कालचा १९ फेब्रुवारी २०१५ दिवस म्हणजे जगाच्या इतिहासातला " वेगळा दिवस " असे लिहायला हवे.
जमीयत उलेमा मुफ्ती महंमद यांनी सर्व मुस्लीम ही शंकराची लेकरे आहेत तसेच शंकर हे मुस्लीमांचे पहिले प्रोफेट आहेत अश्या आशयाचे भाष्य जाहिर रित्या दुरदर्शनवर केले.
वाक्यातल्या शब्दावर काथ्याकुट करायला हरकत नाही पण असा साक्षात्कार एखाद्या उलेमाला होणे हे एक आश्चर्य मानावे लागेल. उत्तर प्रदेशात "बिंदुमाधव मशीद " अश्या नावाचे अनेक चमत्कार आजही सरकारी कागदपत्रात दिसतात. १९४७ सालची स्थिती कायम ठेवण्याचा कायदा कै नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मंजुर झाल्यामुळे यावर अधिक भाष्य नको.
अनेक अन्य मुस्लीम धर्मगुरुंनी मुफ्ती महंमद यांना झालेला साक्षात्कार हा प्रसिध्दीसाठी असल्याचे म्हणले आहे. उद्या जमीयत उलेमा यांची उचलबांगडी ही होऊ शकते किंवा त्यांचे मानसीक स्वास्थ्य ढासळले आहे असे स्टेटमेंट येऊ शकते अशी पोलादी व्यवस्था त्या धर्मात आहे.
मक्केच्या मशीदीत फक्त सौदी अरेबियाचे राजे जातात असे म्हणतात. तिथे या धर्माचे गुढ लपले आहे अशी चर्चा अनेक काळापासुन आहे. या साक्षात्काराचा संबंध त्या गुढ गोष्टीशी आहे किंवा कसे यावर आता चर्चा सुरु होईल.
नेहमीप्रमाणेच या धाग्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशी मानसिकता आहे. जर उलेमा खुलेआम काही म्हणत असतील तर कोणाच्या धार्मिक भावना त्यांच्याच शब्दाने अधिक दुखावल्या गेल्या असतील.
प्रतिक्रिया
20 Feb 2015 - 6:57 pm | तिमा
नेहमीप्रमाणेच या धाग्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशी मानसिकता आहे
आपण दाखवलेल्या या विश्वासाबद्दल, आम्ही सर्व आजी माजी मिपाकर आपले ऋणी आहोत.
21 Feb 2015 - 3:14 am | अर्धवटराव
=))
20 Feb 2015 - 10:18 pm | बॅटमॅन
या मौलानासाहेबांनी मौलाना श्री. पुनोद्दीन ओक यांची पुस्तके वाचली असावीत बहुधा. त्याशिवाय असे साक्षात्कार होणे अशक्य.
20 Feb 2015 - 10:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
पुनोद्दीन ओक :D
20 Feb 2015 - 11:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
21 Feb 2015 - 8:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुनोद्दीन ओक *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
-खाटुक बिन बॅटेन-
26 Feb 2015 - 11:12 am | विशाल कुलकर्णी
पुनोद्दीन ओक ....
हाण तिच्या मारी ;)
21 Feb 2015 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
आपले मिपाकर>>> "राजघराणं" >>> म्हणजेच>>> (Dr.Abhiram Dixit) ,यांचे फेसबुक वॉल वरून साभार > >>
सदर मौलवी जमियते इस्लामी चा प्रतिनिधी आहे . तो इस्लामचीच भूमिका सांगतो आहे. हि अतिशय मूलतत्ववादी भूमिका आहे. मुहम्मदा पूर्वी हजारो प्रेषित होऊन गेले त्यांनी इस्लामच सांगितला . मोझेस - येशु ख्रिस्त , आदम सारे इस्लामाचेच प्रेषित आहेत पुजार्यांनी मुळ इस्लाम विकृत केला . मुहम्मद शेवटचे प्रेषित आहेत आणि त्यांचे शुद्ध संदेश कुराणात असल्यामुळे सार्या मानवजातीने मुसलमान झाले पाहिजे असे कुराणात म्हटले आहे . मुसलमान येशु ख्रिस्ताला प्रेषित म्हणुन मानतातच पण ख्रिस्ती धर्माला पापयुक्त भेसळयुक्त इस्लाम म्हणतात . …। सदर भाषणात जमियत् चा मौलवी ------- शंकर हाही इस्लामचा प्रेषित होता आणि सनातन धर्म हा इस्लामच आहे असा दावा करत आहे . खरे पाहता तो हिंदुना मुस्लिम व्हायची दावत देत आहे . त्यात खुश होण्यासारखे काहीही नाही .
