" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?..."

Primary tabs

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in राजकारण
15 Jan 2015 - 6:45 pm

" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ?...."

"महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एकमहान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एकमोठा प्रश्न निर्मान होतो. भारतामधील कोणत्याही प्रांतात राहणार्या व्यक्तीला दुसर्या कोणत्याही प्रांतात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, हे आम्हालाही मान्य आहे.पण जो माणुस ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वाडवडीलांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी त्या मराठी माणसाला जिवण जगण्याकरता त्याच्याच जन्मस्थान असलेल्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्य नसावे हे कुठपत योग्य आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक दुसर्या राज्यातील लोक येउन व्यवसाय करत आहे व एक आनंदी जिवण जगत आहेत, मराठी माणसाचा त्याला नक्कीच विरोध नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या परप्रांतीय लोकांसाठी मराठी माणसाचा काहीही विरोध नाही हे खरे असले तरी पण महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल. महाराष्ट्रामध्ये कोणीही हिंदु नाही तर मुसलमानही नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार्या माणसाचा धर्म आणि जात ही मराठी आहे.महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणुन १००हुन अधिक लोकांनी बलीदान दिले आहे, तेव्हा कुठे मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राला म्हणजेच मराठी माणसाला मिळाली. परंतु या मुंबई मध्ये आज अनेक परप्रांतीयांचे लोंढेचे लोंढे येत आहे, या लोंढ्याच्या गर्दीमध्ये मराठी माणुस हरवुन गेलेला दिसत आहे.मुंबई मराठी माणसाची हे परप्रांतीय लोंढे मानायलाच तयार नाही, कारण मराठी माणसाला गुलामगिरीची सवय झालेली आहे असा समजपरप्रांतीय लोंढ्याचा झालेला दिसत आहे.परंतु मराठी माणुस शांत आहे पण षंढ नाही हे ही त्या परप्रांतीयांनी लक्षात घ्यायला हवे.
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना, राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या विषयावर अनेक पक्षांनी मतासाठी राजकारण केल. परंतु ते पक्ष मात्र या विषयावर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत असे अजुनतरी दिसत नाही आहे.महाराष्ट्रामधील "मुबई मध्ये काय व्यवसाय करता? मुबंई मध्ये ट्राफीकजाम मध्येच तुमचा बराच वेळ वाया जातो, तुम्ही आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा पुरवु " हे वाक्य आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांन
ी वापरलेले. आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एकमोठा प्रश्न निर्मान होत आहे.
मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्य
े कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कसकाय सहन करतोय?, हा संशोधनाचा विषय बनला आहे.महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कोण असणार? हे सर्व दुसर्या राज्यामध्ये राहणारे नेते ठरवत होते व ठरवत पण आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण राहणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ?हे मराठी माणुस का ठरवु शकत नाही, मराठी माणसाची बुद्धी एवढी षंढ झाली आहे का? की ती षंढ करण्याचा प्रयत्न परप्रांतीय लोक करतायत. ? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी मराठी माणुस असला तरी महाराष्ट्रामधील कोणतेही निर्णय घेण्याकरता त्याला दिल्ली कडेच का पाहावे लागते? हा ही एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कोणताही निर्णय घेताना दिल्लीकडे बघावे लागणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेकडेच बघावे लागेल. असे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी तरी येईल का?. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमक राहणार्या राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांना मराठी माणसाच्या हिताकरता राजकीय स्वार्थ सोडुन एकत्र येण्यास काय हरकत आहे? हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. मराठी माणसाला या दोघांकडुन बर्याच प्रमाणात अपेक्षा आहे, या दोघांच्या भांडणामध्ये मराठी माणसाचे मतांतर होउन मराठी माणसाचेच नुकसान होत आहे व परप्रांतीय समाजाचे लोक हे आपल्या मराठी माणसांमध्ये फुटपाडुन महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतो आहे व आपल्याच माणसाला हाताशी धरुनतो राज्य करताना पणदिसत आहे.महाराष्ट्रामधील मराठी लोकांच्या अस्मितेला असणारा धोका टाळण्यासाठी मराठी माणसाला आपसातील भांडणे विसरुन एकत्र यावेच लागेल व मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अस सरकार आणावेलागेल की ज्याचा मुख्यमंत्री कोण्या दिल्लीवरुन नाही तर महाराष्ट्राच्या एखाद्या शहरामधुन, गावामधुन किंवा गल्लीमधुन ठरवला जाईल .......
संजयराजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 09561730189
EmailId: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2015 - 6:50 pm | धर्मराजमुटके

एकाच दिवसात एवढ्या जिलब्या ? मिपावर अजून एक हलवायांचे आगमन. नमस्कार आणि मिसळपाववर स्वागत. बाकी चालू द्या.

