नमस्ते मंडळी. माझ्या "नक्की किती पैसे पुरेसे?" या धाग्यावर ज्या
मिपाकरांनी सल्ले दिले होते त्यांचे मनापासून आभार मानून आज एक नवीन
मुद्दा उपस्थित करत आहे. तर मंडळी सध्या मी कोकणातील घरी निवृत्त जीवन
जगत आहे. जोडीला एम्टीडीसी च्या न्याहरी निवास योजनेमध्ये सहभागी होवून
घरातील काही खोल्याचा वापर पर्यटकांसाठी देवून त्यातून महिन्याला काही
रक्कम उभी राहते. ज्याना या उन्हाळ्यात कोकणात यायचे असेल अशानी जरूर
संपर्क करावा!
तर आमच्याकडे वरील न्याहारी निवास योजने अन्तर्गत काही पाहुणे गेल्या आठवड्यात आले होते . त्यातील एक सुमारे चाळीशीचा दाढीधारी इसम होता . त्याच्याशी चांगलीच मैत्री झाली .त्याने आपली कहाणी सांगितली. सदरहू इसम मूळचा कोकणातील असून गेली 10 वर्षे आफ्रिकेत टेक्निशियन म्हणून कामाला होता. मात्र मागच्याच महिन्यात त्याच्या कंपनीने कामगार कपात केल्याने तो गावी परत आला. येताना सुमारे 15/20 लाख रुपये सेव्हिंग होते . त्याचे मुंबई किंवा अन्य शहरात घर नसून एकटाच आहे. गावी एक जुने घर आंब्याची दोनचार कलमे आहेत .
अशा परिस्थितीत पुढे काय करावे ? असा प्रश्न त्याला पडला होता . परत दुसरी नोकरी शोधून परदेशी जाण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. पण हाताशी असलेल्या पैशात काय करावे ज्यायोगे पुढील आयूष्य चांगले जाईल? कारण तो तर वैतागून आध्यात्मिक संन्यास घेण्यासाठी हिमालयात जाण्याचा विचार करत होता !
चाळीशीत असल्याने लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता किंवा कदाचित आर्थिक परिस्थितिमुले शक्य झाले नसावे, त्याबाबतीत बोलायला फारसा उत्सुक नव्हता . निघताना त्याने त्याचा मोबाइल नंबर आणि पत्ता मला दिला आणि योग्य तो सल्ला द्यावा अशी विनंती केली .
तर मंडळी, त्याने पुढे काय करावे?
1. धंदा /उद्योग ? कोणता?
2. नोकरी ?
3. शेअर्स/इन्व्हेस्त्मेंट ?
4. लग्न करावे का? का करावे?
5. संन्यास /अध्यात्म की अन्य काही ?
आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत ...
प्रतिक्रिया
13 Mar 2015 - 11:03 pm | पॉइंट ब्लँक
जोपर्यंत तो सल्ला मागत नाहि तोपरर्यंत त्याला मो़कळा सोडा. त्याला स्वतःचा निर्णय घेवू देणे कधिही चांगले.
13 Mar 2015 - 11:05 pm | पॉइंट ब्लँक
शेवट्ची ओळ वाचली नाहि. वरील प्रतिक्रिया रद्द मानन्यात यावी.
13 Mar 2015 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
मन रमेल..असा कोणताही व्यवसाय कर..म्हणावं.
13 Mar 2015 - 11:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ईसम दाढीधारी असल्याने सन्यास-अध्यात्मात सहज रमेल असे ह्यांचे मत.! ह.घे.रे खटोल्या.
नोकरी करणे धंद्यापेक्षा अधिक सुऱक्षित असे वाटते.
14 Mar 2015 - 12:18 am | ज्योति अळवणी
एखादे दूकान टाकावे गावाकडे.
14 Mar 2015 - 12:34 am | काळा पहाड
संन्यास/ अध्यात्म हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे हे माहिती नव्हतं. असं पण असतं काय?
14 Mar 2015 - 9:11 am | hitesh
सन्यास अध्यात्म वगैरे घ्यायचा असेल तर कृपया पैसे मला देऊन जावे.
मी ते पैसे सांभाळुन ठेवीन.
