काही रेशिप्या केल्यात त्यांनी ईथे फोटोपण पेष्टवा
16 Apr 2015 - 10:09 pm | श्रीरंग_जोशी
आलु छोले बनवतांना वापरायची एक क्लृप्ती.
बटाटे थेट छोल्यांबरोबर शिजवण्यापेक्षा ते वेगळे उकडून घ्यावेत (पण जेम तेम उकडावेत). त्यांच्या फोडी करून तव्यावर थोड्याशा तेलात व्यवस्थित परतुन घ्याव्या.
छोले पूर्ण बनल्यावर या फोडी त्यात घालाव्यात. या फोडींच्या खरपूसपणामुळे छोले अधिकच लज्जतदार बनतात.
हापिसच्या पॉटलकमध्ये मी बनवलेले आलू छोले.
त्रि वे णी मो ड ऑ न
रो च क आ हे धा गा. प्र ति क्रि यां च्या प्र ति क्षे त.
त्रि वे णी मो ड ऑ फ.
16 Apr 2015 - 10:13 pm | स्रुजा
म स्त दि स ता ये त छो ले आ णि का हो त्रि ला छ ळ ता आ धी च के व ढी मे ह न त घे ते ती फो न व रू न टा य पा य ला
छोल्यांवरून आठवलं, माझी एक उत्तर भारतीय मैत्रीण छोले उकडताना एक टी बॅग टाकते, मस्त रंग येतो.
16 Apr 2015 - 10:52 pm | रुपी
मी पण चहा घालून पाणी उकळून घेउन ते गाळून घेउन वापरते छोले उकडण्यासाठी.
हे छोले पण खूपच छन दिसत आहेत!
17 Apr 2015 - 10:18 am | सविता००१
सुरेख दिसतायत छोले.
आ णि हो, त्री ला का म्ह णू न त्रा स दे ता य? उ स का स्टा ई ल है व ह! ;)
17 Apr 2015 - 1:35 pm | त्रिवेणी
म स्त दि स ता आ हे त छो ले
16 Apr 2015 - 10:54 pm | रुपी
वरण बट्टी खायची >> हिला वरण बट्टी का म्हणतात? घोटून घेतात म्हणून?
17 Apr 2015 - 2:08 am | विरोचन
पाठारे प्रभूंविषयी इथे माहिती मिळेल. काही 'परभी' रेसिपीज सुद्धा आहेत. इरावती कर्वांच्या 'मराठी लोकांची संस्कृती' मधे यांचा उल्लेख आढळतो
17 Apr 2015 - 2:57 am | जुइ
छान आहे धागा!!
17 Apr 2015 - 10:39 am | स्वीत स्वाति
वरण बट्टी बरोबर काय लागते हि भाजी वाह …विकांताला करायलाच हवी वरण बट्टी न हि भाजी . बट्टी चे पीठ नाही मिळाले तर वरण पोळी तरी करायलाच हवी आता जोडीला हि भाजी आहेच ..
17 Apr 2015 - 11:35 am | त्रिवेणी
ग हु १ वा टी पी ठ + १/२ र वा घ्या स्वा ती ता ई ब ट्टी सा टी
17 Apr 2015 - 11:58 am | स्वीत स्वाति
जर बट्टी पीठ नाही मिळाले दळून तर
17 Apr 2015 - 1:16 pm | स्पंदना
आता गपगुमानं बट्टीची रे सी पी दे.
ना ही त र बघ!
17 Apr 2015 - 2:11 pm | विशाखा पाटील
बट्टी माझ्या पद्धतीप्रमाणे -
जाडसर कणिक घे किंवा कणिक आणि रवा एकत्र करायचा. त्यात ओवा, मीठ, हळद, तेल घालून घट्ट पीठ भिजवायचं. त्याचे गोळे (गोळे करताना पेढ्याच्या आकारासारखे, पण मध्यभागी फुगीर ठेवायचे) करून वाफवायचे. नीट झाले आहेत की नाही ते बघण्यासाठी चाकू घालून बघायचा किंवा चकाकी आलेली दिसते, त्यावरून कळते. थंड झाल्यावर त्याचे दोन/चार भाग करून तेलात किंवा तुपात तळायचे. खरं तर, बट्टी ही भाजली जाते, पण आता कुठे काड्या गोळा करत फिरणार, म्हणून हा मार्ग.
बट्टी, वरण, भरपूर तूप आणि त्रि वे णी ने सांगितलेली वांग्याची भाजी असा ताव मारायचा आणि नंतर ताणून द्यायचं.
