ABCD म्हणजे ABCD ; की ABD, की ABCDG ,की A1BCD, की ABcD, की अबकड ? वाच्यार्थ, शब्द प्रामाण्याची स्विकार्यता, लक्ष्यार्थ कसे आणि केव्हा ठरवावेत ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
19 Jan 2015 - 1:29 pm
गाभा: 

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकांच्या जीवनातील एका आख्यायिकेत, त्यांनी त्यांच्या एका शिष्याला त्यांच्या घराच्या कंपाऊंडची भींत बांधण्याची आज्ञा दिली. शिष्याने भिंत बांधली, ती नानकजींना पसंतीस उतरली नाही त्यांनी ती शिष्यास पाडून पुन्हा बांधावयास सांगितली त्याने ती पुन्हा बांधली. तरीही नानकजींचे समाधान होईना त्यांचे भींत पुन्हा पाडून पुन्हा बांधण्याची आज्ञा देणे चालूच होते. नानकजींचे कुटूंबीय- मला वाटते त्यांची मुले त्या शिष्याला पुन्हा पुन्हा आज्ञेच्या पालना बद्दल हसून काम झाले तसे असू द्यावे असे त्यास म्हणाली पण शिष्याने इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ८-९ वेळा भींत पाडून नानकजींचे समाधान होई पर्यंत पुन्हा पुन्हा बांधली. गुरूनानकजींनी आपल्या मुलांना वंशपरंपरेने गुरुपद न देता त्या शिष्यास पुढे शीख पंथाचा दुसरा गुरू म्हणून नियुक्त केले. या आख्यायिकेत या शिष्याची गुरूप्रती असलेली श्रद्धा आणि श्रद्धेमुळे कोणतीही शंका न काढता, फाटे न फोडता, आळस न करता दिलेले काम गुरुचे पुर्ण समाधान होईपर्यंत चोखपणे केलेले दिसून येते. एखाद्या शिक्षकाने अथवा टिमलिडर दिलेला अभ्यास अथवा सराव अथवा उत्पादन आणि ग्राहक सेवेत अशीच सेवा दिली, सैन्य दलांमध्ये याच शिस्तीने काम झाले तर श्रद्धा आणि सबुरीच फळ सर्वांनाच चांगल मिळणार नाही का ?

शिरडीच्या साईबाबांचही मत गुरु हा गुरु असतो त्याच्या बद्दल शंका काढू नयेत असेच आहे. संगीत आणि इतरही क्षेत्रातील अनेक मान्यवर गुरु मंडळी त्यांच्या तर्‍हेवाईकपणा बद्दल प्रसिद्ध होती आणि त्यांची शिष्य मंडळी आपापल्या गुरुंच्या लहरी तर्‍हा आनंदाने झेलत आपापल्या क्षेत्रातील शिक्षणात उंचीही गाठत गेलेली उदाहरणे वाचण्यात येतात. या श्रद्धेत व्यक्तीप्रामाण्यही आहे आणि शब्दप्रामाण्यही आहे, काही वेळा गुरुने केलेला अधिकाराता अतीटोकाचा अब्युजीव वापरही क्वचित होताना दिसतो आणि त्यांचे त्यांचे शिष्य आणि भक्त ते स्विकारत असतात.

याच श्रद्धेने वागण्याची दुसरी बाजू बघायची झाल्यास व्यक्ती प्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य विषयक श्रद्धा कर्मकांडाप्रमाणे डोळेझाकून निभावल्या जाताना दिसून येतात. कर्मकांडाने इतर काहीच नुकसान झाले नाही तरीही वेळ आणि प्राधान्यक्रमांचा अपव्यय होण्याचा धोका शिल्लाक राहतोच. दुसरे म्हणजे संबंधीत प्रेषित, संत, गुरु, नेता काळाच्या पडद्या आड जातो काळ बदललेला असतो पण व्यक्ती प्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य बदलेल्या काळातील बदललेले परिपेक्ष आणि दृष्टिकोण न लक्षात घेताच शिष्य आणि भक्तमंडळी कालपरत्वे बदल स्विकारावयाचे नाकारून डोळे झाकुन व्यक्ती प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्य टिकवण्यावर आग्रही भर देत राहताना दिसतात. या श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील फरक कसा करावा, स्वतःला कुठे केव्हा, कसे, किती बदलावे आणि किती तसेच रहावे ? काही स्वघोषित संत महंत अशा मानवी श्रद्धा आणि भाविकांचा सरळ सरळ गैरफायदाही घेताना दिसतात मग अशा व्यक्ती प्रामाण्यावर आणि शब्द प्रामाण्यावर यथोचित टिकेचे स्वातंत्र्य टिकाकारांना असावयास हवे अथवा नको ? ज्यांच्या शिष्य आणि भक्तगणांचे सामाजिक, राजकीय वर्चस्व अथवा उपद्रवमुल्य अधिक त्या प्रमाणात टिकाकारांना अमूक एक स्वातंत्र्य द्यावे किंवा नको हे ठरवावे ?