समजा नंतर काही वर्षानी निर्णय बदलला तर पैसे परत करीन... साठलेल्या व्याजावर मात्र निम्मा हक्क माझा राहील.
पण कृपया अध्यात्माच्या नावाने सगळा पैसा कुठल्याही कल्टला देऊ नयेही नम्र विनंती
14 Mar 2015 - 9:45 am | काळा पहाड
म्हणजे त्यांना बँकेत पैसे ठेवायबद्दल माहिती नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?
14 Mar 2015 - 10:21 am | hitesh
अध्यात्माची खाज सुटलेले लोक पैसा वगैरे त्याग करायचा आहे , अशा इच्छेने पच्छाडुन एखादा अमुक बाबा , तमुक ट्रस्ट , देवस्थान याना सगळे दान करुन बसतात.
काही काळाने पुन्हा संसारात परत येतात तेंव्हा अन्नान करत बसतात किंवा ज्या आश्रमाला देणगी दिली तिथल् अन्नछत्रात वाढपी म्हणुन रहातात.
14 Mar 2015 - 10:31 am | hitesh
पिंजरा षिनिमातल्या मास्तरगत अवस्था होते.
इंगळी इष्काची काय आणि अध्यात्माची काय ! शेवट सारखाच असतो.
14 Mar 2015 - 9:45 pm | हाडक्या
ती त्यांची मर्जी आणि त्यांचे निर्णय. त्या निर्णयाचे परिणाम ते भोगतील. मग अनाथश्रमाला अथवा देवस्थानाला दिले काय किंवा मशीदीला दिले काय. हो की नै ?
बाकी अध्यात्माची खाज वैटच हो. मग तो जिजस असो, पैगंबर की बुद्ध अथवा महावीर असो.
14 Mar 2015 - 2:30 pm | उडन खटोला
काउ उर्फ हितेश उर्फ नानासाहेब उर्फ इ**...
सदरची व्यक्तीचा पूर्वीपासून अध्यात्माकडे ओढा होता ,मात्र नोकरीसाठी सतत व्यस्त असलेने त्याला त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता
क्रूपया या धाग्याचे निमित्त करून महान भारतीय अध्यात्म व हिन्दु-धर्म आणि संस्कॄती व इतिहास यावर दुगाण्या झाडन्याचे आपले परमकर्तव्य इथे बजावु नये अशी विनन्ती !
14 Mar 2015 - 3:14 pm | hitesh
मी णाणा नाही.
हज्जार्दा सांगुन झालं आहे.
16 Mar 2015 - 11:37 am | नाखु
लोकांचा इश्वास बसावा अशी एक तरी हितैशीपणा करा की जरा !!!!!
मुद्दाम घुसेन (पूर्वाश्रमीचा आयडी श्री श्री पोटे यांचा)
16 Mar 2015 - 6:58 pm | hitesh
हं ... हे मात्र बरोबर आहे.
पण मी नाना व माइ नाही
14 Mar 2015 - 3:40 pm | पुणेकर भामटा
नमस्कार,
मी आणि माझ्या बायकोने लग्न करतेवेळी ठरवले होते, वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत काय हवे तेवढे आयुष्य जागून घ्यायचे आणि नंतर ईश्वरकृपेने दोघेही जिवंत राहिलो किवा दोघांपैकी कुणीही एकजण जरी जिवंत राहिले तरी उर्वरित आयुष्य हे गडचिरोली , किवा तत्सम एखाद्या लहानश्या खेड्या मध्ये घालवायचे , लोकांची सेवा करायची जशी जमेल तशी , भविष्यकाळातील आव्हानानुसार आणि आमच्या अनुभवानुसार जे जमेल ते करायचे , खूप सार्या संस्था सध्या अशी कामे करत आहेत त्यांना मदत करू शकता ,
शुभेच्या !!!!
14 Mar 2015 - 11:12 pm | श्रीगुरुजी
>>> तर मंडळी, त्याने पुढे काय करावे?
1. धंदा /उद्योग ? कोणता?
2. नोकरी ?
3. शेअर्स/इन्व्हेस्त्मेंट ?
4. लग्न करावे का? का करावे?
5. संन्यास /अध्यात्म की अन्य काही ?