राहिली बात राष्ट्रीयत्वाची … तर मुस्लिमांचे हिंदुस्थान वर प्रेम आहेच . या देशावर आम्ही राज्य केले हा आमचाच देश अशी ती भूमिका आहे. १८५७ च्या उठावापासून मोपल्यांच्या बंडापर्यंत काफिर ब्रिटिश आणि काफिर हिंदुशि लढताना मुस्लिमांचे भारतावरील प्रेम उतू चालले होते हे विसरता कामा नये . जगात इतर श्रद्धा असतात आणि त्यांनाही गैरमुस्लिम राहायचा अधिकार आहे हे जमियतचा कोणताही मौलवी म्हटलेला नाही . म्हणणार नाही .
"पूर्वज सबके हिंदु है " असे म्हणुन आपण फार स्मार्ट्पणे घर वापसीचे आवाहन करत आहोत असे संघाला वाटते . वस्तुत: काफिर पूर्वज आणि पूर्वजांची जात यावर मुस्लिम मुळीच प्रेम करतच नाहीत . प्रत्यक्ष मुहम्मदाच्या गैरमुस्लिम आईचे स्थान नरक आहे असे कुराणातच म्हटले आहे . इस्लामचे घोर अज्ञान हा हिंदुंचा गुण आहे … त्यामुळेच या मौलवीच्या वक्तव्याचा अर्थ त्याना कळत नाही . शंकर मुसलमान होता आता तुम्हीही व्हा असे ते आवाहन आहे . त्यात खुश होण्यासारखे काय आहे ?http://timesofindia.indiatimes.com/…/articlesh…/46306675.cms
21 Feb 2015 - 3:00 am | खटपट्या
मग या मुफ्ती मोहमद साहेबांनी समस्त मुस्लीमांना महाशिवरात्रीचा उपवास करायला सांगीतला पाहीजे. जमल्यास शंकराच्या देवळात जाउन नमाज पडायला सुरवात करायला काय हरकत आहे?
त्याचबरोबर सर्व हींदूंनी जागोजागी असलेल्या दर्ग्यांमधे जाउन दुधाचा अभिषेक करायला सुरवात करुया. रमजानचे रोजे सुद्धा करुयात म्हणजे रोज संध्याकाळी मस्तपैकी बिरयानी, आणि तत्सम पदार्थांवर ताव मारायला आपण मोकळे.
लय मज्जा यील राव.
21 Feb 2015 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा
@मग या मुफ्ती मोहमद साहेबांनी समस्त मुस्लीमांना महाशिवरात्रीचा उपवास करायला सांगीतला पाहीजे. जमल्यास शंकराच्या देवळात जाउन नमाज पडायला सुरवात करायला काय हरकत आहे? >>> करतीलंहि! कारण धर्मप्रसारासाठि अशी नाटक करणं इस्लाममध्ये ग्राह्य आहे. एका युद्धामधे शत्रूला फ़सविण्याकरता प्रेषित मुहंमदांकडे एका सैनिकांनी त्यांच्या विरोधी बोलायची परवानगी मागितली होती. प्रेषिता नि ती विना हरकत दिली. आणि वर आपल्या या सैनिकाला "युद्ध हा फ़सवणुकिचा खेळ असतो " असेही सांगितले. हे झाले जुन्यातले. पुढे १४०० वर्ष अव्याहत पणे या गोष्टी धर्माचा भाग म्हणुन घडत राहिल्या . काही वर्षा पूर्वी पुण्यात मंडई गणपति उत्सवात काही मुस्लिम गळ्यात टाळ घेऊन आरतीला उभे राहिले होते. पेपरावाल्यानी फ़ोटोंसह बातम्या दिल्या होत्या. तेंव्हा समग्र बिगर मुस्लिम समुदाया कडून ह्या नितिचे कौतुक झाल्याचे ही आठवते आहे. आपण यातून शिवाजी महाराजां सारखा काही बोध घेतो का? हां खरा प्रश्न आहे.
