एटीन् टिल् आय् डाय..... (मराठी दिन लघुकथा स्पर्धा)

प्रास's picture
प्रास in स्पर्धा
17 Feb 2015 - 11:39 pm

"अरे बाबा, काय झालंय काय नक्की आजोबाला?" मी हा प्रश्न थर्ड टाईम विचारत होतो. बाबाचं अटेन्शनच नव्हतं माझ्याकडे. ते ही खरंच म्हणा, आपल्या मुलाकडे लक्ष न देण्याचा, आजोबा म्हणतो तो भारतीय संस्कार आमच्या बाबाने अजूनही हौसेने का काय म्हणतात ना तसा जपला होता, आपल्या एजची हाफ इयर्स कॅनडात घालवूनही! पण आता मी ट्वेल्व्ह इयर्सचा झालोय आणि पुढल्या ऑक्टोबरात आई म्हणते तसा थर्टीन इयर्सचा घोडा होणार असल्यामुळे थांबणार नाही, असं मनातल्या मनात म्हणत फोर्थ टाईम विचारायच्या तयारीला लागलो. फक्त आता मी माझा मोर्चा, हा माझ्या आजोबाचा शब्द, आईकडे वळवला. आजोबा पूर्वी खूप मोर्चा मोर्चा खेळलाय, असं आई म्हणाल्याचं मला आठवलं.

मला भारतात येऊन आता थ्री डेज तर नक्कीच झालेत. आजोबाच्या सिकनेसची बातमी बाबाला कळल्या कळल्या आम्ही मिळेल त्या विमानाचं तिकिट काढून भारतात आलो. नाही तरी माझी व्हेकेशन्सच चालू होती आणि आजोबाला भेटायला आपण कधीही, ते आई म्हणते ना, एका पायावर का काय, तसा तय्यार. पहिला दिवस मला काय आजोबा भेटला नाही कारण मला कुणी त्या हॉस्पिटलमध्येच नेलं नाही. बाबा नि आई जाऊन आले, मला सखूमावशीबरोबर ठेऊन. मला आई नि बाबा काही सांगतंच नाहीयेत. मग आज हट्टाने आजोबाला भेटायला इथे आलो तर आजोबा झोपलाय आणि मला कुणी त्याला काय झालंय ते सांगत नाहीये. मग मी पण आता ठरवलंय, आता आपण भूणभूण करायची. हा माझ्या आजोबाचाच शब्द.

आमच्या नगरच्या घरासमोरही टोरॅन्टोच्या घरासमोर असल्यासारखं एक मोठ्ठ पार्क आहे. पहिल्यांदा आजोबाला भेटायला आलो ना तेव्हा मी सारखं दुपारच्या उन्हात त्या पार्कात जायला मागत असायचा. मग आई आणि आजोबाला मी सारखं सांगायचा की पार्कात जाऊ या, आपण पार्कात जाऊ या. मग नेलं नाही की मी रडत, मुसमुसत ते परत परत म्हणत राहायचा. मग आजोबा म्हणायचा, "काय सारखी भूणभूण लावलीयेस रे? चल, जाऊ तुझ्या पार्कात." मग आमची वरात निघायची तिकडे. आता तुम्ही म्हणाल, हे मला कसं माहिती, तर हे सगळं मला सांगितलं माझ्या आईने, कारण तेव्हा मी एकदम बेबी होतो ना, यातला तो वरात शब्द मात्र आमच्या बाबाचा. टोरॅन्टोमध्येही आम्ही कुठेही निघालो ना की तो म्हणतोच, निघाली वरात, म्हणून!

ओ फिश्, माझं हे असंच होतं. एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं निघत जातं आणि मग ते आई म्हणते तसं हनुमानाच्या टेलसारखं होतं, डेमन किंग रावणाने नाही का हनुमानाच्या टेलला आग लावायला सांगितल्यानंतर त्याची टेल लांब होत गेली, अगदी तसंच, संपतंच नाही मग सुरूवात आठवायला लागते. तर मी काय म्हणत होतो, हं. आजोबाला काय झालंय ते आता आईलाच विचारतो.

