डाॅक्टरांची फी

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
11 Mar 2015 - 3:32 pm
गाभा: 

नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.

- स्वधर्म

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

11 Mar 2015 - 3:45 pm | मार्मिक गोडसे

माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले
कसले ऑपरेशन होते ?

स्वधर्म's picture

11 Mar 2015 - 11:59 pm | स्वधर्म

तळहातावर केलाॅईड झाले होते. तिथला काही भाग काढून तिथे मांडीची त्वचा लावली गेली. केलाॅईड हे जखम झाल्यावर तिथली त्वचा जाड होते, वाढतच राहते, त्या व्याधीचे नांव अाहे. करतानाच सांगितले गेले होते, की पुन्हा तिथेच केलाॅइड न होण्याची गॅरंटी नाही.
- स्वधर्म

मराठीप्रेमी's picture

11 Mar 2015 - 4:01 pm | मराठीप्रेमी

पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात.

यावर पुढे चर्चा करण्याआधी तुमच्यामते हा आकडा किती असावा ते सांगू शकाल का?

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 4:13 pm | आजानुकर्ण

या बातमीत एम्सची २०१४ ची थोडी आकडेवारी आहे. अर्थात ते सरकारी हॉस्पिटल आहे. (उदा. ससून) २००४च्या तुलनेत २०१४मध्ये खर्च कमी झालाय हे आश्चर्यकारक आहे. खाजगी हॉस्पिटलांमध्ये याच्या तिपटीपेक्षा जास्त खर्च यावा. त्यामुळे दीड लाखाच्या आसपास किमान खर्च आहे. त्यात तुम्ही स्पेशल रुम घेता का जनरल वार्डमध्ये राहण्यास तयार असता यानुसार पन्नासएक हजार रुपये सहज वाढतात. ऑपरेशननंतर रिकवरीसाठी एखादा दिवस आयसीयूमध्ये त्याचे वीसहजार.

त्यामुळे अडीचलाख मार्केटदराच्या जवळपासच दिसते आहे. आता हॉस्पिटलने त्याचे आयटमायझेशन चुकीचे केले असावे. उदा डॉक्टरांची फी आठहजार दाखवली किंवा आणि इतर खर्च अडीचलाख दाखवला तरी आपल्याला त्यातलं काही कळणार नाही. किंवा डॉक्टरांची फी २ लाख एकोणपन्नास हजार आणि उरलेले ८ हजार इतर खर्च, असे दाखवले तरी नक्की काय फरक पडतो.

http://archive.indianexpress.com/news/aiims-slashes-cardiac-surgery-cost...

Sample this: in 2004 the cost of repairing a hole in the heart was Rs 45,000; now it costs Rs 40,000. Bypass surgery, which used to cost Rs 60,000, is done for Rs 52,000. Two types of surgeries for congenital heart diseases — heart defects that are present since birth — now cost Rs 40,000 and Rs 52,000 respectively against the older rates of Rs 50,000 and Rs 55,000.

स्वधर्म's picture

12 Mar 2015 - 12:07 am | स्वधर्म

धागा काढण्याचं तेच कारण होतं! ८०,००० अनरिझनेबल वाटतात, एवढंच सांगतो.

- स्वधर्म

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 4:01 pm | आजानुकर्ण

वैद्यकीय व्यवसाय हा काही प्राईस रेग्युलेटेड व्यवसाय नाही. डॉक्टरांनी अमुकतमुक उपचारासाठी इतकेच पैसे घेतले पाहिजे असा कुठेही चार्ट नाही. घरातल्या व्यक्तीला तातडीच्या उपचाराची गरज असताना हॉस्पिटलमध्ये जितके पैसे सांगतात तितके द्यावेच लागतात. त्यासाठी आजकाल हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. उपचाराच्या प्रसंगी पैशाच्या अडचणीमुळे चांगल्या उपचाराची संधी गमावू नये. डॉक्टर आणि न्याय्य फी वगैरेंचा काय संबंध आहे? डॉक्टर सांगतात तितके पैसे निमूटपणे द्यायचे नाहीतर दुसरा डॉक्टर बघायचा असा साधा नियम आहे. ही परिस्थिती का आहे यावर चर्चा करण्यापेक्षा ती हाताळता कशी येईल त्याचा विचार करा.

पण हि गोष्ट बदलली जाणे तितकेच महत्वाचे नाही का???? आपण प्रत्तेक वस्तू विकत घेताना तिची MRP बघून विकत घेतो म्हणजेच तिचा रेट ठरलेला आहे मग तुम्ही ती शहरातून घ्या वा गावातून.... अशी काहीतरी पध्दत वैद्यकीय व्यवसायाला हि असली पाहिजे नाहीतर असेच लोक उपचाराविना मारत राहणार.....

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 4:01 pm | कपिलमुनी

popcorn

सूड's picture

11 Mar 2015 - 6:56 pm | सूड

एक टब मला पण द्या हो!!

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 7:01 pm | संदीप डांगे

gg

अश्लिल वाटल्यास नका घेऊ...

अश्लिल कशाने!! धन्यवाद. आता चर्चा किती का चालेना!! ;)

हाडक्या's picture

11 Mar 2015 - 9:37 pm | हाडक्या

नै ते ठिके, पण टबातच बसा, कडेला नको हो. ;)

निश्चिंत असा हो तुम्ही!! आम्ही दोघं जरासं सरकून तुम्हाला तिसरी सीट देऊ का? नै येवढं टबातच बसायचं सांगायला आलात म्हणून म्हटलं हो.

खटपट्या's picture

12 Mar 2015 - 1:31 am | खटपट्या

ट्बातून अजीबात उठू नका....

हे हाड्क्यारावांना सांगताय का मला?

खटपट्या's picture

12 Mar 2015 - 12:01 pm | खटपट्या

चित्रातल्या दोघांना !!

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 11:29 pm | संदीप डांगे

चर्चेवर लक्ष ठिवा. नाहीतर पॉप्कॉर्न लवकरात लवकर संपवण्याकडेच ध्यान आसंल... :-)

अरे, किती सांडून ठेवल्यात लाह्या टबमधे.. कचरा करतात नुसते.. कोण आहे रे तिकडे, जरा व्हॅक्यूम क्लीनर आणा बघू झटपट..

बर्याच दिवसात खाल्ले नव्हते या विषयावर पाॅपकाॅर्न.चालु द्या बरं का चर्चा.डाॅक्टर जाम लबाड,पैसेकाढु असतात हे मान्य आहे!!
आय फोन बनवायला किती खर्च येत असेल? आणि कितीला पडतो,काही माहिती आहे का? तो महाग असुन लोक तो का घेतात का मिरवतात?साधे मोबाईल अस्ताना?(एक निरागस प्रश्न)

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 8:16 pm | आजानुकर्ण

आयफोनबाबतची माहिती इथे पाहा.
http://www.techinsights.com/teardown.com/apple-iphone-6/

लोक तो नक्की का घेतात याबाबत कल्पना नाही.

सर्वप्रथम आपल्या मित्राच्या एका नातेवाइकाची तब्ब्येत कशी आहे?
देवकृपेने ते सुखरूप घरी पोचलेत आणि स्वस्थ असावेत अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो.

बायपास सर्जरी ची मेडीकली १% एक टक्का सुद्धा गरज नाही, आणि गरज नसतांना ती सर्रास राजरोसपणे केली जाते, हे त्याहून मोठी गोष्ट. पण अमक्या हॉस्पिटल मध्ये तमक्याने बायपास केली आहे असे अभिमानाने मात्र सांगितले जाते ते वेगळे.

त्यामुळे बायपास केल्यावर फी घेणे हे डॉक्टरांचे परम कर्तव्यच आहे, नव्हे ते तर त्यासाठीच जगतात व राबतात.

शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली आणि फी फक्त ८००००/- म्हणजे फार स्वस्तात सोडले आपल्याला.
नाहीतर आजकाल चोर सुद्धा फक्त १/२ मिनिटात ५००००/- ची गळ्यातली चेन काढून नेतात.
त्यामानाने फार कमी पैसे घेतले त्यामुळे आपल्या मित्राचे मनापासून अभिनंदन.

ता.क.: बायपास सर्जरी हे एक मोठे फॅड आहे!

माझ्या अल्पमाहितीप्रमाणे हैद्राबाद येथे अल्पमुल्यात उपचार होतात. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनानीही हा विषय धसास लावला पाहिजे.

आकाश खोत's picture

11 Mar 2015 - 4:06 pm | आकाश खोत

योगायोगाने आज तुमचा हा लेख वाचला, आणि मी सध्या डॉक्टरांवरच एक कादंबरी वाचतोय.
एरिक सेगल ची "डॉक्टर्स".

अमेरिकेतल्या ५०-६० च्या दशकातली गोष्ट आहे यात. (आपल्याकडे पण परिस्थिती तशीच असावी असं वाटतं.)
डॉक्टर्स बद्दल राग, कुतूहल, आकस, आदर असं काहीही असणाऱ्या सर्वांसाठी हि कादंबरी वाचण्याजोगी आहे.

डॉक्टर्स बद्दल एक नवा दृष्टीकोन मिळतो. त्यांच्या मेडिकल कॉलेज पासून सगळा प्रवास समजतो.
आपल्याला माहित असतंच त्याप्रमाणे एक साधा डॉक्टर बनायलाच किती तरी वर्षे लागतात. (काही लोकांना मेडिकल आधीच रिपीट करावं लागतं.)
त्यानंतर दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून जम बसवणे.
कुठल्या खास प्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी आणखी काही वर्षे आणि पुन्हा प्रशिक्षण.
असे त्यांना स्थिरावायला खूप उशीर होतो. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अत्युच्च कौशल्य जोखीम तर असतेच.

त्यांची वकिली मी करत नाहीये. खिशाला चाट बसते तेव्हा आपल्याला आवडत नाहीच.
पण या पुस्तकामुळे दुसरी बाजू समजून घेता आली.

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2015 - 4:13 pm | नगरीनिरंजन

हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे यातच सर्व काही आले. शिवाय यात ऑटोमेशन फारसं नाही, पण एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले रोबॉट डॉक्टर आले की मानवी डॉक्टरचे काम फक्त निदान करण्यापुरते उरेल.

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2015 - 4:17 pm | नगरीनिरंजन

शिवाय माणसांची शरीरं जितकी स्टॅन्डर्ड असतील तेवढा उपचारावरचा खर्च कमी होईल. त्यामुळे सहज बदलता येण्याजोगे कृत्रिम, स्वस्त अवयवही बाजारात यायला लागतील. दर काही वर्षांनी बदलले की झाले.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 4:14 pm | अत्रन्गि पाउस

असं आहे

प्रशांत हेबारे's picture

11 Mar 2015 - 4:16 pm | प्रशांत हेबारे

Skill, Brand & Technology चे पैसे मोजावे लागतात . तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता पण खात्री नसते. हे सगयालाच यवासायला लागू होते. तेव्हा त्रागा करून उपयोग नाही.

डॉक्टरांनी किती फी आकारावी हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. ते त्यांच्या कौशल्याचे मानधन घेतात.
माझे बजेट ५,००० रुपये असेल तर माझ्या सिनेमात लता मंगेशकर ह्यांनी गाणे म्हणावे हा आग्रह मी धरू शकत नाही.
तसेच इतकी फी आकारणारे बहुतांश डॉक्टरही त्या क्षमतेचे असतात. सगळेच डॉक्टर अथवा गायक खोर्‍याने पैसा ओढत नाहीत.
काही जण आजन्म २० रुपयात तापाचे औषध देत राहतात, काही जण आजन्म कोरस मधले गायक बनून राहतात.
जे मेहनत घेऊन पुढे जातात ते नाव आणि पैसा कमावतात. पुढे जाण्यासाठी आणि राहण्यासाठी श्रम घ्यावेच लागतात.

त्यामुळे, मेडिक्लेम काढा आणि असले प्रश्न पडू देऊ नका.

