मराठी दिवस २०२०

मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic Sauce)

Primary tabs

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
17 Feb 2015 - 2:23 am

जर्मनीतील नाताळच्या मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. कडाक्याच्या थंडीत हे मश्रुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन हे कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ सुख. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. नाताळ मार्केट्सच्या स्टॉल्स वर बघून कसे करतात याचा अंदाज आला होता, सोप्पा वाटला. आंतरजालावर अजून थोडी शोधाशोध केली. त्यावरून मी केलेली पाककृती येथे देत आहे. यात तुम्ही आवडीनुसार बदल करू शकता.

साहित्य -
५०० ग्रॅम मश्रुम्स (शक्यतो लहान आकाराचे घेतले तर जास्त चांगले)
१ मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून
चवीपुरते मीठ
२-३ टेबलस्पून तेल
मिरपूड
कोथिंबीर

गार्लिक सॉस/डिप साठी

४-६ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या (आवडीनुसार कमी जास्त)
१/३ वाटी घट्ट दही/योगर्ट
१/३ Crème fraîche / सावर क्रीम
१/३ वाटी मेयोनीज (ऑप्शनल)

कृती -

गार्लिक सॉस विकत मिळाल्यास ते थोड्या दह्यात मिसळून किंवा तसेच वापरू शकता. अन्यथा हे खालीलप्रमाणे घरी करू शकतो.

१/३ वाटी घट्ट दही, १/३ Crème fraîche / सावर क्रीम (Sour Cream), १/३ वाटी मेयोनीज (Mayonnaise) हे सगळे एकत्र करून घ्या. यात चवीपुरते मीठ घाला. लसूण पाकळ्या बारीक करून घाला. आवडत असल्यास सुकवलेली कोथिंबीर, शेपू, कांद्याची पात किंवा तत्सम हर्ब्ज घाला. सर्व मिसळून घ्या. सॉस तयार आहे.
मेयोनीज वगळून सुद्धा हे करता येते. लसणाची अजून चव हवी असल्यास लसूण पावडर सुद्धा वापरू शकता.

मश्रुम्सचे देठ काढून घ्या. मोठे मश्रुम्स असतील तर अर्धे तुकडे करू शकता.
एका भांड्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला. कांदा ब्राउन होत आला की मश्रुम्स घाला. दहा ते पंधरा मिनिटे मश्रुम्स ब्राऊन रंगावर परता. मश्रुम्स शिजत आले की मीठ आणि मिरपूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळे एकत्र करून २ मिनिटे परता.

गरमागरम मश्रुम्स प्लेटमध्ये काढून त्यावर गार्लिक सॉस घाला. आवडीच्या ब्रेड सोबत सर्व्ह करा.
आवडत असल्यास वाफाळती ग्लुवाईन घ्या आणि खायला सुरुवात करा.

Guten Appetit!

https://lh6.googleusercontent.com/-v-whBLUuP-s/VOJXPX0CofI/AAAAAAAAELg/uWy0F2zRhhM/w866-h577-no/DSC_0431.jpg

https://lh6.googleusercontent.com/-njfaQNIq-vs/VOJXP0SIiXI/AAAAAAAAELk/ZLPo9Bqlx-w/w866-h577-no/DSC_0435.jpg

इतर प्रकार -
यात तेलाऐवजी बटर देखील वापरले जाते.
काही जण कांद्याची पात पण घालतात.
एका जर्मन माणसाने दिलेल्या पाकृत त्याला आवडतो म्हणून त्याने गरम मसाला घातला होता. :)
चाट मसाला, पुदिना चटणी असे आवडीप्रमाणे यात बदल करता येतील.
अजून काही सुचले तर करून बघा आणि सांगा.

प्रतिक्रिया

जुइ's picture

17 Feb 2015 - 2:29 am | जुइ

मात्र मश्रुम्स आवडत नाहीत.

मध्येच घुसलीस .. पहिला नंबर शेअर करावा लागेल आता:P

जुइ's picture

17 Feb 2015 - 3:36 am | जुइ

:))

स्रुजा's picture

17 Feb 2015 - 3:48 am | स्रुजा

:P

आयला ! कसलं भारी दिसतंय ! हे पुदिना चटणी वगैरे सावर क्रीम ला पर्याय आहेत का? घरात बाकी सग ळं आहे पण क्रीम नाहीये म्हणून विचारते. आज च करता येईल. नवीन वाईन पण आणलीये मॅच च्या निमित्ताने ;)

आणि हो मी पहिल्यांदाच पहिली.

