टोपल्या आणि मी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
13 Aug 2008 - 9:48 pm
गाभा: 

Childhood Trauma and Violent adulthood हा विशय किचकट आहे. मानवी मेंदुवरचे संशोधन बाल्याव्स्थेतआहे.त्यामुळे १००% बरोबर विधान शक्य नाही. सर्व अंदाज मागील अनुभवावरुन बान्धलेल्या पुड्या. माझ्या प्रकटनाशी असहमत असाल तर त्यात गैर काहीही नाही. आपल्या चवकटीच्या बाहेर असलेल्या विशयावर असहमती मी नेहेमीच बघतो. सहमत असुन सुद्धा असहमती ला सेल्फ डिनायल म्हणतात.All humans choose self denial as escape route from reality असे म्हणतात. असे काही नसते म्हणणे सर्वात सोपा मार्ग.
माझे प्रकटन प्रतिबींब आहे.झालच् तर प्रतिध्वनी. आशय नाही. थीम नाही. आयका आणि वाटा.पट्ले नाही सोडुन द्या.
Childhood Trauma is result of child abuse. Childhood Abuse म्हणजे नुस्ता लैगिक छळ नव्हे. मानसिक आणि आर्थिक पण असतो.पुढिल घटना मानसिक मध्ये मोड्ते.
अत्यन्त गरिबीतुन वर आलेले एक सुप्रसिद्ध डॉक्टर. सुखी समधानी. दोन मुले. मोठी मुलगी नक्षत्रासारखी. मुलगा ठिक ठाक. सर्व सुरळित. जुन महीना. १ली ची तयारी.दफ्तर रेनकोट ची खरेदी झाली. १ल्या दिवशी ट्रायल. चिरंजिवानी दफ्तर खांद्यावर चढवले. आईने रेनकोट घातला.खांदे आक्रसल्यावर रेनकोट टरकन फाट्ला.
गरीब डॉक्टरना २५० चे नुकसान सहन झाले नाही . काय केलेस हे असे काहीतरी ओरडुन त्यानी त्या पोराच्या पाठीवर जोरात धपाटा मारला. मारापेक्शा पोर डोळ्यातल्या खुनशी रागाला भ्यालं आणि तिथेच मुतले. आईने मध्यस्ती केली विशय तिथे संपला.
दुसरा दिवशी पासुन पोर बोलायचा थांबला. जवळ जवळ मुका.
पाचव्या दिवशी बोलताना फाफलायला लागला. आकाश कोसळ्ले . एका बेसावध क्षणी आपल्याच हाताने आपल्याच मुलाचा घात.
दोन वर्शांची स्पिच थेरपी, सायकोथेरपी - उपयोग नाही. कोणाच्यातरि रेफरन्सने माझ्याक्डे आले. कर्मकहाणी कळली. आईचे अश्रु थांबत नव्हते. डॉक्टरांची मान खाली.
देवाचे स्मरण करुन सर्व आढावा घेतला. इथे सेकंडरी कॉम्प्लीकेशन पण होती. ताईचा नंबर १ला. वक्त्रुत्व स्पर्धेत १ली. वगैरे वगैरे. सारखी तुलना.
शिकली सवरली घाणीच्याटोपल्या करण्यात हुशार.ठोकुन काढावेसे वाटले. असो.
सल्ला दिला तो असा.
मी: त्याला सर्वात जास्त काय आवड्ते?
आई: W.W.F.(रोल रिवर्सल - मुलाच्या मनात, मार खाणारा बाबा-मारणारा मी)
बाबा: कीति सांग्तो ते सर्व खोट आहे. पण ऐकतच नाही.(इथे पण आपलीच पुन्गी)
मी: बरोबर वेळी घरी या. मुलाबरोबर बसुन तो जसा रमतो तसा तुम्ही रमा. खर्या खोट्याची ऐसी की तैसी. आईला खुण केली. तीने दरडावल्यावर साहेब तयार झाले.WWF MULABAROBAR KASE ENJOY KARAYACHE TYACHE PRACTICAL DAAKHAVALE. GHARACHAA ANUBHAV. सर्व प्रयोगात ताईला सांमील करण्यास विसरलो नाही. पाचवीतली मुलगी बाबापेक्षा हुशार निघाली. सर्व काही सुरळित झाले.एका महिन्यात तोतरेपणा गेला. पोराची आणि बाबाची बर्यापैकी दोस्ती झाली.
आज मुलगा नागपुरला कॉम्प.
इजिनीयरींग करतोय.
इथे काही प्रश्न उदभवतात.
१. माटुंग्याची वी.जे.टी.आय. सारखी सीट सोडुन मुलगा नागपुरला का गेला?
२.आजही मुलगा फक्त चारच दिवस का घरी येतो?
३.वरवर दिसत असले तरी त्याने आपल्या बाबाला माफ केले का?
४. ह्या बालपणीच्या ट्रोमाचा पुढील त्याच्या आयुश्यात काही परिणाम राहील का?
will he be a violent personality
५. बाबा आपल्या भुतकाळाला कधीच विसरणार नाही का?(गरीबी वगैरे. )

