साखरभात...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in पाककृती
16 Aug 2008 - 6:29 pm

राम राम मंडळी,

आज कोली बांधवांची नारलीपुनव! मंडळी, कोली बांधवांचे मी मनापासून आभार मानतो कारण खोल दर्यात जाऊन ते आपल्याकरता ताज्या मासळीचा समुद्री मेवा घेऊन येतात. तेव्हा आज नारलीपुनवेच्या निमित्ताने मी समस्त कोली बांधवांना शुभेच्छा देतो!

आपला,
तात्या कोळी.

आमी बामन लोकं नॉर्मली या दिवशी नारळीभात करतो. आमची म्हातारी नारळीभात फार सुरेख करते. परंतु आज तिने जरा नेहमीची वहिवाट मोडली आणि नारळीभाताऐवजी साखरभात केला. तोदेखील फार सुंदर झाला होता हे वेगळे सांगायला नकोच. आमची म्हातारी आहेच मुळी सुग्रण आणि त्याचा आम्हाला वाजवी अभिमानही आहे! :)

असो,

तर मंडळी, आज आम्ही आपल्या सर्वांकरता आमच्या म्हातारीने केलेल्या साखरभाताची पाकृ येथे देत आहोत. हा साखरभात आपण गोड मानून घ्याल अशी आशा आहे! :)

साखरभात :

पाकृची माहिती : वैदेही अभ्यंकर.
शब्दांकन : तात्या अभ्यंकर.

साहित्य : एक वाटी बासमती तांदुळ, साखर, लवंगा, चारोळी, बदाम, काजू, केशर, वेलची. इत्यादी.

कृती :

प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर साजूक तुपाच्या फोडणीवर लवंगा घालून त्यावर तांदूळ घालून चांगला मऊ-मोकळा शिजवून घेणे व एका ताटात पसरून ठेवणे.

त्यानंतर दीड वाटी साखरेचा पक्का पाक करून घ्यावा, पाक तयार होताना त्यात भरपूर केशर घालावे. पाक झाल्यावर त्यात मगासचा ताटात पसरलेला भात घालावा. पाकात भात घातल्यावर ते मिश्रण जरा पात्तळ होते. ते मंद ते मध्यम आचेवर घट्ट होऊ द्यावे. आणि शेवटी त्या भातात वरून काजू, बदाम, वेलची, चारोळी इत्यादी वस्तू ऐपतीप्रमाणे घालाव्यात! :)

झाला साखरभात तैय्यार! :)

दुपारच्या टायमाला भरपूर साखरभात हादडून त्यानंतर उन्हं उतरेस्तोवर कुले वर करून मनमुराद झोपावे! :)

"काका, मला वाचवा.." :)

आपला,
नारायणरावतात्या पेशवा! :)

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

16 Aug 2008 - 6:32 pm | आनंदयात्री

पाकृ मस्तच ! सादरीकरण जाम आवडुन गेले.

>>आणि शेवटी त्या भातात वरून काजू, बदाम, वेलची, चारोळी इत्यादी वस्तू ऐपतीप्रमाणे घालाव्यात!

हे वाक्य अल्टीमेट्ट ;)

एकलव्य's picture

16 Aug 2008 - 6:39 pm | एकलव्य

... आहोत. मन आतापासूनच प्रसन्न झाले!!

(आमंत्रणाची वाट न पाहणारा) एकलव्य

रामदास's picture

16 Aug 2008 - 6:50 pm | रामदास

आज ताटही बदललेले दिसते आहे.

विसोबा खेचर's picture

16 Aug 2008 - 6:52 pm | विसोबा खेचर

फोटू काढण्याकरता म्हणून खास चांदीचं ताट वापरलं आहे! :)

साखरभाताचा मान आहे तो! :)

आपला,
(खवैय्या) तात्या.

अभिज्ञ's picture

16 Aug 2008 - 7:09 pm | अभिज्ञ

तात्या एक सांगा,
हा तांदुळ साजूक तुपाच्या फोडणीवर लवंगा घालून त्यावर तांदूळ घालून चांगला मऊ-मोकळा शिजवून घेणे
म्हणजे कुकर मधुनच शिजवायचा ना?
नारळिभात व साखरभात ह्यांच्या पाककृतीत नक्कि काय फरक असतो.
इथल्या जनतेने नारळीभाताचीहि कृती दिली तर बरे होइल.