मधुरा देशपांडे's picture

17 Feb 2015 - 2:44 am | मधुरा देशपांडे

सावर क्रीमला नाही गं पर्याय तसा. त्यासोबतच लसणाची मुख्य चव येते. शिवाय वरुन पुदिना चटणी घेता येईल. पण तु करुन बघ आणि सांग.
ग्लु वाईन करुन बघणार असशील तर ही एक स्वातीताईने दिलेली कृती. नेहमीची वाईन पण छानच लागेल. मश्रुम्स परतताना त्यात व्हाईट वाईन पण घालता येईल.

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2015 - 2:55 am | सानिकास्वप्निल

छान दिसतायेत मश्रुम्स.... ग्लुवाईन अहाहा! पण मश्रुम्सने घसा खवखवतो इसीलिए पास.

केले गं मी. मी जरा मेयो जास्त घातलं सावर क्रीम ची टँगी टेस्ट आणायला आणि पुदिना चटणी घातली. मस्त चव आली.

रेवती's picture

17 Feb 2015 - 4:58 am | रेवती

छान पाक्रु! एकदम वेगळी!
पण मश्रुम्स परतायला १० ते १५ मिनिटे लागतील का?

हो. मलाही तसच वाटतय. मश्रुमला पाच मिनीट सुद्धा खूप झाली परतायला. कांदा आणि मश्रुम मिळुन दहा मिनीट लागतील.

कंजूस's picture

17 Feb 2015 - 6:37 am | कंजूस

छान लागेल.
सोपा डिप :दही +मिरपूड +पुदिना पाउडर+मीठ ,साखर .

सुहास झेले's picture

17 Feb 2015 - 9:53 am | सुहास झेले

इंटरेस्टिंग... :)

मदनबाण's picture

17 Feb 2015 - 10:06 am | मदनबाण

मला मश्रुम लयं लयं आवडत असल्याने पाकॄ आवडली आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी

कधीकधी मशरुमची तहान फ्लॉउरवर भागवतो.

मश्रूम अत्यंत आवडते असल्याने ही रेसिपी नक्की आवडेल. पण ते सावर क्रीम म्हणून आमी गरिबांनी काय वापरायचं म्हणे ?

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2015 - 12:47 pm | पिलीयन रायडर

करेक्ट.. गरिबांसाठी काय ते रेसेपीत बदल करावेत ही नम्र विनंती...!!

देवा.. मला असल्या मैत्रिणी दिल्याबद्दल आभार रे!!
चला.... आता मधुराची पण वाट पहाणं आलं...

- (तोंडाला सुटलेलं पाणी कसं आवरावं ह्या विंवचनेतली.. ) पिरा

हा तेच सावर क्रीम च्या ऐवजी काय घेऊ ते सांग पटकन !!बाकी recipe आणि फोटो आवडला आहे !!

कपिलमुनी's picture

17 Feb 2015 - 2:34 pm | कपिलमुनी

मश्रुम्सची अ‍ॅलर्जी असल्याने पास !

मशरुम आवडत नसलेने पास!! शेवटला फोटु जमलाय!!

इशा१२३'s picture

17 Feb 2015 - 3:08 pm | इशा१२३

मशरूमला पर्याय सुचव ग.
आणि सावर क्रिम कुठे मिळेल(मला तो डिपच जास्त आवडलाय)
ग्लुवाईनला पास(मी गरम पाणी वा चहा पिईन:b +b )

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 2:27 am | स्रुजा

तू त्या डिप मध्ये मारी बिस्किटं बुडवून खा. सगळंच पास केलयेस बाकीचं :D

मधुरा देशपांडे's picture

18 Feb 2015 - 2:55 am | मधुरा देशपांडे

:)))
इशा, याच नाताळ मार्केट्स मधे बटाट्याचा एक प्रकार मिळतो. आपले उपवासाचे बटाटेवडे म्हणता येतील असा. त्यासोबत पण हे डिप खातात. पण तो मश्रुमला पर्याय नाही. पुर्ण वेगळा पदार्थ आहे. :) मला कृती माहित नाही. विचारु नये. ;)
तुलाच इतर पदार्थ सुचतील सोबत खायला, ते करुन बघ. मारी बिस्किटे आहेतच नाहीतर. ही सृजा तुझ्या घरी येईल ना तेव्हा तेच कर *biggrin*