६. पुढिल आयुश्यात येणार्या प्रसंगात भुतकाळातील जखमा तारतात का मारतात.?

5. तुम्हाला बाबाने , भावाने खुप मारले त्याचे मानसिक वण तुमच्या वागण्यात दिसतात का?
६. हा सर्व खुळ्चट्पणा आहे. असे काहीही नसते.
तुमचे उत्तर तुम्ही शोधा.
अगले भाग मे मिलते है हमलोग.

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

14 Aug 2008 - 4:48 pm | भडकमकर मास्तर

प्रभूसाहेब,

मानवी मनाच्या खोल कप्प्यांमध्ये कायकाय दडले असेल अंदाज येत नाही...
आपल्या सर्वच गोष्टी ( विशेषतः इथे शेवटी आपण उपस्थित केलेले प्रश्न) फार फार विचार करायला लावणारे‍ आहेत...

कॉलेजात असताना पीडिऍट्रिक डेन्टिस्ट्री मध्ये बालमानसशास्त्र शिकताना चाईल्ड ऍब्यूज हा विषय येत असे तेव्हा त्या अमेरिकन लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये लहान पेशंटच्या पालकांच्या विकृतपणाला डेंटिस्टने प्रथम ओळखून योग्य अधिकार्‍यांकडे रिपोर्ट करावे असे लिहिलेले असे...(मला हे थोडंस अमेरिकन फॅड वाटत असे, आपल्याकडे कसलं आलंय असं? असं डिनायल वगैरे)... पण तुमचे अनुभव भलतेच शिकवून जाणारे.... अजून लिहा...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

14 Aug 2008 - 4:52 pm | सहज

सर्वप्रथम केवळ जुजबी माहीती आधारे [इथे आम्ही मिपाकरांनी] काही मत बनवणे बरोबर नाही. जास्त खोलात माहीती दिल्याशिवाय अश्या कुठल्या स्पेसीफीक केस स्टडीवर चर्चा करणे योग्य नव्हे. नागपुरची मुलगी असेल जिच्या मागे हा मुलगा ;-)लागला असेल. मी जेव्हा प्रेमात पडलो होतो किंवा ते सोडा जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा एकवेळचे जेवण व लॉजिंग म्हणून घरचा वापर केला. ते वय तसं असत घरच्यांपेक्षा मित्रात वेळ जास्त घालवासा वाटतो. आई-वडिल भावंड तेव्हा ही प्रिय, आजही प्रिय.

राहीला मुद्दा पालकांच्या वागण्याच्या मुलांच्या आयुष्यावर तर या विषयावर जे के रोलींग व त्या आधी काही जणांनी म्हणल्याचीच मी री ओढीन. ठीक आहे एका हद्दीपर्यंत नावे ठेवा पण केवळ आई-वडलांना दोष देउन आयुष्यभर आपले अपयश झाकणे हे सबळ कारण नाही. एकदा का हे कळले की असे झाले आहे तर आहे त्या परिस्थीतीतुन पुढे मार्ग काढणे हे त्या मुला/मुलीच्या हातात निदान सज्ञान झाल्यावर तर नक्कीच.

बाकी मानसीक वाढ निकोप झाली पाहीजे व मारु नये , पालकांनी मित्रत्व, कुटूंबातील सर्वांचे एकमेकप्रती व्यवहार व प्रोत्साहन इ. इ. वर कोट्यावधी बॅरेल शाई, अब्जावधी कळफलक आधीच ओतले, बडवले गेले आहेत. त्याआधारे वरील प्रत्येकाचे सायको ऍनॅलीसीस करुन सुधारणा सांगता येतील. :-)

शिकली सवरली घाणीच्याटोपल्या करण्यात हुशार.ठोकुन काढावेसे वाटले. असो.
म्हणजे काय? समजले नाही.

पुढचा भाग वाचायला उत्सुक.

