भृगु संहिता फल पत्रांच्या शोधात...
मित्रांनो, आज या नववर्षाच्या सुरवातीला नाडी ग्रंथ भविष्य विषयावर पुढे शोध कार्य चालू ठेवण्याच्या निमित्ताने भृगु संहिता फल आदेश नेपाळमधे संग्रहित केले असल्याचे ऐकून होतो त्या वर अभ्यास दौरा करायला मी व जळगावच्या विवेक चौधरींनी काठमांडूची यात्रा करायला गोवा एक्सप्रेस ने जात आहोत.
त्यानंतर मेरठ, सहारनपूर, गुरू वालिया, प्रताप गढ, लखनौ येथील भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट वार्ता, फलादेश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत. ते करत करत राम नवमीला अयोध्या —साकेत, अलाहाबाद करत परतायचा बेत रचला आहे.
लहानपणी सिंदबादच्या सफरीतील अपेक्षित घटनाक्रम, अदभूत देश, लोक, प्राणी, आदि रोमांचकारी वर्णने वाचून थक्क व्हायला व्हायचे.
नाडी ग्रंथांच्या सहवासात असेच काहीसे थक्क करणारे अनुभव मोठे झाल्यावर मिळत राहिले.
आजचा हा दौरा काठमांडू विमानतळावर उतरलो की कुठे जायचे हे देखील न ठरवता करायला जात आहोत. महर्षी, विशेषतः भृगु - शुक्राचार्य या पुढील मार्गदर्शन करतील तसे घडेल...
संस्मरणीय घटनांच्या नोंदी व कथने वेळ मिळेल तसे लिहून तयार करेन ...
मिपाकरांच्या शुभेच्छा मिळाल्या तर आणखी काय पाहिजे!
प्रतिक्रिया
22 Mar 2015 - 12:00 pm | सतिश गावडे
हे कसे घडेल याबद्दल कुतुहल आहे.
मला पुढील शक्यता वाटतातः
१. भृगु - शुक्राचार्य आपल्या मनात असलेल्या ऋषीमुनींच्या वेषभुषेत दर्शन देऊन मार्गदर्शन करतील
२. भृगु - शुक्राचार्य सामान्य माणसाच्या रुपात येऊन मार्गदर्शन करतील.
३. तुम्हाला (स्वप्नात/जागेपणी) साक्षात्कार होईल
यातील काहीही झाले तरी इथे नक्की लिहा.
22 Mar 2015 - 12:28 pm | शशिकांत ओक
महर्षींच्या रूपाने आपण दिलेली शुभेच्छा स्वीकार्य आहे.
22 Mar 2015 - 12:34 pm | कंजूस
डायरीत रोजच्या घटना लिहित जातो तसे वर्णन देणारी भटकंती आणि ध्येयाच्या शोधात - पण कुठे जायचे ते अनिश्चित -अतिशय नामी कल्पना. त्यातला ताजेपणा उत्कंठावर्धक ठरणार. रामभरोसे भटकंतीला शुभेच्छा.
22 Mar 2015 - 12:42 pm | कानडाऊ योगेशु
+१
(एरवी असलेले/नसलेले आक्षेप बाजुला ठेवुन)तुम्हाला तुमच्या कार्यात सुयश मिळो हीच शुभेच्छा व्यक्त करतो.
ह्या प्रवासातुन कमीत कमी एक उत्कंठावर्धक प्रवासवर्णन तुमच्याकडुन वाचायला मिळु शकते.
22 Mar 2015 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
+२
23 Mar 2015 - 1:23 am | डॉ सुहास म्हात्रे
+३
तुमच्या भटकंतीच्या आणि शोधात आलेल्या अनुभवांसंबद्धीच्या लेखनाची प्रतिक्षा आहे !
तुमच्या यशासाठी सदिच्छा !
23 Mar 2015 - 10:49 am | पिवळा डांबिस
असेच म्हणतो.
शुभास्ते पंथानः सन्तु!!
23 Mar 2015 - 3:17 pm | आनन्दा
चायलेंज.
(कृ. ह. घ्या. विनोदनिर्मितीचा क्षीण प्रयत्न आहे.)
बाकी ओककाकांना शुभेच्छा.
22 Mar 2015 - 1:19 pm | तिमा
तुम्हाला तुमच्या प्रवासात आणि कार्यात नक्कीच यश मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.
22 Mar 2015 - 4:32 pm | पिंगू
काका, तुमच्या शोधयात्रेला शुभेच्छा.. यशस्वी होऊन परता आणि मग लेखमालाच टंका..
22 Mar 2015 - 7:19 pm | हेमन्त वाघे
नित हं नाही तर भृगु - शुक्राचार्य या पुढील मार्गदर्शन करणार नाही तर तुमची पर्क्षा बघायला अप्सरा पाठवतील ... तसा पण नेपाल काही नको त्या गोष्टी साठी प्रसिद्ध आहे .. तेवा सावध..
