मी आत्तापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (द्क्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.
उदा: दक्षिणायन - रणजीत मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),
गूढ रम्य महाराष्ट्र - मिलिंद गुणाजी,
अफलातून ऑस्ट्रेलिया - जयश्री कुलकर्णी,
र्व अपूर्व - द्वारकानाथ संझगिरी वगैरे.
तसेच नेशनल जिओग्राफिक ट्रेव्ह्लर इंडिया हे मासिक अधून मधून वाचले. मिसळपाव, मायबोली सारख्या वेबसाईट वर सुद्धा अनेक प्रवास वर्णने वाचायला मिळाली.
प्रवासवर्णनावरचे पुस्तक वाचन, मासिक वाचन आणि चॅनेल्स बघणे यात स्वत:चे वेगळे असे फायदे- तोटे आहेत, तो भाग वेगळा!
नंतर, मी प्रवास वर्णनाला-दर्शनाला वाहिलेल्या काही वाहिन्या (चॅनेल्स) शोधल्या. प्रवास आणि जगभरची प्रेक्षणिय स्थळे याला वाहिलेल्या तशा अनेक वाहिन्या दिसायला दिसतात आणि असायला आहेत. पण त्यातली एकही निखळ प्रवास वर्णन आणि दर्शन दाखवत नाही असे मला वाटते. त्यापेक्षा ८० टक्के खाद्य संस्कृती दाखवण्यात त्यांचा वेळ जातो. फोक्स ट्रेव्ह्लर ने पण नांव बदलून फोक्स लाईफ केले आहे. TLC, नेशनल जिओग्राफिक वगैरे पण काही खास प्रवास दर्शन घडवत नाहीत किंवा मला त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा तरी माहित नसावी. कुणाला निखळ प्रवास वर्णन दाखवणारी कोणत्याही भाषेतली (इंग्रजी, मराठी, हिंदी) चॅनेल्स माहित असल्यास येथे शेअर करावीत!
या चर्चेचा उद्देश असा की ज्यांनी प्रवास वर्णने वाचली आहेत किंवा त्या विषयाला वाहिलेली मासिके वाचतात आणि चॅनेल्स बघतात त्यांनी येथे त्याबद्दल माहिती द्यावी, थोडक्यात समिक्षण लिहावे ज्यायोगे इतर त्याचा लाभ घेवू शकतील. आपण सगळे जग फिरू शकत नाही पण प्रवास वर्णनाद्वारे तेथे गेल्याचे काही टक्के समाधान मिळते.
प्रवास वर्णनावरची कोणती चॅनेल्स, मासिके, पुस्तके तुम्ही वाचतात/बघतात?
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 2:17 pm | आशु जोग
ओह इंटरेस्टींग !
24 Feb 2015 - 2:20 pm | नांदेडीअन
पूर्वी भटकंती नावाचे मासिक यायचे.
मी नेहमी घ्यायचो ते.
आता बंद पडले आहे हे मासिक. :(
नांदेडचे एक डॉक्टर, श्री. अच्युत बन यांनी अनेक प्रवासवर्णनपर पुस्तकं लिहिली आहेत.
बघा आवडतात का.
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5060025431485831181
24 Feb 2015 - 4:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी पण नियमित घ्यायचो. वाचल्यानंतर बरेच वर्षे ते गट्ठे पडुनसुद्धा होते. आता रद्दीत गेले. :(
भटकंतीमध्येही प्रकार असतात. खाद्य भ्रमंती, आध्यात्मिक, विदेश भ्रमण,अभ्यास सहल, निसर्ग दर्शन..तुम्हाला कुठल्या प्रकारची आवड आहे?
जंगलभ्र्मंती-
एका रानवेड्याची शोधयात्रा-- क्रुष्णमेघ कुंटे, शिवाय मारुती चितमपल्ली,व्यंकटेश माडगुळकर यांची पुस्तके
विदेश--
मीना प्रभुंची सर्व पुस्तके, पु.ल देशपांडे यांचे अपुर्वाई, पुर्वरंग
आध्यात्मिक- नर्मदा परीक्रमा, कैलास मानस, गिरनार, हिमालय अशा विषयांवर अनेक पुस्तके
पुण्यात बाजीराव रोडला २-३ पुस्तक प्रदर्शने कायम चालु असतात. एकाच ठिकाणी भरपुर काही मिळेल.
