लग्न .... एक घटना

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
12 Feb 2015 - 5:34 pm
गाभा: 

पहिली घटना....

तारीख:20 डिसेम्बर 1990.
स्थळ: साठे कॉलेजच्या जवळील चहाची टपरी
वेळ: दुपारी 12.30
पात्र: तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी

सागर:हाय चैताली.
चैताली मैत्रिणींबरोबर क्लासला जायला निघाली होती. एकीने तिला कोपराने ढोसल. दुसरीने डोळा मारला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चैताली उत्तरली, "हाय सागर".
सागर:कुठे क्लासला का? मी पण निघतोच आहे. एकत्र जाऊ या?
चैतालीने काही म्हणायच्या आत मैत्रिणी हसत म्हणाल्या,"बाय चैताली. आलिस तर क्लासला भेटु. तू ये सावकाश. आम्ही पुढे जातो."
मैत्रिणींना डोळे मोठे करून दाखवत चैताली सगरच्या दिशेने वळली. तिच्या मैत्रिणी गेल्याची खात्री करत सागरने हळूच पाठीमागुन एक लाल गुलाबाच फूल काढल आणि चैतालीला देत विचारल,"I love u chaitaali; will u marry me?" लाजलेली गोंधळलेली आणि सागरने अस काहीतरी म्हणाव याची वाट पहाणारी चैताली गोड हसत "हो" म्हणाली.
आणि मग त्यांच्या relationship ला सुरवात झाली.
----------------------------
4 वर्षांनंतर.... 1994...

चैताली: सागर तुला अलीकडे माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो. तुझा जॉब आणि मित्र एवढच आयुष्य आहे तुझ. मी ऑफिसनंतर तुझ्या घरी जाऊन तुझी वाट बघत तुझ्या आईशी गप्पा मारत बसते. अरे अजुन लग्न फ़क्त ठरल आहे; झाल नाही. तरी तुला खरच मला वेळ द्यावासा नाही वाटत का रे? अलीकडे आपले इतके वाद व्हायला लागले आहेत; मग लग्नानंतर तर बघायलाच नको.
सागर: अग, कित्ती बायको टाइप्स बोलतेस तू आज-काल. सारख भेटून काय करायच
चैताली: काय करायच म्हणजे? अरे जर तुला आत्ताच अस वाटतय तर मग लग्न का करतो आहेस माझ्याशी?
सागर: झाली का तुझी सुरवात परत?

....आणि यथावकाश चि.सागर आणि चि. सौ. का. चैतालीचा शुभ विवाह पार पडला.

---------------------------------------------------------------
तारीख:20 डिसेम्बर 2010.
स्थळ: साठे कॉलेजच्या जवळील चहाची टपरी
वेळ: दुपारी 12.30
पात्र: तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी

संजना कॉलेज नंतर मैत्रिणींबरोबर क्लासला निघालेली आहे.
नीरव: hey ..  hi beautiful.
एक मैत्रीण: देख तेरा रोमियो आया. चल हम निकलते हे. बाय.
संजना: थांबा ग. hey... hi there. तू काय करतो आहेस इथे? क्लासला नाही का येत?
नीरव: थांबतेस थोड़? एकत्र जाऊ.
संजना:चल न आमच्याच बरोबर. आम्ही निघालो आहोत.
नीरव:let your friends go, if u don't mind. आपण दोघेच नंतर जाऊ या. चालेल?
संजना:ok. Provided तू timpass नाही करणार.
नीरव:ok
संजना:fine. ए तुम्ही पुढे निघा. पण माझी जागा ठेवा ह. मी येतेच्.
आणि तिच्या मैत्रिणी पुढे गेल्या.
नीरव: संजना actually i wanted to prapose u. मला तू आवाड़तेस. I know its too early to say if we can spend reat of our life together or no; but i want to be in relationship with u.
संजना: अरे नीरव. मला वाटल होतच तू 'प्रो' मारशील. पण हे ज़रा जास्तच लवकर होत आहे रे. मला विचार करू दे. Till then we can hang around with each other. What say?
नीरव: ok. But ill wait for ur positive reply.
काही दिवसांच्या डेटिंग नंतर संजना नीरवला हो म्हणाली आणि त्यांच्या relationship ला सुरवात झाली.
---------------------------------------
4 वर्षांनंतर......2014