दिनेश सायगल's picture

15 Jan 2015 - 6:53 pm | दिनेश सायगल

रतीबच टाकताय जनू.

Sanjay Kokare's picture

15 Jan 2015 - 7:02 pm | Sanjay Kokare

धन्यवाद सर, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

मराठी मानसावर एवढा अन्याय होत असुन सुद्धा मराठी माणुस का शांत असेल हो

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 9:51 pm | आजानुकर्ण

थंडीमुळे थंड पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडा उन्हाळा येऊद्या मग कसा तापतो ते बघा.

अनुप ढेरे's picture

15 Jan 2015 - 10:53 pm | अनुप ढेरे

द. गोलार्धातला मराठी माणूस तापला असेल आत्ता... त्यांचा बघा उपयोग करता येतोय का?

अनुप ढेरे's picture

15 Jan 2015 - 10:54 pm | अनुप ढेरे

त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यु झिलंड, अफ्रिका इथले मराठी लोक शोधा सध्या...

जर थंडीतच काकडला तर लोक थंडीतच राज्य करतील आपल्यावर

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 10:02 pm | आजानुकर्ण

हो पण उन्हाळ्यात तापल्यावर आपण चटके देऊ ना त्यांना. नाहीतर त्यांचं घर उन्हात बांधू. घाबरता कशाला. मराठा गडी यशाचा धनी!

आपल घरच तर हिरावण्याचा प्रयत्न आहे त्यांचा

आजानुकर्ण's picture

15 Jan 2015 - 10:11 pm | आजानुकर्ण

कुणाचा?

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2015 - 10:14 pm | धर्मराजमुटके

बास झालं की आता ! किती पिडणार आता ?
नया हय वह :)

आजाणुकर्ण सर परप्रांतीयाचा

धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिलीत.

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2015 - 10:43 pm | धर्मराजमुटके

आपला नम्रपणा आमच्या ह्रदयास फार फार भिडला आहे. माणसाने कित्ती कित्ती णम्र असावे बरे !

संजय कोकरे हा तुमचा डूआयडी तर नाहीना ?

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 8:13 am | धर्मराजमुटके

फोन नंबर दिलाय ना लेखात. फोनवून खात्री करुन घ्या. :)

तुम्हाला अस का वाटतय, हा लेख तर माझा देशोन्नतीत छापुन आला आहे

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 3:51 pm | बॅटमॅन

मुटके सर, आपल्या 'धर्मराज' नावाप्रमाणेच आपणही नम्र आहात. आपलाच नम्रपणा आम्ही घेतला बरे.

नक्कीच तुमच स्वागत आहे बॅटमन सर

पिवळा डांबिस's picture

16 Jan 2015 - 12:18 am | पिवळा डांबिस

महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल.

अरे समदा चोक्कस! अरे पन ते आमाला कसाला सांगते? ते 'स्वतंत्र विदर्भ' मागनारे तुमचेच फडणवीस आणि मुनगंटीवार बसलेत तेनला सांग नी!
आमी काय महरास्ट्राचा तुकडा करुन मांगते काय? तुकडा करून मांगते?
काय तो तुजा तिरस्कार असेल तर तो तेनला दाखव नी!!!

इरसाल's picture

16 Jan 2015 - 5:12 pm | इरसाल

नक्की मारवाडी की गुजराती की सौराष्ट्र की कच्छ ?

शैलेन्द्र's picture

16 Jan 2015 - 5:34 pm | शैलेन्द्र

मुंबैकर बेपारी..

अत्रन्गि पाउस's picture

16 Jan 2015 - 5:59 pm | अत्रन्गि पाउस

हे इंडियन गवरमिंट वाले बेपारी लोग ला साले लय सतावते

मराठी माणसा साठी राजकिय पक्ष काही ही करु शकत नाहीत.. ना राज ठाकरे.. ना उद्धव ठाकरे ना भाजप ना राष्ट्रवादी..
ते जे काम करतील हे त्यांना निवडुन यायचे म्हनुन त्यात समस्त मराठी उद्धार वगैरे काही नसते.. ते त्यांचे निवडुन आल्याने/येण्यासाठी चे काम असते .. ते ते करत असतात ( ते योग्य केले असते तर समस्त मराठीजन आज सुखी झाला असता).

