…तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१२५ cc
"jack of all trades master of none" segment
१. दमड्या - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त
२. मायलेज … "कितना देती है" - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त
३. दिसणे - beauty lies in the eyes of the beholder - काहीजणांसाठी वरणभात तर काहींसाठी सुबक ठेंगणी
४. ताकद (power) - ९०+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - बरा
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - बर्याचदा जवळपास १००-११० cc इतकाच
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - बजाज - maximum value for money
बजाज
डिस्कव्हर
होंडा
शाईन
स्टनर
हिरो
स्पेण्डर i-smart
इग्नाइटर
टिव्हिएस
फिनिक्स
यामाहा
ग्लेडिएटर
सुझुकी
स्लिंग शॉट
हयाते
जसे वर लिहिले आहे "jack of all trades master of none"… हा विभाग हे वाक्य अगदी सार्थ ठरवतो
मुलाला १०० cc ची बाइक पळायला फास्ट नाही वाटत पण पालकांना १५० cc च्या बाइकचा पिकप जरा जास्तच वाटतो … घ्या १२५ cc
१०० cc च्या बाइकचा "वरणभात" लुक नाही आवडत आणि दिसायला जरा बर्यापैकी असणारी बाइक हवीय पण १५० cc चे मायलेज फारच कमी वाटते … घ्या १२५ cc
मुलाला १०० cc ची बाइक आवडत नाही पण पालकांना १५० cc च्या बाइकची किंमत जरा जास्तच वाटते … घ्या १२५ cc
१०० cc च्या बाइकमुळे आपण दिसायला काका/आजोबा क्यॅटेगरी वाटतो पण १५० cc ची बाइक स्वत:च्या वयाला जरा जास्तच "यो" वाटते (हा टिपीकल ४५+ नंतरचा विचार) … घ्या १२५ cc
या विभागातल्या बाइक घेणार्यांपैकी ९०% जणांचे वरीलपैकी १ कारण असते … उरलेले १०% ओळखीतल्याने १२५ cc घेतली म्हणून स्वत:पण तीच घेतात… याव्यतिरिक्त आणखी कोणते कारण असल्यास मलासुध्धा कळवावे :)
खरेतर हा विभाग लोकप्रिय करण्यात मोठ्ठा वाटा आहे बजाजच्या डिस्कव्हर बाइकचा…तीच ती "ज्याकी च्यान" वाली
https://www.youtube.com/watch?v=KxLkjpr8vU0
बजाजची पल्सार हिट झाल्यावरसुध्धा बजाजला मोठ्ठा बाइकमेकर बनवण्यात डिस्कव्हरचा वाटा पल्सार इतकाच आहे
हिच माझी पहिली बाइक … अजूनही आहे माझ्याकडे :) मस्त चालते
ती पहिली डिस्कव्हर आल्यानंतर बजाजने त्या मॉडेलमध्ये बर्याच सुधारणा आणल्या … त्यात बरेचसे first in class features सुध्धा आहेत जसे मोनो सस्पेंशन, डुएल स्पार्क प्लग इंजिन, डिजिटल इंस्ट्रुमेंट प्येनल, अलॉय व्हील… most value for money अशी बाइक … आरामाच्या बाबतीत मोनो-सस्पेंशनमुळे या सेगमेंट मध्ये सर्वोत्तम… इद्दरकी जुही चावला
होंडाने १२५ cc मध्ये येताना जुनाच सरळ धोपट मार्ग चोखळलेला. बर्यापैकी खप असणार्या युनिकोर्नचे १५० cc चे इंजिन डिट्युन (मराठी???) करून १२५ cc चे बनवले आणि शाईन वर लावले … बाकी दिसणे जवळपास १०० cc बाइकसारखेच … पण इंजिनच्या क्वालिटीमुळे खप चांगलाच आहे… बजाजच्या डिस्कव्हरला खपाच्या बाबतीत ही एकच स्पर्धक आहे… रानी मुखर्जी
होंडाने १२५ cc मध्ये दिसण्याबाबतॆत सगळ्यात उजवी अशी स्टनर आणली ते सुध्धा फ्युएल इंजेक्शन आणि कार्बुरेटर अश्या दोन्ही प्रकारात … परंतु फ्युएल इंजेक्शन वालीची किंमत १५० cc वाल्या बाइकच्या जवळपास / जास्त जाणारी असल्याने ती फ्लॉप झाली … माझ्यामते तरी होंडाने स्टनरचे मार्केटिंग व्यवस्थित नाही केले नाहीतर कदाचित चित्र वेगळे असू शकले असते… ही गायत्री जोशी
हिरोने १२५ cc मध्ये यायला हुकुमी एक्का "स्प्लेंडर" वापरून पाहिलाय … ते सुध्धा १ पेक्षा जास्त वेळा … पण लेटेस्ट "i-Smart" चांगली वाटतेय … त्याची "स्टर्ट-स्टॉप" प्रकार मायलेजसाठी उत्तम आहे… विशेषत: ट्राफिक मध्ये चालवताना…परंतू अजूनही हिरोला त्यांचा इतिहास बघता म्हणावे तसे यश नाही मिळाले आहे…ग्रेसी सिंग ???
