नव्या वर्षाचे संकल्प

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
1 Jan 2015 - 11:41 am
गाभा: 

सर्वप्रथम मिपाकरांना २०१५ च्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे नवे वर्ष गुडीपाडव्याला सुरु होते किंवा दिवाळीला सुरु होते इ. इ. चर्चा नको. :) तर सांगण्याचा मुद्दा असा की दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी तुम्ही नवीन वर्षाचे तडीस (न) जाणारे संकल्प केले असतीलच. मागच्या वर्षी एखादा संकल्प केला आणि तो पुर्ण केला असेही काही घडले असेल. तर मंडळी येउद्या तुमचे अपडेटस. मी अजून काही संकल्प केला नाही. हजारो संकल्प ऐसे की हर संकल्प पे दम निकले.
पण बघूया, मिपाकरांच्या सुचनेतून काही आवडले तर नक्कीच अनुकरण केले (मिपाच्या भाषेत केल्या जाईल) जाईल.

प्रतिक्रिया

यंदा संकल्प न करण्याचा संकल्प केला होता, तो पूर्णपणे तडीस नेला!!! ;)

धर्मराजमुटके's picture

1 Jan 2015 - 8:49 pm | धर्मराजमुटके

अकर्म देखील एक कर्मच आहे. संकल्प पुर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 1:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पॅरडॉक्स. =))

खटपट्या's picture

1 Jan 2015 - 1:15 pm | खटपट्या

गेल्या पाच वर्षात पूर्ण न झालेल्या संकल्पांची लीस्ट मोठी हाय !! :)

आता उरलो फक्त कट्ट्या पुरता...

मुवि म्हणे

मनिमौ's picture

1 Jan 2015 - 7:25 pm | मनिमौ

आणी बिझनेस वाढवणार

बॅटमॅन's picture

1 Jan 2015 - 7:30 pm | बॅटमॅन

न मरता आणि विना अपघाताचा जिवंत राहणार या ३१ डिसेंबरपर्यंत. तोपर्यंत जगलो वाचलो तर हाच संकल्प पुढील वर्षीही....

धर्मराजमुटके's picture

1 Jan 2015 - 8:47 pm | धर्मराजमुटके

लैच आशावादी बॉ तुम्ही. :) देवाकडे प्रार्थना की पुढच्यावर्षी हाच संकल्प पुढे कॉपी पेस्ट करण्यास येथे हजर असाल.

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जे जे उत्तम आहे... ते पाहण्याचा, वाचण्याचा आणि ऐकण्याचा मानस व्यक्त करतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shiva Tandava Stotram { Amazing }

सत्याचे प्रयोग's picture

1 Jan 2015 - 10:28 pm | सत्याचे प्रयोग

२०१४ चे संकल्प काय काय होते बुवा आठवायचे

पैसा's picture

1 Jan 2015 - 10:44 pm | पैसा

पण आज फेसबुकवर एक छान संकल्प पाहिला, "मी वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन करीन. स्वतः दुचाकी/चारचाकी चालवत असताना रस्त्यावर पादचार्‍यांच्या पहिल्या हक्काचेही कसोशीने पालन करीन!" वाचून बरं वाटलं. जास्तीत जास्त लोकांनी असा संकल्प केला तर किती छान होईल!

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 10:41 am | मुक्त विहारि

सहमत

मराठी_माणूस's picture

2 Jan 2015 - 10:52 am | मराठी_माणूस

रस्त्यावर पादचार्‍यांच्या पहिल्या हक्काचेही कसोशीने पालन करीन

पादचार्‍यांसाठी पदपथ असतात. कित्तेक पाद्चारी पद्पथ असतानासुध्दा रस्त्याच्या मधुन चालत वाहनांचा खोळंबा करतात्.झेब्रा क्रॉसिंग असताना सुध्दा कुठुनाही कसेही रस्ता क्रॉस करतात.
आपल्याकडे बर्‍याच ठीकाणी पदपथ हे चालण्यासाठी मोकळे नसतात त्यामुळे रस्त्यामधुन चालावे लागते ही वस्तुस्थिती असली तरी जिथे पद्पथ असतील तिथे पदपथावरुनच चालावे.