१५-२० लाख रूपये बँकेत ठेवयोजनेत ठेवले तर किमान रू. ११०००-१५००० व्याज दर महिन्याला येईल. इतक्या रकमेत त्यांचे भागेल का?
दुसरा मार्ग म्हणजे झेरॉक्स, शालेय साहित्य इ. चे दुकान टाकणे. दुकानात शालेय साहित्याच्या बरोबरीने आईस्क्रीम, थंड पेये इ. विक्रीसाठी ठेवता येतील.
शेअर्समध्ये अजिबात जाऊ नये. नोकरी मिळत असल्यास, फारशी कटकटीची व व्यापाची नसल्यास करावी. लग्न करावे किंवा नाही हा पूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न आहे.
वरीलपैकी कोणतीही गोष्ट करीत असताना अध्यात्म, परमार्थ साधना सुरू ठेवता येते.
14 Mar 2015 - 11:25 pm | मनीषा
एक जुनी गोष्टं ...
जुनी असली तरी सद्य स्थितीलाही लागू व्हावी --
@@@@@@
एक कुंभार असतो . त्याच्याकडे एक गाढव असते.
कुंभाराची आर्थिक परिस्थिती वाईट असते. म्हणून ते विकायचे ठरवतो.
तो आणि त्याचा मुलगा गाढव घेऊन बाजारकडे निघतात.
वाटेत अनेक लोक, अनेक सल्ले देतात. कुणी म्हणे मुलाने गाढवावर बसून जावे, कुणी म्हणे कुंभाराने.
कोण म्हणतो दोघांनी बसावे, कुणाला वाटे गाढवासोबत दोघांनी चालावे .
एक म्हणला गाढव इतकं अशक्तं , त्याला बाजरापर्यंत चालवणे क्रूरपणा.
मग दोघांनी गाढवाला काठीला उलटे बांधले.
पुलावरून जाताना बिचारे नदीत पडून वाहू न गेले.
आणि प्राणांस मुकले.
यांत सल्ला देणारे जितके दोषी , तितकेच त्याचे अनुसरण करणारेही.
ताप्तर्यं :- ऐकावे जनाचे- करावे मनाचे
बोलणारे हजार जिभांनी बोलतात, आणि सल्ला देणारे त्यांच्या कुवतीनूसार सल्ला देतात. तो ग्राह्य मानू नये.
जे स्वतःला योग्य वाटेल, जमु शकेल तेच आणि तेच करावे.
14 Mar 2015 - 11:28 pm | मनीषा
----- हितचिंतकांपासून ...
असे वाचावे.
15 Mar 2015 - 1:12 am | नगरीनिरंजन
बाकी काही करो न करो, लग्न मात्र करु नये असे मनापासून वाटते. लग्नानंतर जो आणा मागे लागतो त्याने पगाराबरोबर बचतीचीही चटणी व्हायला वेळ लागणार नाही.
15 Mar 2015 - 7:17 pm | ग्रेटथिंकर
जमेल तिथे त्याने नोकरि करावी.छोकरीच्या फंदात पडू नये.
16 Mar 2015 - 10:57 am | प्रभाकर पेठकर
द्विधा मनःस्थितीच्या व्यक्तीने धंद्याच्या फंदात पडू नये. करायचाच झाला तर बिनभांडवली धंदा करावा. जसे, राजकारण, सल्लागार सेवा, गाईड, शिकवण्या इ.इ.इ. आफ्रिकेत कसला टेक्निशियन होता. तो व्यवसायही अगदी कमी भांडवलात सुरु करता येण्यासारखा असेल तर करावा. कारण त्याला त्याचे ज्ञान आहे. (असे गृहीत धरतो).
गावचे जुने घर आणि आंब्याची २-४ कलमे आहेत म्हणजे स्वतःची थोडीफार जागा असावी. तिथे कुक्कुट पालन वगैरे व्यवसाय करावा.
आफ्रिकेतील सर्व कमाई/शिल्लक एकदम, धंद्याचा अनुभव नसल्याकारणाने धंद्यात अजिबात टाकू नये.
बाकी एकटा जीव सदाशिव. गरजा आटोक्यात ठेवल्या तर एकट्या जीवाला गावाकडे किती खर्च असतो? थोडक्यात भागावं.