मधुरा देशपांडे's picture

17 Feb 2015 - 3:31 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. सृजा करून पाहिलेस लगेच म्हणून विशेष आभार.
आणि वर एक लिहायचे राहिले ते, मी फक्त पदार्थाची कृती शोधणे आणि ती लिहिणे एवढेच केले. आणि अर्थात खाणे. बाकी पाकृ आणि फोटो दोन्ही नवऱ्याने केले. त्यामुळे अभिप्राय त्याच्यापर्यंत पोचवले आहेत.

रेवाक्का आणि अपर्णाताई, मश्रूम लवकर शिजत असले तरीही ते नाताळच्या मार्केट्स मध्ये मंद आचेवर सतत परतत असतात. तो रंग आणि चव तशीच यावी म्हणून जरा जास्त परतले. पण थोडे कमी चालतीलच.

मश्रूम न आवडणार्यांसाठी, मलाही काही ठराविक पदार्थातच आवडतात. त्यात हा पदार्थ आता अग्रणी आहे. तेव्हा एकदा ट्राय करून बघू शकता.

सावर क्रीम नसल्यास वर सृजा म्हणाली तसेही करता येईल. आपल्या दही पुरी वगैरे चाट करतो तशा पद्धतीने. दही फडक्यात बांधून ठेवून सगळे पाणी निथळून घ्या आणि ते वापरू शकता. कदाचित सायीचे दही नुसते पण चांगले लागेल असे वाटते. मूळ पाकृत जे Crème fraîche वापरले जाते तो दह्याचाच एक प्रकार आहे. त्याला इतरत्र मिळणारा पर्याय म्हणून सावर क्रीम आहे. फक्त नुसत्या दह्या ऐवजी त्यासोबत मेयोनीज किंवा सावर क्रीम हे एक तरी हवेच असे वाटते. तर तुम्ही सगळ्या सुगरणी करून बघा आणि सांगा. :)

रेवती's picture

17 Feb 2015 - 6:51 pm | रेवती

ओक्के. करून बघते.

हां हे घट्ट दही कळीचा मुद्दा आहे असं मला ही वाटलं. मी ग्रीक योगर्ट वापरलं आणी डिप छान झालं.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2015 - 7:05 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2015 - 7:48 pm | दिपक.कुवेत

फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलयं....मस्त एक वेगळिच पाकृ...

मश्रुम आवडत नसल्याने नुसती बघुन गेले आमच्या मधुराची पाकृ!बघायलाही सुरेख आहे गं तुझी पाकृ!

त्रिवेणी's picture

17 Feb 2015 - 9:40 pm | त्रिवेणी

अ मु ल चे क्री म चा ले ल का?

मधुरा देशपांडे's picture

17 Feb 2015 - 10:04 pm | मधुरा देशपांडे

अमुलचे क्रीम म्हणजे कुठले नेमके? सावर क्रीम मिळाले तर चालेलच. दुसरे कुठले म्हणत असशील तर मी कधी वापरले नसल्याने सांगता येणार नाही.

आनन्दिता's picture

18 Feb 2015 - 12:32 am | आनन्दिता

काय टेंम्प्टिंग दिसतायत मशरुम्स... :)

बहुगुणी's picture

18 Feb 2015 - 2:12 am | बहुगुणी

'क्रेम फ्रेश'/ सावर क्रीम करण्याचा एक व्हिडिओ दुवा (हेही सोपं वाटतंय, करायला पाहिजे):

बाकी आपल्याकडचं सायटं दही म्हणजे काय? तेही बाहेर ठेवलं तर थोडंसं आंबट होईलच ना? त्यात आणि या सावर क्रीममध्ये काय फरक आहे?

