------- ऑफिसमध्ये संध्याकाळी वेळ संपल्यानंतर एक-एक मेंबर गोळा झाले गप्पा मध्ये पावसाळी पिकनिकचा विषय निघाला .......
अचानक बेत ठरला .....माथेरानला जायच ठरल .....कुणालाच काही माहीती नव्हतं......पनवेलवरून जाता येत इतकच माहीती होतं...सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी असते म्हणून ....रजा टाकून कामाच्या दिवशी जायचं ठरलं....दिवस ठरला शुक्रवार दि.२९.०६.२०१२
पनवेलला एका मित्राच्या घरी जमायचं ठरलं होतं..त्याप्रमाणे सकाळी ८:३० ला जमलो त्याच्या घरी नाष्टा केला...नेरळ पर्यंत गाडी करून जायच होत...तिथून पुढे चालत जायचं ..गाडी ठरवून निघालो. आम्हाला काही माहीती नसल्यामुळे आम्ही त्या ड्रायव्हरवर भरवस्यावर होतो.तिच आमची मोठी चूक ठरली. त्याने आम्हाला अर्ध्या तासाने एका गावात नेऊन सोडले .गावाचे नाव होते "धोदाणी" ....गावात चौकशी केली त्यांनी एक रस्ता दाखवला इकडून तासाभरात पोहचाल असं सांगितलं..सकाळी सगळे जोशात होते निघालो......
प्रचि ०१ --अशी झाली सुरवात.....
प्रचि 02 – वाटेत नदी लागली (ओढा) ..कोरडाच होता...
प्रचि 03 – दहा मिनिटात सगळे दमले..........
प्रचि 05 –फोटोत खाली घरे दिसतात ते ते धोदाणी गाव...तिथून सुरवात केली होती...
प्रचि 06 – हाच तो ग्रुप...(मी सोडून)
प्रचि 14 – मध्येच एक शिवाजी महाराजांचे मंदीर होते....
--- माथेरानला पोहचण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तास लागले .......खुपच चाललो,याची आम्हा दहा जणांपैकी कुणालाच सवय नव्हती ....परंतू ज्यावेळी वरती पोहचलो त्यावेळी तिथले वातावरण पाहून संपूर्ण थकवा निघून गेला ..त्यातच तिथे पोहचता-पोहचताच पाऊस चालू झाला....त्यामुळे खुपच मजा आली......शेवटी खाली उतरताना त्याचेच काही प्रचि...
प्रचि 17-- याच्यावर ताव मारल्यावर आणखी हायस वाटल...
प्रतिक्रिया
23 Mar 2015 - 4:11 pm | स्पा
डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून
23 Mar 2015 - 4:12 pm | आदूबाळ
+१
आणि मला एकदम मुपीवरचे ते पन्नास ट्रेक करणारे काका आठवले.
23 Mar 2015 - 4:15 pm | वेल्लाभट
ळॉळ
24 Mar 2015 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा
@ डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून>>> =)))))
माझेहि! =))
24 Mar 2015 - 7:25 am | अत्रुप्त आत्मा
कित्ती वैट वाटतं नै? :-D फ़ोटुप्रेमळ हृदयाच्या पां डुब्बा ला! =))
23 Mar 2015 - 4:21 pm | कोंबडी प्रेमी
पहिल्यांदाच ऐकले
23 Mar 2015 - 4:25 pm | कपिलमुनी
पूर्वीच्या धाग्यात फोटो चाम्गले होते हो तुमचे !
अचानक का गळपटलानं ?
23 Mar 2015 - 4:55 pm | मॅक
त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता......
हे सगळे फोटो .... मोबाईल आणि एक सोनिचा डिजिटल कॅमेरा यांनी काढले आहेत.(तेही मित्राच्या)
23 Mar 2015 - 5:04 pm | पॉइंट ब्लँक
अशा अचानाक ठरलेल्या सहलीच जास्त मजेशी आणि स्मरणिय होतात.
23 Mar 2015 - 5:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
इफेक्ट्शिवाय फोटो चालले असते.
24 Mar 2015 - 8:57 am | कंजूस
>>ड्रायवरने चूक केली आम्हाला धोधाणीला सोडले>>? काहीच चुकलं नाही हो. हाच तर ट्रेक आहे "धोधाणी ते सनसेट पॉइंट(पॉर्क्युपाइन पॉइंट)" मी नेहमी इथूनच जातो.फोटोंना नंतरचे नक्शीकाम करतांना त्यांची कॉपी करून त्यावर काम करतो ना?
24 Mar 2015 - 10:59 am | नितिन पाठे
काहीच चुकलं नाही हो.... मी पण धोदाणी जवळ राहतो....एवढ्या निसर्गरम्य ठिकाणाहून - सनसेट पॉइंट जवळ पोहचे पर्यन्त खूप मजा येते
24 Mar 2015 - 11:56 am | मॅक
फोटोंना नंतरचे नक्शीकाम करतांना त्यांची कॉपी करून त्यावर काम करतो ना?
........हो...नक्कीच...
"धोधाणी ते सनसेट पॉइंट(पॉर्क्युपाइन पॉइंट)" मी नेहमी इथूनच जातो.
काहीच चुकलं नाही हो.... मी पण धोदाणी जवळ राहतो........ ते आम्हाला वरती गेल्यावर स्थानिक लोकांनी सांगितले.... पण पावसाळा असल्यामुळे कोणी जास्त जात नाही पावसाळ्यात त्या मार्गे... त्यामुळे आम्हाला वाटले की रस्ता चुकला
24 Mar 2015 - 12:29 pm | कपिलमुनी
नक्षीकाम कमी करा . मूळ फोटोची मजा गेली आहे.
बाकी तु समर्थला कोणत्या बॅचला होतास ?
30 Apr 2015 - 8:41 am | योगेश आलेकरी
छायाचित्रे पन.