सगळ्यात शेवटी...
एका माणसासाठी, दूसर्यामाणसाला, तिसर्या माणसाने सल्ला देणे अव्यवहार्य वाटते आहे.
16 Mar 2015 - 11:45 am | सुबोध खरे
एका माणसासाठी, दूसर्यामाणसाला, तिसर्या माणसाने सल्ला देणे अव्यवहार्य वाटते आहे.
अगदी अगदी
हनुमान होऊ नये
17 Mar 2015 - 12:35 pm | नितिन५८८
नोकरी म्हणजे ८ तासांचा घंदा आणी धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी....
उडन खटोला तुमचा कोकणातील पत्ता द्यावा, तसेच राहणायची, जेवणाची, न्ह्यारीची कशी सोय आहे हे सविस्तर कळवावे (nitin५८८@gmail.com ). शक्य असल्यास तुमचा फोन no. द्यावा.
नितिन
21 Jul 2015 - 6:58 am | उडन खटोला
सध्या माझ्या भाच्याने हे चालवायला घेतले आहे , जरुर लाभ घ्यावा .मुन्बई गोवा हायवे वए आहे
सम्पर्क- ०९८६०१०१२५१
बर्याच महिन्यान्च्या विश्रान्तिनन्तर मिपावर आलो ,त्यामुळे उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असाई
17 Mar 2015 - 12:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्य व सा य!!!
एखादं छोटं दुकान टाकता येईल की. पण आज रोख उद्या उधार तत्वावर चालवले तरचं जमेल नाहीतर अवघड आहे. नैतर मिपावर अजुन एखादा धागा निघायचा "कोंकंणीं दुंकांनंदांरांचीं अंरेंरांवीं".
19 Mar 2015 - 6:06 pm | hitesh
दुकान टाकुन पोट भरु शकत होते तर इतकी वर्ष नोकरी का करत होते ? तरुणवयातच दुकान टाकायचे की.
19 Mar 2015 - 6:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पैसा होता का तेव्हा भांडवलासाठी त्यांच्याकडे? तो आत्ता आलाय. मग आत्ता करु देत की चालु. आणि व्यवसाय सुरु करायला वय हा अडसर नसतो. इच्छाशक्तीचा अभाव हा एकमेव अडसर असु शकतो. धन्यवाद.
19 Mar 2015 - 6:22 pm | गवि
एकूण त्यांचे गावही कोंकणातच आहे असं दिसतं आहे. जुनं घरही आहे. म्हणजे राहण्याचा प्रश्न नाही.
आता प्रश्न चरितार्थाचा. कोंकणात घर असेल तर घराच्या बाहेर जागा असल्यास अथवा जागा बनवून चहाचे दुकान (पिण्याचा तयार चहा पावडर नव्हे) काढावे. मोठा दगडी कट्टा बांधून घ्यावा बसायला. आंब्याचा पार असेल तरी उत्तम. कोंकणात गावांमधे लोकांना संध्याकाळी अशा जागी बसून गप्पांचे अड्डे जमवायला भयंकर आवडतं. इनफॅक्ट उनका बस चले तो दिवसभरही आवडेल हेच करायला.
मोठे हॉटेल नव्हेच. फक्त चहाचे अग्निहोत्र चालू ठेवायचे. सोबत बरणीत तीनचार प्रकारची बेकरी बिस्किटे, टोस्ट, खारी. शक्य असेल तर संध्याकाळी सहानंतर भजी. तंबाखूवर बॅन नाही तोसवर सिगरेट, बिड्या, गायछाप ठेवायचे.
बास. व्यवस्थित पुरेसं होईल.. इन गिव्हन कंडिशन्स. आणि वेळही उत्तम जाईल.
निगुतीने आलंबिलं घालून चहा बनवत गेलं तर ही जागा गावचा हॉटस्पॉट होईल. यात चेष्टा नाही. विचार करुन पहावा.
19 Mar 2015 - 10:25 pm | खटपट्या
अगदी, गावची चकाट्या पिटायची जागा नजरेसमोर आली. (कोकणच्या गजाली)
19 Mar 2015 - 6:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
१.आणि पुण्यात छोटेसे घर घ्यावे. रोज कुठे ना कुठे काही ना काही कार्यक्रम चालुच असतात. बरेचसे फुकट असतात. फक्त त्यासाठी सकाळ/म.टा. किंवा तत्सम पेपर रोज घ्यावा लागेल.त्यात माहीती मिळेल.
