मराठी इ-पुस्तकांचा प्रकल्प.

रामदास's picture
रामदास in काथ्याकूट
17 Aug 2008 - 10:21 pm
गाभा: 

नमस्कार.
मराठीत कॉपीराइटचे हक्क संपलेल्या पुस्तकांचे इ-पुस्तकात रुपांतर करण्याचा एक प्रकल्प काही मंडळी सुरु करीत आहेत.यासाठी
आज ठाण्यात श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांचे घरी एक भेटीगाठीचा समारंभ ठेवला होता. मी या कार्यक्रमासाठी हजर राहू शकलो नाही.परंतू त्यानंतर श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांचेसोबत झालेल्या चर्चेत बरीच माहिती मिळाली.
१ जुन्या मराठी ग्रंथसंपदेचे जतन करणे.इ-माध्यमात.
२ अशा पुस्तकांची यादी बनवणे.त्यांची प्रत मिळवणे.
३ इ-रुपांतर करून सी.डीं बनवणे.
४ वितरण करणे.
५येत्या वर्षात कमीतकमी पन्नास पुस्तकांचे लक्ष्य ठरवण्यात आलेले आहे.
६ या प्रकल्पासाठी स्वयंसेवकांची यादी बनवणे.
गोषवारा थोडक्यात असा आहे.
इच्छुकांनी रामदास यांना nathconsulting@gmail.com या पत्त्यावर संपर्क करावा.

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

18 Aug 2008 - 6:45 am | मेघना भुस्कुटे

माहितीबद्दल धन्यवाद, काका.

अरुण मनोहर's picture

18 Aug 2008 - 9:13 am | अरुण मनोहर

इ पत्र टाकले आहे.

चंबा मुतनाळ's picture

18 Aug 2008 - 1:11 pm | चंबा मुतनाळ

इ पत्र पाठवत आहे.
गुगलले असता, खालील ठीकाणी बरीच मराठी पुस्तके सापडली
<डीजीटल लायब्ररी ऑफ इंडीया>

रामदास's picture

18 Aug 2008 - 6:09 pm | रामदास

आभारी आहे. उपक्रमाच्या संचालकांना माहिती पुरवतो आहे.

चिन्या१९८५'s picture

19 Aug 2008 - 3:19 pm | चिन्या१९८५

^^^^^^^^^^^^^^हे पान उघडत नाहीये

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 3:27 pm | विसोबा खेचर

४ वितरण करणे.

कुणाला वितरण करणे? कसे करणे? आणि प्रत्येक सीडीचे किती पैसे घेणार? पैसे घेतल्यास नफा कुणाला मिळणार? किती मिळणार? नफ्याचं प्रमाण कोण ठरवणार? की हे काम ना नफा ना तोटा तत्वावर केलं जाणार आहे?

अनेक प्रश्न आहेत....!

तात्या.

चिन्या१९८५'s picture

18 Aug 2008 - 7:07 pm | चिन्या१९८५

अतिशय चांगला प्रकल्प आहे असे वाटते.इंटरनेटवरही अशी पुस्तके उपलब्ध करायला हवीत

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

ऐका दाजीबा's picture

19 Aug 2008 - 1:10 am | ऐका दाजीबा

श्री (की सौ?) चंबा मुतनाळ यांना...

'गुगलणे' हे नवीन क्रियापद मराठीस प्रदान केल्याबद्दल धन्यवाद!

उदय ४२'s picture

19 Aug 2008 - 8:47 pm | उदय ४२

अशा प्रकारचा प्रयोग मुलुंडच्या माधव शिरवळकर यांनी फार आधीपासुन सुरु केला आहे.त्यांनी राम गणेश गडकरी ,लक्श्मीबाई टिळक आदिंचे लेखन इ बुका द्वारे प्रसिद्ध केले आहे.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2008 - 11:01 pm | मुक्तसुनीत

>>> त्यांनी राम गणेश गडकरी ,लक्श्मीबाई टिळक आदिंचे लेखन इ बुका द्वारे प्रसिद्ध केले आहे.

लिन्क देता येईल का त्याची ?

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2008 - 9:11 pm | प्रकाश घाटपांडे

हा माधव शिरवळकरांचा ब्लॉग
प्रकाश घाटपांडे

उदय ४२'s picture

20 Aug 2008 - 3:55 pm | उदय ४२

माधव शिरवळ्करांचा इ मेल आय डी देतो.त्या वरुन मिळवता येईल.
किंवा त्यांची वेबसाइट देतोय.
madhav@pujasoft.com
www.esanganak.com

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)