पण अनेक रस्त्याना पदपथ नसतात. राष्ट्रीय हमरस्ते आणि ऑटोमेटेड सिग्नल्स असलेली व्यवस्था सोडून इतर रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असो नसो, पायी चालणार्‍यांचा पहिला हक्क असतो. सिग्नल्स नसलेल्या शहरांमधे पोलीस हजर असला तर सगळे ट्रॅफिक थांबवून रस्ता ओलांडणार्‍यांना मदत करतो. काल बाजारात एका झेब्रा क्रॉसिंगवर पोलीस हजर नसल्याने मला रस्ता क्रॉस करण्यासाठी १० मिनिटे थांबावे लागले. तरीही गाड्या थांबेनात. शेवटी दोन्ही बाजूच्या गाड्यांना पोलिसांसारखे 'थांबा' असे हात करून सरळ रस्ता ओलांडला. किती वेळ वाट बघणार?

मराठी_माणूस's picture

2 Jan 2015 - 11:28 am | मराठी_माणूस

राष्ट्रीय हमरस्ते आणि ऑटोमेटेड सिग्नल्स असलेली व्यवस्था सोडून इतर रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असो नसो, पायी चालणार्‍यांचा पहिला हक्क असतो

ह्याला काही आधार आहे का ?

hitesh's picture

2 Jan 2015 - 12:08 pm | hitesh

हे चालणार्‍याला माहीत असुन काय फअअयदा ? गाडीवाल्याला हे ठाउक नसेल तर तो गाडी अंगावर घालेल की.

पैसा's picture

2 Jan 2015 - 12:24 pm | पैसा

सगळ्या जगभरची भरपूर उदाहरणे मिळतील.

पैसा's picture

2 Jan 2015 - 12:25 pm | पैसा

तुम्ही कुठच्या शहरात रहाता ते सांगा, म्हणजे तिथे चालताना मी नक्की पोलीस बरोबर असताना चालेन! कारण तुम्ही गाडी पायी चालणार्‍यांच्या अंगावर मुदाम घालणार्‍यांपैकी वाटत आहात! =))

मराठी_माणूस's picture

2 Jan 2015 - 2:55 pm | मराठी_माणूस

उदाहरणे निश्चित मिळतील , पण आखुन दिलेले नियम आहेत का ज्या मधुन पहीला हक्क कोणाचा ते समजेल

भारी मुद्दा काढलात की. असा नियम लिखित स्वरूपात असणं जरा अवघडच दिसतंय. रस्त्यावर सगळ्यांचा सारखाच हक्क असला पाहिजे.

पण लेखी जरी नसलं तरी प्रॅक्टीकली पादचारी हे असुरक्षित असल्याने त्यांचाच हक्क पहिला हे गृहित धरून वाहन चालवणं श्रेयस्कर...

तमिळनाडूतली पोझिशन अशी असावी-

http://www.trafficwardens.in/traffic_logic.html

मराठी_माणूस's picture

2 Jan 2015 - 3:32 pm | मराठी_माणूस

पादचारी हे असुरक्षित असल्याने

...

बरोबर, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जिथे पदपथ असतील तिथे त्याचा वापर करावा.

पैसा's picture

2 Jan 2015 - 3:38 pm | पैसा

पण लहान शहरात पदपथ नसतातच ना! तिथे काय रस्त्यावर यायचंच नाही का? मग मी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून शिस्तीत ट्रॅफिक थांबवून रस्ता क्रॉस करते. नाहीतर घरी पोचताच येणार नाही कधी!

स्वधर्म's picture

2 Jan 2015 - 4:27 pm | स्वधर्म

रस्ता वापरण्याचा 'हक्क' सर्वांना आहे, तर वाहन चालकाला रस्ता वापरायला 'परवाना/ लायसेंन्स' घ्यावे लागते. म्हणून रस्त्यावर पहिला हक्क पादचार्याचाच असतो.
- स्वधर्म

मराठी_माणूस's picture

2 Jan 2015 - 4:54 pm | मराठी_माणूस

असे जर असेल तर कित्येक ठीकाणी वहाने जाउच शकणार नाहीत. उदा. लोकल स्टेशन्स , जिथे लोकांची सतत येजा चालु असते. अशा ठीकाणी वहान इंचभर पुढे सरकणे सुध्दा दुरापास्त.
तात्पर्य , वहाने आणि पाद्चारी ह्यांनी तारतम्य ठेउन ये जा करावी.