२.घर घेउन बाकी उरलेले पैसे एफ.डी. मध्ये टाकुन व्याजावर जगावे.
३.जमल्यास एखादी लहान नोकरी (केअरटेकर/ काउंटर जॉब/ ट्युशन्स ) करावी म्हणजे त्यात थोडा वेळ जाईल आणि पैसेही मिळतील.
४.लग्न अजिबात करु नये. केल्यास वरील सर्व सल्ले बाद मानावेत आणि बायको म्हणेल तेच करावे.
19 Mar 2015 - 10:23 pm | खटपट्या
त्यांच्याकडे १५/२० लाख सेव्हींग आहे त्यात पुण्यामधे घर येईलसं वाटत नाही.
23 Mar 2015 - 1:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
विकुन येइल की...काही नाही तरी उण्ड्री पिसोळि ,नर्हे,आळंदी, मोशी इथे नक्कीच
24 Mar 2015 - 12:36 am | खटपट्या
पुण्यातल्या रीअल ईस्टेटचे भाव मला माहीत नाहीत. पण आजकाल आयटी मुळे वन बी एच के सुद्धा ३५ लाखावर जातो असे ऐकून होतो. म्हणून म्हणालो... असो.
19 Mar 2015 - 10:55 pm | सांजसंध्या
सल्ला शक्यतो अनुभवी, कृतीशील, यशस्वी व्यक्तीकडून आणि थेट घ्यावा. अयशस्वी मनुष्यही धंदा करताना काय करू नये हा सल्ला देऊ शकतो.धंदा न चाललेले अनेक लोक व्यवसाय मार्गदर्शन करत असतात...त्या एका विशिष्ट शहरात जरा जास्त.
23 Mar 2015 - 12:11 pm | नितिन५८८
पुण्यामध्ये मासे कोकणच्या मानाने खूप महाग असतात उद.: कोकणात जर कोळंबी १५० रु टोपली असेल तर तीच टोपली पुण्यात ४०० रु असते. तर मुद्दा असा कि आपण हेच मासे ३०० रु टोपली प्रमाणे विकले तर पुण्यातून online ग्राहक मिळतील, त्यासाठी आपले एखादे संकेत स्थळ तयार करावे online order घ्यावी आणी दर रविवारी प्रत्येकाची order घरपोच करावी. order कमीत कमी ३ कि. घ्यावी. जमल्यास त्याबरोबर कोकणातील मसाले पण विकत येईल. उन्हाळ्यात आंबे पण तसेच विकता येतील.
५०% पैसे online घ्यावे आणी बाकीचे order पूर्ण केल्यावर. ह्यासाठी भांडवल पण कमी लागेल
23 Mar 2015 - 2:25 pm | पाषाणभेद
तुम्हालाच सल्ला हवा आहे का? ताकाला....
23 Mar 2015 - 8:13 pm | पाषाणभेद
तुम्हालाच सल्ला हवा आहे का? ताकाला....
24 Mar 2015 - 9:42 am | आयुर्हित
कृपया ज्योतिषशास्त्राचा फायदा वाचावे.
24 Mar 2015 - 10:02 am | खटपट्या
याने काय होणार ? इस्कटून सांगा.
का फक्त धाग्याची झैरात ??
24 Mar 2015 - 10:02 am | खटपट्या
याने काय होणार ? इस्कटून सांगा.
का फक्त धाग्याची झैरात ??
24 Mar 2015 - 10:09 am | आयुर्हित
धागाकर्त्याचे जे काही मूळ प्रश्न आहेत, ते सोडविण्याचा एक पर्याय दिला आहे.
झैरात तर आहेच कि, आपण मूळ लेख न वाचता प्रश्न लिहिला आहे त्याची!
24 Mar 2015 - 11:48 am | सुबोध खरे
ज्योतिषशास्त्र हा बाकी एकदम किफायतशीर बिन भांडवली धंदा आहे. नक्की तोच करायला सांगा त्यांना.