17 Apr 2015 - 2:27 pm | स्पंदना
शेवटच "ताणुन द्यायच" जमतयं.
बाटी मी पण करते, पण त्री काहीतरी वेगळ करते. तुपात असतात तिच्या बट्ट्या.
17 Apr 2015 - 2:57 pm | त्रिवेणी
मा झी रे सि पी उ द्या दे ते मु लीं नो.
17 Apr 2015 - 9:01 pm | त्रिवेणी
अप्पु ताई माझी बट्टीची कृती-
2लोक्स साठी मी जाड दळलेले गव्हाचे पीठ (नसल्यास 1 वाटी गव्हाचे पीठ+1/2 वाटी रवा हे प्रमाण घ्यावे). त्यात 3-4 चमचे दही (सोड्याचे काम करते) मीठ, थोडी हळद, असतील तर थोड्या ओवा टाकून 2 चमचे तेलाची कडकडीत मोहन द्यायचे आणि थोडे घट्ट भिजवून अर्धा तास ठेवायचे.
आता या पीठाची पोळपाटावर तेल लावून मोठी पोळी लाटावी. पोळीवर परत थोडे तेल लावून गुंडाळी करावी आणि ती गुंडाळी मोठ्या लिंबाच्या आकारात गोळे करून गोल गोल करावे.
आता frying pan मध्ये बर्याेपैकी तुप टाकून वरील गोळे मस्त भाजून घ्यावे. 15-20 मिनिटात मस्त होतात.
आता वरणात ही बट्टी चुरुन बट्टी शेकायला वापरलेलेच तुप घालून ओरपावे.
(बट्टी करतांना तुप कमी घेतले तर सात जन्माचे पाप लागते.)
17 Apr 2015 - 2:42 pm | सूड
जाड पोहे कांदेपोह्यांना जसे भिजवतो तसे रात्री भिजवावे. सकाळी उन्हं वाढायच्या आत हे पोहे नीट मळून त्यात जीरं मीठ घालून चकल्या पाडाव्या. सावलीत दोन दिवस वाळवाव्या, शेवटच्या दिवशी एक उन्ह दाखवून हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्या. जेवताना तोंडी लावणं म्हणून तळून घ्यायला बर्या पडतात. यात लाल तिखट, लसूण वैगरे घालून पण करता येतात. तळताना मात्र तेल नीट तापवून मध्यम आचेवर तळायच्या तर आतपर्यंत तळल्या जातात.\\
आता हापिसातून फोटो अपलोड करता येईना नायतर यंदा केलेल्यांचा एक फोटो टाकला असता.
17 Apr 2015 - 2:46 pm | स्पंदना
मिरगुंडा सारख्या लागतात का?
आहेत जाड (जरा जास्तच जाड आहेत. कसे संपवावे या विवंचनेत आहे.) पोहे. करुन पहाते.
17 Apr 2015 - 2:49 pm | सूड
हो साधारण तशाच, पण मिरगुंडात पापडखार असतं. यात तसं काहीच नाही.
फक्त सकाळी अकराच्या आत सगळं उरकेल असं बघा, नाहीतर पोहे रात्री भिजवलेले असल्याने दुपारनंतर राह्यलं तर मग आंबायला सुरुवात होते.
17 Apr 2015 - 2:58 pm | आदूबाळ
व्हाट इज पापडखार?
17 Apr 2015 - 3:18 pm | सूड
पापडखार इज युज्ड फॉर मेकींग पापड्स कुरकुरीत!! जास्त झाल्यास पापड तेलात सोडताच काळे पडतात. आणि तुरटसर अशी विचित्र चव येते.
21 Apr 2015 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
पापडखार म्हणजे sodium benzoate which is widely used as a food preservative known अस E211.
Alternatively, you can use Sodium Carbonate and Sodium Bicarbonate in 2:1 ratio instead of पापडखार टू मेक पापड्स कुरकुरीत.
22 Apr 2015 - 10:32 am | रुस्तम
http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=182
17 Apr 2015 - 3:01 pm | स्पा
17 Apr 2015 - 3:17 pm | सूड
फोटो डकवण्यात हेल्पवल्याबद्दल धन्स!!
18 Apr 2015 - 7:35 pm | सानिकास्वप्निल
रंगीत चकल्या सुरेख दिसतायेत.
खूप आवडल्या :)
22 Apr 2015 - 10:12 am | Mrunalini
स्पा... मस्त दिसतायत रंगीत चकल्या
कोणी केल्या??? :D I hope its not you. :P
28 Apr 2015 - 5:57 pm | सूड
काकू, मी केल्यात. स्पावड्याने फोटो डकवायला मदत केलंन!!