सायकलला लायसेन्स लागत नाय.....मग सायकलवाल्याचा हक्क पैला की पादचार्‍याचा?

झेब्रा क्रॉसिंगवर पादचार्‍यांना प्राधान्य आहे. वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाताना कुणी पादचारी क्रॉस करत नाहियेत हे बघून मगच पुढे जाणे अपेक्षित आहे.

याआधी संकल्प वगैरेला पास होता. पण आता ठरवलं आहे की पूर्वीपेक्षा जास्त आणि नियमित आर्थिक बचत करेन.
होउदे खर्च!!! :)

जयन्त बा शिम्पि's picture

2 Jan 2015 - 10:37 am | जयन्त बा शिम्पि

२०१४ च्या दिवाळीपासून " पालि " भाषेचा अभ्यास सुरु केला होता , त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते
आता जून २०१५ पर्यंत पुर्ण करणार , म्हणजे करणारच ! !

पैसा's picture

2 Jan 2015 - 11:03 am | पैसा

तुम्हाला खूप शुभेच्छा! त्यानंतर पाली भाषेतील वाङ्मयाची मिपावर जरूर ओळख करून द्या!

यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास करणे.
मागील वर्षी एका मिपाकराने दिलेली मोडी शिकण्याबद्दल दिलेली इपुस्तक अर्धीच वाचुन झालीत.
आता मात्र वेळ काढुन मोडी शिकण्यात येईल.

जयन्त बा शिम्पि's picture

2 Jan 2015 - 11:49 pm | जयन्त बा शिम्पि

मी मोडी लिपी साठी चार तीमाही मासिके जमविली आहेत व तिचाही अभ्यास करणार आहे, पण ती तितकीशी पुरेशी नाहीत
याची मला जाणीव आहे म्हणून विनंती कि तुमच्याकडे असलेले इ - मोडी लिपीचे पुस्तक फॉर्वर्ड करता येइल काय ? किंवा लिन्क पाठवता येइल काय ?
जयन्त शिम्पी

खटपट्या's picture

3 Jan 2015 - 2:10 am | खटपट्या

क्रुपा करुन मला ईपुस्तक फॉरवर्ड करु शकाल काय ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2015 - 6:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

सूर्यनमस्कार घालणे आणि तब्येत जssssरा सुधारणे...किमान सर्दी तापापासुन दुर राहण्यापुरती
ऑफिसमधुन मिळालेल्या व्हाऊचर चा उपयोग करुन १-२ सर्टीफिकेशन पूर्ण करणे.

कंजूस's picture

3 Jan 2015 - 6:52 am | कंजूस

सुप्रभात
१)जुनी जैन हस्तलिखितं पाली भाषेत आहेत ना ?
२)पाली, अर्धमागधि, ब्राह्मि यावर लेखाची लिंक पाहिजे. ३)या मोडिसारख्या लिपी आहेत का भाषा? ४)युनिकोडमध्ये नसणार मग याचा फोटो टाकावा लागेल का ?

सुनील's picture

3 Jan 2015 - 7:03 am | सुनील

१)जुनी जैन हस्तलिखितं पाली भाषेत आहेत ना

जैन नव्हे, बौद्ध.

जुनी जैन हस्तलिखिते अर्धमागधीत आहेत.

पैसा's picture

3 Jan 2015 - 10:55 am | पैसा

पाली अर्धमागधी या प्राकृत भाषा आहेत. सुरुवात म्हणून त्यांच्याबद्दलची विकि पाने बघा. मिपावरचे श्री जयंत कुलकर्णी आणि प्रास या भाषांचे अभ्यासक तज्ञ आहेत.

ब्राह्मी ही लिपी आहे. तिच्यावरही विकि पान आणि अन्य माहिती जालावर उपलब्ध आहे. माझ्या आठवणीप्रमाणे वल्लीने या लिपीचा अभ्यास सुरू केला होता. त्याला जास्त माहिती विचारा.

विवेकपटाईत's picture

3 Jan 2015 - 10:44 am | विवेकपटाईत

मी संकल्प करतो, मी कुठला ही संकल्प करणार नाही आणि केला तरी तो कधीच पाळणार नाही.