मी भूणभूण करायच्या तयारीने आईजवळ गेलो तर तिनेच मला एका बाजूला घेतलं आणि तिथल्या कोचावर बसवलं. ती पण माझ्या शेजारीच बसली. मग हळू आवाजात म्हणाली, "चंद्रा, बाळ, आजोबाला बरं नाहीये. बाबा घेऊन जाईल तुला आजोबाकडे. पण तू आजोबाला त्रास द्यायचा नाही हं." आता काय, आईने सांगितलं म्हणजे बाबा घेऊन जाणार म्हणजे जाणारच आजोबाकडे. मी मग माझा भूणभूण प्रोग्रॅम कॅन्सल केला आणि रंगा अंकलशी बोलणार्‍या बाबाकडे बघू लागलो.

एरवीपेक्षा आज बाबा खूपच हळू बोलत होता रंगाकाकाशी. एरवी, बाबा बोलायला लागला की समोरच्या डेलच्या घरीही क्लिअरली ऐकू येतं तो काय बोलला ते. पण नो प्रॉब्लेम, नो बडी अंडरस्टॅण्ड मराठी इन डेल्स हाऊस. तिला तर धड इंग्लिशही येत नाही. ती जे काही बोलते ते मला नीट कळत नाही पण ऐकत राहावसं वाटतं. आई म्हणते ती क्युबेकवरून आलीय. फ्रेंच बोलते. मी ठरवलंय, पुढच्या वर्षी शाळेत फ्रेंच क्लास घ्यायचा म्हणून. मग मी तिच्याबरोबर मस्त गप्पा मारेन. ओ हो, पुन्हा माझी हनुमानाची टेल....

तर बाबा रंगाकाकाला सांगत होता, "बाबांना असं का झालंय तेच कळत नाहीये. गेली दोन वर्षं त्यांनी माझ्याकडे यायचं थांबवलंय. जमत नाही, दग दग होते. पाय सुजतात, दुखतात, म्हणत होते. थोडा डायबिटीस आहे पण फार नाही रे. आता नुसते झोपून असतात. प्रभाकाका नि सोनाकाका आणि आता आई गेल्यावर तर त्यांनी अंथरूणच पकडलंय. कुणाशी बोलणं नाही काही नाही. सारख्या जुन्या आठवणी काढून रडत बसतात. डॉक्टरकाका म्हणत होते की बाबा डीप्रेशनमध्ये गेलेत. त्यांना त्यातून बाहेर काढायला हवंय रे. त्यांचं वय पण फार नाही. त्यांना टोरॅन्टोला न्यायची केव्हाही तयारी आहे पण तिथली थंडी सोसत नाही ना. काय करावं तेच कळत नाहीये.” असं काय काय तो खूप वेळ बोलत राहिला. मला कळलं की मला आजोबाला भेटवायला तो विसरलाय. मग मी त्याला जोरात हाक मारली, "बाबा, मला आजोबाला भेटायचंय." तसा तो थांबला. मला म्हणाला, "चंद्रा, आजोबाला डॉक्टर अंकलने औषध दिलंय. आपण जाऊ हं आजोबाला भेटायला. चल."

मग रंगा अंकलला तिथेच उभा ठेऊन आम्ही आजोबाच्या बेडकडे गेलो. तिथे गेल्या गेल्या मी झोपलेल्या आजोबाला हलवलं आणि जोरात हाक मारली. तसा आजोबा डोळे उघडून माझ्याकडे बघायला लागला. मग एकदम तो उठला आणि मी त्याच्या बेडवर उडी मरून चढलो. बाबा मला कायतरी बोलायला गेला तर डॉक्टरकाकांनी त्याला बाजूला बोलावलं. मग मी आणि आजोबा दोघेच उरलो. मी विचारलं, "आजोबा, अरे तुला काय झालंय? तुझे पाय दुखतात का पोट दुखतंय? मी येवढ्या लांबून तुला भेटायला आलो तर बाबाने आज आणलं इथे. तू कसा आहेस?"

मी येवढं विचारतोय तर आजोबा रडायलाच लागला. मला तर काहीच कळेना. मला जवळ घेऊन माझे खूप किसेस् घेतले त्याने. तो रडायचं थांबेचना. मग मी त्याला म्हणालो, "आजोबा, तुला इथे कंटाळा आलाय का तर आपण घरी जाऊ. डॉक्टरकाका सोडणार का आज? नाही? उद्या? ओके ओके, मग आजोबा, अरे आपण उद्या घरी जाऊ या!"