17 Apr 2015 - 3:02 pm | पियुशा
आ धी जि ल ब्या आ ता च क ल्या का स्पा
17 Apr 2015 - 3:04 pm | सविता००१
मस्त दिसतायत चकल्या. कलरफुल
17 Apr 2015 - 3:19 pm | सूड
रुखवतासाठी केल्यात!! ;)
17 Apr 2015 - 3:47 pm | सविता००१
छान दिसतील रुखवतात.
17 Apr 2015 - 3:05 pm | अजया
सूडची रेसिपी करुन बघण्यात येईल.सोपी वाटतीये.
17 Apr 2015 - 6:31 pm | मितान
लोकांनो, एक मदत हवी आहे.
२० खादाड लोकांसाठी ;) इडली सांबार करायचं आहे. मेनु फक्त आणि फक्त इडली सांबारच आहे.
किती डाळ तांदूळ लागतील?
17 Apr 2015 - 8:06 pm | रेवती
डाळ तांदूळ प्रमाण आपापले वेगळे असते बरेचदा! मी हिवाळ्यात २ मापे तांदूळ व १ माप उ. डाळ घेते. उन्हाळ्यात ३ मापे तांदूळ व १ माप उ. डाळ घेते (त्यातही अर्धे तांदूळ उकडे व अर्धे सोना मसूरी). यापुढे सांगतीये ते प्रमाण मेजरींग कपांचे असेल त्याप्रमाणे घेणे.(माझे वेगळे माप आहे). तुला एकूण ९ मेजरींग कप्स धान्य लागणार आहे. त्यात डाळ किती व तांदूळ किती घ्यायचे ते ठरव. लोक्स जर व्यवस्थित खाणारे असतील तर याच प्रमाणात थोडा फेरफार कर. जसे, ११ मापे धान्य (डाळ +तांदूळ).
आता सांबारासाठी तूरडाळ म्हणशील तर पाऊण मेजरींग कप डाळ शिजवून पेठकरकाकांच्या कृतीने सांबार केले तर आम्हाला तिघांना पुरून अजून २ जणांना पुरेल इतके उरते. पण सहभोजनाच्यावेळी पाऊण कप डाळीचे सांबार ४ जणांना पुरेल असे धरलेस तर हिशोब कर. पेठकर काकांच्या सांबाराच्या कृतीनुसार फर्मास सांबार होते, फक्त मी त्यात गूळ घालते.
चटणीचे प्रमाण माझ्याकडे नाही. ती अंदाजे करते कारण मुलगा अजिबात चटणी खात नाही.
18 Apr 2015 - 9:42 am | जेपी
1 किलो तांदळात पाव किलो डाळीची भर.
50 मिडीयम साईज इडल्या होतात.
बाकी असा.
17 Apr 2015 - 8:37 pm | पलाश
(२.५ भाग तांदूळास १ भाग उडीद डाळ) माझ्या अंदाजाप्रमाणे उकडे तांदूळ १२.५ वाट्या आणि उडीद डाळ ५ वाट्या या प्रमाणात मध्यम आकाराच्या (१७.५ * ८) साधारण १४० इडल्या होतात. प्रत्येकी ७ इड्ल्या धरल्या तर हे प्रमाण बरोबर होईल.
17 Apr 2015 - 9:14 pm | मितान
तिन्ही प्रतिसादातील प्रमाणांचा लसावि काढून इडल्या करणेत येतील. :)
आता पेठकर काकांचे सांबार शोधते...
17 Apr 2015 - 9:15 pm | आदूबाळ
लसावि नाही, सरासरी.
18 Apr 2015 - 9:41 am | जेपी
साहित्य-कच्ची कैरी मेन आहे.
क्रुती.-
कैरीबारीकचिरा.
कढईत पळीभर तेल गरम करुन त्यात मोहरी ,जिरे, चुटकीभर मेथीदाणे टाका. यात कैरीच्या फोडी टाकुन परता.
यामध्ये तिखट मीठ शेंग पुड चवी पुरता गुळ टाकुन शिजुद्या.
17 Apr 2015 - 7:47 pm | पलाश
चित्र १.
![pattice preparation](https://lh3.googleusercontent.com/-5UWQvtU9x2w/VTEOYrUzjgI/AAAAAAAAACw/NM2rCQii6UE/s512/IMG_9055.JPG)
चित्र २.
![pattice ready to shallow fry](https://lh3.googleusercontent.com/-0ZH8HF972mY/VTEOZMORGRI/AAAAAAAAAC0/Lryxs5nkMXA/s800/IMG_9058.JPG)
चित्र ३.