ग्रंथ प्रामाण्य मानणार्‍या जुन्या काळातील असंख्य ग्रंथ परंपरा मौखिक होत्या त्यात मूळ लेखकास अभिप्रेत नसलेले ABD, किंवा ABCDG ,किंवा A1BCD, किंवा ABcD, किंवा अबकड असा एकही बदल जाणता अजाणता न होताच मौखिक परंपरा अत्यंत शुद्ध स्वरूपातच प्रत्येक पाठांतरकर्त्या व्यक्तीने जपल्या (एकही अक्षर-शब्द-अर्थ गहाळ अथवा चूक न करण्या एवढे सगळ्या मौखीक परंपरातील सगळे पाठांतरकर्ते अलौकीक असल्या प्रमाणे शब्दप्रामाण्यवाद्यांचे वर्तन हा ही अत्यंत महत्वाचा विषय पुरेशा चर्चे विना राहून जाताना आढळतो) , किंवा काळाच्या ओघात भाषेतील अर्थ / अर्थछटात , परिपेक्षामंध्ये काहीच बदल न होता हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचले आहे का ?; आम्ही जे प्रमाण म्हणून वाचतो विश्वास ठेवतो ते किती प्रमाण असते की आम्ही काळाप्रमाणे बदलूच नये ?

या धागा लेखाचा विषय उपरोक्त मुद्द्यापर्यंत मर्यादीत नाही तो बराच व्यापक आहे हे लक्षात घेता यावे म्हणून धागा लेख शीर्षक मोठे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दप्रामाण्याबद्दलही लोक प्रामाणिक नसतात अथवा गोंधळतात पण ABCD मधील अंशिक मजकुर खाऊन ABD असे वाचणे, किंवा आपल्या सोईचे ABCDG किंवा A1BCD किंवा ABcD, किंवा अबकड जोड देऊन बदल करून वाचणे, जिथे कोणताही लक्ष्यार्थ अभिप्रेत नाही तेथे लक्ष्यार्थ योजणे किंवा चुकीचा लक्ष्यार्थ योजणे आणि जिथे लक्ष्यार्थ अभिप्रेत आहे तो बाजूस ठेऊन वाच्यार्थास चिटकून राहणे असे होता नाही दिसते का ? वाच्यार्थ केव्हा घ्यावा लक्ष्यार्थ केव्हा घ्यावा आणि आपण सुयोग्य लक्ष्यार्थ वापरतो आहोत हे कसे ठरवावे असे तुम्हाला वाटते ?

*** चर्चा संक्षेप ***

* धू म्हणले की धुवायचे, पॉलिसी केव्हा योग्य केव्हा अयोग्य ?

* त वरून ताकभात असा अर्थ किंवा दोन ओळींच्या मध्ये अर्थ केव्हा काढावा केव्हा काढू नये ? त म्हणजे त च समजावे आणि सूतावरून स्वर्ग गाठायचे केव्हा टाळावे ?

* ध चा मा होतो आहे हे केव्हा आणि कसे लक्षात घ्यावे ?

*** *** ***

* मी वर नमूद केलेल्या आख्यायिका या माझ्या आंतरजालावरील वाचनावर आधारीत आहेत, चुक भूल देणे घेणे.
* प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

माहितगार's picture

19 Jan 2015 - 1:37 pm | माहितगार

धागा लेखात एके ठिकाणी टिकवण्यावर एवजी टिवण्यावर असे झाले आहे ते दुरूस्त करून देण्यात संपादकांचे सहकार्य हवे आहे. सुवाच्यतेसाठी अजून थोडे संपादन करावयास लागेल ते सवडीनुसार संपादकांना व्यनीने कळवेन.

