गाभा:
नमस्ते,
मला गुंतवणूक सल्ला हवा आहे. मिपा कार जाणकार असल्याने सल्ला घेणे पसंत करतोय.
१ स्थावर मालमत्ता विकून नवी १-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये स्वरुपाची गुंतवणूक करणेचे योजतोय. व्यक्तिगत शोध मोहीम सुरु आहेच. एखादा धागा मिळाला तर शोध सोपा होईल.
विशेष माहिती-::
गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
पुणे भाग म्हणजे वाघोली-कात्रज-रावेत-मांजरी हद्द गृहीत धरतोय.
नवीन सदनिकेत राहण्याचा विचार अजिबात नाही.
४-५ वर्षांनी सदनिका विकणे हा विचार पक्का.
बांधकाम सुरु असलेले प्रकल्प चालतील. ताबा मिळण्याची गडबड नाही.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
10 Jan 2015 - 5:04 am | अर्धवटराव
विचार तर उत्तम आहे. पुण्यात सदनिकेऐवजी नागपूर, नाशिक कडे प्लॉट का घेत नाहि? गडकरी आणि फडणवीस नागपूरचं मुल्य थोडं तरी वाढवतील. नाशिक, औरंगाबाद पण पर्याय आहेच.
10 Jan 2015 - 3:01 pm | कलंत्री
कर्ज मधल्या गाण्याची आठवण येत आहे.
सध्या घरे कर्जावर घेण्यासाठी परवडतात. ५० लाखाच्या घराला भाडे फारतर १.२ लाख मिळू शकते.
५० लाख जर स्थिरठेवीच्या स्वरुपात ठेवलात १० % व्याजाच्या रुपात मिळु शकते.
साधकबाधक विचार करा.
10 Jan 2015 - 8:53 pm | सुबोध खरे
पन्नास लाखाची ठेव पन्नास लाखच राहते वाढत नाही.कालांतराने पन्नास लाखाची किंमत कमी होत जाते. (शिल्केच्या पैश्याला पाय फुटण्याचीपण शक्यता असते) शिवाय त्याच्या व्याजावर आपल्याला कर भरावा लागतो. आपण जर ३०% कराच्या श्रेणीत असाल तर मिळणारे व्याज ७% असते
घराची किंमत वाढते. घराच्या कर्जाच्या मुदलावर आणी व्याजावर करातून वजावट मिळते. घर भाड्याने दिल्यास त्या उत्पन्नातून घराचे कर ई भरता येतात
हे दोन्ही हिशेब करूनच आपला निर्णय घ्यावा.
10 Jan 2015 - 5:15 pm | गुळाचा गणपती
अर्धवटराव & कलंत्री
आपला मुद्दा पटला शत प्रतिशत. माझे मुक्काम पोस्त पुणे असल्याने इथे खरेदी.
10 Jan 2015 - 9:19 pm | जेपी
मुद्दा पटला नाही.
गुतंवणुक म्हणुन 4-5 वर्षासाठी सदनिका घेणे मंजे टाईमपास.
तस पण दुसरे घर घेऊन तुम्ही तिसर्याला घर महाग करतात.
10 Jan 2015 - 11:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जेपी, अरे एक मराठी माणूस्,त्यात मिपाकर गुण्तवणूक करतोय हे पाहून आनंद वाटावयास हवा.दुसरी गाडी घेऊन तुम्ही तिसर्याला गाडी महाग करताय से म्हणतो का आपण?
जागांचे भाव वाढलेत ते प्रमाणाबाहेर केलेल्या शहरीकरणामुळे.
25 Aug 2016 - 10:02 am | वेल्लाभट
मग उद्या कुणी असंही म्हणेल की बायपास करून आयुष्य टॉप अप करून तुम्ही पृथ्वीवरची आणखी एक जागा व्यापताय.
25 Aug 2016 - 10:20 am | संदीप डांगे
वेलासेठ, जेपी काहीच चुकीचं म्हणत नाही आहेत.
