हे लोकांच्या हिताचे आहे का?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
15 Mar 2015 - 7:10 am
गाभा: 

आर आर पाटलांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नीला आंदण देण्यात आली आहे. आबा पाटलांबद्दल आदर म्हणून बाकी कुठल्याही मोठ्य पक्षाने ती जागा लढवायची नाही असे ठरवले आहे.
हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे का? मागे गोपीनाथ मुंड्यांच्या निधनानंंतर हेच केले गेले.
मयत नेत्याबद्दल आदर असणे योग्यच आहे. पण रिकामी झालेली लोकप्रतिनिधीची जागा भरणे हा त्या नेत्याबद्दल असणार्‍या आदराचा विषय नसून लोकांचे योग्य प्रतिनिधित्व करण्याचा असला पाहिजे.
लोकशाहीत असे वंशपरंपरेने जवळच्या नातेवाईकाला मग त्याची कुवत असो वा नसो, वारसाहक्क असल्यासारखे देणे हे कितपत योग्य आहे? त्या नेत्याला आदर दाखवणे हे काही अल्प काळापुरते आहे. लोकप्रतिनिधित्व हे पाच वर्षांकरता असते.
माझी खात्री आहे की जर आबांच्या पत्नीविरुद्ध कुणी उभा राहिला तर लोकही भावनेच्या आहारी जाऊन त्याला पाडतील. पण एकंदरीत असा पायंडा पडणे घातक आहे असे मला वाटते.
पाश्चात्य देशात जिथे लोकशाही प्रगल्भ आहे तिथे असे होताना दिसत नाही.

http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/03/14/article526415.ece/BJP-...

प्रतिक्रिया

जेपी's picture

15 Mar 2015 - 7:52 am | जेपी

ओ हुप्या साहेब,
ते अबप माझा आमी बगत नाय..
दरयेळेस देताव तस लोकसत्ताची लिंक द्या बिगीबिगी

चहाची चव बघा कपबशीच्या डिजायनची फार उस्तवार करु नका ही नम्र इनंती.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Tasgaon-bypoll...

आता दोनतीन मोठ्या पक्षात लोकांनीच निवडलेले प्रतिनिधी{अगदी हरलेले सुद्धा बरीच टक्के मते राखून असतात} आहेत आणि ते असा निर्णय घेतात म्हणजे लोकशाहीला धरूनच आहे असं मला वाटतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2015 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

जोपर्यंत मतदारांच्या रक्तातली घराणेशाहीची पूजा जात नाही, तोपर्यंत हे असेच होणार.

निवडणूकीचे तिकीट देताना सर्व रंगांचे राजकिय पक्ष "निवडून येण्याची खात्री" हीच मुख्य पात्रता जमेस धरतात. त्यातल्या त्यात नविन उमेदवार राजकारणात कच्चा असला तर हायकमांडला तितकेच जास्त सोईचे !... कारण असा उमेदवार हायकमांडचा जास्तीत जास्त मिंधा आणि निष्ठावान (पक्षी : कह्यात राहणारा) असतो.

हुप्प्या's picture

15 Mar 2015 - 9:04 pm | हुप्प्या

कच्चा उमेदवार आपला मिंधा राहील हा हिशेब बरोबर आहे. पण तो फारच कच्चा निघाला तर नंतरच्या निवडणुकीत ती सीट टिकवणे अवघड जाण्याची भीती त्या पक्षाला का वाटत नाही?
बाकीचे पक्ष उगीच वाईटपणा कशाला घ्या म्हणून अलिप्त रहात असावेत.

हा दिवंगत नेत्याला श्रध्दांजली वहाण्याचा कार्यक्रम ५ वर्षे चालू नये. द शो मस्ट गो ऑन अशी वृत्ती असायला हवी. कितीही थोर नेता असला(ली) तरी तो (वा ती) जाण्याने बनलेली पोकळी ही भरून निघतेच हे बघण्याची प्रगल्भता मतदारात यावी अशी इच्छा आहे.

hitesh's picture

15 Mar 2015 - 9:09 pm | hitesh

सीट फुकट मिळते का ?

पक्षाला पैसे , लोकाना पैसे दिले असतीलच ना ?

पैसे घातले. वसुल करायच्या आतच खेळ संपला .

म्हणुन एक चान्स द्यायचा बेत असणार.

हा एक अंदाज. आहे

हुप्प्या's picture

15 Mar 2015 - 9:15 pm | हुप्प्या

आबा पाटील आणि गोपीनाथ मुंडे हे आपापल्या पक्षातले ज्येष्ठ नेते होते. पहिल्या पाचात तर नक्की. त्यांना तरी तिकिट मिळवायला पक्षाला पैसे चारायला लागले नसतील अशी आशा आहे. नाहीतर कठीण आहे!

जानु's picture

15 Mar 2015 - 10:44 pm | जानु

कर्तुत्ववान माणसाच्या मागे त्याची पुढील पिढी कार्य पुढे नेणारीच असेल असे नसते. त्यामुळे हा निर्णय चुकीचाच आहे. पण लोकशाही म्हणजे काही मोजक्यांचीच मते. व्यक्ती पुजा किती करावी हे जोवर लोकांना समजत नाही तोवर असेच चालणार.

तिमा's picture

16 Mar 2015 - 11:18 am | तिमा

एका मुरलेल्या राजकारण्याकडून असे ऐकले होते की , एखादा मोठा नेता जेंव्हा अचानक जातो तंव्हा त्याने पक्षासाठी जमवलेली माया वा पक्षाने निवडणुकीसाठी त्याला दिलेली माया त्याच्या घरीच रहाते. ही माया मुख्य प्रवाहात (म्हणजेच पक्षांत) परत यावी म्हणून असा वारसदार नेमतात. तो जर कर्तृत्ववान निघाला तर प्रश्नच नाही. अन्यथा ती माया परत पक्षाकडे पोचली की त्या वारसदाराला विस्मृतीत ढकलण्यांत येते.

hitesh's picture

16 Mar 2015 - 6:55 pm | hitesh

थोड्या फार फरकाने मीही हेच लिहिले होते.

फक्त पैसे याने त्याला की त्याने याला द्यायचे? इतकाच फरक होता.

काळा पहाड's picture

16 Mar 2015 - 11:27 am | काळा पहाड

People get the leader that they deserve. तेव्हा काळजी करू नका. भारतीयांची हीच लायकी आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Mar 2015 - 1:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१११ कारण हे सत्यवचन आहे!!!

हिताचे नाही. एवढेच नव्हे, तर अाबांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांवर हा मोठाच अन्याय अाहे.
- स्वधर्म

जयन्त बाबुराव शिम्पी's picture

18 Mar 2015 - 12:27 am | जयन्त बाबुराव शिम्पी

खरं म्हणजे यात आणखी एक नवाच मुद्दा माझ्या लक्षात येत नाही तो असा कि एखाद्या ठिकाणी निवडणूक होते , जो उमेदवार निवडून आला त्याच्या विरुद्ध उभा असलेला उमेद्वार , तान्त्रिक चुकीबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करतो . तक्रारीचा निकाल लागेपर्यंत २ / ३ वर्षे सहज निघुन जातात आणि आयोगाने निवडून आलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध निकाल दिल्यानंतर , त्याची निवड रद्द होते. अशावेळी त्या उमेदवाराने ज्या ज्या कामात सहभाग घेवून आपली मते मांडलेली असतात ती ग्राह्य कशी काय धरली जावू शकतात ? त्याला मिळालेला भत्ता एकवेळ वसूल केला जावू शकतो , पण त्याच्या सहभागाने झालेले निर्णय योग्य ठरतात काय?