त. टि.: ह्या पेशातला गैरप्रकारांबद्दल चीड आहेच. गैरसमज करून घेऊ नये.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 4:20 pm | निनाद जोशी

दोन वर्षांपूर्वी माझ्या घरातील एका व्यक्तीला गावाकडे असताना हृदयविकाराचा झटका आला होता. गावाकडे असल्यामुळे इलाजही तेथेच करावे लागले. माझ्या गावाजवळ माढा येथे उपचार झाले. अगदी अन्जिओप्लास्ती पण झाली. आणि ८ दिवस ICU मध्ये भरती होती हे वेगळेच. एवढे सगळे होऊनही बिल किती आले माहिती आहे??? फक्त १५००० सर्व औषधांचा खर्च धरून. आणि हॉस्पिटल खासगी होते बर का!!!! मी नंतर माझ्या एका मित्राच्या वडिलांची सेम केस शहरात हाताळली गेली होती त्याला खर्च विचारला तर त्याचा खर्च होता १,५०,०००. मग हि तफावत कश्यामुळे??? ह्याचाच अर्थ शहरात अत्यंत लुटालूट चालते असा नक्कीच काढता येऊ शकतो.....

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 4:29 pm | कपिलमुनी

अँजिओप्लास्टी >> अँजिओग्राफी + सर्जरी +स्टेंट + ओटीचे भाडे + ८ दिवस ICU भाडे + ८ दिवस डॉक्टरचे व्हिजिट + नर्सिंग चार्जेस + सलाईन्स + औषधे

प्लीज तुम्ही त्या हॉस्पिटलचा नाव आणि पत्ता , डॉक्टरचे नाव सर्वांना द्या !

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 4:52 pm | निनाद जोशी

माढा येथील पाटील हॉस्पिटल, डॉक्टर चे नाव नीटसे आठवत नाही पाहिजे असल्यास घरी रिपोर्ट बघून बाकी माहिती देतो....

अँजिओप्लॅस्टी, ८ दिवस ICU आणि सगळी औषधं मिळून १५,००० भागवणारे ते गाव आणि हॉस्पिटल ह्यांचं नाव सांगितलं तर बरं होईल.
पहिली शंका ही आली की खरंच अँजिओप्लॅस्टी केली का. असो.

१ कोटी रुपयांमधे गावात मिळणारे घर आणि शहरात मिळणारे घर ह्यांच्यातला फरक पहा. साध्या गाळ्याचे भाडे बोरिवलीमधे ३५-४० हजार रुपये आहे. मार्केट परिसरात गेलात तर हीच किंमत कोटींमधे पोचते. तेच गावात वाडीसकट वाड्याचेही तितके पैसे होत नाहीत. त्यामुळे शहरात अत्यंत लुटालूट चालते असा काढणार का?

गावातल्या मेडिकल कॉलेजची फी आणि शहरातल्या मेडिकल कॉलेजची फी, डॉक्टर झाल्यावर जम बसायला लागेपर्यंत येणारा खर्च, स्टाफचा पगार, इत्यादि गोष्टीही लक्षात घ्यायला हव्या.

काही प्रमाणात भाव जास्त आहेतच. पण 'अत्यंत लुटालूट' ह्या सदराखाली ते मोडतील की नाही ह्याबद्दल शंका आहे.

ज्या गोष्टी साच्यातून बनवल्या जातात त्यांना अधिकतम किरकोळ किंमत असणे बरोबरच आहे. पण अशा व्यवसायांना ते लागू होऊ शकत नाही. गाडीची एक्स शोरूम प्राइस मुंबई आणि ठाण्यात जवळपास सारखीच असते. ती रस्त्यावर आणायची असेल तर किंमत बदलते. आणि ती किंमत मुंबईच्या रस्त्यावर गाडी उतरवण्याची असते.

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 4:45 pm | कपिलमुनी

तरीपण १५००० मधे अँजिओप्लॅस्टी पटत नाही.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 4:53 pm | निनाद जोशी

अहो आता बिल पाठवू का फोटो काढून????

अगदीच पटत नाही .... स्टेंटचीच किंमत त्याच्यापेक्षा जास्त असेल.

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 4:57 pm | संदीप डांगे

नाहीच पटत... काहीतरी झोल आहे हे नक्की.

कदाचित त्यांना अँजियोग्राफी म्हणायचं असेल?

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 5:05 pm | निनाद जोशी

आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी केली कि नाही हे मी कसे सांगू शकतो परंतु ती केली नसली तरी अँजियोग्राफी अधिक बाकी दिलेले खर्च ह्याची बेरीजही १५००० म्हणजे कमीच आहे शहराच्या तुलनेत नाही का???

अहो आत्ता तर मी आपण बिल इथे देतो म्हणाला होतात तेव्हा त्याची वाट बघत होतो. त्यात कळेल की अँजियोग्राफी आहे का अँजियोप्लास्टी ते...?

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 5:12 pm | कपिलमुनी

आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी केली कि नाही हे मी कसे सांगू शकतो

खात्री असल्याशिवाय सांगू नका . मिपाकर लै हार्ड हैत

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 5:49 pm | निनाद जोशी

अहो माझ्या घरी बिल आहे त्यावर अँजिओप्लॅस्टी चा खर्च लिहिला आहे पण नुसता खर्च लिहिला का केली पण हे मला कसा कळणार म्हणून म्हंटल . बिल मी आज रात्री पर्यंत घरनं मागवून टाकतो काळजी नसावी.

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 3:28 pm | सुबोध खरे

बिल अजून आलं नाही का?

रुस्तम's picture

13 Mar 2015 - 3:36 pm | रुस्तम

बिल बिल बिल Bill Please

प्रसाद१९७१'s picture

13 Mar 2015 - 6:13 pm | प्रसाद१९७१

ते १५००० नसुन १,५०,००० आहेत हे लक्षात आले असेल.

मग तसं सांगु दे. आम्ही आपले आशेला आलो होतो....

अवांतरः बाकी माढ्यासारख्या ठिकाणी आता अशा सोयी आहेत म्हणल्यावर "कुठे नेऊन ठेवलाय.." वगैरे प्रश्न वेडगळच म्हणायचे. मी पाच वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा साधं हॉटेल नव्हतं गावात....शेजारी कुर्डुवाडीत रहावं लागलं होतं.

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 6:28 pm | सुबोध खरे

प्रसाद साहेब
मोदक रावांच्या दुव्यावर मी म्हटलेले होते कि ऐन्जीयोग्राफिसाठी लागणाऱ्या डिसपोजेबल गोष्टी ( क्याथेटर,शीथ,गाईड वायर इ पूर्ण संचाची) किंमत नउ हजार पर्यंत येते कारण ते आयात करायला लागतात.आणि त्याची किंमत १५० डॉलर आहे. जर कोणी हा पूर्ण नवा संच वापरून ऐन्जीयोग्राफि करत असेल तर त्याची किंमत कमीत कमी १०००० दहा हजार होईल.यास्तव जे जे किंवा नायर रुग्णालयात याची किमत १२ हजार आहे (जेथे कोणीही डॉक्टर लुबाडायला बसलेला नाही). असे असताना एन्जीयोप्लास्तीची(ऐन्जीयोग्राफि नव्हे) किंमत माढा सारख्या तालुक्याच्या गावी पंधरा हजार असेल हि शक्यता फारच कमी वाटते. जर कोणी दानशूर माणूस याला पंधरा हजाराची सबसिडी देत असेल तरच हे शक्य आहे याचे कारण ऐन्जीयोग्राफिनंतर अरुंद झालेली रक्तवाहिनी परत पूर्ववत करायला लागणारा फुगा सुद्धा १२५ डॉलर ला येतो.( हा फुगा फुगवून ती अरुंद रक्तवाहिनी रुंद करण्यात येते). या रक्त वाहिनीची परत अरुंद होण्याची शक्यता ५०% असते म्हणून त्यात स्टेंट बसवावा लागतो आणि तो नुसता धातूचा स्टेंट तीस हजारापेक्षा जास्त किंमतीला येतो. त्यातून (drug elluting stent) रक्ताची गुठळी न होणारी औषधी सोडणारा स्टेंट जर असेल तर त्याची किंमत ५०,००० ते एक लाख यामध्ये येते. तेंव्हा निनाद राव यांनी लिहिलेल्या गोष्टीत काहीतरी फार महत्त्वाचं राहून गेलेलं आहे. मी या धाग्यावर वाचन मात्र झालो होतो परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या होत्या त्या लिहायच्या आहेत.
क्रमशः .

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 8:26 pm | सुबोध खरे

वर लिहिलेल्या किमती सरकारी रुग्णालयातील आहेत. तेंव्हा आपण मुंबईतील नायर किंवा जे जे रुग्णालयात एन्जीयोप्लास्टी केलीत आणि एक स्टेंट बसवला तर त्याचा खर्च ५० ते ७५ हजार इतका येतो. यात डॉक्टरांची लुटालूट, रुग्णालयात अधिक दिवस ठेवून घेतल्याने फुगवलेले बिल असा प्रश्न येत नाही. तेंव्हा १५,०००/- रुपयात एन्जीयोप्लास्टी तर सोडाच ऐन्जीयोग्राफि सुद्धा खाजगी रुग्णालयाला परवडेल काय याची मला शंका वाटते.
यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे कि ऐन्जीयोग्राफि करताना जर हृदयाच्या रक्त वाहिनीतील कोलेस्टीरोलचा प्लाक क्याथेटरमुळे सुटा झाला आणि रक्तवाहिनीत पुढे गेला तर टेबलवरच रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो अशा वेळेस तुम्हाला तातडीने( ६ तासात) बायपास शल्यक्रिया करावी लागते. याच कारणासाठी ऐन्जीयोग्राफि करताना हृदय शल्यक्रिया तज्ञ आणि शल्यक्रिया गृह राखीव( backup) असणे आवश्यक आहे. हि शक्यता १ % पेक्षा कमी असते तरीही हि काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यत १% हून कमी असेल तरीही ज्याच्या नातेवाईकाच्या बाबतीत असे होते त्याच्या दृष्टीने टक्केवारीला काहीहि अर्थ उरत नाही.
याकारणास्तव मुंबईत इतकी मोठी रुग्णालये असूनही प्रत्येक रुग्णालय ऐन्जीयोग्राफि करत नाही आणि ज्यांच्याकडे अशी सोय नाही त्यांचे अशी शल्यक्रिया करणाऱ्या रुग्णालयांबरोबर करार असतो आणि प्रत्येक ऐन्जीयोग्राफि पूर्वी त्या रुग्णालयाला तयार राहण्यासाठी कळवलेले असते.
माढा सारख्या ठिकाणी (बायपास शल्यक्रिया) अशी सोय असेल असे वाटत नाही.
याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि श्री निनाद यांनी अज्ञान जनक अशी माहिती पुरवलेली आहे. या माहितीमुळे एखादा मिपाकर किंवा हे वाचणारा ज्याला तातडीने ऐन्जीयोग्राफि/एन्जीयोप्लास्टी ची गरज आहे तो माणूस नुसत्या ऐन्जीयोग्राफिचे १५- २० हजार रुपये होतील हे ऐकून रानोमाळ १५ हजार रुपयात एन्जीयोप्लास्टी करणारे रुग्णालय शोधत फिरेल आणि महत्वाचा वेळ वाया घालवू शकेल.
आपण येथे माहिती देताना अत्यंत काळजीपूर्वक वागावे. आपल्या चुकीच्या माहितीमुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते

रुस्तम's picture

13 Mar 2015 - 9:17 pm | रुस्तम

डॉक्टर ज्ञानात भर टाकल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

मराठी_माणूस's picture

11 Mar 2015 - 4:32 pm | मराठी_माणूस

हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय खर्च वाढला आहे.

आयुर्हित's picture

11 Mar 2015 - 4:39 pm | आयुर्हित

हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय खर्च नव्हे तर वैद्यकीय लुट वाढली आहे!

मराठी_माणूस's picture

11 Mar 2015 - 4:47 pm | मराठी_माणूस

हो, ह्या खर्चाला लुट म्हणण्या एव्हढी ती वाढली आहे.

उलट मी एकदा असं वाचलं होतं की इंशुरन्स कंपन्यांच्या दबावामुळे अव्वाच्या सव्वा फिया घेण्याला आळा बसला आहे. मिळाला लेख तर परत देतो इथे.

गिरकी's picture

11 Mar 2015 - 4:43 pm | गिरकी

डॉक्टर लोक त्यांच्या तजुर्ब्याचे पैसे घेतात. काही उपचार असे असतात की एक चूक सुद्धा खूप महाग पडू शकते. अशावेळी अनुभवी आणि त्याच्या क्षेत्रात बेस्ट असलेला डॉक्टर आपण निवडतो. जेव्हा ते येवढे पैसे घेत असतात तेव्हा त्यांनासुद्धा जबाबदारीच्या जाणिवेमुळे मानसिक ताण येत असणारच. आणि इमर्जन्सी कधीही येते त्यामुळे रात्री अपरात्री काम करून शारिरीक ताण तर आहेच. या अनुभवाची आणि त्यांच्या त्या क्षेत्रातल्या कौशल्याची, जबाबदारीची किंमत तासांच्या हिशोबात करणे अयोग्य आहे.