मराठी उद्धारासाठी .. लेखनी हाती आली पाहिजे.. भ्रष्टचारमुक्त (निदान प्रमाण कमी झाले पाहिजे) महराष्ट्र झाला पाहिजे.
राज- उद्धव एकत्र येवुन मराठी माणासाचा उद्धार होणार हे तरी मला पटत नाही.. उगाच कशाला आशा.

मराठीच नाही प्रत्येक राज्यातील सामान्य माणासाची अशीच अवस्था झालेली असेन .. मुंबईतील लोंढें थांबत नाहीयेत.. तर आपण निदान कोल्हापुर - नागपुर - नाशिक या शहरांना पर्याय म्हणुन निदान पुण्यासारखे केले पाहिजे.

आणि लोकसंख्या ही महाराष्ट्राचीच नाही तर पुर्ण भारताची समश्या झाली आहे, आटोक्यात येणार नसेल तर उद्या मुंबईप्रमाणे सर्वत्र गर्दीच गर्दी असेन

चिरोटा's picture

31 Jan 2015 - 6:10 pm | चिरोटा

१९७०,१९८०..२०१५.कुठल्याही काळात हा लेख फिट्ट बसतो.

आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एकमोठा प्रश्न निर्मान होत आहे.
मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्य
े कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कसकाय सहन करतोय?

त्यात गैर काय आहे? दुसर्या राज्यात उद्योग गेले तर आपसूक 'लोंढे' ही जातील ना दुसर्या राज्यात? मग आपल्या उत्तम व्यवस्थेवरचा तथाकथित 'ताण'ही कमी होईल. असो!.
सध्याच्या काळात उद्योग धंदे कायम स्वरूपी एकाच ठि़काणी असले पाहिजेत ही मागणी गैरवाजवी वाटते. सुरुवातीच्या काळात(१९६० ते १९९०)मध्ये मोठे प्रकल्प्,उद्योग राज्यात आले ते तेव्हाच्या सरकारांनी सवलती दिल्याने व राज्यात व्य्वसाय करणे सुसह्य होते म्हणून.नंतर १९९१,परिस्थिती बदलली.कंपन्या हिमाचल प्रदेशपासून मदुराईपर्यंत ,भुज पासून कलकत्यापर्यण्त जाऊ लागल्या.२००० नंतर तर परिस्थिती खूपच बदलली. रस्ते,महामार्ग,टेलिफोन्,इंटरनेट ह्यात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. ह्यावेळी ईतर राज्य राज्यसरकारांनी अनेक सवलती देऊन मोठे उद्योग आकर्षित केले.महाराष्ट्रानेही नक्कीच प्रयत्न केले असणारच पण 'मुंबई जवळ','पुण्या जवळ' ह्या पूर्वी आकर्षणाच्या मुद्द्यांना प्रचलित व्यवस्थेत विशेष महत्व राहिले नाही.हे पूर्वीचे मुद्दे नव्या व्यवस्थेत चालणार नाहीत हे ओळखून राज्य सरकारने पावले उचलावयास हवी होती.
सध्याच्या काळात जमीन स्वस्त्,कुशल कामगार,कायदा सुव्यवस्था,पायाभूत सुविधा.. जी राज्ये हे पुरवतील..तेथे उद्योग्,व्यवसाय जातील.

नविन सरकार काय करते आहे ते बघूया.

परप्रांतिय, लोंढे वगैरे म्हणण्याआधी आपल्या राज्याचीच लोकसंख्या अफाट, उत्तर प्रदेश खालोखाल आहे-११ कोटी हे ल़़क्षात घेऊया. तेव्हा ह्या आद्ळणार्या ह्या 'लोंढ्या'मध्ये आपल्या राज्याचीच माणसेही असणार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2015 - 6:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओ कोकारे साह्येब काहाले धतिंग करू राहले!!! महाराष्ट्रियन लोकाइची लायकी हाय काय?

"मिपावर मराठवाडी माणसांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न होतोय ?" *wink*

अवांतर-माझा लेख मराठवाडा नेता मध्ये छापुन येणार आहे.

माहीत नव्हत कोणी मोर्शीचही सापडेल...

