गाभा:
व्यक्ती स्वतंत्र हा सध्याचा फारच ज्वलंत मुद्दा आहे. प्रत्तेक माणूस आपण जे काही करू त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची जोड लाऊन ते बरोबरच आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय??? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत??? आज मणिशंकर अय्यर सारखा माणूस अफझल गुरुला दिलेली फाशी हि निष्कारण होती आणि तो दोषी आहे हे निश्चित झाले नव्हते असे म्हणू शकतो. एक चित्रकार भारतमातेचे नग्नचित्र भारतात राहून काढू शकतो. एक लेखक दिग्दर्शक भारतात राहून भारतीय फौजेला गुन्हेगार ठरवणारा आणि स्वतंत्र काश्मीरला समर्थन देणारा चित्रपट काढतो. ह्या सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे योग्य ठरेल का????
प्रतिक्रिया
4 Mar 2015 - 2:29 pm | अनुप ढेरे
हो. पूर्णपणे.
4 Mar 2015 - 2:35 pm | निनाद जोशी
असे असेल तर मग देशद्रोह हा शब्द्द केव्हा वापरावा......
4 Mar 2015 - 2:44 pm | अनुप ढेरे
त्यावर बक्कळ चर्चा होऊ शकते. पण वरील एकही गोष्ट देशद्रोह नाही. गुन्हा देखील नाही.
4 Mar 2015 - 2:40 pm | आकाश कंदील
स्वातंत्र्य असावे पण जबाबदारीची जाणीव असावी, स्वातंत्र्य म्हनजे स्वैराचार नसवा. अधिकारा बरोबर कर्त्यव्य लक्ष्यात ठेवावे.
4 Mar 2015 - 3:15 pm | खंडेराव
कसे आहे, प्रत्येक नाण्याला २ बाजु असतात. तुमची उदाहरणे selective आहेत. हयदर च्या दुसर्या बाजुवरही सिनेमे आलेत.
पिके वर प्रश्न आणि MSG ला विरोध केला कि अक्खा सेन्सॉर बोर्ड गायब. हे लफडे आहे.
4 Mar 2015 - 6:03 pm | बाप्पू
भारतामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य आहे. (विचार,वक्तृत्व,प्रकाशन,संचार ई .) परंतु प्रत्येक व्यक्तिस्वातंत्र्याला घटनेनुसार मर्यादा किंवा बंधने आहेत. हि बंधने भारतातील अखंडता, बंधुता, न्याय समता यांचे रक्षण करण्यासाठी आहेत. कोणीहि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर भारताची अखंडता, बंधुता, न्याय, समता, कायदा इ घटकांना बाधक असे वर्तन करू शकत नहि. अश्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. परंतु बर्याच वेळा राजकीय आणि प्रशासकिय उदासीनतेमुळे हि कारवाई होत नाहि.
व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादेवरील उदाहरण : - MIM चे नेते ऒवेसि यांना पुण्यात जाहीर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. नंतर काही आटी लावून त्यांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आलि.
घटनेच्या १९ ब कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला भारतात सभा घेऊन (शस्त्र -विरहित आणि शांततेत ) आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण तरीही सामाजिक शांततेचा विचार करून प्रशासनाने त्यांना सभा घेण्याची परवानगी नाकारली होती.
म्हणजेच भारतातील व्यक्तीस्वातंत्र्य हे मर्यादित आहे. (आणि ते असायलाच हवे असे माझे मत आहे :) )