एक घर असतांना दुसरं घर घेणे हे तिसर्याला ज्याच्याकडे एकही घर नाही त्याच्यासाठी महाग करणं होतं. घर ही मर्यादित वस्तू आहे. समजा शंभर घरे उपलब्ध आहेत आणि शंभर खरेदी दार आहेत, पण एकापेक्षा जास्त घरं खरेदी करण्याची क्षमता ५० जणांकडे असेल तर इतर पन्नास जणांना घरे महाग होत जातात. मागणी जास्त, पुरवठा कमी झाला की भाव वाढतात, त्यात दोन घरे घेऊ शकणारे अव्वाच्यासव्वा भाव देऊन घरांची उपलब्धी कमी करत जातात, त्यातून भाव वाढतात, भाव वाढले म्हणून परत भाव वाढतीलच ह्या आशेवर सरप्लस पैसा असणारे आणखी घरे विकत घेतात. उपलब्धी कमी होत भाव वाढत जातात. मला वाटतं , अंधेरी गोरेगाव भागांमधे सुमारे चाळीस टक्के घरे रिकामी आहेत, कारण ती गुंतवणूक म्हणून घेतलेली आहेत. चांगला परतावा मिळाल्याखेरिज ते विकत नाहीत, भाड्याने देणं-घेणं परवडत नाही,
26 Aug 2016 - 1:56 pm | मराठी_माणूस
बरोबर.
दुसरे असे की , ह्यात अप्रत्यक्षपणे बिल्डरचेच खीसे भरले जातात.
11 Jan 2015 - 2:38 am | सुहास
नाईकनवरेचा चाकणला प्रोजेक्ट चालू आहे "द्वारका" म्हणून.. बांधकामाची क्वालिटी उत्तम आहे, मंजूर टाऊनशिप आहे, ४५ लाखात दोन १ बीएचके बसतील, आज या घडीला ३-३.५ हजार प्रत्येकी भाडे मिळु शकेल .. पुढे पीसीएमसी मध्ये जाण्याची शक्यता आहे (किंवा वेगळी नगरपालिका होऊ शकते).. जरूर बघुन या.. त्याबरोबर क्रेडाई चे कसलेसे प्रदर्शन लागले आहे स्टेशन जवळ ते पण बघा.. बिल्डर्स ऑफर द्यायला लागलेत आता..
11 Jan 2015 - 11:02 am | नगरीनिरंजन
पाच वर्षात पुणे परिसरात फ्लॅट्सच्या किंमतीत किती अॅप्रिसिएशन होईल असा अंदाज आहे आपला?
12 Jan 2015 - 1:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुणे आणि मुंबई कधीच सॅचुरेशन पॉईंटला पोचले आहेत . अणि सध्या पुण्याच्या बाजुचे निर्णय होताना दिसत नाहित (आय आय एम, मेट्रो वगैरे). शिवाय ५ वर्षे हा खुप कमी वेळ आहे. त्यामुळे नाशिक /नागपूरचा विचार करावा असे वाटते.
13 Jan 2015 - 12:53 am | गुळाचा गणपती
राजेंद्र मेहेंदळे:
बरोबर. गुंतवणूक ठिकाण बदलावे लागणार असे वाटत आहे.
13 Jan 2015 - 8:22 am | समिर२०
पिसोली ला २ बि एच के आहेत स्वप्न गंगा येथे
लवकरच महापालिका हद्दित येईल
13 Jan 2015 - 12:42 pm | काळा पहाड
पिसोळी ला कचरा डेपो होतोय हो.. कशाला नसत्या फंदात पडता?
13 Jan 2015 - 12:30 pm | मराठी_माणूस
गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार करावा. घरात गुंतवणूक केल्याने घरे महाग होतात आणि ह्यात अप्रत्यक्षरित्या बिल्डरचाच फायदा होत रहतो.
13 Jan 2015 - 3:44 pm | कलंत्री
तुळशीबागेजवळा नविनतुळशीबाग नावाची योजना सुरु होत आहे. तेथे १०० चौ. फु. गाळ्याची किमंत ५० लाख पडेल असे समजते. गाळ्याची किंमत वाढत राहिल आणि व्यवसायाचा विचारही करता येईल.
13 Jan 2015 - 5:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा विचार जरा पटतोय. प्राईम लोकेशन आहे.
कालच ऐकले की लोकांनी हातात थप्प्या घेउन गर्दी केली होती गाळे बूक करायला :)
13 Jan 2015 - 5:49 pm | काळा पहाड
आईगं, थप्प्या घेवून? लोकान्कडे लय पैसा हंय आंस माँझ मत हंय. हँकींग़ शिकावं म्हन्तो.
13 Jan 2015 - 5:50 pm | काळा पहाड
"आईग़ं" अंस वाचांव
24 Jan 2015 - 8:22 pm | चारु राऊत
मुर्ख लोक घर घेतात शहाणे त्यात भाड्याने रहातात
10 Feb 2015 - 6:47 am | चारु राऊत
गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार करावा.