विनायक प्रभू's picture

14 Aug 2008 - 4:55 pm | विनायक प्रभू

प्रिय दंतवैद्य,
तुमचा पोटापाण्याचा धंदा लोकांच्या तोंडातुन होतो. टोपीच पडली.
धन्यवाद.
वि.प्र.

शिप्रा's picture

14 Aug 2008 - 5:05 pm | शिप्रा

मी सध्या school psychology शिकत असल्याने तुमच्या लेखांचा मला अभ्यासासाठि खुप उपयोग होईल्..धन्यवाद

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

मदनबाण's picture

14 Aug 2008 - 7:17 pm | मदनबाण

मनावर दडपण कधी व कशाने येईल याची काहीच खात्री नाही..
आणि हे दडपण मनाच्या कुठल्याही कोपर्‍या मधे तसेच राहु शकते..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

चतुरंग's picture

14 Aug 2008 - 7:43 pm | चतुरंग

चांगली सुरुवात आहे. पण सर्व धागे नीट जुळणे जरा अवघड होते आहे. मिसिंग लिंक्स आहेत.

पुन्हा एकदा विनंती आहे -
क्रिप्टिक लिखाणाकडे तुम्ही फार चटकन जाता. आधीच विषय मानसोपचारासारखा त्यात तुमच्या मनातले विचार जोपर्यंत थेट पोचत नाहीत, स्पष्ट समजत नाहीत तो पर्यंत लोकांचा सहभाग मर्यादित होणार.
थोडे विस्ताराने लिहा, स्पष्ट लिहा. वाचायला अधिक आवडेल.

चतुरंग

प्रियाली's picture

14 Aug 2008 - 7:44 pm | प्रियाली

१. माटुंग्याची वी.जे.टी.आय. सारखी सीट सोडुन मुलगा नागपुरला का गेला?

कदाचित त्याला वि.जे.टी. आय. ला ऍडमिशन मिळाली नसावी किंवा त्याला घरातल्यांपासून दूर राहावेसे वाटत असावे. १७-१८ वर्षांच्या मुलाला तसे वाटल्यास नवल नाही. किंबहुना, तसे वाटलेच पाहिजे.

२.आजही मुलगा फक्त चारच दिवस का घरी येतो?

कदाचित त्याला वेळ मिळत नसावा. मी गेली ४ वर्षे भारतात गेले नाही, आणखीही काही वर्षे जाणार नाही, तसा प्लॅन नाही. माझे आई-वडिल मारकुटे नव्हते, वडलांचा आवाजही चढल्याचे आठवत नाही. मातोश्री ओरडायच्या पण आम्हीच निगरगट्ट असणार त्यामुळे काही फरक नाही. या मुलाच्या बाबतीत मात्र त्याला स्वतंत्र राहण्याची संधी मिळाली किंवा वडिलांपासून दूर राहण्याची संधी मिळाली तिचा फायदा त्याने घेतला असावा आणि घ्यावा.

३.वरवर दिसत असले तरी त्याने आपल्या बाबाला माफ केले का?

कदाचित केलेही असावे कारण वडिलांबद्दल विश्वास निर्माण झाल्यानेच त्याचा तोतरेपणा गेला पण मनात खोलवर स्वतंत्र होण्याची इच्छाही असू शकेल. स्वतः बाप झाला की माफ करण्याची इच्छा कदाचित अधिक उचल खाऊ शकेल.

४. ह्या बालपणीच्या ट्रोमाचा पुढील त्याच्या आयुश्यात काही परिणाम राहील का?will he be a violent personality

असेच सांगता येत नाही कदाचित तो आपल्या मुलांना अतिशय चांगली वागणूक देईल किंवा माझा बापही मला असाच बडवत होता म्हणून बडवेल. प्रत्येक मन वेगळे असते.

५. बाबा आपल्या भुतकाळाला कधीच विसरणार नाही का?(गरीबी वगैरे. )

भूतकाळ विसरता येत नाही. त्यातून शिकून पुढे जावे लागते. बाबांकडून विसरण्याची अपेक्षा करू नये, समजूतीची करता यावी.

६. पुढिल आयुश्यात येणार्या प्रसंगात भुतकाळातील जखमा तारतात का मारतात.?

ते त्या व्यक्तिवर आणि परिस्थितीवर अवलंबून आहे.

5. तुम्हाला बाबाने , भावाने खुप मारले त्याचे मानसिक वण तुमच्या वागण्यात दिसतात का?