पण हल्ली शहरात साध्या ताप सर्दीला पण अ‍ॅडमिट करून पैसे उकळण्याचे जे प्रकार सर्रास चालू आहेत ते नक्कीच चुकीचं आहे.

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 4:46 pm | कपिलमुनी

मिपावरील डॉक्टरांच्या प्रतीक्षेत :)

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 4:48 pm | संदीप डांगे

डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची तुलना चुकीची आहे. ड्रायवरांना बस चालवायचे पैसे मिळतात, जीव वाचवायचे नाही. डॉक्टर जीव वाचवायचे पैसे घेतात, ऑपरेशन थिएटरमधे उभे राहायचे नाही. एवढी फी घ्यायला पात्र व्हायला त्यांना आयुष्याची किमान २० वर्षे अखंड मेहनत करावी लागते. पुढेही करतच राहावी लागते. देतांना कधीच कुणाचे पैसे बघू नका, त्याला ती गोष्ट साध्य करायला किती मेहनत पडते ते बघा. तो डॉक्टर जे करू शकतो ते तुम्ही आम्ही चार-दोन महिन्यात शिकून करण्यास पात्र होण्याइतकं सोपं नाही आहे.

बाकी या व्यवसायतल्या फसवणुकीबद्दल वेगळी मतं आहेत. पण कधीच कुणाला पैसे देतांना डोळे मोठ्ठे 'अरेरे, लुबाडतात नुसते' वैगेरे करून देऊ नये. घेणारा आणि देणारा दोघांसाठी फार वाईट आहे ते. जो तो आपल्या अक्कलहुशारी आणि मेहनतीच्या लायकीप्रमाणे कमावतो.

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 4:52 pm | संदीप डांगे

जो तो आपल्या अक्कलहुशारी आणि मेहनतीच्या लायकीप्रमाणे कमावतो आणि घालवतो सुद्धा...

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 5:02 pm | निनाद जोशी

अहो पण अशीच सूट मिळत राहिली तर आज हॉस्पिटल चा खर्च हा गरिबांना परवडत नाही उद्या मध्यम वर्गाला हि झेपेनाहीसा होईल. मग ह्या सगळ्यांनी विना उपचार मरावे कि काय??? ह्या खर्चामुळेच सरकारी हॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी वाढू लागली आहे जी हाताळण्या पलीकडे गेली आहे. जे डॉक्टर सरकारी दवाखान्यात काम करतात ते तिथे कमी वेळ आणि आपल्या खासगी दवाखान्यातच जास्त वेळ असतात. म्हणजे डॉक्टरकी हि फक्त पैसा कमावण्यासाठीच झाली आहे असेच म्हणावे लागेल. मग का त्यांना समाजाचा सेवक अथवा देवता वगैरे म्हणावे. आधी लोक लोकसेवेसाठी डॉक्टर व्हायचे आणि लोकसेवा करायचे ही. आताचे डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी फक्त श्रीमंत लोकांचेच इलाज करतात आणि स्वतःला लोकसेवक वगैरे म्हणवून घेतात......

डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी फक्त श्रीमंत लोकांचेच इलाज करतात आणि स्वतःला लोकसेवक वगैरे म्हणवून घेतात......

टाळ्या..शिट्ट्या सगळं काही या एका वाक्याला!!....(आणि हशा सुद्धा)!!

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 5:28 pm | संदीप डांगे

श्रीमंत लोकपण लोकंच असतात त्यामुळे लोकसेवक म्हटलं तर कुठे बिघडलं? अजून कोण फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाही?

ज्यां गरीब किंवा मध्यमवर्गाला या व्यवस्थेची चीड आहे त्यांनी आपाआपल्या वर्गातून असे लोकसेवक डॉक्टर तयार करावे आणि त्यांना खाजगी दवाखाने चालवण्यास मदत करावी.

लोकसेवक म्हणजे गरिब लोकांचे काम फुकटात करणारा (काहीच अपेक्षा किंवा मोबदला न घेणारा) असाच असतो हा आपल्या समाजात पसरलेला गोड गैरसमज आहे. गाडगेबाबा होते एक. पण ते संत होते हो.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 5:54 pm | निनाद जोशी

अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त रास्त दरात द्या एवढीच मागणी आहे. जे उपचार गावात १० हजारात होतात ते तुम्ही शहरात २० ते ३० हजारात द्या त्यासाठी लाखभर रुपयाचे बिल लावण्याची गरज नाही. ह्यातून त्यानाही बक्कल पैसा मिळेल कि...... आणि तुम्ही डॉक्टर अभय बंग किंव्हा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, डॉक्टर विकास बाबा आमटे ह्यांसारख्या लोकांना विसरलात कि .......

असंका's picture

11 Mar 2015 - 6:04 pm | असंका

१. रास्त दर काय हे कोण ठरवणार?
२. दुसर्‍याची गरज किती आणि काय हे आपण कसं ठरवायचं? आणि त्याचवेळी आपली गरज काय हे ठरवायचा अधिकारही आपण दुसर्‍यांना देणार का?
३. किती पैसा असला की बक्कळ झाला असं म्हणता येतं?
४. सगळ्या समाजधुरीणांची नावं इथे लिहिली नाहीत म्हणजे ती विसरली गेली हे आपलं प्रामाणिक मत आहे का?

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 6:14 pm | निनाद जोशी

अजून कोण फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाही?

ह्या प्रश्नाचे मी फक्त उत्तर दिले आणि आपण डॉक्टर ने कितीही पैसे वाढवले तरी गप्प बसतो आणि रेल्वे ने तिकिटात ५ रुपये वाढवले तरी बोम्बाबोम करतो. हि अशी अवस्था असल्यावर काय बोलायचे???? आणि आपण प्रत्तेक वेळी आधीच्या किमतीशी तुलना करून महागाईत किती वाढ झाली हे ठरवत असतो. त्याच विचाराने आपण भाज्या आणि दुध वगैरे गोष्टी महाग झाल्या आहेत म्हणून ओरडतो. ह्यात पेट्रोल इत्यादी गोष्टींचे भावही येतात. तिथे आपण असे नाही म्हणू शकत कि पेट्रोल चे भाव ८० वरून ८०० रुपये लिटर झाले तर तुम्ही ठरावा पेट्रोल घ्यायचं का हि ते. तिथे तुम्ही भाव वाढीला समर्थन का नाही करत ?????

असंका's picture

11 Mar 2015 - 6:19 pm | असंका

_/\_

माझ्या इतर प्रश्नांचीही अशीच अघळपघळ उत्तरे देऊन उपकृत करावे...

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 6:28 pm | निनाद जोशी

माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कि तुम्ही पेट्रोल चे भाव ८० वरून ८०० रुपये लिटर केले अथवा रेल्वे तिकिटाचे भाव २५ वरून २५० केले तर काही बोलत नाही का??? तेव्हा ह्या दर वाढीला सामान्यतः सर्व लोक तरी अव्वाच्या सव्वा असेच म्हणतात 'कंफ्युज्ड' लोक ह्याला काय म्हणतात हे मला तरी ठाऊक नाही. ह्या दरवाढीला तुम्ही काय म्हणाल हे मला सांगून तुम्ही मला उपकृत करा.....

माझा "आय डी" हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक विषय आहे. तो चर्चेचा विषय नाही. तो चर्चेसाठी उपलब्धही नाही. कृपया वैयक्तिक टीका टिप्पणी टाळा.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 6:39 pm | निनाद जोशी

वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा क्षमस्व .......

असंका's picture

11 Mar 2015 - 6:43 pm | असंका

ओके....

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 6:41 pm | निनाद जोशी

परंतु ह्या दरवाढीस तुम्ही तयार व्हाल का आणि ह्यास तुम्ही काय म्हणाल ह्याचे उत्तर अजूनही अपेक्षित आहे......

माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे सोडून तुमचेच प्रश्न पुढे घ्यायचेत तुम्हाला? हरकत नाही. पण आधी माझा एक अगदी छोटा प्रश्न- खरं तर "माझा" म्हणणं पण योग्य नाही-

आत्याबाईला मिशा अस्त्या तर?

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 7:02 pm | निनाद जोशी

माझ्या आत्याबाईंना तरी मिश्या नाहीत आणि मी तुमच्या एका प्रश्णाच उत्तर दिल आता तुम्ही एका प्रश्णाच उत्तर द्या

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 6:53 pm | संदीप डांगे

तुम्ही सरकारी आणि खाजगी सेवांमधे गल्लत करत आहात.

सरकार नियंत्रित क्षेत्रांमधे नागरिकांना सोयीचे पडेल असे निर्णय घेण्याची सोय असते. एक उदाहरण म्हणून मोबाईल सेवेचे घेऊ. वरकरणी इथे आपण खाजगी कंपन्यांची सेवा वापरत असलो तरी मूळ त्या कंपन्या सरकारी मालमत्ता (बँड्विड्थ स्पेक्ट्रम्स) वापरून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांनी काय दर लावावे यावर ट्राई सारखी संस्था नियंत्रण ठेवून असते. तेच पेट्रोल बाबत पण आहे आणि रेल्वे बाबत पण आहे.

खाजगी वैद्यकीय सेवेबद्दल असे म्हणता येणार नाही ते का याचे उत्तर खाली दिले आहे.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 7:06 pm | निनाद जोशी

मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी दरवाढ झाल्यास प्राबलेम नसेल ना……

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 7:16 pm | संदीप डांगे

आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू द्याहो, ऐकतं कोण इथे? भाजीचा दर ५ रुपय किलो असो की ५० रुपए किलो असो, न कुर्कुरता द्यावा लागतो. नाहीतर जेवायला मिळत नाही. कधी भाजी घ्यायला बाजारात जात नाही का तुम्ही?

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 6:19 pm | संदीप डांगे

सॉरी, त्यांना विसरलो ते.

पण कसं आहे ना भौ, ही हेल्थ इंड्स्ट्री आता लोकसेवा म्हणून केली जात नाही. प्रचंड नफा कमावण्यासाठी औषध कंपन्या कुठल्याही थराला जातात. ०.०००५ पैसे उत्पादन खर्च असलेली एक गोळी तिच्या सो-कॉल्ड अव्दितीय असण्यामुळे ५,००० काय ५०,००० रुपयाला पण विकली जाते. जे लोक ती किंमत देऊ शकतात त्यांनाच जगायचा अधिकार आहे का असा मला पूर्वी प्रश्न पडायचा. खरेतर आपल्या संशोधनासाठी उचित रॉयल्टी घेऊन ते संशोधन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले तरी समाधानकारक नफा कमावला जाऊ शकतो. पण समाधान ही सापेक्ष भावना असल्याने वैद्यकिय क्षेत्रात दुर्मिळ झाली आहे. त्याला डॉ़क्टरसुद्धा अपवाद कसे असणार? अमूक एक औषध सांगितले की ते कितीही किंमतीचे असले तरी लोक आणतातच हे त्यांची अगतिकता लक्षात येऊन मस्त लुटालुट चालली आहे. एखाद्या गरीब रुग्णाला सांगितलेला ३० दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स घेणे परवडत नाही, ते मेडिकलवाल्याला ८ दिवसाचं औषध द्यायला सांगतो. मेडिकलवाल्याला माहिती असतं हा प्राणी पुढील औषधे घेणारंच नाही आणि फुकट मरेल म्हणून तो त्याला पुर्ण कोर्स घ्यायला जबरदस्ती करतो. हे दृश्य फार हेलावून जाते.

बर्‍याचदा गरज नसलेल्या शस्त्रक्रिया, औषधे सांगितली जातात. रुग्ण हतबल असल्याने काहीच करू शकत नाही. मी वर दिलेला सल्ला उपरोधिक अजिबात नाही. खरंच कुशल व प्रामाणिक डॉक्टरांना समाजाने अधिक संख्येने पुढे आणले तर समाजाचाच फायदा आहे. सध्या मागणी तसा पुरवठा तत्त्वावर चालू आहे तसे नको असेल तर मागणी कमी करायला लागेल किंवा पुरवठा वाढवायला लागेल.

या व्यवसायक्षेत्राला रेगुलेशन यायला पाहिजे. कारण हा नागरिकांच्या जिवनमरणाचा प्रश्न आहे.