हिरोने नवीन आणलेल्या इग्नायटर बद्दल काय लिहावे … ती बाइक होंडाच्या स्टनरचॆ "चोप्य-पस्ते" आहे :) कदाचित खपाच्या बाबतीत सुध्धा… ही "स्नेहा उल्लाल" ;)
टिव्हॆएसने एकेकाळी १२५ cc मध्ये त्यांच्या "व्हिक्टर" बाइकमुळे वर्चस्व गाजवलेले … काही कारणांमुळे त्यांनी ती बाइक बनवणे बंद केले … आणि ते आता १२५ cc सेगमेंटमधे जवळपास नसल्यात जमा आहेत… १२५ cc सेगमेंटमधे "फिनिक्स" नावाने आणलेली बाइक काही टिव्हॆएसला उठवू शकलेली नाही… आपली मनीषा कोईराला :)
यामाहाने "ग्लेडिएटर" आणलेली पण ती काही जास्त लोकप्रिय झालेली नाही … होंडाचॆ इंजिन क्वालिटी आणि बजाजची value for money features बाकी सगळ्या बाइकना भारी पडतात… रिमी सेन
सुझुकीने "स्लिंग शॉट" आणि "हयाते" आणल्या कधी हेच कोणाला माहित असेल याची शंका यावी इतका त्यांचा खप कमी आहे… खप आहे म्हणायचे कारण की सुझुकी थोडेफार आकडे दाखवते म्हणून
"हयाते"????
भारतासारख्या देशात जिथे उत्पादनाच्या नावांवरूनसुध्धा उत्पादनाच्या खपावर परिणाम होतो तिथे सुझुकीला बाइकचे व्यवस्थित बारसे करणारी माणसे मिळू नयेत याचे आश्चर्य वाटते … एखादा कोकणी माणूस "हय ते म्हणजे काय मरे" असे विचारून बाइक डिलरला गप्प करेल
आणि "स्लिंग शॉट"???
नावावरून बाइक कशी दिसेल/चालेला याचा काही अंदाज येतो???
हयाते => diana penty (हे नाव मराठीत लिहीले तर कदाचित लेखालाच पंख लागतील :D )
स्लिंग शॉट => kalki koechlin (हे मराठीत कसे लिहू याच्या विचारात होतो…नंतर प्रयत्न सोडला)
डिस्क्लेमर - या लेखातल्या हिरवणॆंच्या उपमा कदाचित भयंकर हुकलेल्या वाटू शकतात (हुकालेल्या आहेतच हे नक्की)… पण त्याचे कारण हेच कि मला स्वत:ला १२५ cc मध्ये जरासुध्धा आवड नाही…माझ्यासाठी २५ cc चा फरक मी फरक मानतच नाही…या २५ cc च्या फरकाने तयार केलेल्या सेगमेंट म्हणजे सगळे मार्केटिंग फ़ंडे आहेत त्यामुळे या बाइक्स मला "ना घर का ना घाट का" या प्रकारच्या वाटतात
क्रमश:
प्रतिक्रिया
29 Dec 2014 - 11:32 am | मुक्त विहारि
बाकी बाइकला नट्यांची नावे द्यायची कल्पना आवडली.
