गाभा:
जुगाड ह्या शब्दाने आणि जुगाडू वृत्तीने सध्या थैमान घातले आहे ... बर्फाच्या लादीवरून अवजड मशीन खड्ड्यात उतरवणारा माथाडी कामगार वगैरे उदाहरणे ठीक आहेत ..
अपवादात्मक परिस्थितीत एखादी युक्ती वापरून मार्ग काढणे ह्या अर्थी जुगाड इतपत ठीक आहे पण ...
- रहदारीत वेडेवाकडे घुसणे
- खाद्य पदार्थांमधील भेसळ
- परीक्षेतील उघडकीस येणारे कॉपीचे नवनवीन प्रकार
- दैनंदिन कामातील कुणी पकडू नं शकणारी कामचोरी
- शक्य तितके कायदे / संकेत / नियम ह्यांचे आपल्याला सोयीस्कर अर्थ लाऊन वाटेल तसे वागणे
- हे आणि अजून बरेच
तस्मात ...जुगाड ह्या
शब्दाखाली येणारे अनिष्ट / बेशिस्त वर्तन
हे आपल्या समाजातील अनेक समस्यांचे मूळ आहे ... ह्या जुगाड शब्दाला अनावश्यक मिळणारी प्रतिष्ठा तर सोडाच त्याचे साधे कौतुकही नको अशी परिस्थिती आहे ...
आधी जे नियम कायदे संकेत आहेत ते कटाक्षाने पाळायला शिकून तसे ते आचरणात आणून दाखवणाऱ्या व्यक्तीलाच मग त्यातील कच्च्या दुव्यांवरील बदल करण्याचा अधिकार असावा ....
काय वाटते आपल्याला ?
प्रतिक्रिया
10 Jan 2015 - 11:28 am | अत्रन्गि पाउस
मग आता काय कराच ?
10 Jan 2015 - 12:05 pm | जेपी
तुमी ज्याला जुगाड म्हणताव त्याला अनैतीकता/चोरी/चुकारपणा म्हणत्यात.
खरा जुगाड मंजे 'वडाची साल पिंपळाला' लावुन लोकांना नमस्कार करायला लावणे.
(जुगाड प्रेमी) जेपी
10 Jan 2015 - 12:20 pm | कोंबडी प्रेमी
ह्याच्यात अनैतिकता आहे का नाही ? निदान आपल्या देशात तरी ....
10 Jan 2015 - 7:25 pm | आनन्दा
तुम्हाला त्या वाक्याचा अर्थे फारसा कळलेला नाही असे दिसते..
बाकी मला कोणाचे तरी वाक्य आठवते - वी इंडिअन्स आर जुगाडू बाय नेचर, असे काहीसे तो म्हणला होता.
10 Jan 2015 - 12:26 pm | धर्मराजमुटके
जुगाड म्हणजे अॅडजस्टमेंट. आमच्या लेखी जुगाड म्हणजे अपवादात्मक परिस्थितीत एखादी युक्ती वापरून मार्ग काढणे हाच आहे आणि ते आम्हाला पदोपदी करावेच लागते कारण अपवादात्मक परिस्थिती रोजच उद्भवत आहे.
याच विषयावर आमचे आवडते महान संत ह.भ.प. कैलाश महाराज ख्रेर यांच्या मुखकमलातून निघालेले सुंदर किर्तन येथे ऐकता आणि पाहता येईल.
11 Jan 2015 - 10:53 am | चित्रगुप्त
@धर्मराज मुटके:
एकदम योग्य. आम्ही स्वतः अनेकदा अश्या जुगाडबाजीने टोपीकर मंडळींना आश्चर्यचकित करून सोडलेले आहे. पद्धतशीर पण साचेबंद विचार करणार्यांना असले काही सुचतच नाही.
आपण दिलेले गाणे (आमची अभिरूचि हेमंत कुमार, ओपी, मुकेश इ. वर पोसलेली असूनही) अत्यंत आवडले.