निनाद जोशी's picture

11 Mar 2015 - 6:23 pm | निनाद जोशी

पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे ना कि हि शुद्ध लुटालूट आहे ते..... माझे हेच तर म्हणणे होते. ह्या विरुद्ध नक्कीच काही नियम हवेत हेच तर मी म्हणत होतो नाहीतर हि लुटालूट चालूच राहणार......

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 6:43 pm | संदीप डांगे

नाही हो. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
१. एखाद्याचा मेहनताना ठरवणे.
२. एखाद्या क्षेत्रात मनमानी कारभार चालू असेल तर त्यावर शासकिय नियंत्रण आणणे.

दोन्ही गोष्टी शक्य नाहीत कारणः
१. एखाद्याचा मेहनताना त्याची सेवा किती दुर्मिळ आणि महत्त्वाची आहे यावर ठरतो.
२, सरकारने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून खाजगी कडे जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल? फारतर नागरिक सरकारी सेवा उत्कृष्ठ दर्जाची करण्याबाबत दबाव आणू शकतात.

खाजगी क्षेत्रावर नियंत्रण आणणे शक्य होणार नाही कारण खाजगी सेवा ही नागरिकांनी स्वत:च्या चैनीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी उभी केलेली व्यवस्था आहे, त्यात लुटालुट झाली तर आरडाओरडा करण्यात अर्थ नाही.

यसवायजी's picture

12 Mar 2015 - 5:05 am | यसवायजी

हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून बघतोय...

सरकारने लोकल बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून रिक्षाने जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल?

संदीप डांगे's picture

12 Mar 2015 - 8:03 am | संदीप डांगे

खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं धरून ते लॉजिक मांडलंय. रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? एका हॉर्न सोडून सगळं वाजणार्‍या खस्ताहालत रिक्षामधे बसण्याचे तेवढेच पैसे आणि आणि नव्या कोर्‍या गुबगुबित सिट्स असलेल्या आरामदायक रिक्षात बसण्याचे तेवढेच पैसे हे लॉजिक मला ती कधीच पटलेले नाही. फाईव्ह स्टार हॉटेलमधे न धुतलेल्या चादरी, जळमटं, पानाच्या पिचकार्‍या मला तरी अजून कुठे आढळल्या नाहीत.

यसवायजी's picture

12 Mar 2015 - 9:58 am | यसवायजी

@ रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? >>
सरकारचं नियंत्रणच असते. म्हणजे नक्की कोण? बहुतेक काही Regional Transport Authority (RTA) असतात. त्या ठरवतात.

The Hindu मधील ही बातमी- The government has increased the minimum fares for autorickshaws and taxis to Rs.20 and Rs.150 respectively.

रिक्षासारखी सुविधा, जी मेडीकलपेक्षा कमी महत्वाची आहे असे मला वाटते, तिच्यावर नियंत्रण का आहे मग?

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 6:25 pm | आजानुकर्ण

जेव्हा तातडीच्या मेडिकल सेवेची गरज असते तेव्हा करता रुग्णाच्या नातेवाईकांकडून अत्यंत भावनिक होऊन विचार केला जातो. अशा प्रसंगी रॅशनल विचार करणे शक्यच नसते. या गोष्टींचा फायदा घेऊन पिळवणूक चालू आहे.

अमेरिकेत जसे ओबामाकेअरच्या धर्तीवर इन्शुरन्स कंपन्या व हेल्थकेअर इंडस्ट्रीला चाप लावला आहे त्या धर्तीवर भारतात काहीतरी रेग्युलेशन हवे आहे.

खंडेराव's picture

11 Mar 2015 - 5:11 pm | खंडेराव

अगदी सरळ बोलतोय. माझ्या नात्यातल्या एका लहान मुलीचा मागच्या महिन्यात हात तुटला. घरचे पैसेवाले असल्यामुळे हैदराबाद च्या प्रसिध्द हॉस्पिटलात गेले. १५ मिनिटात प्लास्टर आणि ओपरेशन झाले, २ नेल्स टाकले.
बिल किती यावे? १,३५,००० ( ९०,००० प्लास्टर लावायचे, ४५,००० काढायचे )

कसाही विचार केला तरी हा हिशोब कळत नाही. गावाकडे ५,००० लागले नसते साध्या दवाखान्यात.

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 5:12 pm | कपिलमुनी

मोडला म्हणायचे आहे का ?

तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, फ्रॅक्चर अशाटाईप शब्द वापरा ना! लहान लेकरांना काय असे म्हणताय.

या प्रतिसादावर हसावे की रडावे तेच कळत नाही. समजा हात तुटला ऐवजी हात मोडला म्हटले तर तेवढ्याने ती मुलगी ऑपॉप बरी होणारे का? कायतरी एकेक चमत्कारिक कल्पना असतात.

बाकी यावर बिनबुडाच्या प्रावचनिक बुडबुड्यांच्या प्रतीक्षेत.

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 5:59 pm | कपिलमुनी

हात तुटणे आणि हात मोडणे
यात काही फरक आहे का ? दोन्हीचा अर्थ सारखाच होतो कि वेगवेगळा ?

मुनिवर, 'लहान मुलांसाठी असे शब्द काय वापरता' यावरती माझा रोख होता. बाकी मान्यच आहे.

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 6:00 pm | आजानुकर्ण

:)

खंडेराव's picture

12 Mar 2015 - 9:27 am | खंडेराव

भावना पोहोचल्या.
आठवायचा प्रयत्न केला, लहानपणापासुन तुटणे हा समानार्थी म्हणुन वापरला गेलाय गावाकडे.

फ्रॅक्चर टाइप करण्याचा प्रयत्न करण्यात बोटे फ्रॅक्चर व्हायची वेळ आली.
आता चोप्य पेस्त केलाय.

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 8:35 pm | सुबोध खरे

खंडेराव
मुलीच्या हातात दोन खिळे टाकले म्हणजेच तिची शल्यक्रिया झाली. हि शल्यक्रिया गावाचा हाडवैद्य करू शकेल काय याची शंका वाटते. तो कदाचित ९० % वेळेस काम व्यवस्थित करेलही पण उरलेला १० % धोका आपण पत्करायचा कि नाही हे आपण ठरवु शकता.
वाढत्या वयात हाताची दोन हाडे जर व्यवस्थित सांधली गेली नाही तर एका बाजूचे हाड जास्त वाढते आणि दुसरे हाड वाढत नाही. शिवाय जर हाड वाकडे जुळले तर आयुष्यभर वाकडा हात राहिल्याची शिक्षा त्या निष्पाप मुलीला मिळेल. आयुष्यभर अपंग म्हणून तिला राहायला लागेल किंवा परत शल्यक्रिया करून हात सरळ करावा लागेल. (जर हे केले नाही तर) अशा वाकड्या हाताच्या मुलीला लग्नाच्या वेळेस पत्करणारा मुलगा हा त्याची किंमत वसूल केल्याशिवाय राहील काय? शेवटी लग्न हा बाजार आहे.
बाकी इतकी किंमत का याचे उत्तर लांबलचक आहे आणि ते देऊनही बर्याच लोकांना पटवून घ्यायचेच नाही त्यामुळे मी ते देत नाही.

खंडेराव's picture

16 Mar 2015 - 1:52 pm | खंडेराव

आहे हो. जर आपण या किंमतीला योग्य म्हणत असु, आणि वर असेही वाटत असेल की कमी किमतीत हे करण्यात धोका आहे तर परिस्थिती अवघड आहे. किती लोक एवढे पैसे देउ शकतात?

प्रत्येक स्किल्ल या योग्य ती किंमत मिळाली पाहीजे, पण जेव्हा अवास्तव पैसा मागितला जातो, तिथे अडचण सुरु होते.
झोमटो सारखी एखादी साइट असावी, जिथे दरपत्रके आणि रिव्यु मिळतील दवाखान्यांचे पण.

एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का?

:-))

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 5:59 pm | आजानुकर्ण

माझ्या नात्यातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी १० वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा एकूण खर्च ५०००० रुपयाच्या आसपास आला होता. मेडिकल'सेवे'चे इन्फ्लेशन बघितले तर दहा वर्षात ही किंमत पाचपट झाली आहे हे सहज लक्षात येईल. त्यामुळे अडीच लाख रुपये खर्च हा सद्य बाजाराच्या दरानुसारच वाटतो आहे. हा दर योग्यच आहे असे मला म्हणायचे नाही.

उदा. आजकाल मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियांचा खर्च सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत गेला आहे.

एकंदर किंमत बाजाराच्या दरानुसार असल्याने त्याच्या अंतर्गत आयटमायझेशन कसे केले आहे याने पेशंटला तत्त्वतः काहीही फरक पडत नाही. माझा असा अंदाज आहे की इन्शुरन्स कंपनीच्या नियमांना वळसा घालण्यासाठी हॉस्पिटले सोयीस्कर आयटमायझेशन करतात. उदा. इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार सलाईनच्या बाटलीचे पैसे देणार पण बाटली अडकवण्याच्या स्टँडचे भाडे नाही असे काही असेल तर बाटली व स्टँड असे मिळून सर्व पैसे बाटलीला लावले जात असावेत. त्याचप्रमाणे डॉक्टरची फी इन्शुरन्स कंपन्यांना एक्स्क्लुड करता येत नसल्याने जो खर्च मिळण्याची शक्यता कमी आहे तो डॉक्टरच्या फीमध्ये पकडला जात असावा.

तुम्ही इन्शुरन्स क्लेम केले की नाही याचा यात फरक पडू नये. बिलिंग सिस्टम सोपी ठेवण्यासाठी सर्वच पेशंटला एकाच प्रकारचे दर लावण्याचा हॉस्पिटलचा हेतू असावा.

पुन्हा एकदा हॉस्पिटलचा दर व एकंदर सिकनेस केअर व्यवस्थेचे मला चुकूनही समर्थन करायचे नाही. भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते.

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 6:30 pm | संदीप डांगे

भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते.

पूर्णपणे पटले....

मार्मिक गोडसे's picture

11 Mar 2015 - 6:00 pm | मार्मिक गोडसे

क्षय रोग उच्चाटनासाठी सरकारी रुग्णालयात डॉट अंतर्गत क्षय निदान व उपचार मोफत राबवला जातो. तेथील तपासण्या व औषधे प्रमाणीत असतात. परंतू क्षयाचे बरेचशे रुग्ण खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजून उपचार घेतात. मोफत त्यात सरकारी म्हणजे कमी दर्जाचे असा लोकांचा समज असतो. त्यामुळे खाजगी डॉक्टरांचे फावते.

माझ्या आजोबांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेला जे.जे.रुग्णालयात अंदाजे ६००० रू. खर्च आला. ह्यात नेत्रतपासणी, लघवी रक्त, ईसीजी तपासणी,शस्त्रक्रीया, लेन्स (नामांकीत कंपनीची) औषधे, दोन दिवस रुग्णालयात मुक्काम,दिवसातून दोन वेळा दूधपाव व डॉक्टरांची व्हीजीट हे सर्व समाविष्ट आहे. खाजगी रुग्णालयात हाच खर्च ३० ते ३२ हजरापर्यंत गेला असता.

चिनार's picture

11 Mar 2015 - 6:02 pm | चिनार

स्वत: च्या कौशल्याचे एखाद्याने किती पैसे मागावे हे तोच ठरवू शकतो. पण ते द्यावे की नाही हे आपण ठरवावे. पैसा सगळ्यांनी कमवावा पण स्वत: पुरती एखादी नियमावली आखून घ्यावी. डॉक्टर च्या बाबातीत बोलायचं तर माझ्या मते नियमावली खालीलप्रमाणे असावी.

१. दवाखान्यात दाखल होऊन शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार घेऊन जर एखादा पेशंट नंतर रुटीन चेक अप साठी आला असेल तर त्याच्याकडून फी घेऊ नये किंवा नाममात्र घ्यावी. (असे काही डॉक्टर माझ्या पाहण्यात आहेत)
२. औषध लिहून देताना रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून शक्य असल्यास तुलनेने स्वस्त औषध द्यावीत.
३. मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये.
४. जेवढी गरज आहे तेवढेच उपचार करावेत. शक्यतो घरगुती उपाय सांगावे.
५. सेकंड ओपिनियन घ्यायला आलेल्या रुग्णाला परत सगळ्या चाचण्या करायला लावू नये

मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये.

ही खालची माझी मतं आहेत- माझ्याकडे पुरावा नाही. पण कार्यकारणभाव मला तरी योग्य वाटतोय-

इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला.

