श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
8 Jan 2015 - 11:18 am
गाभा: 

आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य, आंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजवत नाही आणि ते शक्य ही होत नाही.
अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या आणि आचरणात आणण्यासारख्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात. आत्मविश्वास वाढवतात. "साधेच ओषध पण अत्यंत गुणकारी" असा अनेक अभ्यासार्थींचा अनुभव आहे. आजपर्यंत १००,००० लोकांनी या ज्ञान पाणपोईचा लाभ घेतला आहे.
आता श्रवण केलियाचे फळ / क्रिया पालटे तात्काळ - अशी निः संदेह ग्वाही स्वःत समर्थच देतात आणि अनेकांचा तसा अनुभव आहे.श्री. समर्थ सेवा मंडळाच्या 'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास आता ई-मेलद्वारे ही सहज शक्य झाला आहे.
• हा 'अभ्यासक्रम आहे - पारायण नाही. समर्थांना पारायण नव्हे आचरण अपेक्षीत आहे.
• हा स्वा-ध्याय आहे, यासाठी गुरू नाही( दासबोध ग्रंथ हाच गुरू ), पूजा-अर्चा, भजन-सत्संग अथवा प्रवचनाला जाण्याचे प्रयोजन नाही. तासिका नाही, चाचणी नाही, सराव अथवा पाठांतर नाही. स्वाध्याय अशासाठी की त्यामुळे अभ्यासाला शिस्त लागते.
• दर महीन्याला एक याप्रमाणे पहील्या वर्षी 'प्रवेश' चे १२ स्वाध्याय, दुसऱ्यावर्षी 'परीचय' चे १२ स्वाध्याय आणि तिसऱ्या वर्षी 'प्रबोध' चे १२ स्वाध्याय, असे एकूण ३६ स्वाध्याय घरच्या घरी पुस्तकात बघून सोड्वायचे आणि नेमून दिलेल्या 'समिक्षकांकडे' पाठवायचे! इतके सोप्पे!
• एक स्वाध्याय लिह्ण्यास साधारण ५० मिनिटे लागतात. ६०% प्रश्न हे 'एका वाक्यात उत्तरे ' या स्वरुपात!
• परीक्षा नाही, गुण/ श्रेणी नाही, आचरण आणि प्रचिती हेच गुणापत्रक!
• प्रवेश फी नाही, प्रवेश परिक्षा नाही.
• प्रवेश पात्रता- वयाची अट नाही, मराठी लिहीता- वाचता येणे, आणि नवीन शिकण्याची आवड, एवढेच अपेक्षीत

प्रवेश प्रक्रिया सुरू -
पत्रद्वारे अभ्यासासाठी खालील पत्त्यावर रु. १० ची मनिऑर्डर पाठवावी

'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' श्रीसमर्थ सोसायटी, धन्वंतरी सभागृहाच्या मागे,पटवर्धन बाग, पुणे -४११००४

ई-मेलद्वारे अभ्यासासाठी खालील ई-पत्त्यावर ई-मेल पाठवावी
http://dasbodhabhyas.org/
अधिक माहितीसाठी
dasbodh.abhyas@gmail.com

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Jan 2015 - 11:38 am | सविता००१

मागच्याच महिन्यात प्रवेश घेतलाय. आता तो स्वाध्याय सोडवायचा आहे.

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 12:04 pm | मुक्त विहारि

धन्यवाद..

घरी दासबोध आहे पण सध्या तरी, रामा पेक्षा धनाजीचा सहवास जास्त वेळ हवा आहे.

स्मिता चावरे's picture

8 Jan 2015 - 2:24 pm | स्मिता चावरे

हवी असलेली माहिती मिळाली. लगेच इ मेल पाठवला आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jan 2015 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

http://www.dasbodh.com/

इ मेल पाठविला आहे.

पैसा's picture

11 Jan 2015 - 9:37 pm | पैसा

धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jan 2015 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

विटेकर काका,

२०११ साली तुम्ही मि.पा. वर दिलेली या उपक्रमाची माहिती मी माझ्या आईला सांगीतली होती. तीने नेटाने हा उपक्रम पूर्ण केला व आज ती या उपक्रमात समिक्षकाच्या भूमिकेतून सहभाग घेते आहे.

मागील वर्षी रामदास स्वामींच्या पादुका जेव्हा पुण्यात मुक्कामाला होत्या त्या वेळी एका संध्याकाळी आम्ही त्यांची आमच्या घरी आणुन पुजा देखील केली होती.

आईच्या निमित्ताने माझा व माझ्या पत्नीचाही दासबोध वाचून झाला.

हे सर्व सुरु झाले ते तुमच्या एका धाग्याने.

या उपक्रमाची माहीती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद.

पैजारबुवा,