बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 9:43 pm

बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते

मिपावरील ऑनलाईन बुद्धीबळाचा खेळ पाहण्यासाठी:

"ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे:
Name: (MiPa3); Password: (Watch)
'Go' वर क्लिक करा.

त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा:

--

बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Dec 2014 - 11:34 am | कंजूस

आताच एक प्रायोगिक सामना बिरुटेसर वि॰ वल्ली यांच्यात झाला आणि प्रतिसादासाठी इकडे आलो.
नवीन माध्यमांचा वापर करून ही स्पर्धा होणार आहे त्याबद्दल फारच उत्सुक आहे. मिसळपाव ,बहुगुणी आणि खेळाडूंचे आभार.

हे ऑनलाइन खेळणे आणि बघणे मला अशक्य आहे परंतू खेळाचा कोड(खेळाडूंनी) टाकल्यास मला तो खेळ पटावर नंतर खेळून आनंद घेता येईल.
प्याद्याच्या विनंतीचा विचार करावा.

बहुगुणी's picture

29 Dec 2014 - 7:09 pm | बहुगुणी

नक्कीच मिळेल, त्या त्या खेळाडूं ना किंवा मला व्यनि करा, आमच्यापैकी कुणीही संपूर्ण सामन्याचे score sheet पाठवू शकू.

त्याहीपेक्षा सोपा मार्गः

तुम्ही वर दिल्याप्रमाणे प्रेक्षक म्हणून प्रवेश केलात की आधी झालेल्या तुम्हाला हव्या त्या सामन्यावर क्लिक करून (व्ह्यू)त्या सामन्यातील खेळी पहाता येतात. सामना अखेरीस असलेली पटाची स्थितीही दिसते. पटाच्या उजवीकडे दिसणारी Back ही कळ क्रमशः क्लिक केली की सुरूवातीपर्यंतचा सर्व खेळ उलट्या क्रमाने पहाता येतो. आम्ही चाचणी म्हणून घेतलेल्या सामन्यातील खेळी 'लिस्ट 'स्वरूपात अशा दिसतात:

Score sheet:
1. d2-d4 d7-d5
2. e2-e3 b8-c6
3. b1-a3 c8-f5
4. c2-c3 g8-f6
5. g1-f3 e7-e6
6. f3-g5 f5-g6
7. d1-a4 f8-d6
8. f1-b5 e8-g8
9. e1-g1 f6-g4
10. a4-d1 d8-g5
11. d1-f3 g4-h2
12. f3-d1 h2-f1
13. d1-f1 e6-e5
14. b5-c6 b7-c6
15. a3-c2 e5-e4
16. a2-a4 g5-h5
17. g2-g3 a7-a6
18. c2-e1 a6-a5
19. e1-g2 g6-f5
20. f2-f4 f5-g4
21. g2-h4 g4-f3
22. f1-h3 f3-e2
23. h3-d7 e2-d3
24. d7-c7 h5-d1
25. g1-g2 d6-c7
26. b2-b3 d1-f1
27. g2-h2 f7-f6
28. h4-g2 g7-g5
29. h2-h3 h7-h5
30. f4-g5 f6-g5
31. g3-g4 f1-h1

विकास's picture

29 Dec 2014 - 5:30 pm | विकास

इंटरेस्टींग प्रकार आहे! धन्यवाद बहुगुणी!

बहुगुणी's picture

29 Dec 2014 - 7:23 pm | बहुगुणी

(बघता काय, सामील व्हा ;-) )

आधिकाधिक मंडळींनी खेळून पाहिलं की त्रुटी समजतील आणि जमल्यास स्पर्धेआधी दुरूस्त करता येतील. ('जमल्यास' म्हणण्याचं कारण म्हणजे हा मूळ ऑनलाईन खेळ मिलान मिक्लाव्हसिक या मिशिगन विद्यापीठातील हुषार गणितज्ञाने तयार केलाय, त्याच्या 'कोड' मध्ये काही फेरफार करण्याची माझी कुवत वा अक्कल नाही, मी केवळ तो मुक्तपणे उपलब्ध असलेला पट उचलून इथे आणून टाकला आहे! फक्त मिपावर खेळतांना ज्या काही सुधारणा शक्य असतील, त्या नीलकांत वा प्रशांत यांना विनंती करून करता येतील कदाचित.)

कंजूस's picture

29 Dec 2014 - 8:14 pm | कंजूस

कोड ओके. खेळून पाहणार.
एक विचारतो प्रत्यक्ष खेळाची वेळमर्यादा एक तास अथवा कमी असेल ना? कारण ऑनलाईन रेँगाळून उपयोग नाही.
आनंदXकार्लसनच्या खेळावरची टिप्पणीही वाचायला मिळाली तशी इकडेही करा कोणी. मजा येणार आणि मिपाकरांचे सुप्त गुण दिसणार. खेळांमुळे समाजाचे मानसिक आरोग्य चांगले राहाते. जिओ मिपा हजारो साल!