29 Dec 2014 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा
योग्य मूल्य~मापन! *GOOD*
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अर्थात... प्रत्येक बाबतितले! :-D
29 Dec 2014 - 12:03 pm | मदनबाण
टका छान तुलना केलीस हो ! ;) चांगल्या "जोड्या" लावल्या आहेस ! :P
पुढच्या भागाची उत्सुकता आहे.... { हॅहॅहॅ } ;)
जाता जाता :- हल्लीच इडियट बॉक्सवर चॅनल चॅनल खेळत होतो... अचानक एक नवा चॅनल पाहिला... त्यावर एक मालिका चालु होती...म्हंटल जरा २ मिनीट पाहु तरी काय हाय सिरियल मंदी ! सिरियलचा तो एपिसोड आणि त्या एपिसोड मधली चबली-बबली "जिग्ना" आपल्याला लयं लयं म्हणजे लयं आवडली... एकदम क्युट काय ते म्हणतात तसा अभिनय केला हाय... ;)
मालिकेचे नाव आहे "यम किसी से कम नही" चॅनल :- EPIC
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India:Ministries told to prefer domestically-manufactured electronic goods
29 Dec 2014 - 12:16 pm | टवाळ कार्टा
बघायला पाहिजे ;)
29 Dec 2014 - 12:17 pm | टवाळ कार्टा
आणि चायला सगळेच "पुढल्या" भागाची "आतुरतेने" वाट बघत आहेत ;)
29 Dec 2014 - 12:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास ट.का.
डीट्युन केलेलं ईंजिन नाही. सी.सी. कमी करायसाठी बोअर डायमीटर कमी केलाय. आणि मोनो सस्पेंशन नाही. इंजिन मात्र होंडाच्या इतर कुठल्याही बायकीप्रमाणेचं स्मुथ आहे.
बाकी स्टनर बद्द्ल सहमत. स्टनर १५० सी.सी. मधे फ्युएल इंजेक्शन आणि स्पोर्टी लुक मधे आली असती तर तिनी पल्सर चं मार्केट डाऊन केलं असतं. कारण म्हणजे फ्युएल इंजेक्शन नी मायलेज मधे ५ ते ७ कि.मी.चा फरक पडतो. दुसरं म्हणजे दिसायला छान आहे.
29 Dec 2014 - 12:44 pm | टवाळ कार्टा
ते इंजिनच्या आतमधले मला काही समजत नाहे :)
पण स्टनर १५० सी.सी. मधे फ्युएल इंजेक्शन आणि स्पोर्टी लुक मधे आली असती तर तिनी पल्सर चं मार्केट डाऊन केलं असतं याबाबत असहमत
होंडा कधीही कोणतीही गोष्ट भारतात उशीराच आणते उ.दा. honda cbr150r
29 Dec 2014 - 12:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सी.बी.आर. १५० घेणं हा एलिट मुर्खपणा आहे. =))
सी.बी.आर. ५०० सी.सी. खाली घेणं अजामिनपात्र गुन्हा समजला पाहिजे. =))
29 Dec 2014 - 1:04 pm | टवाळ कार्टा
नै भौ...भारतात ३०० cc च्या वरची कोणतीही घेतली तरी ती ३०० cc च्याच वेगाने चालवता येते :(
पण CBR250R सोडून CBR150R घेणारा चम्या असेल ;)
29 Dec 2014 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आता त्यात होंडाची चुक नाही. सी.बी.आर. १००० सी.सी. च्या अॅक्सीडेंट मधे अझरुद्दीनचा मुलगा गेला होता हे आता आठवलं.
पुण्यातल्या एका प्रसिद्ध रस्त्यावर तुमची गाडी ६००० सी.सी.ची असेल तरी २०-३० च्या पुढे नेता येतं नाही. =))
29 Dec 2014 - 1:10 pm | टवाळ कार्टा
चूक बाइकची नसते...चालवणार्याची किंवा त्याला ठोकणार्याची असते
बाकी तो पुण्यातला रस्ता कोणता? लक्ष्मी रोड का?
