ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
प्रतिक्रिया
30 Jan 2015 - 7:44 pm | कोंबडी प्रेमी
सुरुवात करताय कि तुम्ही ...:)
30 Jan 2015 - 7:51 pm | बबन ताम्बे
:-)
31 Jan 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे
इंदिरा गांधींनी सांगितल्याशिवाय काही करायचे नाही अशी त्यांना सक्त ताकीद होती असे ऐकून आहे, त्यामुळे असे झाले असेल :) रबर स्टँप म्हणून त्यांच्या इतकी प्रसिद्धी आणि व्यंगचित्रे दुसर्या कोणत्या राष्ट्रपतींची पाहिली नाहीत.
31 Jan 2015 - 12:32 am | खटपट्या
असं कसं ?? आपले मौनीबाबांना विसरलात का? ते राष्ट्रपती होते आणी हे पंतप्रधान एवढेच...
31 Jan 2015 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती केले. पण त्यांनी झाडू मारायला सांगितला असता तरी मी ते केले असते." असे म्हणणारे आद्य पार्टी वर्कर अशीही त्यांची ओळख आहे.
2 Feb 2015 - 11:39 am | बबन ताम्बे
हो, हे खरे आहे की ते रबर स्टँप होते. पण इंदिरा गांधी गेल्यानंतर शेवटी जाताना राजीव गांधींना त्यांनी नाकी नउ आणले होते असे वाचल्याचे आठवते. बहुतेक पोस्ट खात्यासंबंधीच्या बिलावर त्यांनी सही करण्यास नकार दिला होता. ते बिल काय होते ते आता आठवत नाही.
31 Jan 2015 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
John Kerry (अमेरिकेचे सद्याचे परराष्ट्र मंत्री, पूर्व सिनेटर आणि पूर्व अध्यक्षिय उमेदवार) fined $50 for failing to shovel snow
अशी लोकशाही भारतात कधी येईल ?
अगदी निवडणूकीत (जिंकलेल्या तर सोडाच पण) पडलेल्या कॉर्पोरेटरला निर्भयपणे त्याच्या चुकीबद्दल जाब विचाराणे हे फार मोठे धाडस आहे असे (सर्वसामान्य नागरिकांना तर सोडाच पण) पोलीसांना वाटायचे केव्हा बंद होईल ?
नॉर्वेतला माझा एक अनुभव : हॉटेलशेजारी असलेल्या एका रेस्तराँच्या नावावरून तिथे चमचमीत खायला मिळेल म्हणून गेलो. चमचमीत जेवण मिळाले नाही पण खर्या लोकशाहीत काय घडते याची चमक मात्र जरूर दिसली. त्या रेस्तराँचा मालक पाकिस्तानातून नॉर्वेत स्थलांतरीत झालेला आहे. गप्पा मारताना तो सहजपणे म्हणून गेला, "इथे घाम गाळावा लागतो. महागाई आहे. कर फार आहेत. पण एक मात्र त्या सगळ्यात भारी आहे." ते त्याच्याच शब्दांत, "इधर एम पी (मेंबर ऑफ पार्लमेंट) ने काम नही किया तो उसकी कॉलर पकडके पूछ सकते है ।"