बहुगुणी's picture

29 Dec 2014 - 9:58 pm | बहुगुणी

स्पर्धेसाठी सूचनांचं स्वागत आहे, Fast Chess प्रकारातील Blitz पद्धत (प्रत्येक चालीसाठी प्रत्येक खेळाडूला ५ मिनिटे वगैरे मर्यादा) वापरता येईल, पण त्यावर टीकाही वाचायला मिळाली ("Blitz kills your ideas / Blitz is simply a waste of time" वगैरे), इथले पट्टीचे खेळाडू मार्गदर्शन करतील अशी आशा आहे.

तोपर्यंत आनंद घ्या एका सुंदर खेळाच्या विश्लेषणाचा: (यातल्या ११व्या मिनिटाला होणारी ऑनपसाँट [En Passant]) खेळीचा वापर अफलातून वाटला!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2014 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपक्रम !

पैसा's picture

30 Dec 2014 - 4:59 pm | पैसा

मस्त प्रकार! आतापर्यंत आनंद कार्लसन सामने बघत टिप्पणी करणार्‍या मंडळींनी प्रत्यक्ष स्पर्धा खेळातही जरूर भाग घ्या!

बहुगुणी's picture

30 Dec 2014 - 9:35 pm | बहुगुणी

सद्यस्थितीत पटावर मिपाकर सामील असावेत असे ३ सामने चालू दिसताहेत, पण गेल्या ६-७ तासांत तरी त्या सामन्यांमध्ये काहीही खेळी झालेल्या दिसत नाहीयेत, ही मंडळी कोण आहेत?

MiPa3 - bootlace, MiPa3 to move

MiPa3 - MiPa1, MiPa1 to move

marvin - MiPa2, MiPa2 to move

कुणी लॉग इन केलं आहे त्या नावात फक्त 'वल्ली' यांचं नाव तक्त्यात आहे (आणि काल 'tilak' या नावाने कुणीतरी तक्त्यात नोंद केली होती)

ते खेळाडू पुढे खेळणार नसतील तर ते खेळ बंद करून इतरांना खेळता येईल. मी बंद करू शकेन, पण कुणाचा चालू खेळ बंद व्हायला नको. तेंव्हा खेळाडूंनी इथे आणि तक्त्यात प्रतिसाद द्यावा हे आवाहन.

Bootlace, Marvin आणि tilak हे मिपाकरांपैकी कुणी आहेत का?

खेळाडुंनी खरडफळ्यावर संपर्क करून आपापल्या घरीच खरा पट मांडावा आणि दुसऱ्याला फेसबुकच्या मेसेजातून खेळीचा कोड पाठवावा. खेळ एक दीड तासात संपवण्याचे अगोदरच ठरवावे. संपल्यावर सर्व कोड इकडे धाग्यावर द्यावा . अगदी स्पर्धेसाठी नाही खेळले तरी खेळाडुंना एखादा डाव टाकायला कायमचे भिडू मिळून जातील.

पैसा's picture

18 Jan 2015 - 12:22 am | पैसा

स्पर्धेत भाग न घेता इतर सराव सामने खेळणार्‍यांनी कृपया स्पर्धेत सध्या वापरात असलेले MiPA1 MiPA2 Mipa11 MiPa12 MiPA41 इ. आयडी घेऊन खेळू नका. स्पर्धेत भाग घेणार्‍यांचे आयडी त्यांच्यासाठीच राहू देत. इतरांनी MiPA99 MiPA100 . इ. आयडी घेऊन खेळा. आणि तुम्ही कोणते आयडी घेतलेत त्याची कृपया इथे नोंद करा. म्हणजे इतर खेळू इच्छिणार्‍या मिपाकरांना संपर्क करणे सोपे जाईल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2015 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

MiPA99 मय हु.

पैजारबुवा,

मिपा ६२ चे सर्व अर्धवट गेम कृपया बंद करा. मी आता आतिवास नावाने रजिस्ट्रेशन केले आहे.

पैसा's picture

18 Jan 2015 - 6:04 pm | पैसा

बहुगुणी हामेरिकेत पोचले की करतील

एकही सामना चालू दिसत नाहीये, तुम्ही प्रेफरन्स ० ला सेट केला असल्याने, किंवा वेळ संपल्याल्या, ते सामने बाद झाले असतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 10:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज रातच्याला हाय काय कोण हत्ती-घोड्यांचे डाव टाकायला असाच टैमपास म्हणुन. वेळं भारतीय प्रमाणवेळे प्रमाणे ९.३० पी.एम. णंतर. असेल तर व्यनि करा.

आतिवास's picture

19 Jan 2015 - 12:00 pm | आतिवास

रात्री १०.०० चालेल मला - अर्थात सराव म्हणून.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 1:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालेलं वल्ली किंवा तुमच्याशी मॅच लावतो.