23 Mar 2015 - 12:33 pm | मॅक
शुभेच्छा.......!!!!!!!!
23 Mar 2015 - 12:49 pm | टवाळ कार्टा
पर्यटनाला कचकून शुभेच्छा....नेपाळ मला पण पहायचा आहे...हिमालयासमोर गेल्यावरच जाणवते की आपण किती शुद्र आहोत...वेड लावतो हिमालय
अवांतर - "महर्षी, विशेषतः भृगु - शुक्राचार्य या पुढील मार्गदर्शन करतील तसे घडेल..." ... जमल्यास त्यांचा फोटो पण काढा
23 Mar 2015 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरुवात शहाण्या मुलासारखी केली. पण पुढे नाव सिद्ध केले :) ;)
23 Mar 2015 - 12:54 pm | टवाळ कार्टा
ओ काका...फोटो असला की लोकांची तोंडे लगेच बंद करता येतात...हा सूर्य हा जयंद्रथ टैप
इथे कितीतरी लोक उग्गीच थोर भारतीय संस्कृतीला मनाचे श्लोक बोलतात ;)
23 Mar 2015 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
समज्लं, समज्लं :) अजून पुराव्यांची गरज नाय ;)
23 Mar 2015 - 5:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. प्रतिसाद वाचायला सुरुवात केल्यावर मला धक्का बसला. तीन वेळा प्रतिसादकर्त्याचं नावं आणि प्रतिसादाची पहिली ओळ वाचली. =))...
23 Mar 2015 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा
@जमल्यास त्यांचा फोटो पण काढा>>
23 Mar 2015 - 1:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
आपल्या भटकंतीला आणि अभ्यास दौर्याला सुद्धा (किंवा दौर्यातील अभ्यासाला म्हणा)
23 Mar 2015 - 2:17 pm | हेमन्त वाघे
अप्सरा आल्या तर tyanche पण फोटो . पण की केलेत तर त्याचा विडीओ नको... नाहीतर मीपा MMS बनायचा!
23 Mar 2015 - 7:24 pm | प्रकाश घाटपांडे
नाडी अनुभवाचा नवीन खजिना घेउन या! नाडी पर्यटनाला शुभेच्छा!
27 Mar 2015 - 5:19 pm | शशिकांत ओक
आता विविध अन्य भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट द्यायला जाणे चालू आहे...
संस्मरणीय घटनांच्या नोंदी व काही अनोखे अनुभव सादर व्हायची वाट पहात आहेत! वेळ मिळेल तसे सादर करायला आवडेल...
27 Mar 2015 - 5:34 pm | शशिकांत ओक
काठमांडू विमानतळावर एका बुटक्या व बसक्या चेहऱ्याची साधिका तरुणी... वाट पहात असलेल्या ओकांना न्यायला सज्ज...
कांतिपुर एफएक ९३.१च्या रेडिओ जॉकींनी घेतलेली मुलाखत...
नेपाळमधील भारतीय एम्बसीतील अधिकाऱ्याने गुळपाणी देऊन केलेले स्वागत...
हस्तलिखितांच्या आखाड्यात...
30 Mar 2015 - 9:05 am | शशिकांत ओक
मित्रांनो,
नेपाळच्या यात्रेनंतर उत्तर भारतातील विविध भृगु संहिता केंद्रात जाऊन तेथील संहितांचा आढावा घेऊन आपल्या देशातील आणि परदेशातील ज्योतिष विषयाची गोडी असणाऱ्यांना ,भाषा, बोली लिपी वर काम करणाऱ्या शोधकवृत्तीच्या अभ्यासकांना,कारण परत्वे भृगु फल आदेश मिळावू इच्छुकांना, या पुढील काळात एकत्रितरीतिने माहिती जमा करावी असा प्रयत्न केला आहे. त्यावर आधारित कथन विवेक चौधरींनी सादर करायचे ठरवले आहे. पाहूया ते काय व कसे सादर करतात.
विशेष विनंती...
आमच्या कडील विविध व्हिडीओ शूटिंग चे संकलन करायला मदत करू इच्छितात अशा मिपाकर मंडळींनो आपण या कामी हातभार लावायची विनंती करतो. संपर्क ९८८१९०१०४९.
30 Mar 2015 - 9:52 am | नाखु
नवा प्रदेश नवे अनुभव आणि तुमचे पर्यट्न वाचायला उत्सुक.
21 Apr 2015 - 2:26 am | शशिकांत ओक
विवेकजी,
संक्षिप्त वर्णनात्मक धागा सादर करावा. ही विनंती...