सामान्य माणसाकडे मात्र हे दोन्ही नसतं. मुळात तो हॉस्पिटलमध्ये येतो तेच ऐन वेळी. तो थोडीच काही निगोशिएशन करू शकतो. शेवटी अव्वाच्या सव्वा दर हे अन-इन्शुअर्ड माणसाकडनं घेणंच जास्त शक्य होत असावं, असं आपलं मला वाटतं...

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 6:20 pm | आजानुकर्ण

साधारणपणे माझा असा अनुभव आहे की तुम्ही इन्शुरन्स कंपनीशी भांडू शकता. आयआरडीए वगैरेकडे जाऊ शकता. त्यामुळे जास्त क्लेम केला आणि तो नाकारला गेला तर पेशंट व इन्शुरन्स बघून घेतील असे हॉस्पिटलचे साधारण धोरण असते.

मात्र हॉस्पिटल व डॉक्टर यांच्या संदर्भात कुठेही दाद मागण्याची सोय मला माहीत नाही.

इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला.

अनुभव

असंका's picture

11 Mar 2015 - 6:31 pm | असंका

घ्या पुरावा पण आला...

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 8:25 pm | आनंदी गोपाळ

ऐशी हजार त्या डॉक्टरानी घेतले, असे मान्य करू. बाकीचे एक लाख सत्तर हजार कुठे गेले?

दुसरे,
समजा, तुम्हाला हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर बायपास सर्जरी करायची आहे. तुमच्या समोर ३ पर्याय आहेत.

१. डॉ. ख्यातनाम सुप्रसिद्ध क्षक्षक्ष. (यांची फी ८० हजार रुपये आहे. तशी पाटी त्यांनी दवाखान्यात लावलेली आहे, तुम्हाला स्टँप्ड पावतीही दिली आहे. हा व्हाईट व्यवहार आहे, व त्यात सगळे प्रकार मिळून ४०% टॅक्स सरकारला जातो हे तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. टोटल खर्च २.५ लाख)
२. एक नवखे / डॉ. अननोन. यांची फी माफक ४० हजार रुपये आहे. टोटल खर्च १.७५ लाख
३. शासकीय इस्पितळ उदा. जेजे. तिथे अँजिओप्लास्टी करणे पोस्टग्रॅज्युएट वैद्यकिय विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कदाचित डॉ क्षक्षक्ष यांच्याच मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन होईल, पण ते करणारा विद्यार्थी असेल. किंवा नसेल. ते ऑपरेशन नक्की कोण करील ते तुम्हाला समजणार नाही. इथे खर्च फुकट आहे, कारण तुमच्याकडे पिवळे/केशरी रेशनकार्ड आहे. नसेल, तर सगळा मिळून ५५ हजार.

आता या परिस्थितीत, तुम्ही कुणाकडे उपचार घ्याल? व का? की

४. उपचार न घेता आपले लाडके आयुर्हित सांगताहेत तसे घरी बसाल?

आयुर्हित's picture

11 Mar 2015 - 8:59 pm | आयुर्हित

माझ्या प्रतिसादात "उपचार न घेता घरी बसा" असे कुठे म्हटले आहे?

उपचार घ्यायचे तर घरी बसूनही उपचार घेता येतात, या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची गरजच नाही!

आणि फक्त हृदयातिल तर सारे ब्लॉक निघतातच, संपूर्ण शरीरात अजून कोठे(मानेत, मेंदूत, यकृतात, वृक्कमध्ये, डोळ्यात, पायात) असतील तिथले सारे ब्लॉक निघतात.

त्यासाठी एवढी महाग आणि जीवघेणी "बायपास"च का?
डॉक्टर ती सुचवितात कारण या सर्जरीने एका दिवसात लाखो रुपये कमावता येतात म्हणूनच, इतर काही कारण नाही.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 9:22 pm | आनंदी गोपाळ

I don't discuss Modern Medical Procedures with ...... Thank you.

आयुर्हित's picture

11 Mar 2015 - 10:03 pm | आयुर्हित

आपल्याला Modern Medical Procedures जर माहित असते तर बायपास ला नक्कीच पर्याय सांगितला असता!
पण नाही....
माहित असेल तर सांगालना.

आपल्या माहितीसाठी मी नीम हकीम नाही तर Modern Medical Procedures चा अभ्यासू व खंदा पुरस्कर्ता आहे!

उदाहरण अ.

मला शर्ट विकत घ्यायचा आहे.
ब्रँडेड शोरूममधे "शर्ट" साडेतीन हजार रुपयाला मिळतोय.
शेजारीच श्री जयहिंद क्लॉथ स्टोअरमधे "शर्ट" १५००ला आहे
बाहेर फुटपाथवर "शर्ट" १५० रुपयांत आहे. घासाघीस करून सव्वादोनशेत जोडी मिळेल.

जगातल्या मोठ्ठ्ठ्ठ्या ब्रँड्सचेही कपडे चीन बांग्लादेश वगैरे ठिकाणच्या स्वेट्शॉपमधेच शिवले जातात. लेबलही तिथेच लावतात. पुढची किंमत ब्रँडमुळे वाढते.

उदाहरण ब.

ताजमधे "चहा" कितीला मिळतो?
अमेरिकेत कितीला?
बर्‍या हॉटेलमधे?
रस्त्यावरच्या टपरीवर?

का?

उदाहरण क.

सरकारी सेवा.
रेल्वे.
जनरल बोगी तिकिट किती?
स्लीपर कोच किती?
थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट क्लास?

डिझेल तितकेच, इंजिन तेच, रुळही तेच, मशीनरीतली इन्व्हेस्टमेंटही तीच.

त्यातही पासवाल्यांना एसीचा रेट वेगळा, सीझन तिकिट वाल्याला वेगळा, सैनिकाला वेगळा इ.

का?

उदाहरण ड.

व्हॉट्सॅपवरचा फेमस केळीवाला जोक.
भैय्या, केले कैसे दिया?

घर मे खानेको १० रुपये. मंदिरमे चढानेको १५, अस्पताल्वाले मरीज को देनेके लिये २०

एमेसईबी ज्यु. इंजिनियर : भाई, केला वोही, भाव अलग क्यूं?

केलेवाला : साब, बिजली वही, डोमेस्टीक, धार्मिक, कमर्शिअल भाव अलग क्युं?

चला, निनाद जोशींना सोबत घेऊन आपण या सर्वच प्रकारच्या असमानतेबद्दल आंदोलन करू या. त्यांना (काही) डॉक्टरांना मिळणार्‍या पैशांचा फारच राग आलेला दिसतोय. ;)

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 8:47 pm | आनंदी गोपाळ

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉक्टरला 'धंदा' कुणी शिकवत नाहीत कालेजात. बिझिनेसचे ज्ञान शून्य असते. घरचा दवाखाना वगैरे आधीच असेल तर वेगळी बाब, पण खानदानात प्रथमच हा उद्योग करणार्‍याचा लोचा होतो. एकतर सरकारी हॉस्पिटलात पैसे घ्यायचे नसतात ही सवय. आपण केलेल्या कामाचेही पैसे मागायची खरच लाज वाटते, अन त्या काळात अनेक फुकटे लुटून घेतात. हे झाले अवांतर.

तर गम्मत अशी, की प्रॅक्टीस सुरू केली तेव्हा मी माझी कन्सल्टेशन फी ठेवली होती ३० रुपये. (त्या पहिल्या पेशंटने दिलेल्या १० रुपयांच्या ३ नोटा अजूनही फ्रेम करून ठेवल्यात माझ्यापाशी.) कारण, गावातल्या सिनियर कन्सल्टंट्सची फी ४० रुपये असे. म्हटलं आपण ज्युनियर, आपल्याला जास्त पैसे मागणे शोभणार नाही.

४-६ महिन्यांत एका पेशंटने मला अक्कल शिकवली. नवा असल्याने वेळ भरपूर असायचा, पेशंट्शी गप्पा वगैरे मारायचो. पठ्ठ्या थोड्या गप्पांनंतर खुलून मोकळं बोलत मला म्हणतो कसा,

"साहेब काय करणार? गरीबी आहे. थोडे जास्त पैसे गाठीला असते, तर 'भारी' डॉक्टरला दाखवले असते.."

दुसर्‍या दिवशीपासून मी माझी फी ५० रुपये आहे असा बोर्ड बाहेर लावला. तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंत दुकान भरभरून वाहते आहे.

धन्यवाद!

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 8:53 pm | आजानुकर्ण

सचोटीने व्यवसाय करणारे किंवा अगदी सेवाभावी वृत्तीने मदत करणारे डॉक्टर नाहीत असे नाही. पण राजकारणी-बिल्डर-कंत्राटदार मंडळींबाबत जे परसेप्शन आहे अगदी तेच परसेप्शन वैद्यकीय व्यवसायाबद्दल का होतंय याचा विचार त्या क्षेत्रातील मंडळींनीच करणं आवश्यक आहे. पब्लिकला आमचा खर्च/अडचणी कळत नाही किंवा डॉक्टरांच्या पैशावर जळतात हे फारच सुलभीकरण वाटते.

आजकाल किमान दर्जाची वैद्यकीय सेवा घ्यायची म्हटली तर खर्च होणार याची मानसिक तयारी बहुतेकांची असतेच. मात्र त्या सेवेची खात्री आणि त्यात हलगर्जीपणा झाल्यास त्यासंदर्भातील हॉस्पिटल/डॉक्टर यांनी घ्यायची जबाबदारी याबाबत सर्वत्र आनंदीआनंद आहे.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 9:28 pm | आनंदी गोपाळ

खाली दिलंय ते स्टँडर्ड ग्यारंटीवालं उत्तर आहे. अन त्याला नाईलाज आहे. कारण आम्ही शरीरं रिपेयर करणारे मेकॅनिक्स असलो, तरी प्रत्येक इंजिन वेगळं आहे, अन त्याच रिपेअर टेक्निकला प्रत्येक इंजिन वेगळा रिस्पॉन्स देतं. तोच नट त्याच खाच्यात फिट होईल असंही नसतं, व स्पेअर्स बाजारात मिळत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय ते इंजिन मुळातच आम्ही बनवलेलं नसल्याने, ब्ल्यूप्रिंट, यूजर मॅन्युअल वगैरे कुठे मिळत नाहीत. असो.

या व्यवसायात चोर शिरलेत ते १००% खरे आहे. व त्यांचा बंदोबस्त व प्रतिकार करण्याचा प्रयत्न आमच्यातलेच अनेक लोक करीतच असतात.

समाजही आपल्यापरीने आमच्यावर अंकुश ठेवून असतो. ताळतंत्र सोडून स्त्रीभ्रूणहत्या होवू लागल्या, तेव्हा समाज व कायद्याचा बडगा इतका तीव्रतेने पडला, की फॉर्म भरताना कानामात्राविलांटी चुकली तरी डॉक्टरला ५-५ वर्षे खडी फोडावी लागते. परवाची पुण्यातलीच केस आहे पेपरात.

सुक्याबरोबर ओलेही जळतेच, पण त्यामुळे सगळ्याच पेशाला बदनाम करणारे असे धागे काढण्यात काय हशिल आहे?

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 10:27 pm | अत्रन्गि पाउस

आपण उद्वेगाने असेल कदाचित डॉक्टरांची तुलना मेकानिक्स वगैरेंशी करता ते अतिशय खटकते ...