24 Feb 2015 - 2:33 pm | निमिष सोनार
"कॅनडियन रॉकीज"
24 Feb 2015 - 2:39 pm | कपिलमुनी
travel xp नावाची एक दूरदर्शन वाहिनी आहे . ती पर्यटन या विषयाला वाहिलेली आहे.
25 Feb 2015 - 7:26 pm | PIYUSHPUNE
Explore channel सुद्धा आहे बहुधा
24 Feb 2015 - 2:44 pm | निमिष सोनार
कृपया सांगा
24 Feb 2015 - 2:53 pm | संदीप डांगे
ट्रेंड बदलतो तसा वाहिन्यांचा विषयही बदलतो. पूर्वी खूप प्रवासाधारीत, स्थळाधारित कार्यक्रम असायचे. त्यांना आता तेच तेच दा़खवून कंटाळा आला आहे, लोकांना सतत नवे काही हवे असते. आता हॉटेल आणि तत्सम व्यवसायांना पोषक म्हणून जिकडे ति़कडे खानपान दा़खवणे सुरु आहे.
24 Feb 2015 - 4:17 pm | कंजूस
चानेलवाल्यांना आता सेट टॉप बॉक्स आणि डिटिएच मधून फिडबैक अचूक मिळतो काय दाखवल्यावर लेक चानेल बदलतात ते.
एक मजेदार गोष्ट आता चर्चेतल्या तारापोर मत्स्यालयातली.मुंबईत आलेल्या गाववाल्यांना घेऊन इथले मुंबईकर चर्नीरोड चौपाटीचा पुल उतरून प्रथम मासे बघायला जातात. या दाराने आत आणि त्या दाराने बाहेर पंधरामिनीटांत. "यहां भी माछली है "करत एकेका टाक्यासमोरून "ये तो कछुआ !" त्यांना सगळे रंगीत मासे एकाच चवीचे.दोन रुपये वाया. त्यांना जायचे असते समुद्रावर भेळ, कुल्फि खायला.
24 Feb 2015 - 4:52 pm | निमिष सोनार
हसू आले
24 Feb 2015 - 5:00 pm | चौकटराजा
मीना प्रभूंची पुस्तके, मिलिंद गुणाजी यांची पुस्तके व एपिसोडस, ट्रवल एक्स पी हे सर्वच एकांगी आहेत. प्रभूंच्या पुस्तकात इतिहासाचा अनावश्यक अतिरिक्त डोस, मिलिंद गुणाजींच्या पुस्तकात तेच,.ट्रॅव्हल एक्स पी त खादाडी व स्पा यांची भरमार. सर्व साधारण माणसाच्या प्रवासाची पद्धत व वर तिन्ही दिलेली उदाहरणे यांचा काही संबंध नाही. त्यापेक्षा
मिपावरच्या भ़टक्यांचे लेखन बरे वाटते. लोकसंस्कृति, अल्प इतिहास, हवामान. उद्यम, दळणवळण ई सर्वांचे सम्यक दर्शन
घडविणारे प्रवास वर्णन विरळाच !
24 Feb 2015 - 5:47 pm | कंजूस
पूर्वी फोटोमाध्यम नसल्याने आणि भारतातील बरेच पर्यटन घार्मिक असल्याने अनंत कणेकरांचे लाल माती निळे आकाश यातले शाब्दिक वर्णन आवडायचे. आता लोक विमानाने लेह, मदुराई, बंगळुरू ,कोचिला जाऊन ढीगभर फोटो काढून येतात त्यांना खादाडीतच स्वारस्य असते. डोंगरा तळ्याचे वर्णन आणि मी किती हुशारी केली यापेक्षा खाटमांडूला याकच्या दह्याची लस्सी घेऊन कशी फजिती झाली, अमुक दुकानात कसे फसलो हेच वाचायचे असते.
25 Feb 2015 - 12:54 am | मस्तानी
http://www.globetrek.org/
25 Feb 2015 - 11:33 am | निमिष सोनार
छान आहे लिंक
25 Feb 2015 - 7:33 pm | PIYUSHPUNE
Explore channel सुद्धा आहे बहुधा