नीरव:संजना कुठे आहेस?
संजना:अरे ऑफिसमधून थेट मैत्रिणीकड़े आले. आज आपण भेटणार नव्हतो न. म्हणून मी माझा प्लान केला.
नीरव:अग, आई म्हणत होती एकदा संजना भेटून गेली तर बर होईल. ती तशी फारशी येत नाही.
संजना:त्यासाठी मी तुझ्या आईला का भेटायच? काय रे तुझी आई सारखी काही न काही कारणं का शोधत असते मी तुमच्या घरी ऑफिसनंतर याव याची? लग्न ठरल आहे न आपल् आणि लग्नानंतर मी त्याच घरी येणार आहे न? मग आत्ता तरी मला माझ्या चॉइसच आयुष्य जगु दे न. By the way, तू कुठे आहेस?
नीरव:मित्राकडे. का?
संजना:वा! तू तुझ्या घरी नाहीस आणि मी मात्र ऑफिस नंतर तुझ्या आईला भेटायला तुझ्या घरी जायच? अजुन लग्न नाही झाल आपल. नवरेगिरी करू नकोस.
नीरव:यात नवरेगिरीं काय ग? तिची तुला भेटायची इच्छा आहे; ते मी तुला सांगितल. यायच तर ये नाहीतर गेलीस उड़त.
संजना:उड़त काय? हे अति होत आहे ह नीरव. जर उडवायच होत मला तर लग्न का करतो आहेस माझ्याशी?
नीरव: झाली का तुझी सुरवात परत?

....आणि यथावकाश चि.नीरव आणि चि. सौ. का. संजनाचा शुभ विवाह पार पडला.

प्रतिक्रिया

जेपी's picture

12 Feb 2015 - 5:46 pm | जेपी

दुर्घटना से देर भली...

(स्लो)जेपी

>>दुर्घटना से देर भली

+१

नगरीनिरंजन's picture

12 Feb 2015 - 8:53 pm | नगरीनिरंजन

देर से हो या तुरंत, दुर्घटना तो होके ही रहती है|
प्रत्येकाला वाटतं की आपलं वेगळं असावं, असेल; पण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; तुमचं, आमचं, सगळ्यांचं सेम असतं. :-)

प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच अमच सेम असत.+1989
(प्रेमी कार्यकर्ता)जेपी

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापा बापा शेरातले कॉलेजं!!!! आमाले कधी नाही भेटले ब्वा असे चान्स! असो!!!

यथावकश बाप्याचा बापूसाहेब झालाच!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Feb 2015 - 6:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या चहाच्या टपरीतच काहीतरी दडलेले दिसतय!
ह.घे. ग ज्योते.

ती टपरी तुमच्या 'ह्यांची' आहे ग माई...
लै पांचट चा बनवतात.

(पयशे वाया )जेपी

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 6:22 pm | टवाळ कार्टा

उग्गीच कैच्याकै...असे कधी अस्ते का :)

का असू नये? अशी भांडाभांडी सार्वत्रिक आहे.

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 6:34 pm | टवाळ कार्टा

म्हणजे मला विचारायचे होते की मुलगी अशी पटकन लाईन देते?

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 6:36 pm | कपिलमुनी

पात्र: तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी

पहिल्या वर्षापासून पोट्ट्याने घासली असेल ना बे !

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 6:38 pm | टवाळ कार्टा

पहिल्या वर्षापासून घासूनपण जर तिसर्या वर्षापर्यंत लाईन मिळत नसेल तर तो मुलगा शुध्ध ** आहे =))

मुलगी अशी पटकन लाईन देते?

आपण लाळघोटेपणा करुन आधीच आपली किंमत कमी करुन घेतलेली नसेल तर नक्की देते.

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 6:37 pm | टवाळ कार्टा

हा हा हा...सहमत ;)

शब्दबम्बाळ's picture

14 Feb 2015 - 1:38 am | शब्दबम्बाळ

का कोणास ठाऊक पण मला हे आधीचे आणि नंतरचे प्रसंग पाहून फेअर & लवलीची जाहिरात वाटली.
मुलगा मुलीला भेटताना (त्यात ती मैत्रिणींबरोबर असताना, त्यात ह्यांच अजून काहीच नसताना! ) "hey beautiful" अशी हाक मारतो?
आणि हे "प्रो" काय अरे?!
म्हणजे खरोखर सध्या हि असली भाषा बोलली जाते कि उगीच "मॉड"पणा दाखवायच्या नावाखाली तरुण वर्गावर लादली जातेय?
हे प्रश्न मला खरोखर पडलेले आहेत लेखावर टीका करण्याचा उद्देश नाही…