अत्रन्गि पाउस's picture

19 Jan 2015 - 2:45 pm | अत्रन्गि पाउस

शुद्ध तात्विक चर्चा होईल (धर्म /श्रद्धा आदी बाबींना लक्षात घेतले जाणार नाही) असे गृहीत धरतो ...

शिष्याने भिंत बांधली, ती नानकजींना पसंतीस उतरली नाही त्यांनी ती शिष्यास पाडून पुन्हा बांधावयास सांगितली त्याने ती पुन्हा बांधली. तरीही नानकजींचे समाधान होईना त्यांचे भींत पुन्हा पाडून पुन्हा बांधण्याची आज्ञा देणे चालूच होते.

प्रश्न असा कि पडायची भिंत का पडायची / अजून सुधारणा काय हव्यात ? / नमुना काम (prototype) आदी मार्ग असू शकतात ...
अर्थात आपल्या कडे ज्येष्ठांना 'का' विचारणे हेच अशिष्ट समजले जाते ...

दुसरे म्हणजे गुरुचे विशिष्ट वर्तन / अपेक्षा ह्या 'ज्ञानदान' ह्याला अनुलक्षून आहेत कि वैयक्तिक लहरीपणा म्हणून आहेत हे बघणे आवश्यक आहे ... कित्येकवेळा असे वाटते कि ह्या सगळ्या प्रकारात अनेक मौल्यवान ज्ञानसाठे कालौघात नष्ट झाले असावेत ...

अपात्री दान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे ठीक आहे पण एकदा आत आल्यावर अघोरी कामे, अमानुष वागणूक, मारहाण हे सगळे पटत नाही ...

असो विषय मोठा आहे ...पुढील प्रतिसाद आले कि अजून बोलूयात

माहितगार's picture

20 Jan 2015 - 4:48 pm | माहितगार

प्रश्न असा कि पडायची भिंत का पडायची / अजून सुधारणा काय हव्यात ? / नमुना काम (prototype) आदी मार्ग असू शकतात ...
अर्थात आपल्या कडे ज्येष्ठांना 'का' विचारणे हेच अशिष्ट समजले जाते ...

हम्म.. खरय आधीच नेमक काय हवय हे माहित असेल तर ट्रायल अँड एररची संख्या आणि गरज कमी होईल. काम परिपूर्ण आणि नेमके (मेटीक्यूलस) हवे असेल तर, काम करून घेणार्‍याची दृष्टी आणि करून देणार्‍याची समजक्षमता दोन्हीही महत्वाची असावी. पण बर्‍याच वेळा या व्यक्ती अथवा संवाद कुठे तरी कमी पडतात.

असे म्हणजे असेच हवे ह्याचे व्यक्तीगत / सांघिक शिस्तीच्या दृष्टीने महत्व रहातेच. टिम प्लेयर्स वेळच्यावेळी आअणि अभिप्रेत पद्धतीने काम करणार नाहीत तर टिम लिडर समोर मोठीच समस्या उभी राहू शकते. टिम प्लेयर्स मध्ये बेशीस्त असेल तर जबाबदारीच्या भावनेचा अभाव असू शकतो आणि एक टिम म्हणून याची मोठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष किमंत चुकवली जावी लागू शकते.

काम करून घेणारा टिम लिडर उपरोक्त कारणामुळे असेल किंवा स्वभावाचा भाग असेल म्हणून त्याच्या वागण्यात अहंकार व असुरक्षीततेची भावनेने ग्रस्त असेल तर असे म्हणजे असेच हवे धू म्हटले कि धुवायचे या अट्टाहासाला पेटलेला असू असू शकतात. जे टिम लिडर गरज नसतानाही प्रत्येक बारीक स्टेप सुद्धा अमूक पद्धतीनेच झाली पाहीजे म्हणून प्रत्येक अनावश्यक स्टेपसुद्धा सूचना देऊन नियंत्रीत करतात अशा व्यवस्थापकांसाठी इंग्रजीत micro manager असा शब्द प्रयूक्त केला जातो. अनावश्यक स्टेप्सवर सूचना देऊन नियंत्रीत करण्याने सूचना घेणारी व्यक्ती वैतागू शकते, किंवा त्यांच्या सर्जनशिलतेस आणि नेतृत्व गुणांना विकास अथवा वाव मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो हि बाब micro manager च्या लक्षात येत नाही आणि मग micro manager ला कसे मॅनेज करावे असा नवा प्रश्न उभा टाकतो.