10 Feb 2015 - 10:29 am | कैलासवासी सोन्याबापु
इन्वेस्टमेंट म्हणालात म्हणून विचारतो, रीसेल चा चालेल का? असल्यास काही ऑप्शन देऊ शकेन
11 Feb 2015 - 3:22 pm | खटासि खट
रोहा.
गोवा महामार्गाचं चौपदरीकरण चालू आहे. मुंबई - माणगाव लोकलचं काम चालू आहे ( २०१४ मधे अपेक्षित होत). म्हणजे रोहा मुंबईचं सॅटेलाईट सिटी बनणार. ६३ सेझ जावडेकरांनी कोकणासाठी मंजूर केले आहेत. इतही कामे मार्गी लागतील. आज रेल्वेस्टेशनच्या जवळ भाव २८०० ते ३४०० आहे. लोकल झाल्यावर पाच हजाराचा ट्प्पा ओलांडेल सहज.
11 Feb 2015 - 3:38 pm | गणेशा
पिंपरी चिंचवड मध्ये नक्कीच गुंतुवनुक करा, नक्कीच ४ वर्षात दबल रिटर्न मिळेल. नाही म्हंटले तरी ५० लाखाला ७५ लाख कुठेच गेले नाहीत.
त्यातही
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटनी मधील नविन अपार्टमेंट , रावेत ( थोडे लांब आहे आता पण ४ वर्षात वाढेन) बिआरटी असुनही त्याव्यतिरिक्त ६ लेनचे रस्ते इअतर कुठे दिसतात का तरी.
पिंपरी चिंचवड हे रस्त्यांनी खुप छान जोडलेले आहे, शिवाय आता एक नविन ब्रिज होतो आहे चिखली पर्यंतचा त्यामुळे चिखली, निगडी पण जबरदस्त ऑपशन आहेच. चाकन साईड कडे हवे असल्यास स्पाईन रोड वर घ्या मस्त होयील.
असो पिंपरी चिंचवड चे जानकार आनखिन मत सांगतीलच.
माझा वयक्तीक अनुभव सांगतो,
मी रहाटनीत रो हाउस घेतले २०१० ला २५ लाख रुपयाला, आज त्याची किंमत कमीत कमी ९० लाख आहे ( १६०० sq. ft)
त्याच वेळेस बहिनीसाठी पिंपळे सौदागर मध्ये मेन जागेवर (बोरा पार्क) , जुना १ bhk ( ६३० sq ft + ६०० sq. ft गार्डन फ्लॅट), घेतला १९ लाखाला , आता ब्रोकरच ३८ लाखाला मागतोय. म्हण्जे कमीत कमी डबल.
शिवाय भाडे १०-१२ हजार आगे १ bhk तेथे. आणि रहाटनी मध्ये ८-१० हजार.
--
एक सल्ला आनखिन,
व्यव्स्थीत ओळखी असतील तर जागेच्या खरेदी विक्रीचा बिझनेस करा की. थोडी दूर जागा घ्यायची. १-२ एकर येवुन जाईन , प्लॉटींग करायचे आणि विकायचे, किंवा वेळ नसेल तर जागा घ्यायची, आणि ६ महिने टोकन देवुन पॉवर ऑफ अटर्नी करुन तीच जागा तिसर्याला जास्त किंअतीला विकायची. यात तुमचे ४५ लाखातील ४० लाख तुमच्याकडेच राहतात आणि ६ महिन्यात कमीत कमी ३-४ लाख तरी फायदा होतोच.
माझ्याकडे पैसे नाहित नाहितर या बिझनेस मध्ये उअतरणार आहे मी.. ओळखी भरपुर आहेत आता भांदवल कुठुन आणणार ?
उरुळी कांचन चे स्वताचे जुने घर जागे सहित विकायचा मनसुबा होता पण तो केन्सल करण्यात आला आहे.
11 Feb 2015 - 8:37 pm | केदार-मिसळपाव
बघा बरं...
कारण एकरकमी घर घेणार्याचे ठिक आहे पण कर्ज काढुन घेणार्याला मात्र विचार करावा लागेल.
५० लाखाला ४० लाखाचे कर्ज लागेल. (४० हजार रुपये प्रतीमहिना हफ्ता)
प्रथम १० लाख रोख हवेत.