(स्वतःच्या हाताने स्वयंपाक करुन खाणारा) अभिज्ञ.

अवांतर-
"काका, मला वाचवा.."

आपला,
नारायणरावतात्या पेशवा!

हे लै भारी. ;)

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 9:43 am | विसोबा खेचर

म्हणजे कुकर मधुनच शिजवायचा ना?

नाही, बाहेरच शिजवायचा...

नारळिभात व साखरभात ह्यांच्या पाककृतीत नक्कि काय फरक असतो.

माझ्या माहितीप्रमाणे नारळीभातात नारळ आणि गुळाचा वापर करतात. म्हातारीला विचारून एक्झॅट सांगतो..

इथल्या जनतेने नारळीभाताचीहि कृती दिली तर बरे होइल.

इतर कुणी दिली तर चांगलंच आहे नायतर म्हातारीला विचारून मी देईन.. :)

तात्या.

रेवती's picture

16 Aug 2008 - 7:29 pm | रेवती

साखर भात! आपले व आपल्या मातोश्रींचे आभार. मला हा भात कध्धी नीट जमत नाही आता या कृती प्रमाणे करून बघीन.
आजच एक नविन टिप मिळली, ती म्हणजे लवंगा तुपावर घातल्या कि तळलेली एखादी लवंग काढून किंचित दालचीनी सोबत कूटून भातात घालावी. पण मी अजून हा प्रयोग करून नाही बघीतला.
मला असे वाटते की भात पातेल्यात शिजवल्यास मऊ व छान मोकळा होईल.
रेवती

स्नेहश्री's picture

16 Aug 2008 - 11:05 pm | स्नेहश्री

अरे बोलवायच की आम्हाला नक्की आलो असतो.
काय तात्या तोंडला पाणी सुटत आहे फोटु बघुन......
उगीच जळवता तुम्ही.......
पुढच्या वेळी असा फोटु नका लावु त्रास होतो.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

शितल's picture

17 Aug 2008 - 8:55 am | शितल

साखरभाताची कृती छान.
पाक करून साखरभात नाही केला कधी, पण नक्की करून बघेन. :)
फोटो पाहुन तर भुक लागली ना :)

मुक्तसुनीत's picture

17 Aug 2008 - 9:38 am | मुक्तसुनीत

बहोत अच्छे तात्या ! काय राव ! साखरभात पाहून कधी एकदा त्यावर ताव मारतोय असे झालेय ! मजा आली लेख वाचून !
- तात्या मला वाचवा ! ;-)

उच्चैश्रवा's picture

17 Aug 2008 - 3:38 pm | उच्चैश्रवा

तात्याराव,
नारळीपौर्णिमेचा साखरभात झाला.आता बकरी इदेला काय देणार?

तात्या,

पाक कृती छान लिहली आहे."भातात वरून काजू, बदाम, वेलची, चारोळी इत्यादी वस्तू ऐपतीप्रमाणे घालाव्यात!" हे आवडले..

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

18 Aug 2008 - 5:40 am | प्राजु

आपल्या मातोश्रींच्या हातचा भात दिसतो सुंदर आहे.
मला साखरभात तितकासा आवडत नाही. त्यातून त्यात जर खायचा केशरी रंग घातला असेल तर अजिबात आवडत नाही. पण आपल्या आईंच्या हातचा भात खायची इच्छा आहे. येऊ का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 7:54 am | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादींचे माझ्याकडून व माझ्या म्हातारीकडून अनेक धन्यवाद...

तात्या अभ्यंकर,
वेदेही अभ्यंकर.

मुन्नाभाई एम बी बी एस.'s picture

19 Aug 2008 - 4:31 pm | मुन्नाभाई एम बी...

पाकृ मस्तच ! सादरीकरण जाम आवडुन गेले.

सर्वात जास्त आवडले ते:-
दुपारच्या टायमाला भरपूर साखरभात हादडून त्यानंतर उन्हं उतरेस्तोवर कुले वर करून मनमुराद झोपावे!

saniya's picture

20 Aug 2008 - 11:18 am | saniya

सर्वात जास्त आवडले ते:-
नेहमी नेहमी करु नका.