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:01 pm | माहितगार

दुसरे म्हणजे गुरुचे विशिष्ट वर्तन / अपेक्षा ह्या 'ज्ञानदान' ह्याला अनुलक्षून आहेत कि वैयक्तिक लहरीपणा म्हणून आहेत हे बघणे आवश्यक आहे ...

सहमत, गुरु एखादी गोष्ट ज्ञानदानच्या दूरदृष्टीने करून घेतो आहे का निव्वळ लहरीपणा आहे हे कळण्याचा शिष्याकडे मार्ग अत्यंत मर्यादीत असू शकतो. गरुची/ टिम लिडरची दूरदृष्टी समजून न घेता आधीच फाटे फोडण्यातही पॉईंट नसावा. शिष्य / टिम सदस्य असतील त्यांच्यातही यू अ‍ॅटीट्यूड आणि टिम लिडरची दूरदृष्टी समजून घेण्याची गरज असू शकते. का ? हा प्रश्न विचारणे आणि गुरुने उत्तर देऊन संवाद पूर्ण करणे हा महत्वाचा भाग पण शिष्य / टिम सदस्य नकारात्मक भावनेने ग्रस्त असतील अथवा त्यांच्या व्यक्तीगत प्रिओरिटीज काही वेगळ्याच असतील असेही होऊ शकते.

कित्येकवेळा असे वाटते कि ह्या सगळ्या प्रकारात अनेक मौल्यवान ज्ञानसाठे कालौघात नष्ट झाले असावेत ...

थोडस पटतय अर्थात या बाबत आपण काय म्हणताय ते अधिक विस्ताराने माहित करून घेणे आवडेल.

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:03 pm | माहितगार

अपात्री दान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे ठीक आहे पण एकदा आत आल्यावर अघोरी कामे, अमानुष वागणूक, मारहाण हे सगळे पटत नाही ...

सहमत

माझीही शॅम्पेन's picture

19 Jan 2015 - 3:42 pm | माझीही शॅम्पेन

कळळ नाही .. त्या मुळे पास !!!

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:04 pm | माहितगार

धाग्याला भेट दिल्या बद्दल धन्यवाद

पगला गजोधर's picture

19 Jan 2015 - 4:57 pm | पगला गजोधर

तुमचा (धार्मिक, सांप्रदायिक, प्रांतीय, भाषिक भावना न दुखवता) चर्चा घडवण्याचा, हा प्रयत्न (डीट्टो जसा आमिरने पीकेमध्ये केलाय) आवडला. तरीपण पास….

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:10 pm | माहितगार

तुमचा (धार्मिक, सांप्रदायिक, प्रांतीय, भाषिक भावना न दुखवता) चर्चा घडवण्याचा, हा प्रयत्न (डीट्टो जसा आमिरने पीकेमध्ये केलाय) आवडला.

:) कदाचित काँटेक्स्ट दिलेतर बरे राहीले असते कारण काही जण धागा लेख आणि चर्चा विषय कळले नाहीत असे ही नोंदवताना दिसताहेत. मी उल्लेख मुद्दाम टाळले असेही नाही एकतर धागा लेख आणि चर्चा एखाद्याच विवादात अडकून राहिली असतीका माहित नाही मुख्य म्हणजे धागा लेख लिहिण्यासाठी माझ्या स्वतःच्या वेळेच्याही मर्यादा आल्या असे वाटते.

प्रतिसादासाठी धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

19 Jan 2015 - 7:13 pm | बोका-ए-आझम

इथे गुरु हा सर्वज्ञानी आहे हे एक महत्वाचे गृहीतक किंवा assumption आहे. त्यामुळे गुरुवरची श्रद्धा ही निरपेक्ष आहे. त्याचप्रमाणे गुरुचीही शिष्याबद्दल किंवा त्याच्या क्षमतेबद्दल खात्री आहे. पण जर अशी श्रद्धा नसेल तर असं घडणं कठीण आहे. नानकांच्या कथेमध्ये त्या शिष्याने भिंत पुन्हापुन्हा बांधण्याचं कारण कदाचित हे पण असू शकतं की त्याला गुरुंकडून या कष्टांच्या मोबदल्यात काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती. ती न ठेवता जर त्याने निव्वळ गुर्वाज्ञा म्हणून काम केलं असतं तर आपण नक्कीच गुरुंवरची श्रद्धा म्हणू शकतो. पण असं ठरवता येण्यासाठी आपल्याला दुस-याच्या मनात डोकावून बघता येण्याची क्षमता पाहिजे, जे शक्य नाही.