४० लाख १५-२० वर्षांसाठी म्हणजे कमीत कमी ~२५-३५ लाख व्याज पुर्णकाळासाठी.
४-५ वर्षात विकले तर व्याज किमान ~१० लाख भरावे लागेल पुर्ण कर्ज फेडाले तरी.
मग आलेल्या किमतीतुन मूळ किंमत आणि व्याज काढुन उरलेल्या रकमेवर कर द्यावा लागेल.
तुम्हास काय वाटते?
मला वाटते की जर फ्लॅट २०-३० लाखात असेल तरच तुमचे म्हणणे लागु होते. त्यानंतर मात्र खुप जोखिम आहे.
12 Feb 2015 - 7:19 pm | गणेशा
जोखिम तर असते हो, लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधुन अशी म्हण पण आहे आपल्याकडे.
पण धागाकर्त्याकदे ४५ लाख केश आहेत म्हणुन हे मत दिले.
----
आता सिटी मध्ये घर घेने अवघड होत चालले आहे, नवी मुंबई परवडली येव्हडे पुणे - पिंपरी चिंचवड महाग झाले आहे.
--
जर ५० लाखाची इस्टेट किमान ४ वर्षात १ ते सव्वा करोड होत असेल तर आणि तरच तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने घर घेता येइल नाही तर इतक्या ओढातानी करुन काही उपोयोग होणार नाही.
12 Feb 2015 - 7:22 pm | गणेशा
आणि आता ५० चे १ करोड होण्याचे दिवस बहुतेक गेले आहेत, त्यामुळे जर लोन घेवुन घर घ्यायचे असेन तर चाकन, तळेगाव, चिखली, चंदननगर असले शहराबाहेरील भागात घर घ्यावे लागेल.
चाकण ऑप्शन चांगला आहे फक्त इन्व्हेस्टमेंट च्या द्रूष्टीने, आणि ३० मिनिटात नाशिक फाट्यावरुन (पिंपरी चिंचवड) तेथे पोहचता येते भोसरीचा ब्रिज आणि रोड चांगला असल्याने
13 Feb 2015 - 12:53 pm | नितीन पाठक
मझ्या मते सध्या वाघोली हा सर्वात बेस्ट पर्याय आहे कारण ...
पुणे ते औरंगाबाद सध्या चार पदरी हायवे आहे. लवकरच तो ६ पदरी करणार आहे. तसेच पुणे ते शिक्रापूर उड्डाणपूल करावयाचे चालले आहे. पुणे ते सुपा (ता. पारनेर) हा पट्टा ब-यापैकी औद्योगिक पट्टा झाला आहे. रांजणगाव, तळेगाव, सुपा शिक्रापूर येथे एमआयडीसी उभी राहीली आहे. रांजणगाव येथे पंचतारांकित एमआयडीसी चे काम चालू आहे. लवकरच वाघोली व इतर गावे मिळून नवीन महानगरपालिका होणार आहे. हिंजवडी येथील आयटी पार्क "फुल्ल" झाला आहे. तेथे नवीन विस्तार होण्यासाठी फारसा वाव नाही. भविष्यात बरेचसे आयटी उद्योग वाघोली येथे सुरू होतील.
वाघोली तील जागेचे, फ्लॅट चे भाव अजून मध्यमवर्गियांच्या आवाक्यात आहेत.
भविष्या मध्ये पुणे - अहमदनगर - औरंगाबाद - नागपूर हा फार मोठा हायवे होइल.
17 Mar 2015 - 3:59 pm | नितिन५८८
माझा स्वताचा औंध गावठाण (परिहार चौक पासून २-३ मिनिटे अंतर) मध्ये १bhk, ४६५ sqft विकणे आहे. अपेक्षित किंमत २७ लाख. flat ३ ऱ्या मजल्यावर आहे, semi furnished आहे. २ wheeler पार्किंग आहे.
इच्छुक मिपाकरणे nitin५८८@gmail.com वर संपर्क साधावा.
18 Aug 2015 - 6:46 pm | चारु राऊत
सध्या सामान्य जनतेच्या खिशातील पैसे कसे काढता येतील किंवा त्याला एका तऱ्हेने गृहकर्ज घ्यायला लावून आपले खिसे कसे भरता येतील हे उद्दिष्ट बिल्डर किंवा त्यांच्या धंद्यातील गुंतवणूकदारांचे आहे. कारण या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे प्रीमियम मिळते. या गुंतवणूकदारांमध्ये राजकारणी, उच्च अधिकारी, मोठे व्यापारी, उद्योजक इ. असू शकतात व तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा मात्र जाहिरातींमुळे किंवा जागाच्या भाववाढीच्या बातम्यांमुळे बळी जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तेव्हा घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वानीच गंभीरपणे विचार करा! घर खरेदीची घाई मुळीच करू नका!
