पालीचं शेपूट

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
11 Aug 2008 - 8:34 am
गाभा: 

"मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.
"पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते."

"अंतरज्ञान म्हणजे"व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान."
कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक.पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे."
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.

"मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.

अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती.बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी "कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे.
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,त्यामुळेच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली.त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं."

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 Aug 2008 - 4:20 pm | विजुभाऊ

प्रत्येकानेच नको असलेली शेपटं कधीतरी टाकुन द्यायला हवीत.
पाल हे आपल्याकडे लक्क्षुमीचे प्रतीक मानतात.
बालाजीच्या देवळातल्या पालीच लोक आवर्जुन दर्चन घेतात. स्पर्श करुन घेतात

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ's picture

12 Aug 2008 - 8:29 pm | लिखाळ

लेख छान.
एक शेपूट टाकले की पालीला कालांतराने दुसरे फुटते. आपल्याबाबतीत सुद्धा असेच होत असावे. रिटायरमेंटनंतर नोकरीचे शेपूट गळले तरी नातवंडे, त्यांच्या परिक्षा आणि इतर अनेक शेपट्या फुटतच असतात.
-- (सात शेपट्यांचा)लिखाळ.