10 Jan 2015 - 12:27 pm | धर्मराजमुटके
हा दुवा देखील बघा.
10 Jan 2015 - 1:48 pm | धडपड्या
आपण बंकर रॅाय, अथवा बेअरफूट कॅालेज असे काही ऐकलेले दिसत नाही... अन्यथा जुगाड हा शब्द नक्कीच आदराने घेतला असता...
असेही, आपण ज्याचा उल्लेख केलाय, ते प्रकार जुगाड या टायटल खाली येत नाहीत, फसवणूक या सदरात येतात...
10 Jan 2015 - 3:44 pm | संचित
जौ द्या हो.
10 Jan 2015 - 7:02 pm | कोंबडी प्रेमी
मला बेअरफुट कॉलेज बद्दल माहिती नाही ...पण वाचतो ...
धन्यवाद
10 Jan 2015 - 6:34 pm | पिंगू
जुगाड म्हणजेच हॅकिंग म्हणता येईल. जशी हॅकिंग आणि क्रॅकिंगची तुलना करतात, तशीच तुलना इथे करता येईल.
अर्थात हॅकिंग हे चांगल्या हेतूसाठीच करतात आणि क्रॅकिंग हे अनैतिक वापरासाठीच करतात.
10 Jan 2015 - 7:01 pm | कोंबडी प्रेमी
कदाचित माझ्या मांडणीत त्रुटी असाव्यात ...
जुगाड ह्या
हे आपल्या समाजातील अनेक समस्यांचे मूळ आहे
हे माझे म्हणणे आहे ...
"वैसे ऐसा काम नाही हो सकता ...लेकीन कुछ तो जुगाड करके काम हो गया " ह्या खाली येणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो आहे ...
अर्थात जुगाड ह्याची व्याख्याच जर मुळी फक्त युक्ती जी नैतिक / कायदेशीर / सदहेतूने केलेली/ इतरांना त्रास नं होणारी असेल तर प्रश्नच मिटला ..
10 Jan 2015 - 7:38 pm | टवाळ कार्टा
हे घ्या
http://www.storyepic.com/23-pictures-will-prove-jugaad-greatest-inventio...
11 Jan 2015 - 11:08 am | चित्रगुप्त
@टवाळ कार्टा:
२३ चित्रांवाली जुगाडबाजी: मान गये उस्ताद.
12 Jan 2015 - 7:57 pm | आनन्दा
२३ वा एकदम बेस्ट... औट ऑफ द बॉक्स.
10 Jan 2015 - 9:06 pm | जेपी
जाताजता-
आमच्या जुगाडु पणाचा एक किस्सा खफवर आलता .
येळ मिळाल्यास हिकड पण टाकेन.
13 Jan 2015 - 4:42 pm | विटेकर
भारतीय आणि पाश्चिमात्य लोकांच्या विचारसरणीतील हा फरक आहे.
पाश्चिमात्य ( अपवाद असू शकतो) लोक हे बायनरी लॉजिक वापरतात तर भारतीय फजी ! त्याचे मूळ ही धर्मात आहे. हिन्दू लोक देवांकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे मानतात तर ख्रिष्चन आणि इस्लाम हे एकेश्वरवादी आहेत. त्यामुळे प्याथॉलॉजिकली भारतीय अनेकानेक पद्धतीने विचार करु शकतात , किंबहुना ते ठराविक साचेबद्ध पद्धतीने विचारच करु शकत नाहीत ! सहिष्णु असल्याने शिस्तीत वागूच शकत नाहीत.
आणि जुगाड हा त्याचाच परिपाक आहे.. मागे याच विषयावर इथे लिहिले होते , आता सापडत नाही , जौ दे !
14 Jan 2015 - 12:42 pm | अत्रन्गि पाउस
झक्कास विश्लेषण ..
कोबम्डी प्रेमी म्हणतात त्याप्रमाणे हाच प्रोब्लेम आहे ??
आय am चिंतनिंग ...