हम्म.. श्रद्धा आणि विश्वासाच नातं येथे महत्वाचे असेल का ?

हरकाम्या's picture

19 Jan 2015 - 11:00 pm | हरकाम्या

तुम्हाला नेमके काय लिहायचे आहे?

भृशुंडी's picture

20 Jan 2015 - 1:00 am | भृशुंडी

प्रश्न कळला नाही.

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:22 pm | माहितगार

आपण धागा लेखातील आख्यायिका क्षणभरासाठी बाजूस ठेऊन धागा लेखास अभिप्रेत काही चर्चा विषय मराठी म्हणींच्या स्वरूपात लक्षात घेऊ.

* धू म्हणले की धुवायचे, पॉलिसी केव्हा योग्य केव्हा अयोग्य ?

* त वरून ताकभात असा अर्थ किंवा दोन ओळींच्या मध्ये अर्थ केव्हा काढावा केव्हा काढू नये ? त म्हणजे त च समजावे आणि सूतावरून स्वर्ग गाठायचे केव्हा टाळावे ?

* ध चा मा होतो आहे हे केव्हा आणि कसे लक्षात घ्यावे ?

ह्या वरुन आठवलेला एक विनोद.
A young monk arrives at the monastery. He is assigned to helping the other monks in copying the old canons and laws of the church by hand. He notices, however, that all of the monks are copying from copies, not from the original manuscript.

So, the new monk goes to the head abbot to question this, pointing out that if someone made even a small error in the first copy, it would never be picked up. In fact, that error would be continued in all of the subsequent copies.

The head monk says, "We have been copying from the copies for centuries, but you make a good point, my son." So, he goes down into the dark caves underneath the monastery where the original manuscripts are held as archives in a locked vault that hasn't been opened for hundreds of years.

Hours go by and nobody sees the old abbot. So, the young monk gets worried and goes down to look for him. He sees him banging his head against the wall and wailing, "We missed the "R", we missed the "R". His forehead is all bloody and bruised and he is crying uncontrollably.

The young monk asks the old abbot, "What's wrong, father?" With a choking voice, the old abbot replies, "The word was CELEBRATE!"

मंदार कात्रे's picture

20 Jan 2015 - 1:50 am | मंदार कात्रे

मार्मिक

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:23 pm | माहितगार

अगदी मार्मिक

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2015 - 11:20 am | टवाळ कार्टा

=))

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:24 pm | माहितगार

:)

कंजूस's picture

20 Jan 2015 - 7:23 am | कंजूस

उत्तम शिष्य म्हणजे वरिष्टांच्या चुका न काढता स्वत:चे डोके न वापरता आज्ञा मानून काम करणे . रवि{ग्रह} प्रभावी लोक असे चांगले शिष्य होतात परंतू यांचा कार्यकाल २८ ते ५८ असतो नंतर रविचा अस्त होतो आणि यांचा नाकर्तेपणा ,कामातल्या चुका दिसू लागतात. यांच्याकडे कल्पनाशक्ती, लोकप्रियता {चंद्रप्रभावी} दूरदृष्टी ,धोरणीपणा{शनिप्रभावी}आणि मर्म जाणण्याचे गुणांचा{बुध} अभाव असतो .बरीच वर्षे दराऱ्याने खुर्चि{नोकरीतली}अडवून ठेवतात.राजा होऊ शकत नाहीत ,मंत्री होतात.

माहितगार's picture

20 Jan 2015 - 5:29 pm | माहितगार

स्वत:चे डोके न वापरता आज्ञा मानून काम करणे .

ची परिणती

कल्पनाशक्ती, लोकप्रियता दूरदृष्टी ,धोरणीपणा आणि मर्म जाणण्याचे गुणांचा अभाव असतो .बरीच वर्षे दराऱ्याने खुर्चि{नोकरीतली}अडवून ठेवतात. राजा होऊ शकत नाहीत ,मंत्री होतात.