मधुरा देशपांडे's picture

18 Feb 2015 - 2:48 am | मधुरा देशपांडे

या व्हिडिओत दाखवलेले टेक्स्चर परफेक्ट आहे अगदी. असे करता येईल. मला रेडी गार्लिक सॉस मिळाल्याने मी ते वापरले. पण इतर पदार्थांसाठी जेव्हा सावर क्रीम आणले ते याच प्रकारचे होते.

सायटं दही म्हणजे सायीचं दही का? मग ते आणि सावर क्रीम एकच म्हणु शकतो.
आपले नेहमीचे दही/योगर्ट हे दुध विरजवुन केले जाते आणि सावर क्रीम म्हणजे क्रीम विरजवुन केलेले जसे या व्हिडिओत दाखवले आहे. या व्याख्यांमधे काही चुकले असल्यास सुगरणींनो मदत करा आणि माझ्या ज्ञानात भर घाला.

अगं सायटं दही तेवढं घट्ट असेल पण सावर नसेल ना ! आपलं रोजचं दही जर घट्ट लावलं आणि ते आंबट केलं तर ते सावर क्रीम होईल असं वाटतंय. म्हणजे क्रीमी टेक्श्चर आणि सावर चव दोन्ही हवं ना? तुझा आधीचा पर्याय योग्य वाटतोय, चक्क्यासारखं थोडं दही बांधून ते घटट करून वरतून मेयो सारखं काही तरी घालून तो परिणाम साधता येईल.

मधुरा देशपांडे's picture

18 Feb 2015 - 3:17 am | मधुरा देशपांडे

हो क्रीमी टेक्श्चर आणि सावर चव दोन्ही हवेच. मी नेटवर जे शोधले त्यातही चक्क्यासारखं बांधुन ठेवायचा पर्याय दिला होता. हा ही मुद्दा आहेच की ते सावर नसेल. पण बहुगुणी म्हणताहेत तसे बाहेर ठेवुन कदाचित ट्राय करता येईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Feb 2015 - 4:57 am | निनाद मुक्काम प...

माझी आवडती डिश
ते खायचे तर फक्त तुझ्या हातचे
असे मागच्या वर्षी बायकोला व त्याच्या मागच्या वर्षी सासूला सांगितले होते.
सासूने पारंपरिक पद्धतीने केली होती तर बायकोने आंजा च्या मदतीने त्यात थोडा बदल करून हीच डिश केली होती.
कृतीच्या तपशिलात न शिरता मी खायचे काम केले होते.
भारतातून आलेल्या शाकाहारी मंडळींना काय करून खायला घालायचे हा एक यक्ष प्रश्न असतो.
हि डिश त्याचे उत्तर आहे ,

पैसा's picture

18 Feb 2015 - 10:11 am | पैसा

सोपी वाटतेय. काही बदल करून करता येईल.

हे डिप म्हणजे तर रँच ड्रेसिंग - उसगावातलं सर्वात बेसिक ड्रेसिंग! सर्व सॅलड व फ्रेंच फ्राइज बरोबर अफलातून लागते.

सावर क्रिम, दही, मेयोनिजच्या प्रमाणात वाट्टेल ती अफरातफर केली तरी चव विशेष बदलत नाही, फक्त मेयोनिज असणे महत्वाचे!
डाएट चा विचार करणर्यानी - सावर क्रिम ऐवजी वड्यावाले दुधाचे दहीच पुर्ण वापरा!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2015 - 6:52 am | अत्रुप्त आत्मा

या सावर शब्दामुळे त्या होडन सावर ची आठवण झालि. त्यातले आणि ह्यातले ते सावर एकच का?

नूतन सावंत's picture

3 May 2015 - 9:49 am | नूतन सावंत

व्हिडीओमद्ज्ये दाखवलेल्या कृतीतील वेळ हा अठ्ठेचाळीस तासांचा आहे.इथल्या हवामानात तो २४ तास भरपूर होईल असे वटते.१२ तास दही लावायला आणि १२ तास फ्रीजमध्ये ठेवायला.कृपया जाणकारांनी माहिती दिली तर बरे होईल.

स्वाती दिनेश's picture

3 May 2015 - 2:42 pm | स्वाती दिनेश

आवडती डिश, नाताळ मार्केटात गेले की खाल्लीच जाते..
(आता नाताळापर्यंत वाट पाहणं नहीतर स्वतः करणे आले.. :) )
स्वाती