मी असं बरंच काही बोलत बसलो मग त्याच्याशी, बाबा म्हणतो तसं, सटरफटर, कारण आजोबाला माझं सटरफटर बोलणं आवडतं. टोरॅन्टोतही आम्ही खूप सटरफटर बोलायचो. सडन्ली माझ्या लक्षात आलं की आजोबाने त्याचा नेहमीचा वॉकमन हॉस्पिटलमध्ये आणलेलाच नाहीये. आजोबाला साँग्ज ऐकायला आवडतं. मला कळलं, तो इथे जाम बोअर झाला असणार आणि म्हणूनच बाबा म्हणाला तसा डिप्रेशन का काय ते त्याला झालं असणार. मग मी एक आयडिया केली. माझा नवा डिस्कमन त्याला दिला आणि डोळा मारत त्याला म्हणालो, "आजोबा, हा आज तू वापर. यात माझी नवी सीडी टाकलीय. आमच्या टोरॅन्टोचाच एक म्युझिशियन आहे ना ब्रायन अ‍ॅडम्स नावाचा, त्याचा तो अल्बम आहे. तुला आवडेल कारण तो ही तुझ्याच वयाचा आहे रे."

----------०----------

मोहन, लीना आणि चंद्रा भेटून गेल्यावर आकाशात पुन्हा मळभ दाटून आल्यासारखं वाटायला लागलं. मन उदास झालं. पुन्हा रडू यायला लागलं. छातीवर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. श्वास घ्यायला त्रास होतोय की काय असं वाटायला लागलं. तसंच पांघरूणात घुसून बसावसं वाटू लागलं. कुणाशी बोलणं नको की काही नको. मुलगा, सून, नातू साता समुद्रापारहून फक्त आपल्यासाठी आल्याचं बघूनही मला कसली तरी भीती वाटल्यासारखं वाटू लागलं. मी ट्यूब बंद करून अंधार केला तसा मला अंधाराचीही भीती वाटायला लागली. काल-परवा माझ्यासोबत हसत खेळत होते ते मित्र असे डोळ्यासमोर गेले. इतक्या वर्षांची सहचारिणी सोडून गेली. आता माझं काय होणार, कसं होणार, काही काही सुचत नव्हतं. जरा कलंडलो तर हाताच्या धक्याने चंद्राचा डिस्कमन सुरू झाला. त्याने इयर-फोन जाता जाता माझ्या कानातच खुपसलेला तो काढायचा तसाच राहिलेला आणि तशातच कानात गाणं वाजायला लागलं.

Wanna be young - the rest of my life
Never say no - try anything twice
Till the angels come - and ask me to fly
Gonna be 18 till I die - 18 till I die
Can't live forever - that's wishful thinkin'
Who ever said that - must of bin' drinkin'
Don't wanna grow up - I don't see why
I couldn't care less if time flies by

18 till I die - gonna be 18 till I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 till I die

Anyway - I just wanna say
Why bother with what happened yesterday
It's not my style - I live for the minute
If ya wanna stay young - get both feet in it - 18 till I die
A 'lil bit of this - a 'lil bit of that
'Lil bit of everything - gotta get on track
It's not how ya look, it's what ya feel inside
I don't care when - I don't need to know why

18 till I die - gonna be 18 till I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 till I die

Ya there's one thing for sure - I'm sure gonna try

Don't worry 'bout the future
Forget about the past
Gonna have a ball - ya we're gonna have a blast
Gonna make it last

18 til I die - gonna be 18 til I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 til I die

gonna be 18 til I die
I gonna be 18 til I die
18 til I die

गाणं लयदार होतं. शब्द हळू हळू कळायला लागले आणि गाण्याच्या शेवटाला येईपर्यंत जाणवलं, या गाण्याची आवर्तनं होणार नक्की, कारण मगाचचं दाटून आलेलं आकाश मोकळं होऊ लागलं होतं....

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

18 Feb 2015 - 12:43 am | आदूबाळ

अरे ये बात! काय छान कथा आहे!

रुपी's picture

18 Feb 2015 - 1:51 am | रुपी

फार आवडली!

राघवेंद्र's picture

18 Feb 2015 - 2:04 am | राघवेंद्र

कथा आवडली!!!!

स्पंदना's picture

18 Feb 2015 - 5:42 am | स्पंदना

ओहो!! संगिताची ओळख अशी कथेत गुंफुन सादर केली गेलीय तर!!
मस्तच. पण तरीही वृद्धत्व डसुन गेलच.