18 Aug 2015 - 6:46 pm | चारु राऊत
सध्या सामान्य जनतेच्या खिशातील पैसे कसे काढता येतील किंवा त्याला एका तऱ्हेने गृहकर्ज घ्यायला लावून आपले खिसे कसे भरता येतील हे उद्दिष्ट बिल्डर किंवा त्यांच्या धंद्यातील गुंतवणूकदारांचे आहे. कारण या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे प्रीमियम मिळते. या गुंतवणूकदारांमध्ये राजकारणी, उच्च अधिकारी, मोठे व्यापारी, उद्योजक इ. असू शकतात व तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा मात्र जाहिरातींमुळे किंवा जागाच्या भाववाढीच्या बातम्यांमुळे बळी जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तेव्हा घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वानीच गंभीरपणे विचार करा! घर खरेदीची घाई मुळीच करू नका!
18 Aug 2015 - 6:48 pm | चारु राऊत
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...
18 Aug 2015 - 7:01 pm | कपिलमुनी
दिलेला दुवा सोमवार,३ मे २०१०चा आहे.
आता लेखकाची मते आणि आकडे तपासून बघा
12 Jan 2016 - 6:26 am | चारु राऊत
१. जर तुम्हाला येथून पुढे तीन वर्षांसाठी गुंतवणूक करायची झाली, तर जास्तीत जास्त रक्कम रोख्यांत गुंतवा. शक्य झाल्यास म्युच्युअल फंडाच्या योग्य त्या डेट योजनेची निवड करा. २. तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल, तर म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना निवडा. पण ही गुंतवणूकही टप्प्याटप्याने शक्य तो एसआयपी पद्धतीने नियमितपणे करीत राहा. अत्यंत तरल, पारदर्शक आणि कमी खर्चीक गुंतवणूक असून सद्य काळात सर्वाधिक लाभ देणारी ही गुंतवणूक ठरेल. ३. स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी नाहीच हे लक्षात घ्या. घर ही निवाऱ्याची जागा आहे, त्याला गुंतवणुकीचे माध्यम बनवू नका. ४. सोन्यातील गुंतवणुकीपासून जितके दूर राहाल, तितके उत्तम. याची अनेकांगी कारणे आहेत. शुद्धतेबाबत फसवणूक, घडणावळ शुल्क, चोरी, लूटमारीचा धोका अधिक जीवितास जोखीम हे सोने गुंतवणुकीचे अवगुण आहेतच, शिवाय येथून पुढे चांगल्या परताव्याचीही अपेक्षा नको. – विजय मंत्री (लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजमध्ये सल्लागार आहेत.) - See more at: http://www.loksatta.com/arthvrutant-news/article-trend-of-indian-financi...
12 Jan 2016 - 10:29 am | सुबोध खरे
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी नाहीच हे लक्षात घ्या. घर ही निवाऱ्याची जागा आहे, त्याला गुंतवणुकीचे माध्यम बनवू नका.
हे लेखकाचे मत एकांगी किंवा पूर्वग्रहदूषित आहे. (ते स्वतः शेअर बाजाराशी संलग्न अशा संस्थेत सल्लागार आहेत तेंव्हा ते असा सल्ला देणारच)
गेल्या काही वर्षात घराच्या किमती इतक्या वाढल्या आहेत कि काही ठिकाणी त्यात येणारा परतावा ३५ % पर्यंत गेला आहे.
शिवाय ती गुंतवणूक सहज विकत येत नसल्याने त्यातील पैसा हा चैनीच्या वस्तूंसाठी वापरला जात नाही आणि आणीबाणीच्या प्रसंगी मोठे भांडवल उपलब्ध होऊ शकते हा फायदा नक्कीच आहे. शिवाय घर घेण्यासाठी सहसा कर्ज घेतले जाते त्यामुळे एस आय पी च्या ऐवजी कर्जाच्या हप्त्यात पैसे महिन्याच्या सुरुवातीला आपोआप गेल्यामुळे उगाचच पैशाला वाटा फुटत नाहीत हाही एक फायदा. (एस आय पी वाले हाच फायदा कंठशोष करून सांगत असतात).