29 Dec 2014 - 1:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
होय लक्ष्मी रोड.
29 Dec 2014 - 1:46 pm | टवाळ कार्टा
=))
29 Dec 2014 - 5:22 pm | आदिजोशी
हे बाईकसाठी जबरदस्त नाव आहे. चुकीच्या बाईक वर ते वाया घालवले असं माझं मत आहे. असंच दुसरं वाया घालवलेलं नाव म्हणजे वॅगन आर ची स्टिंग-रे.
29 Dec 2014 - 5:28 pm | टवाळ कार्टा
ह्म्म...स्लिंग शॉट चा अर्थ मला माहित नव्हता...पण तरीसुध्धा नाही आवडले
स्टिंग-रे बाबत मात्र १००% सहमत
आणि आपला प्रतिसाद या लेखाला लागला...आता RX बद्दल लिहायलाच लागेल \m/
29 Dec 2014 - 6:09 pm | कपिलमुनी
सध्या हिच्या प्रेमात आहे .
29 Dec 2014 - 7:18 pm | काळा पहाड
क्या बच्चों की जान लेतंय क्या.. डब्बल सीसी की गाडी बोले तो कित्ता पेट्रोल खाती..
29 Dec 2014 - 8:15 pm | टवाळ कार्टा
माझा गणेशा झालाय पण जर तुम्हाला "इंझुमा" आवडत असेल तर सुझुकी ती बाइक भारतातून काढून घेत आहे...मोजून १३ का १५ विकल्या गेल्या होत्या
30 Dec 2014 - 3:49 pm | कपिलमुनी
३,००,००० हून २,२५,००० केली पण तरीसुद्धा लूक आणि फीचरच्या मानाने महगच वाटते
30 Dec 2014 - 4:02 pm | टवाळ कार्टा
२,२५,००० नसेल २,००,००० असेल...पण २,२५,००० ला डुएल सिलिंडर बाइक ठिक आहे...पण जर टुरिंग ऐवजी नुस्ती स्पीड आणि पिकप हवा असेल तर KTM Duke 400 किंवा KTM RC 400 यांना पर्याय नाही
आणि दोन्ही २,२५,००० च्या जवळपासच आहेत :)
अवांतर - जर घेतलीत तर १ फेरी मारायला द्या :)
30 Dec 2014 - 4:00 pm | मुक्त विहारि
एखादा लेख "वर्देंची" वर पण टाक....
घरात निदान एक तरी "वर्देंची" हवी, असे वाटते.
30 Dec 2014 - 4:07 pm | टवाळ कार्टा
लेख नाही पण त्याचा उल्लेख नक्कीच होइल :)
30 Dec 2014 - 4:51 pm | कपिलमुनी
तुमचा लेकरू खुश होइल
6 May 2015 - 5:38 pm | टवाळ कार्टा
यामाहाने नवीन १२५ cc ची Saluto आणली आहे
अधीक माहिती इथे मिळेल
26 May 2016 - 7:19 pm | मराठी कथालेखक
TVS Phoenix बद्दल अधिक वाचायला आवडेल.
मी १०० cc ची बाईक बदलायचा विचार करतोय. Phoenix चांगला पर्याय वाटत आहे.
काही अनुभव वाचायला मिळतील का ?
26 May 2016 - 10:59 pm | अभ्या..
फिनिक्स बाजारात फेल गेली. आधी तर ग्राफिक्स असले भंगार होते कि बस्स, आता जरा टॅन्क काऊल वगैरे लावून मेकओव्हर केलाय. इंजिन चांगलंय. पॉवर आहे. मायलेज गंडते. लॉंग ड्रॅइव्ह ला पाठ अवघडते. टिव्हीएस वर एवढे प्रेम असेल तर न्यू व्हिक्टर आलीय. 110 सीसी. जुन्या स्टार चे इंजिन आणि जाईव्ह ची बॉडी आहे. लूक बराय. एव्हरेज देते 65.