अहो जिवलगांच्या जीवावर बेतते तेव्हा डॉक्टरांची पायरी चढतो माणूस....कमालीच्या विश्वासाने म्हणा किंवा पराकोटीच्या अगतिकतेने डॉक्टर म्हणतील ते करायला तयार असतात सामान्य लोक ..क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल ..... पैसा सत्ता आणि अधिकाराच्या माजोरडेपणाने उन्मत्त वर्तन करणारे काही लोक आहेत पण ते बहुतांश नव्हे .. राग मानू नका पण त्यांच्या समोर तसेही फारसे कुणाचेच काही चालत नाही ...
तुमच्यात इतका रोखठोक कडवटपणा आलाय त्याची कारणे असतीलच ..ते नाकारत नाही ...पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजही डॉक्टर देवासारखे मानले जातात आपल्या देशात...आपल्या माणसाला बरे करणारे डॉक्टर माणूस जन्मभर विसरत नाही हां त्याची पैशात भरपाई करू शकत नाहीत सगळे पण प्रसंगी वाटेल ती मदत करतील त्यांच्या अखत्यारीत .. ... तुम्हाला अनुभव येत असतीलच ..
जाता जाता : पेशंटच्या आर्थिक /सामाजिक परिस्थितीची एका लिमिटच्या पलीकडे पर्वा न करता कमालीच्या सेवाभावाने
आपले काम करणारे आणि हाताला गुण असणारे शेकडो डॉक्टर्स आजहि कार्यरत आहेत आणि तुम्ही कमालीच्या कुत्सितपणे ज्यांना हेटाळून बोलता ते 'जीप्डे'पण आहेत आणि प्रख्यात सर्जन्स वगैरे पण आहेत ...आणि देव करो ते ते तसे सतत कुठे नं कुठे समाजात येत राहोत ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 10:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल

अत्रंगी साहेब, कष्ट करुन खाणारा कोणीही क्षुल्लक होउ शकत नाही. कृपया कुठल्याही कष्टकरी वर्गाला मग तो किती का कमवत असेना नावं ठेउ नका. धन्यवाद. बाकी प्रतिसादाशी सहमत.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 10:39 pm | अत्रन्गि पाउस

गाडी रिपेयर हे प्राधान्याने 'क्षुल्लक' काम आहे शरीर रिपेयर करण्यापुढे असा त्याचा हेतू आहे ...
अहो फार फार तर गाडी स्क्रप मध्ये काढू ...पण शरीराचे तसे नाही ...
मेकानिकला नावे ठेवणे हा हेतू नाही आणि अनवधानाने तसे सूचित झाले असेल तर पुन्हा क्षमस्व ...

अजया's picture

11 Mar 2015 - 8:51 pm | अजया

फाईव्ह स्टार क्वालिटी ट्रिटमेंट पाहिजे आणि दाम मात्र खाणावळीचे हवे हो!!

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 8:54 pm | आजानुकर्ण

किंवा फाईव्ह स्टारचे पैसे घेेणार आणि खाणावळीच्या दर्जाचे जेवण देणार.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 10:11 pm | आनंदी गोपाळ

फाईव्हस्टारचं जेवून खरंच पोट भरलंय का कधी तुमचं? त्या मळमळीत जेवणाला इतके पैसे का घेतात तेच कळत नाही मला. (हो. मिळमिळीत नाही. मळमळीत.)

(एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी 'राइस लेंटिल सूप' नावाखाली चक्क अत्यंत बेचव वरणभातात भरपूर पाणी घालून लोकांना खायला ठेवलं होतं. प्र च ण्ड शिव्या घातल्या होत्या, व घालू शकलो होतो, कारण पैसे देणारा ऑर्गनायझर मी होतो. तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात? )

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 10:32 pm | आजानुकर्ण

तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात?

असंच काल कोणीतरी विचारलं होतं, दुसऱ्याच्या जमिनीवर झालेल्या धरणाचे पाणी तुम्ही पिता तर तुमची जमीन गेली तर त्याचे इतके वाईट का वाटते.
I do not have ability to counter this kind of argument.

काळा पहाड's picture

12 Mar 2015 - 1:44 pm | काळा पहाड

एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी

बघा. तरी डॉक्टरांना सध्याचे एक्स्पेन्सेस परवडत नाहीत असं तेच म्हणतात. :)

जाऊ नका ना मग अशा ठिकाणी!शिंपल!!

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 9:04 pm | आजानुकर्ण

हो पण अशा ठिकाणांची यादी कुठे प्रकाशित होत नाही. पैसे खर्च करुन, शारीरिक हाल झाल्यानंतर आता हे ठिकाण चांगले नाही, दुसरे पाहू अशी काट मारता येते. इथे कुणाला अशा ठिकाणांची माहिती असल्यास ती या निमित्ताने समोर आली तर उत्तम.

आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 9:21 pm | आनंदी गोपाळ

आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.

तुम्हीही 'वरच्या' कंपनीतून आणलेले तुमच्या शरीराचे ग्यारंटी कार्ड मजकडे घेऊन या. तुमच्यावर केलेल्या प्रत्येक उपचाराची "वॉरंटी" त्यावरच ल्हिहून देईन. :)

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 9:29 pm | आजानुकर्ण

उपचारांच्या हलगर्जीपणाबाबत काय अकाऊंटॅबिलीटी आहे, हा प्रश्न विचारला तर डॉक्टर लोक प्रचंड डिफेन्सिव होतात किंवा विनोदी वक्तव्य करुन वेळ मारुन नेतात हा अनुभव नवा नाही.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 9:53 pm | आनंदी गोपाळ

क्षमा करा, वर उत्तर टाईप करतच होतो.

इथे ते ग्यारंटीचे लिहिल्याशिवाय राहवले नाही. डिफेन्सिव्ह का होतात, याचे कारण म्हणजे, अकाउंटेबल रहायला हरकत नाही, पण कित्येकदा परिस्थिती आमच्याही हाताबाहेरची असते, व 'नुकसानभरपाई' इन काइण्ड देणे अशक्य असते. इंजिन खोलतानाची तूटफूट, स्पेअरपार्ट्स इ. वर लिहिले आहेच. तुमच्या गाडीचे इंजीन रिपेयर करताना कुणा मेकॅनिककडून चूक झाली तर तो सिव्हिल ऑफेन्स होतो, की क्रिमिनल? त्याच्याकडून तुम्ही पैसे मागता, की त्याला जेलीत धाडायची वा हातपाय तोडायची मागणी करता?

ज्या जीवनाची खरंच ग्यारंटी नाही, ते रिपेअर करतानाची ग्यारंटी इतकीच, की माझे पोट माझ्या रेप्युटेशनवर अवलंबून असते, हे तुम्ही लक्षात घेणे. मी घिसाडघाईने, वा पब्लिकला *तिया बनवून नुसतेच पैसे कमवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच मारही खाईन व उपाशीही मरेन, हे आजच नाही, प्राचीन काळापासून सत्य आहे.

उपचाराने वाचणारे किती,हलगर्जीने दगावणारे किती?काय रेशो? काही विदा?
किती आणि कोणते डाॅक्टर ठरवुन हलगर्जीपणा करुन मारतात पेशंटला?
हे प्रश्न आयुर्वेदिकच्या नावाखाली,कोणतीही सर्जरी लागणार नाही,औषधांनी बरे व्हा असे सांगुन रितसर भरपूर पैसे घेणार्या इतर पॅथी डाॅक्टर्सना विचारले जातात का?(एक कुतुहल)

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 10:20 pm | आजानुकर्ण

ठरवून हलगर्जीपणा करणे आणि चुकून हलगर्जीपणा करणे यात डावेउजवे असे काही नाही. शिवाय उपचार घेणाऱ्या त्यात पेशंटचा काहीही दोष नाही. जर पैसे घेतात तर त्या दर्जाची सेवा मिळायला हवी हा पेशंटचा हक्क आहे. एवढेच म्हणायचे आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात ठरवून दुसऱ्याला मारले जात नाही. तरीही अपघातकर्त्याला शिक्षा होतेच. उपचाराने वाचणारे हे हलगर्जीपणाने दगावणाऱ्यांपेक्षा जोपर्यंत जास्त आहेत तोपर्यंत काही काळजी करायची नाही का? अगदी एक जीवही हलगर्जीपणामुळे जात असेल तर त्याची शिक्षा होणे आवश्यकच आहे. माझा स्वतःचा अॅनेकडोटल अनुभव असा आहे की आजपर्यंत चार वेळा मी व घरातील इतर यांना हॉस्पिटलायझेशन करावे लागले. त्यातील तीन वेळा चुकीचे उपचार, चुकीचे निदान आणि अॅडमिट केल्याचे दिवस वाढवण्यासाठी वेळकाढूपणा हे प्रकार अनुभवास आले. यातील एक वेळा आयसीयूपर्यंत विनाकारण फेरी मारावी लागली. या सर्व प्रकारात झालेला मनस्ताप फक्त आम्हाला झालेला आहे. प्रत्यक्षात सदर घटनेस जबाबदार व्यक्तींना त्याची काहीही तोशीस नाही.

आता या सर्व गोष्टी कुठे डॉक्युमेंट होतात ते सांगितल्यास मी विदा व रेशो पुरवू शकतो. त्यात सद्य परिस्थितीत पारंपरिक न्यायालयांकडे दाद मागण्याशिवाय रुग्णांकडे काहीही पर्याय नाही.

आयुर्वेदिक व्यक्तींना किंवा तत्सम अल्टरनेटिव मेडिसिन प्रकाराला मी डॉक्टरी मानतच नाही. शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.

आनंदी गोपाळ's picture

11 Mar 2015 - 10:31 pm | आनंदी गोपाळ

शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.

<<
यांना कुणीतरी बालाजी तांबे नामक क्वॅकच्या दुकानातला 'हर्बल चहा' पाजा हो कुणीतरी. पैसे यांच्याकडून घ्या. मग टोटल फीबद्दल बोलू.

आजानुकर्ण's picture

11 Mar 2015 - 10:35 pm | आजानुकर्ण

बालाजी तांबे आणि डॉक्टर यांचे वर्क एथिक्स एकच असावेत अशी तुमची मागणी असल्यास पुढे चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही.

मुळात ही सर्व Modern Medicine Procedure आयुर्वेदिक प्रक्रिया नसली तरी त्याचे उद्देश आयुर्वेदिक पद्ध्तीसारखेच आहे
आणि ती म्हणजे "आजाराचे संपूर्ण व समूळ उच्चाटन"

सर्व प्रक्रिया (Procedure) Non-invasive चिरफाडरहित व धोकाविरहित असल्याने पूर्ण उपचार घेणारे सर्वच जण वाचतात व आयुष्याचा पुरेपुरे आनंद घेतात.

अगदी साधारण डॉक्टरांनी "बेड रेस्ट घ्या" म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण सिंहगड चढतांना पहिले तर आश्चर्य वाटून घेवू नका!

आणि शेवटचे काही महिने उरलेत आता यांची घरी नेवून फक्त सेवा करा म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण पुढचे १० ते २० वर्ष जगतांना पहिले तर मुळीच आश्चर्य वाटून घेवू नका!!

सुबोध खरे's picture

12 Mar 2015 - 10:31 am | सुबोध खरे

आयुर्हीत साहेब
आपण बायपास वर सल्ला दिलात म्हणून सांगतो. मी एशियन हार्ट ला असताना ३००० तीन हजार बायपास च्या शल्यक्रिया पाहिल्या आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना बरेच अडथळे( multiple blocks) असत. एक किंवा दोन अडथळे असतील तर अन्जीयो प्लास्टी केली जाते. बहुसंख्य रुग्णांना लेफ्ट मेन मध्ये अडथळा असे. यातील कित्याक रुग्ण मला असे विचारत( मी रुग्णांशी जास्त मोकळेपणाने बोलत असे म्हणून) कि डॉक्टर माही बायपास केला नाही तर काय होईल. मी त्यांना शांतपणे सांगत असे ९० % काहीच होणार नाही. आणि तुम्हीच मला ५ वर्षाने सांगाल कि अहो डॉक्टर मला बायपास सांगितला होता पण मी तो केला नाही आणि तरीही मी ठणठणीत आहे. पण जर तुम्ही उरलेल्या १० % मध्ये असाल तर तुमचा रोग असा आहे कि तुम्ही कदाचित रुग्णालयापर्यंत सुद्धा पोहोचू शकणार नाही. आता तुम्ही या ९०% मध्ये आहात कि १० % मध्ये आहात हे समजायला मी काही ज्योतिषी नाही. तेंव्हा तुम्ही तुमच्या ज्योतिषाला विचारून पहा कि माझा मृत्युयोग केंव्हा आहे. दुसरे असे आहे कि हा इथे मागे पश्चीम द्रुतगती मार्ग आहे(एशियन हार्ट च्या मागिल खिडकीतून दिसतो) तो आपण डोळे मिटून पार करा १०० पैकी ९० वेळा आपण सुखरूप पार कराल. पण तो धोका पत्करायचा कि नाही ते तुम्ही ठरवा.
एका दीड शहाण्या रुग्णाने माझ्या दवाखान्यात हेही सांगितले कि डॉक्टर तुम्ही म्हणता त्याला काही अर्थ नाही. माझा मृत्युयोग नसेल तर मला काहीही होणार नाही. मी त्यानाही थंडपणे सांगितले कि साहेब तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. तुमचा मृत्युयोग नसेल तर तुम्ही मरणार नाही. पण तुमचा मृत्युयोग नाही म्हणून हे दवाखान्याच्या समोर असलेले रेल्वेचे रूळ तुम्ही डोळे मिटून पार करणार का? हा विचार तुम्हीच करायचा आहे. अर्थात त्यांनी माझे म्हणणे मान्य केले.
तेंव्हा आपण या ९०% शक्यतेमध्ये खेळत आहात हे ध्यानात ठेवा आणी विचार करा. उरलेल्या १० टक्क्यातील लोक सुद्धा मी बरेच पाहिलेले आहेत कि तीन वर्षे माधवबाग, चिलेशन, बलून पंप वगैरे करून हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते.
असो.
जाता जाता के इ एम चे CVTS किंवा, जे जे रुग्णालय किंवा AIIMS आणी आमच्या MH CTC पुणे लष्करी रुग्णालयात येथील डॉक्टराना बायपास केल्याचे पाच पैसे सुद्धा अतिरिक्त मिळत नाहीत मग तेथील डॉक्टर असे बायपास का करतात याचाही विचार करा.