प्रीत-मोहर's picture

18 Feb 2015 - 8:30 am | प्रीत-मोहर

मस्त कथा प्रास. आवडली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Feb 2015 - 9:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं!!!! :)

ब़जरबट्टू's picture

18 Feb 2015 - 9:25 am | ब़जरबट्टू

आवडली कथा... :)

गाण्यातली कथा आणि कथेतलं गाणं मस्त जमून आलंय.क्या बात है!

खटपट्या's picture

18 Feb 2015 - 9:45 am | खटपट्या

आवडली !!

राजाभाउ's picture

18 Feb 2015 - 10:43 am | राजाभाउ

मस्तच !!!
खुप आवडली.

विनिता००२'s picture

18 Feb 2015 - 1:17 pm | विनिता००२

सुंदर :)

गवि's picture

18 Feb 2015 - 1:23 pm | गवि

उत्तम...!!!

सविता००१'s picture

18 Feb 2015 - 1:33 pm | सविता००१

मस्त मस्त.
छान कथा आणि त्यातली गाण्याची ओळख.

राही's picture

18 Feb 2015 - 2:30 pm | राही

छान कथा.
लहान मुलाची निरागस शैली छान पकडलीय.
छानच. अगदी एकोणीसशे त्र्याण्णव वेळा छान.

अन्या दातार's picture

18 Feb 2015 - 2:40 pm | अन्या दातार

प्रासभाऊ कशातून कशाची लिंक जोडतील नेम नाही. कथा आवडली हेवेसांनल

सूड's picture

18 Feb 2015 - 2:43 pm | सूड

वाह!!

सस्नेह's picture

18 Feb 2015 - 2:51 pm | सस्नेह

लहान मुलाच्या नजरेतून मांडलेली मोठ्यांची व्यथा छान उतरली आहे.

मृत्युन्जय's picture

18 Feb 2015 - 2:54 pm | मृत्युन्जय

आव्डली.

इनिगोय's picture

18 Feb 2015 - 4:30 pm | इनिगोय

बर्याच दिवसांनी तुमच्या आवडीच्या विषयावर लिहिलंत तेही अशा मस्त फाॅर्ममध्ये. आवड्या..

मस्त कलंदर's picture

18 Feb 2015 - 9:53 pm | मस्त कलंदर

आवडली कथा.लहान मुलाचा निरागसपणा छान उतरलाय. गाणं ही सुंदर!!

प्रियाजी's picture

22 Feb 2015 - 3:38 pm | प्रियाजी

कथा खुप खूप आवडली. कथेतल्याच काय प्रत्यक्षातल्या आजोबांचंही डिप्रेशनही पार पळून जाईल ही गोष्ट वाचून.

आतिवास's picture

22 Feb 2015 - 4:00 pm | आतिवास

कथा आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2015 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राससेठ, आवडली राव कथा.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

23 Feb 2015 - 6:43 am | स्पंदना

पुन्हा एकदा वाचली कथा.
हल्लीच शेजारचा डेरेक आजारी पडलाय. स्पाईनच आहे दुखणं. नवरा बायको!! त्यात मी पाया सूप केक अस काहीबाही बनवुन हे खा ते खा केलं की काय कौतुक वाटत दोघांना!! येत्या सोमवारी,(पुढचाच ना?) सर्जरी आहे. त्यासाठी ताकड असावी म्हणुन माझे आपले प्रकार सुरू आहेत.
पण एक जाणवतं. तिन मुलं आहेत डेरेकला! एकजणही साधा विचारपूस करायला नाही. :(
आमचही हेच होणार का?

पैसा's picture

25 Feb 2015 - 10:42 am | पैसा

मस्तच! कोणाला डिप्रेशनमधून बाहेर काढायला लहान मुलांची सटरफटर बडबड आणि गाणी यासारखी दुसरी थेरपी नाही! मस्त लिहिलंय!

बॅटमॅन's picture

25 Feb 2015 - 5:42 pm | बॅटमॅन

क्या बात.............

मस्त आहे कथा :) तो लहान मुलगा फारच निरागस आहे आणि गाण्याची ओळखही फार वेगळ्या रितीने करून दिली, एकदम आवडेश :)

एक एकटा एकटाच's picture

15 Mar 2015 - 11:41 pm | एक एकटा एकटाच

कथा आवडली