@त्याचबरोबर सर्व हींदूंनी जागोजागी असलेल्या दर्ग्यांमधे जाउन दुधाचा अभिषेक करायला सुरवात करुया. रमजानचे रोजे सुद्धा करुयात म्हणजे रोज संध्याकाळी मस्तपैकी बिरयानी, आणि तत्सम पदार्थांवर ताव मारायला आपण मोकळे.>> उलट वार म्हणुन ही निति पाळायलाहि हरकत नाही. पण हे करण्यात गाम्भीर्य किती असणार आहे? हां ही प्रश्न आहेच. भारतातला बराच बिगर मुस्लिम समुदाय इस्लामी निति विषयात अक्षरश: अनभिज्ञ आहे. त्याला या वर्तानातुन संदेश काय जाइल? आपणंहि शिवाजी प्रमाणे अफजल खानांना फ़सविण्या साठी हे करत आहोत. याचे ज्ञान आणि भान हवेच ना? :)
21 Feb 2015 - 6:47 am | सुनील
वर बुवांबी राजघराणं यांच्या लेखाचा उल्लेख केला आहेच. माझेही दोन शब्द -
हिंदू धर्मात प्रेषित नाहीत. थेट सगुण-साकार देवच.
उलट मुस्लिमांत देव (अल्ला) हा निराकार. तर त्याचा संदेश मर्त्य माणसांकडे घेऊन येणारा तो प्रेषित - तो ही मर्त्यच.
कुराणात मोझेस (मुसा) आणि येशू (इसा) ह्या प्रेषितांचा आदरपूर्व उल्लेख आहेच. महंमद पैगंबर हा 'शेवटचा' प्रेषित!
उलेमा अजून एक पाऊल मागे जाऊन, शंकराचादेखिल पहिला प्रेषित (मुसाच्याही पूर्वीचा) म्हणून उल्लेख करीत आहेत. ते (त्यांच्या धर्मशास्त्रानुसारे) ठीकच. त्यात हिंदूंनी हुरळून जाण्यासारखे काय आहे, ते समजले नाही.
अवांतर - खरे तर, शंकराची देवपदावरून प्रेषितपदावर झालेली "पदावनती" खुपली कशी नाही, याचेच आश्चर्य वाटते! ;)
21 Feb 2015 - 7:47 am | खटासि खट
येणार ये, येणार गं
येणार ये, येणार गं
कि बाई बाई
हिंदू राष्ट्र येणार
अखंड स्वप्नं
साकार होणार
21 Feb 2015 - 10:20 am | hitesh
नथुरामच्या गाडग्याला मोक्ष मिळणार का ?
22 Feb 2015 - 11:45 am | म्हया बिलंदर
कांद्याला औषध मारायाचय, उसाला पाणी कमी पडायालय, फुडचं पीक काय घ्यावं??….
आयुष्यात लै म्हत्वाची प्रश्न असतांना बिलंदरा हिकडं काहून घुसाय्लास??
22 Feb 2015 - 6:48 pm | नितीनचंद्र
मला तरी पदावनती खुपली नाही. देव आणि प्रेषीत या मानव निर्मीत संकल्पना आहेत. हिंदुंना देव ही संकल्पना जितकी सोपी वाटते तितकी मुस्लीमांना नाही कारण त्यांचा धर्म एकाच ग्रंथावर अवलंबुन आहे.
जात्यांधाना जसे हत्ती भिंती सारखा, दोरी सारखा, खांबासारखा वाटला तसा तो मुफ्ती महंमद यांना प्रेषीत भासला. यामुळे रुपकात जसे हत्तीच्या मुळ रुपाला बाधा येत नाही तसे हिंदुनी शिवाला प्रेषीत म्हणले म्हणुन टाहो फोडण्याचे कारण नाही.
माझ्या मते धर्मा - धर्मातील अंतर या साक्षात्काराने कमी होण्यास हातभार लागेल. एकाबाजुला मुस्लीम नसलेल्या लोकांचे बगदादीमार्फत क्रुर हत्याकांड होत असताना हा साक्षात्कार ही मुस्लीमांना विचाराची वेगळी दिशा देईल.
23 Feb 2015 - 3:48 pm | विजुभाऊ
असेच काहिसे वाक्य मुम्बैत एका उत्तरप्रदेशीय मुस्लीम टॅक्सीवाल्याने साम्गितले होते.
तो म्हणे की हमारा बाबा आदम आणि तुम्हारा शंकर भगवान हे एकच आहेत. आणि मक्केच्या देवळात शंकराचीच पूजा होत असते.