![pattice ready](https://lh3.googleusercontent.com/-kmbI3qLZ6-A/VTEOWpyWTHI/AAAAAAAAACk/Rccmxt5Xj2U/s512/IMG_9061.JPG)
पहिल्या चित्रात दाखवलेले साहित्य व एक/दोन चमचे तेल. बटाटे सोडून इतर पदार्थ एकत्र करून सारण बनवावे. याशिवाय या सारणात बेदाणे छान लागतात. असल्यास एक/दोन चमचे घालावेत.
शिजवलेले व सोललेले बटाटे खिसणीवर खिसून थोडे मीठ घालून त्याचे गोळे बनवून त्यात सारण भरावे व दुसर्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पॅटिस तयार करून घ्यावेत. नॉनस्टिक पॅनमध्ये अगदी थोडे तेल घालून त्यामध्ये पॅटिस चित्र तीन मध्ये दाखवल्याप्रमाणे रंग येईतो शॅलो फ्राय करावेत. नुसते दही किंवा दह्यातील चटणीबरोबर खावेत.
17 Apr 2015 - 7:50 pm | श्रीरंग_जोशी
फारच आकर्षक दिसत आहेत.
17 Apr 2015 - 8:59 pm | त्रिवेणी
माझ्याकडे pattice करतांना कितीही मैदयात, कोर्न्फ्लौर मध्ये आंघोळ घातली तरी फुटतात. काय करू म्हणजे फुटणार नाहीत.
17 Apr 2015 - 9:40 pm | पलाश
वरच्या कृतीत शॅलो फ्राय केले आहेत. बटाटे अगदी बेताचे उकडून घ्यावेत. म्हणजे सहसा त्यात काहीही न घालतासुद्धा थोड्या तेलावर न फुटता शिजतात.
तळून करायचे असतील तर मात्र उकडून खिसलेल्या बटाट्याच्या किसात या प्रकारात उपवासाची भाजणी घालावी व पॅटीस कोरड्या भाजणीत घोळवून तळावेत.
उपवासाचे नसतील तेव्हा नेहमीकरता वरील प्रमाणात बटाटे बेताचे उकडून त्यात २/३ ब्रेड स्लाईस अगदी थोड्या पाण्यात भिजवून पाणी पिळून घालावे व पॅटीस करून ब्रेडच्या चुर्यात घोळवून तळावे. फुटतात असे वाटले तर बटाटा किसात आणखी थोडा ब्रेड भिजवून घालावा.
18 Apr 2015 - 7:32 pm | सानिकास्वप्निल
बटाटे उकडून कीसून घे ,खुप उकडलेस तर चिकटपणा येतो. मैदा, काॅर्नफ्लाॅवर घालून बाईंड करायला सोपे पडतात.
22 Apr 2015 - 10:14 am | Mrunalini
येस्स.. आणि उपासाचे करायचे असेल तर वरईचे किंवा शिंगाड्याचे पीठ वापरले तरी चालते.
16 Jun 2015 - 5:58 pm | स्वाती दिनेश
बटाट्याची पावडर मिळते ती घाल ना बाइंडीग करता..
17 Apr 2015 - 8:09 pm | रेवती
त्रि, धाग्याचे शिर्षक बघून दचकले. का ते तुला समजले असेलच. ;)
तू दिलेला मसाला वापरण्यासाठी भाजी कळव ना!
17 Apr 2015 - 8:45 pm | त्रिवेणी
रेवक्का ख्फ वर ये ग उद्या.
आता परत एक वांग्याची रेसीपी देते त्या मसल्यासाठी.
1 कांदा, 1 टमाटा खिसून घ्यायचा, त्यातच खिसलेले खोबरे, हळद थोडे लाल तिखट आणि मी दिलेला मसाला 1 चमचा घे. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाल. आता या मिश्रणात 1चमचा तेल आणि भरपूर कोथंबीर घालून छान मिक्स कर. मिश्रणात पाणी अजिबात नको. आता वांग्याना + मध्ये कापून वरील मिश्रण भरून थोड्या जास्त तेलात वांगी शिजव. भांड्यावरच्या झाकणात पाणी घालायचे म्हणजे आतले वांगे जळत नाही.
17 Apr 2015 - 10:11 pm | रेवती
ओक्के. आता आमच्याकडे वांगी मिळू लागतील, त्यावेळी भाजी करते व कळवते. धन्यवाद ३वेणी.
17 Apr 2015 - 9:38 pm | अजया
पेठकरकाकांच्या सांबाराची लिंक देईल का कोणी?