वेल्लाभट's picture

7 Feb 2015 - 5:21 pm | वेल्लाभट

अहो; ते महत्व वगैरे गेलंय कधीच. त्यामुळे राहुद्या.

एक सहज प्रश्न.....तुम्ही मुंबईत कुठेही ति-हाईताशी बोलताना कुठल्या भाषेत बोलता?

त्याचच पुनरज्जीवन झालं म्हणायचं काय ;)

सांरा's picture

10 Feb 2015 - 8:34 pm | सांरा

बोलताय का?

स्वाक्षरी :-
நான் ஒரு தடவ சொன்னா, நூறு தடவ
சொன்ன மாதிர..!!!

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 10:10 pm | टवाळ कार्टा

हायला....तुम्ही अल्लादिनचा जीन काय? :)

नान ओरु तडव सोन्ना, नूर्रु तडव सोन्ना मात्र!

मी एक सांगकाम्या राक्षस आहे, सांगितल्यास शंभरांना लोळवतो?

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2015 - 10:29 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो सोडा सगळ्यात होपलेस मराठी माणूसच आहे. आमच्या कोकणातल्या केळशी गावात गेल्या ८-९ पिढ्या राहणार्‍या मारवाड्याचे कुटुंब अजूनही घरात मारवाडीतचबोलतें आणि मुंबई पुण्यासारख्या अस्सल मराठि शहरात राहणारे मराठी लोक पोरं विंग्रजी शाळेत जातात आणि कॉस्मो मुलांच्या संगतीत असतात म्हणून मराठीत बोलत नाहीत. तिच गत बृहन्महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी लोकांची "हमारे यहाँ हिंंदी चलती है" म्हणून मराठी बोलत नाहीत. पुण्यात येऊनही बोलत नाहीत. कसले आलेत मराठी लोक? जरा रिस्क घेऊन काम करायला नको.मराठी लोकांना गुंडगिरी पण धड करता येत नाही हो त्या दाऊदच्या टोळीत काम करतील पण स्वतःची टोळी काढणार नाहीत. गुड फॉर नथिंग.

अर्धवटराव's picture

10 Feb 2015 - 11:01 pm | अर्धवटराव

त्या दाऊदच्या टोळीत काम करतील पण स्वतःची टोळी काढणार नाहीत. गुड फॉर नथिंग.

=))
मेलो.

हाडक्या's picture

13 Feb 2015 - 10:42 pm | हाडक्या

च्यायला छोटा राजनचे नाव नाय ऐकले काय ?
बाकी सहमत पण उगी टिका करायची म्हणून कायपन नको

बॅटमॅन's picture

14 Feb 2015 - 2:02 am | बॅटमॅन

ह्या बाकी खरा हां. अरुणभौ गवळी, छोटा राजन इतकेच नव्हे तर दाऊदभाऊ हेही स्वतः मराठीच. नाव दाऊद असले तरी आडनावाने कासकर आहेत म्हणावं. मराठी पाऊल इथे पुढं आहे.

शिव कन्या's picture

13 Feb 2015 - 10:38 pm | शिव कन्या

बरे झाले लिहिलेत!

वेल्लाभट's picture

14 Feb 2015 - 12:18 am | वेल्लाभट

आज आयसीआय्सीआय वाल्या बाईचा फोन आला होता क्रेडिटकार्ड विकायला. हिंदीत बोलू लागली. म्हटलं मराठीत बोला. नही आता म्हणॅ हिंदी या इंग्लिश मे बात कीजिये. मी म्हटलं माफ करा तुम्ही महाराष्ट्रात आहात. मी मराठी आहे. महाराष्ट्रात कार्ड विकताय. मराठी बोलू शकत नसाल तर मी पुढे बोलू इच्छित नाही. सर आप..... कट!

Sanjay Kokare's picture

14 Feb 2015 - 11:35 am | Sanjay Kokare

वेल्लाभट्ट सर
लय भारी

सुचिकांत's picture

4 Mar 2015 - 11:16 am | सुचिकांत

संजयजी महाराष्ट्र तुम्हाला अपेक्षित असलेली राजकीय भूमिका कधीही घेऊ शकणार नाही. कारण आपले नेते महाराष्ट्र राज्यासाठी स्वार्थी नाहीत.
तो स्वार्थ जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा सर्व काही महाराष्ट्रासाठी चांगलेच घडेल.