एक मूळ विचार -- कोणत्याही गुंतवणुकीच्या माध्यमात सर्व पैसे गुंतवू नका. मग ते समभाग असोत म्यूचुअल फंड असोत सोने असो स्थावर मालमत्ता असो कि मुदत ठेवी असोत.
12 Jan 2016 - 5:33 pm | सह्यमित्र
घर मध्ये कर्ज घेऊन गुंतवणूक करण्यापूर्वी हे गणित करून बघा:
कर्ज साधारण १०% दराने घ्यावे लागेल. म्हणजे प्रतिवर्षी घराची किंमत १०% पेक्षा जास्त दराने वाढली तरच फायदा होईल अन्यथा नाहि. ह्यात अगदी २% फायदा होण्या करिता दर वर्षी घराची किंमत १२% इतकी वाढावी लागेल. म्हणजेच ५ वर्ष मध्ये साधारण १.७६ पट. म्हणजे ४५ लाख किमतीचे घर ५ वर्षांनी ७९ लाख रुपये किमती ला विकले गेल्यासच काहीतरी फायदा होईल.
सध्य स्थिती मध्ये पुण्यात तरी रिकाम्या घरांची inventory खूप आहे. त्यामुळे २००३-२००९ ह्या दरम्यान जसे घराचे दर वाढले तसेच पुढे वाढण्याची शक्यता कमी आहे. ४५-५० लाख किमतीचा २BHK flat तोही धानोरी , वाघोली, धायरी, नऱ्हे अशा कमी विकसित उपनगरात. सध्या अशा अवास्तव किमती चा flat घ्यायची क्षमता असलेले लोक तुलनेने बरेच कमी आहेत. असे असताना ह्याच flat ला ५ वर्षांनी सुमारे ८० लाख देऊ शकणारे prospective buyers किती असतील ह्याचा विचार करून बघा.
12 Jan 2016 - 4:21 pm | alokhande
मला वाटतं की घरामध्ये गुंतवणूक करू नये. कारण सरकार येणाऱ्या काळात सर्वासाठी परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.
12 Jan 2016 - 4:22 pm | वेल्लाभट
फारच ब्वा आशावादी तुम्ही!
12 Jan 2016 - 6:02 pm | NiluMP
सर्वासाठी नाही फक्त झोपडपटी वाल्यांसाठी
23 Aug 2016 - 9:05 pm | चारु राऊत
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी नाहीच हे लक्षात घ्या. घर ही निवाऱ्याची जागा आहे, त्याला गुंतवणुकीचे माध्यम बनवू नका.मूर्ख माणसे घरे विकत घेतात शहाणे त्यात भाड्याने राहतात.
25 Aug 2016 - 6:02 am | मराठमोळा
४-५ वर्षात घर विकायचे म्हणजे मोठी रिस्क आहे. त्यात एकच घर घेणार म्हणजे नुकसान जास्त होण्याची शक्यता.
घर घेताना स्टॅंप ड्युटी, सोसायटी, ट्रांसफर, वीज वगैरे नवावर करण्याचा खर्च ध्यानात घ्या. एजंट असल्यास २% त्याला द्यायचे. (सर्व साधारण घर जितक्या रुपयांना घ्यायचं आहे त्यात ८ % वाढीव खरच धरा) रोख व्यवहार आहे म्हणून कर्ज आणि व्याज लागणार नाही. चांगला भाडेकरु मिळणे अवघड, घराच्या अंतर्गत मेंटेनंससाठी वेळ आणि पैसा दोन्ही लागतो. भाडे नगण्य असते. सोसायटीचा मेंटेनंस आणि ईतर खर्च (टॅक्स वगैरे) यातच बराच पैसा जातो.
पुन्हा घर विकताना एजंटला पैसे देणे आले. झालेल्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागेल (काळाबाजार नाही केला तर), कागपत्रांच्या (यात खुप खाच खळगे, गडबडी असतात) भानगडीत वेळ आणि मानसिक त्रास होतो तो वेगळा.
सगळी रक्कम एकाच ठिकाणी गुंतवण्या ऐवजी, वेगवेगळ्या पर्यायांमधे गुंतवावी, त्याने रिस्क कमी होते.
25 Aug 2016 - 6:04 am | मराठमोळा
लेख बराच जुना आहे हे पाहिलेच नाही.. मिपाकर काय उकरून काढतील भरवसाच नाही. ;)
असो.