आयुर्हित's picture

12 Mar 2015 - 1:09 pm | आयुर्हित

मानले बुवा आपल्याला.
अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आपण.

सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते!
अगदी ह्याच गोष्टीचा डॉक्टर गैरफायदा घेतात, जो त्यांनी घेवू नये.
जास्त पैसे हवे असतील तर मेहनत वाढवावी, ४ नवीन ठिकाणी शाखा उघडाव्या अथवा स्वत:चे ४ नवीन हॉस्पिटल उघडावे, पण अडल्या नडलेल्या गरीब श्रीमंत जनतेला नाडू नये, हेच मनापासून वाटते आणि धागाकर्ताही हेच सांगायचा प्रयत्न करतोय.

ज्या गोष्टीत धोका आहे ती मुद्दामहून का म्हणून करावी?

जी गोष्ट अत्यंत चुकीची आहे, जे ओपेरशन करतांना लोकांची आयुष्यभराची कमवलेली कमाई जाते, किंबहुना बऱ्याच लोकांचा प्राणही जातो, ती गोष्ट का करावी?

ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये?

अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात ते का सुचवू नये?

ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये?

कोणते कोणते चांगले पर्याय आहेत ते सांगावेत. समस्त मिपा कराना फायदा होईल.

अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात.

माहितीसाठी कुठे आणि कस करतात ते सांगाल का? मिपा करांचे रुपये तरी वाचतील…

आयुर्हित's picture

12 Mar 2015 - 1:45 pm | आयुर्हित

आपल्या महितातल्या रुग्णाला सांगून त्याची माहिती मला व्यनीतून कळवावी.
पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि जयपूर येथे ठरवून माझी प्रत्यक्ष भेट घेवू शकतात.

कपिलमुनी's picture

12 Mar 2015 - 2:36 pm | कपिलमुनी

अहो साधारण उपचारपद्धती काय आहे ते तरी सांगा

आयुर्हित's picture

12 Mar 2015 - 2:55 pm | आयुर्हित

एकदाच व थोडक्यात सांगतो : आजाराची लक्षणे नव्हे तर मूळ करणे शोधणे व त्यावर सुयोग्य (पेशंटला हवा तो परिणाम कायमस्वरूपी साधणारी) उपचार सुचविणे, व ते सहजसाध्य होईल ते पाहणे.

कपिलमुनी's picture

12 Mar 2015 - 4:06 pm | कपिलमुनी

धन्यवाद !

सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल जर बोलत असाल तर जरा जपून. उगा खेळ व्हायचा कुणाच्या तरी जीवाशी.

हा विषय वेगळाच आहे.
आपले काही अनमोल अनुभव असतील किंवा याबद्दल अधिक काही सांगायचे असेल
तर वेगळा धागा काढाल प्लीज....

खटासि खट's picture

11 Mar 2015 - 10:06 pm | खटासि खट

टंकण्याचा भयानक कंटाळा आल्याने पास होता. पण वेळ मिळेल तसं अनुभव लिहावे असं वाटतंय.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 10:30 pm | अत्रन्गि पाउस

+१

खटासि खट's picture

11 Mar 2015 - 10:31 pm | खटासि खट

अनुभव वैयक्तिक आहेत.

अनुभव पहिला : तातश्रींना पोटाचा आजार अनेक वर्षांपासून आहे.
एका ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी सांगितलं भिंगातून पाहून काय प्रॉब्लेम आहे हे निश्चित करू. पण भूल दिल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. बाहेर तीन सुपुत्र (आम्ही) बसले होते. त्यातल्या एकाच्या सह्या घेतल्या. आठवडाराभर ठेवलं. लाखभर बिल झालं. काही दिवसांनी पुन्हा पोट दुखायला लागलं. मग औषधं लिहून देऊ लागले. पण लघवी कोंडल्यासारखे वाटत असल्याने रात्रभर वेदना होत होत्या.
डॉक्टर बदलला : पूर्वीच्या सर्व चाचण्या दाखवल्या. डॉ म्हणाले मुंबईला एक चाचणी करावी लागेल. सुपुत्र क्र्म २ घरी होते. त्यांनी हे काम केलं. मग पुण्यात त्याच चाचण्या वेगवेगळ्या डायग्नॉस्टीक सेंटर मधे करवून घेण्यात आल्या. त्यातलं एक स्वारगेट, दुसरं बंडगार्डन, तिसरं म्हात्रे ब्रिज आणि चौथं पिंपवड येथे. जबरदस्त पुणे दर्शन झाल्यावर रिपोर्ट्स पूर्वीप्रमाणेच नॉर्मल आले. मग आनखी एक टेस्ट करू म्हणाले. दोन दिवसाची औषधं दिलेली. झोप लागली. घरचे खूष. तिस-या दिवशी पहिल्यापेक्षा जास्त वेदना. सदर सुपुत्र घरी आल्यावर गोळ्या पाहील्या तर वेदनाशामक !
सहा महीने सहन करून झाल्यावर फरक पडला नाही. आता पुन्हा डॉक्टर बदलला.
आता कर्वे रस्त्यावर एका सराफाच्या इमारतीतला !
पुन्हा त्याच चाचण्या, पण जवळच्याच इस्पितळात. ही जागा राज ठाकरेंचं नाव घेतलं की लक्षात येते.
चाचण्या झाल्या. या वेळी बिल रग्गड आलं. सहजच बिलात पाहीलं तर डॉक्टर फीज २०००० रुपये आणि व्हिजीट फी ३०००/-. याबद्दल विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मग बंधूंकडून जुनी बिलं घेतली. सग़ळीकडे हेच. डायग्नॉस्टीक सेंटरकडून विविध चाचण्यांपोटी पाच हजारापासून तेरा हजारापर्यंत डॉक्टरला गेले होते.
हे लक्षात येऊनही नाईलाजाने वा-या चालू आहेत. तातश्रींकडे बघवत नाही. आता चांगला म्हणवला गेलेला एकही डॉक्टर शिल्लक नाही. निदान होत नाही. पैसे भरपूर गेले आहेत. आम्ही काही खूप गरीब नसलो तरी श्रीमंत वर्गात मोडत नाही.

डॉक्टरच्या अक्कलहुशारीचे असते तर काही वाटलं नसतं.

अनुभव २

सासूबाईंना अस्वस्थ वाटलं म्हणून मेव्हण्याने पूर्व भागातल्या एका हॉस्पिटलमधे नेलं. त्याच्या समोरचं हॉस्पिटल क्रमा़ंक एकचं आहे. पण मध्यंतरी डेड बॉडी दाखल करून घेऊन दीड दिवसाचं बिल एक लाख सत्तर हजार दिलं होतं. तो ग्राहक पंचायतीचा ट्रॅप होता. पेपरमधे आलं होतं. ज्यांना हे माहीत आहे ते समोरच्या इस्पितळात जातात. आता देशातील एका लीडींग हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे.

साबाना अँजिओग्राफी करायची होती. ज्या डॉक्टरने शिफारस केली होती त्याने व्हॉल्व्ह ब्सवण्याची गरज नाही, फक्त पहायचं असं सांगितलं होतं. सहजच रेट पाहून आलो. बाहेरच्यापेक्षा जास्तच होते. पण अँजिओप्लास्टी ७५०००/- त होईल असं मित्रानं सांगितलं. इकडं मेव्हणा गायब होता. तीन तासाने भेटला तर त्याने सांगितलं अडीच लाख खर्च सांगितलाय. तेव्हां त्याला ओरडलोच. मग त्याला घेऊन गेलो तर घोळ होता. हा इन्शुरन्स विभागात गेला होता.
तिथला जो कुणी होता तो म्हणत होता तुम्हाला काय करायचंय ? खिशातून थोडीच जातात ? कंपनी कॅशलेस करतेय. याची लिमीट पाच लाख म्हणून अडीच लाख. त्याला त्यांच्याच हॉस्पीटलचे दर सांगितले तर तो म्हणाला इन्शुरन्स कंपनीनेच आम्हाला हे दर सँक्शन केले आहेत.
गोची अशी होती की,
ज्या हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे त्यांचे दिल्लीतले दर कंपनीने सँक्शन केले आहेत. पण पुण्यात हे दर आकारले जात नसताना दिल्लीच्या दराने पैसे घेणं यात चुकीचं काही आहे असं त्यांना वाटतच नव्हतं. माझ्या समोरच त्याचा बॉस आलाअ. दुस-या एका केसमधे त्याने दोन लाखाचं एस्टीमेट कंपनीला दिलं होतं. बॉस त्याला ओरडला अरे या केसमधे मागच्या महीन्यात आपण साडेतीन लाखाचा क्लेम दिलेला आहे...

अशाने इन्शुरन्स कंपन्यांचे प्रीमीयम वाढतील हे एक. दुसरं म्हणजे सर्रास अशी फसवणूक होत असेल तर हेल्थ इंशुरन्सच्या बाबतीत गरजूंचे क्लेम्स पास होणार नाहीत हा एक धोका आहे.

या दोन्ही अनुभवांमधे डॉक्टरला, हॉस्पिटलला त्यांचे हक्काचे पैसे मिळाले आहेत असं म्हणता येईल का ?
हा काही युनिक अनुभव नव्हे.

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 10:37 pm | संदीप डांगे

चर्चा भरकटू देऊ नका. डागतरांस्नी मन्मानी फीया घ्यायच्या का न्हाय ह्योच सवाल हाय. थे अकौंटीबिलिटी व्यैग्रे वायला टापिक हाय. हलगर्जी झाली तर ग्राहक न्यायालयात जाता येतं. त्याचा डॉक्टरांच्या फीशी काय संबंध? उद्या समजा सगळया डॉक्टरांना सरकारी नोकरीच करायला लावली मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा उपचारांचा दर्जा काय असेल आणि हलगर्जी झाली तर कोण जबाबदार?

जास्त फी आकारणारा डॉक्टर चांगला असतो तो उपचार चांगले करतो म्ह्णून की फी जास्त आकारतो म्हणून? फी जास्त आकारणारा हलगर्जी करण्याची शक्यता कमी आहे, हलगर्जी करणाराकडे पेशंट जाण्याची शक्यता कमी आहे भले तो फुकट का इलाज करेना...

तर मंडळी, चर्चेचा मुद्दा आहे डॉक्टरांच्या भरमसाट फिया, हलगर्जी करणारे डॉक्टर नाही. ते त्या मिश्रेयाताईंच्या धाग्यावर आहेत. तिकडे जाऊन भांडा.

कॅटरीना कॅटला द्यायच्या पैशात प.पू. पूनमताई पांडेंना साईन कराल का ?

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 11:24 pm | संदीप डांगे

अहो पण इथे पैसे दिल्यावर कळतं कॅट आहे का पांडेबाई आहे ते. त्याचं काय?

मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा उपचारांचा दर्जा काय असेल आणि हलगर्जी झाली तर कोण जबाबदार?

अगदी अगदी.. शिक्षणाच्या दर्जाशी अशीही काही पडलेली नाहीये आपल्याला त्यामुळे इथून पुढे बिनकामी माणसांना दिला जाणारा पगार म्हणून मास्तरांचे पगार रेफर करावेत.. हो ना ?

)बादवे, हे आपण वाचले असेलच. आपल्या देशात अशा गोष्टी स्वप्नच राहणार आहेत हे नक्की.)

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 11:23 pm | संदीप डांगे

अहो तो उपरोध होता हो. उपरोध नसता तर मी शालेय शिक्षक असा शब्द वापरला असता. सरकार ज्याप्रमाणे शिक्षकांना वागवते तसेच डॉक्टरांना वागवायला लागली तर जे शिक्षकी क्षेत्रात झालंय तेच वैद्यकिय क्षेत्रात झालेलं चालेल का असा तो प्रश्न होता. माझ्याकडून अनावधानाने शिक्षकांचा अपमान झाला असेल तर क्षमस्व.