125 ला बेस्ट ऑप्शन सलूतो किंवा शाईन किंवा ग्लॅमर.
150 यामाहा एक्स झेड नवीन कलर आलेत. चांगलीय ती पण. स्टर्डी आणि लूक मस्त. मयलेज 50
27 May 2016 - 12:50 pm | मराठी कथालेखक
TVS वर प्रेम नाही पण १२५ सीसी मध्ये ११ PS इतकी power फक्त डिस्कवर मध्ये आहे असं वाटतं.. पण बाकी फिचर्स (डिजीटल स्पीडोमीटर) वगैरेचा विचार करता phoneix उजवी वाटते. म्हणजे On paper तरी ती सर्वात चांगली वाटते आहे.
माईलेज कमी म्हणजे किती आहे ?
27 May 2016 - 4:59 pm | अभ्या..
फिनिक्स मायलेज ५०-५५ साधारण.
अशा टोटल फेल गेलेल्या मॉडेल्सचे स्पेअर्स मिळायला त्रास होतो. टीव्हिएस स्पेअर्स मिळतात म्हणा इझीली.
यामाहा सल्युटो मित्राची आहे. हाईट चांगलीय. स्टेबल आहे. लो स्पीड ला नॉकिंग देत नाही. सस्पेन्शन उत्तम आहे. तकलादू वाटनारे प्लास्टिक पार्टस सोडले तर उत्तम डील आहे. ह्या रेंजमध्ये प्राइस पण कमी आहे. अॅव्हरेज मी हायवेवर बॉटलचेक केले. ६८ पडते.
नवीण शाईन एसपी जवळपास सल्युटो लूक आहे. ५ गिअर आहेत. इंगिन जास्त स्मूथ आहे. त्यापेक्षा युनिकॉर्न १६० चांगले डिल आहे.
27 May 2016 - 5:53 pm | मराठी कथालेखक
मला वजनाने हलकी बाईक हवी आहे. Phoneix या आघाडीवर चांगली दिसते. (Shine : 124 kg, Phoneix : 116 kg)
26 May 2016 - 11:18 pm | टवाळ कार्टा
१००cc साठी होंडा लिवो चांगली आहे...थोडी महाग आहे बाकी बाईकपेक्शा पण होंडाइतके चांगले इंजीन दुसर्या बाईकमध्ये नाही...अर्थात हे ५+ वर्शे बाईक वापरणार असाल तर...नाहीतर जी आवडेल ती घ्या :)
26 May 2016 - 11:20 pm | टवाळ कार्टा
बाकी चर्चा १००cc बाईकवाल्या धाग्यावर करू...हा धागा १२५cc वाल्या बाईकचा आहे :)
27 May 2016 - 12:18 pm | मराठी कथालेखक
मला १०० सीसी ची बदलून जास्त पॉवरची घ्यायची आहे
27 May 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा
१०० सीसी वरून १२५ सीसी हे अपग्रेड नाहीये...१८०-२०० सीसी घ्या :)
27 May 2016 - 4:13 pm | मराठी कथालेखक
8.4 ps वरुन 11 ps हे ३०% अपग्रेड आहे ना
27 May 2016 - 4:45 pm | टवाळ कार्टा
हा फरक चालवताना जाणवत नाही
27 May 2016 - 3:57 pm | मिनेश
सुझुकी हयाते …… जो कोई नही चलाते :D
27 May 2016 - 4:09 pm | टवाळ कार्टा
=))
27 May 2016 - 7:15 pm | मराठी कथालेखक
i-Smart १०० सीसी ची आहे १२५ नाही
http://www.heromotocorp.com/en-in/the-bike/splendor-ismart-69.html
27 May 2016 - 10:57 pm | सतिश गावडे
मध्यम देहयष्टीच्या व्यक्तीस ("पर्सनॅलिटी" वगैरे अजिबात नाही. उंची ५' ५") साजेल आणि झेपेल असे रॉयल एनफिल्ड/बुलेट्/अॅवेंजरचे मॉडेल सुचवा.
28 May 2016 - 1:04 pm | झेन
हिरो ची नाही भावली पण टका तूमच्या पँशनला सलाम