मला माझ्या बाबांनी साधे ओरडल्याचेही आठवत नाही. भाऊ लहान होता पण आमची कधी मारामारी झाली नाही. आई ओरडत असे, धपाटे खाल्ल्याचेही आठवते पण आईबद्दल कधी मनात कटु भावना नाही.

केवळ मारल्याने कटु भावना राहते किंवा जरबेने राहते असा प्रकार नसतो. वेताच्या छडीने चोपून काढणारे आई-बाप पाहिले आहेत. त्यांची मुले मोठी झाली की होतोच आम्ही व्रात्य. आई वडिल करतील तरी काय? असे म्हणतानाही पाहिले आहेत. आजूबाजूला चालणार्‍या प्रत्येक घटनेतून मूल शिकत असते आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावर होत असतो. विचारक्षम नसलेल्या वयात एखादी घटना किंवा प्रसंग (मग तो आई-वडिलांतील, वडिल-काकांतील भांडणे, आई-वडिलांनी आजी-आजोबांना दिलेली वाईट वागणूक, नोकरांना दिलेली वाईट वागणूक, आपल्याखेरीज इतरांचे केलेले कौतुक अशा अनेक घटना सांगता येतील) मनावर कोरला जातो आणि पुढील आयुष्यात परिणाम दिसून येतो.

माझ्यामते शारीरिक मार विसरला जातो परंतु शाब्दिक मार, हिणकस बोल, आपल्याला मिळणारी वाईट वागणूक मुले विसरत नाहीत. घरातील एखादी कुजकट बोलणारी आत्या, मावशीच घ्या. मुले लहानपणी आणि मोठेपणीही त्यांच्यापासून दूर राहतील.

६. हा सर्व खुळ्चट्पणा आहे. असे काहीही नसते

खुळचट नक्कीच नाही परंतु विषय अधिक विस्तृतपणे मांडण्याची गरज आहे.

आता माझं मत-

१. मुलांना मारू नये पण प्रसंगी एखादा धपाटा देणे ठीक असते. धपाटे देताना पाठ किंवा ढुंगण हे भाग चांगले. त्यासाठी हात सोडून इतर कोणत्याही गोष्टी जसे चप्पल, छडी, लाकडी चमचे इ. वापरू नयेत.
२. सार्वजनिक ठीकाणी मुलांना मोठ्याने ओरडणे, अपमानास्पद बोलणे, धपाटे देणे करू नये.
३. त्यांच्या मित्र-मैत्रिणींसमोर त्यांची थट्टा करणे, घालून पाडून बोलणे टाळावे.
४. त्यांच्यावर एखादेवेळी विश्वास दाखवायचा नसेल तरी समोरासमोर अविश्वास दाखवू नये.
५. केलेली चूक पुन्हा पुन्हा काढून दाखवू नये
आणि बरेच काही.

चतुरंग's picture

14 Aug 2008 - 8:11 pm | चतुरंग

१ ते ५ पूर्ण सहमत.
आणखी एक महत्त्वाचे वाटते तेवढे टाकतो -
शिक्षा ही चुकलेल्या वर्तनासाठी असावी त्यातून मूल वाईट आहे असा संदेश त्या मुलाच्या मनात न जाऊ देणे चांगले.

चतुरंग

विनायक प्रभू's picture

14 Aug 2008 - 8:02 pm | विनायक प्रभू

प्रियाली,
१ते५ .सिंपली ग्रेट्.वि.प्र.

विनायक प्रभू's picture

14 Aug 2008 - 8:16 pm | विनायक प्रभू

प्रिय सहज,
वि.जे.टी. आयची मिळालेली सिट मुम्बइचा कुठलाही सोडत नाही. नागपुरात कुठ्लेही प्रेमप्रकरण नाही. मुलगा बाबापेक्षा माझ्या संपर्कात आहे. हे त्यांना माहीत आहे. त्यानी ते नाइलाज म्हणुन स्विकारले आहे. कोणी किति ओतले त्याला मी काय करावे. बाकीकरता आय रेस्ट माय केस मिलॉर्ड.
वि.प्र.

विनायक प्रभू's picture

14 Aug 2008 - 8:29 pm | विनायक प्रभू

प्रिय चतुरंग,
हळु हळु लागतील. प्रियाली मदतीला धावली की. काही घरात मुलांना खुपच मार पड्तो.छोट्य छोट्या कारणाकरता.
हे वाचुन वा ऐकुनसुधारले तर आणखी काय पाहिजे.वि.प्र.