काळा पहाड's picture

11 Mar 2015 - 11:18 pm | काळा पहाड

एकदा नीट ठरवा. डॉक्टरी ही सेवा आहे का धंदा आहे ते. धंदा असेल तर सरळ करा. तुम्ही ब्लॅक मार्केटींग वाला करायला जाता आणि वर सेवाभावाबद्दलच्या मानाची अपेक्षा करता.

आनंदी गोपाळ's picture

12 Mar 2015 - 12:24 am | आनंदी गोपाळ

फक्त याला उत्तर द्यायला लॉगिन झालो.

डॉक्टर ब्लॅक मार्केटवाला धंदा करतात, या तुमच्या म्हणण्याला हे माझे हलकट उत्तर आहे.

मला सेवाभावाबद्दलच्या मानाची वा देवत्वाच्या देव्हार्‍यात बसण्याची अजिब्बात इच्छा नाही.
ती तशी माझ्यासारख्या कोणत्याच 'सेन' डॉक्टरला नसते.

पण मला इमानदारीत धंदा तर करू द्याल?

मी धंदा करायला लागलो की मला सांगायचं, तू देव आहेस. पैसे मागू नकोस. तू देव आहेस. स्वतःचे घरदार बायकापोरे जेवण्खावण सोडून २४ तास 'सेवा' दे. देवासारखा आमच्या चुका पोटात घाल. वा!

अन तुम्हीच बनवलेल्या देवाला तुम्हीच हाताबाहेर घालवून आणलेल्या आजाराच्या उपचारात यश आलं नाही, की लाथाबुक्या घालत माझं घर दार दुकान फोडायला यायचं? हा किती पैसे मागतो म्हणून बोंबा मारायच्या? देवाच्या चुकीचा मार पडतो तेव्हा देवळं फोडायला जाता का? पाऊस पडतोय महाराष्ट्रात. जीव जातोय लोकांचा. किंवा वर त्यांनी विचारलंय, तसं बाकी वैदूंच्या भोंदूगिरीला जाब विचारता का?

माझा धंदा आहे. पैसे मी ठरवणार. तुमचा आजार मी तुम्हाला दिलेला नाही. तो आजार बरा करण्याचा प्रयत्न फक्त मी करणार आहे. त्यासाठीची जागा, मशिनरी, स्किलसेट मी स्वतःच्या कष्टाने, माझ्या व आईबापांच्या घामाच्या कमाईतून मिळवलेले आहेत. माझी पायरी चढायची जबरदस्ती मी तुम्हाला केलेली नाही, अहो माझ्याच दुकानात या, अशी साधी जाहिरातही करू देत नाहीत एमेमसीवाले आम्हाला. सिंपल.

तेव्हा, तुम्ही ठरवा डॉक्टर देव की दुकानदार. दुटप्पीपणा करू नका. एक काय ते ठरवा. तुम्हाला लुटणारी हॉस्पिटले कुणाच्या मालकीची, ते नीट पहा. डॉक्टरने तुमच्यासाठी नक्की काय केले, व त्याला काय मिळाले तेही पहा.

कोणत्याही सामान्य माणसाप्रमानेच मीही, लोकांची फुकट 'सेवा' करून उपाशी मरण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मलाही इंजिनियरिंग, आयाआयटीत अ‍ॅडमिशन घेता येण्याइतकी हुशारी मिळालेली आहे. ते केलं असतं तर मज्जा केली असती अन इथे धागे पाडले असते.

तुमचा माणूस आजारी आहे, व तुम्ही त्याला मजकडे आणलेत, ही माझी चूक कशी????

नक्की ठरवाच एकदा, डॉक्टरकीचा धंदा आहे की 'सेवाभाव'?

अगदी सहमत. सोयीस्करवाद हाच एक खरा वाद राहिलाय म्हणल्यावर ज्याला सचोटीनं जगायचंय त्याला इतकं रोखठोक वागायलाच लागणार.

काळा पहाड's picture

12 Mar 2015 - 11:31 am | काळा पहाड

माझा धंदा आहे. पैसे मी ठरवणार. तुमचा आजार मी तुम्हाला दिलेला नाही. तो आजार बरा करण्याचा प्रयत्न फक्त मी करणार आहे. त्यासाठीची जागा, मशिनरी, स्किलसेट मी स्वतःच्या कष्टाने, माझ्या व आईबापांच्या घामाच्या कमाईतून मिळवलेले आहेत. माझी पायरी चढायची जबरदस्ती मी तुम्हाला केलेली नाही, अहो माझ्याच दुकानात या, अशी साधी जाहिरातही करू देत नाहीत एमेमसीवाले आम्हाला. सिंपल.

हां आता कसं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड झालं. उगीच ताकाला जाताना भांडं कशाला लपवायचं?
१) आता सगळ्यात पहिल्यांदा ती हिप्पोक्रॅटीक ओथ घेणं बंद करूया. उगीच अडचण. म्हणजे डॉक्टर कोटणीसांसारखे काही ज्यांना तशा प्रकारे काम करायचंय ते ती घेतील, बाकीचे कट प्रॅक्टीस सुरू करेन, इल-लीगल गर्भपात करेन, उगीचच चाचण्या करायला लावेन, अ‍ॅडमीट करायला सक्ती करेन, उगीचच सर्जरी करायला लावेन वगैरे प्रकारची ओथ घेतील.
२) त्या नंतर सगळे मिळून एक गुप्त ऑर्गनाय्झेशन काढा जी असं ठरवेल की सगळ्यांनी व्हिजिटींग चार्जेस उदाहरणार्थ हजार रुपयांपेक्षा कमी नको करायला. जो करेल त्याला कोणीच केमिस्ट कट देणार नाही. कोणीच पेशंट रिफर करणार नाही.
३) आता काही काही लोक उगीचच समाजोपयोगी कामं करत असतात. स्वच्छता राखा म्हणणं, पोलियोची लस देणं, हेल्मेट घाला म्हणणं, लशी शोधत बसणं. यानं धंद्यावर किती परिणाम होतो! म्हणून सरकारवर दबाव आणूया की हे सगळं बंद करा. धंद्यावर परिणाम होतो. त्याउलट महानगरपालिकेतल्या अधिकार्‍यांना पैसे चारूया की खड्डे भरू नका, रस्त्यावरचा कचरा उचलू नका, उलट तो थोडा स्वच्छ एरिया मध्ये फैलावत जा, इत्यादी.
४) सरकारवर दबाव आणू की सरकारी इस्पितळं बंद करा.
५) हे जेनेरिक औषधाचं फॅड बंद करायला लावू. जर जनतेला स्वस्त औषधं मिळाली तर मग आम्ही जगायचं कसं?
६) एम एम सी वाल्यांवर दबाव आणायला लावू की जाहीरात करण्याची परवानगी द्यावी. मग हायवे वर मोट्ठे मोट्ठे बोर्ड दिसतील. एड्स वर खात्रीशीर इलाज फक्त डॉक्टर क्ष कडेच, एक महिन्यात कॅन्सर हटवा फक्त डॉक्टर वाय कडेच. बोर्डावर डॉक्टर च्या बाजूलाच दोन सुंदर मॉडेल्स चा फोटो. शिवाय "आजच बुकींग करा आणि बँकॉक ची ट्रिप फ्री मिळवा", "दोन बायपास वर एक बायपास फ्री" इत्यादी अ‍ॅड पण टाकता येतील. शिवाय याचं फंडींग जवळच्या नगरसेवकांकडून घेवून त्याच्या कच्या बच्यांचे फोटो पण खाली "डॉक्टर क्ष आगे बढो" म्हणून टाकता येतील.
७) आपणच केलेल्या सर्जरी साठी अ‍ॅन्युअल मेन्टेनन्स पॅकेज तयार करता येईल. ओपन हार्ट सर्जरी केली की पुढचे दोन वर्ष त्यावर अँजीओग्राफी फ्री आणि अँजीओप्लास्टी वर ५०% फ्री. चु.भू.दे.घे.
८) सध्या काही हॉस्पिटल्स नी पॅकेजेस सुरू केलेलीच आहेत. नी रिप्लेसमेंट चं सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटीनम पॅकेज असल्याचं ऐकलं आहे. आणि काय काय असेल हे माहिती नाही. पण हे साध्या रोगांना का नको? सर्दी, खोकला आणि ताप आला तर तुम्हाला ती एक दिवसात घालवायची तर प्रिमियम फ्लू पॅकेज, तीन दिवसांसाठी मिडीयम आणि सात दिवसांसाठी ऑर्डीनरी. कस्टमाईझ्ड पॅकेजेस सुद्धा तयार करता येतील. फक्त "सर्दी आणि ताप" घालवायचा असेल तर दीड हजार रुपये (किंमत वाढीसाठी पॉईंट २ रेफर करावा) किंवा "फक्त ताप" साठी बाराशे रुपये इत्यादी. आणखी एक हजार रुपये घालणार असाल तर औषधं भेसळफी असण्याची गॅरंटी.
९) सध्याची हॉस्पिटल्स फक्त इलाजच करतात. शी! काय हे. आपण त्याचं पूर्ण हॉटेल करून टाकू. प्रिमियम पॅकेज मध्ये रूम मध्येच संपूर्ण बार कॅबिनेट आणि अनलिमिटेड बूझ फ्री. गोल्ड पॅकेज मध्ये पार्टी करण्याची पूर्ण व्यवस्था होटेल सॉरी हॉस्पिटल व्यवस्था करून देईल, विथ बाऊन्सर्स अ‍ॅन्ड डीजे (अशीही अ‍ॅड करता येईल की आमचे डॉक्टर पार्ट टाईम बाऊन्सर्स म्हणून काम करतात). आता प्लॅटिनम पॅकेज मध्ये एका बार गर्ल चा डान्स रूम मध्येच फ्री. अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत महाराजा, आहात कुठं!

करूयाच 'धंदा' राव! 'सर्व्हिस' मद्धे मज्जा नाई.

मलाही इंजिनियरिंग, आयाआयटीत अ‍ॅडमिशन घेता येण्याइतकी हुशारी मिळालेली आहे. ते केलं असतं तर मज्जा केली असती अन इथे धागे पाडले असते.

अजब तर्कट आहे आहे तुमचं
बाकी चालु द्या.

या निमित्ताने एक प्रस्ताव परत एकदा मांडतो. झोम्याटो, बर्प, इ. सायटींवरती हॉटेल रिव्ह्यूज़ जसे असतात तसे डॉक्टर रिव्ह्यूवाली एखादी साईट पाहिजे. गैरप्रकार करणार्‍यांवर प्रेशर पडायला अजून जास्त मदत होईल. शिवाय कोणता डॉक्टर किती पैसे घेतो व वागायबोलायला कसा आहे आणि हातगुण/कौशल्य इ. त्या हिशेबाने कसा आहे याबद्दलही सब्जेक्टिव्ह का होईना माहिती मिळेल.

आता पेड रिव्ह्यूचा प्रॉब्लेम इथेही असेलच, पण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले अतिशय उत्तम असे वाटते. या पद्धतीमुळे इमानदार डॉक्टरांवी आयतीच जाहिरात होईल तर लांडीलबाडीवाल्यांनाही काही अंशी तरी चाप बसेलसे वाटते.

अशा काही साईट्स आहेत. सध्या त्याचं कव्हरेज मेट्रो सिटी मधल्या थोड्याफार डॉक पुरतेच आहे. पण या बाजुने डेव्हलपमेंट सुरु आहेत. परवाच एका प्रथितयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये काही टेकी लोक्स सर्व पेशंटची मुलाखत घेत होते. 'तुम्ही या हॉस्पिटल मधेच का आलात- हॉस्पिटल च्या रेप्युटेशन मुळे की अमुक डॉक फक्त इथेच भेटतात म्हणून' इथेपासून 'कुठल्या डॉक कडे जायचे हे तुम्ही कसे ठरवता' इथेपर्यंत अनेक प्रश्न विचारले गेले. आणि त्यांच्याकडून एका अशा साईटची निर्मिती होत असल्याचे कळले. सध्या मला माहित असलेल्या साईट : https://www.ratemds.com , www.practo.com, शिवाय mouthshut वर देखील काही रिव्ह्यू पाहायला मिळाले.

आयुर्हित's picture

12 Mar 2015 - 1:13 pm | आयुर्हित

मनापासून धन्यवाद.