लहान मुलांसाठी मोबाईल अ‍ॅप

बटाटा१'s picture
बटाटा१ in काथ्याकूट
1 Feb 2015 - 7:41 am
गाभा: 

माझा मोठा मुलगा सव्वा दोन वर्षाचा आहे, त्याची आयपॅड ची सवय घालवण्या खुप प्रयत्न केला पण दिवसातुन थोडावेळ तरी त्याला आयपॅड वापरायचा असतो. आयपॅड ला शिक्षणाचे साधन म्हणून कसे वापराता येईल याचा शोध घेतांना काही चांगली आणि काही बरिचशी पेड अ‍ॅप्स मिळाली.

मुलांसाठी चांगली अ‍ॅप्स सुचवावी म्हणून हा धागा काढत आहे. सध्या मी माझ्या मुलासाठी वापरत असलेली अ‍ॅप्स-

१. Talking Ben: जवळ जवळ प्रत्येक मुलाची आयपॅड किंवा मोबाईल वापराची सुरुवात या अ‍ॅप ने होते मात्र अ‍ॅप नको पण जाहीराती आवर आशी याची अवस्था आहे.
२. Farm Animals: जिग्सॉ पझल्स चे हे अ‍ॅप आहे. माझा मुलगा दोन वर्षाचा होण्यापुर्वी पासुन हे अ‍ॅप वापरतोय. चित्राचे मोठे तुकडे आणि तुलनेने सोपं असल्याने मुलांना आवडणारे अ‍ॅप. जाहिरातींचा त्रास नाही.
३. Peekaboo: वेगवेगळे प्राणी ओळखण्याचे हे अ‍ॅप आहे. ग्राफिक्स चा दर्जा खुप चांगला आहे.फ्रि वर्जन मधे ठरावीक प्राणी आहेत आणि जाहिरातींचा त्रास नाही.
४. Preschool kids academy: लहान मुलांना ईंग्रजी अक्षरे आणि अंक लिहायची शिकवणारे हे अ‍ॅप आहे. फ्रि वर्जन मधे फक्त काही आणि अंक आहेत. अनेक अ‍ॅपचे बंडल मिळते आणि या अ‍ॅप चा दर्जा खुप चांगला आहे. मी तर पुर्ण बंडल विकत घ्यायचा विचार करतोय. जर कुणी हे अ‍ॅप वापरत असेल तर कृपया रिव्हू दिला तर मदत होईल.
५. ABC Riddles: ABCD शिकवणारे अ‍ॅप. जाहिरातींचा त्रास नाही.
६. Pottery: लहान मुलांसोबतच मोठ्यांना पण आवडेल असे हे अ‍ॅप. मोफत आहे.
७. Dot To Dot Zoo: वर्तमानपत्रात बालमित्र विभागात १,२,३,४ जोडत चित्र तयार होणारे एक सदर असते. हे अ‍ॅप तेच आहे. ठिक ठाक आहे तसेच जाहिरातींचा फार त्रास नाही.

अजुनही बरेच अ‍ॅप्स आहेत पण जाहिरातींचा फार त्रास नसणारे अ‍ॅप्स दिलेत. जासत जाहिराती असलेल्या अ‍ॅप्स ला मुले कंटाळतात किंवा सरळ YouTube वर जाऊन स्थिरावतात म्हणून कृपया अशाच अजुन अ‍ॅप्सची भर घालवी हि विनंती.

मी प्रथमच लेखन करत असल्याने लेखन प्रकार, लेखनविषय निवडतांना गोंधळ उडतोय, संपादक मंडळाला विनंती की त्यानी हा धागा योग्य जागी हलवावा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Feb 2015 - 11:52 am | पैसा

मुलांना या सगळ्यापासून लांब ठेवता येणार नाहीच. तर निदान त्यातल्या त्यात चांगले काय ते शोधावे हे उत्तम.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2015 - 12:03 pm | अत्रुप्त आत्मा

उपयुक्त धागा!

मीही सुचवण्यांच्या प्रतीक्षेत.