माफक ईच्छा...मिपाधर्म वाढवावा......

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
9 Aug 2008 - 4:42 pm
गाभा: 

(जो लेख गमत्या ने लिहला आहे त्याच विषयावर मि त्याच्या दोनेक दिवस आधी लिहायचा विचार केला होता पण काही कारणास्तव लिहणे जमले नाही. मला गमत्या ने जे लिहले ते पटले पण कदाचीत मि लिहले असते तर त्याच्या ले़खणात जो एक हुकुमीपणा वाटतो तो तिथे नसता वा त्याची आक्रमकता थोडी कमी असती पण तो लेख लिह्ण्यामागे जो उद्देश होता तो मात्र पटला.पण त्या लिखाणावर झालेल्या प्रतीकीया बघीतल्या नंतर असे वाटले की नाही कुठेतरी गफलत होत आहे म्हणून हा प्रपंच)

पिडा काका....असे आहे का की तुम्ही जर काही लिहले नाही तर तुम्ही दुसर्यांचे चांगले वाचु पण नव्हे??.आता काही लो़कांना नाही करता येत त्यांच्या फींलीग्स व्यक्त्...माझेच उदाहरण घ्या मि मिपाचा साधारणतहा १५-१६ आठवडयापासुन सदस्य आहे आणी त्याच्याही ७-८आठवडयापासुन मी ईथे नीयमीतपणे यायचो.मी मीपावर खुप वाचन केले ..मी आधी नव्ह्तो तेव्हा जे लेख लीहले गेले होते ते सुध्हा मी वाचुन काढले ..कारण मला वाचन आवडते.मग मला मध्यंतरी वाटले चला आपण ही काहीतरी लिहुण बघावे तुम्ही माझी वाटचाल बघाल तर मी पण काही तरी एक - दोन फुटकळ लेख लिहले पण त्यानंतर मला असे समजले की मी एक चांगला लेखक नाहीए ...मी कदाचीत माझे विचार योग्यपणे शब्दात मांडु शकत नाही.त्याचा असा अर्थ होत नाही कि मी एक चांगला वाचक पण नाही. होय मी तुमच्या कडून चांगले आणि जास्तीत जास्त लिह्ण्याची अपेक्षा करतो कारण एक वाचक म्हणुन मला तुमचे ले़ख खुप आवडतात मग ते अब्दुलखान सीरीज असो वा जॉर्ज कॉल्डवेल सीरीज असो वा नास्तीक वा अधीक खुप सारे ...

मला वाटते की तुम्ही एक चांगले लेखक आहा म्हणुन आम्हाला तुमच्याकडुन अपेक्षा आहे.

जर उद्या सचीन तेंडुलकर त्यांच्या चाह्त्यांना म्हणेल की आधी तुम्ही भारतीय टीम मधे प्रवेश मीळ्वुन दाखवा चांगले खेळुन दाखवा मग माझ्या कडुन अपेक्षा करा..तर ते म्हणने योग्य होणार नाही ना..उलट तो काय करतो की अधीकाधीक चांगले खेळ्ण्याचा प्रयत्न करुन आणि त्याच्या चाह्त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

होय मला तरी असे वाटते काही दिवसांपासुन मिपा चे वातावरण जरा बिघड्ले आहे आधी कुणी एक जण एक कवीता करतो मग त्या कवीतेवर कुनीतरी दुसरा विडंबण करतो मग त्या विडंबणावर कुणी तरी तीसरा आणखी विडंबण करतो....मग त्यावर प्रतीसाद ..त्या प्रतीसादात एकमेंकावर कुरघोड ....अंतरगत राजकारण.हमरी तुमरी.. अरे हे चाललय काय? तुम्हाला लिहता येतना?? तुमच्याकडे कला आहेना ?? अरे मग लिहान स्वताची मस्त ओरीजनल कवीता,लेख,पाककला,व्यक्तीचीत्रे आणी आमच्यासारख्या असंख्य चाहत्यांना घेऊ द्या त्याचा मनमुराद आनंद..आणि वाढवा मिपाधर्म ..

मिपाची आत्तची जी स्टेज आहे ती खुपच महत्त्वाची ..आतापर्यंत जी होती त्यापेक्षाही कारण ..मिपा हळूह्ळू वाढतय त्याचे ग्लोबलायझेशन होत आहे (आठवा सकाळ मधे मिपाचा उल्लेख्)..त्याची लोकप्रीयता वाढ्तेय. आता नवनवीन सदस्य येतील ..आखीर मिपा काय चीज आहे आणि तेव्हाच तुम्च्या आम्च्या सारख्या सिनीयर लोंकाची जबाबदारी वाढ्लीय्..अरे मस्त नवनवीन एकापेक्षा एक असे सुंदर लेख येउ द्यात त्यात आम्ही वाचकवर्ग चांगल्या आणि प्रामाणिक प्रतीसादांची भर घालुच

ईथे एवढी चिखलफेक नाही झालीये ..पण ती पुढे वाढु नये हीच आमची ईछा

आता कुणी म्हनेल हा लेख तर उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार वाटला तर त्यांचे त्यांना लख लाभ.

माझी अपेक्षा खुपच माफक आहे ..शेवटी एवढंच सांगु ईछीतो .....ईथे काहीच लोक लिहतात पण त्या लिखाणाचा वाचक वर्ग खुप मोठा असु शकतो हे विसरु नये.

---नितिन(मिपाचा ,ईथल्या लिखाणांचा,ईथल्या टोपण नावांचा ,तात्याचा निस्सीम चाहता)

प्रतिक्रिया

II राजे II's picture

9 Aug 2008 - 5:27 pm | II राजे II (not verified)

अनुमोदन तुमच्या मताला आमचे ही !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर

आजपर्यंत सर्वच नव्हे, परंतु मिपावर निखळ प्रेम असणार्‍या मिपाकरांच्या साथीने मिपाधर्म वाढवण्याचा प्रयत्न केला. उद्याचं माहीत नाही! नुकतंच नीलकांतला भेटून मिपावर थोडा अधिक खर्च करून अजून काही चांगल्या सुधारणा करण्याबद्दल, सर्व्हरबद्दल वगैरे चर्चा केली. परंतु आता मन नाही. आहे ते मिपा ठीकच आहे!

असो,

नितिनराव, आपल्या अपुलकीबद्दल कृतज्ञ आहे...

तात्या.

अवलिया's picture

9 Aug 2008 - 5:44 pm | अवलिया

नुकतंच नीलकांतला भेटून मिपावर थोडा अधिक खर्च करून अजून काही चांगल्या सुधारणा करण्याबद्दल, सर्व्हरबद्दल वगैरे चर्चा केली. परंतु आता मन नाही. आहे ते मिपा ठीकच आहे!

असे उदास होवुन कार्य होणार नाही
दुर्लक्ष करा अशी माणसे सर्वत्र असतात त्यांना टाळणे हाच उपाय
याल तर सह, न याल तर .... हे विसरु नका म्हणाव त्यांना

नाना

(सर्व्हर बदलत असाल तर भारतातीलच बघा ... त्या अमेरीकन कंपन्यांचे काय खरे नाहि केव्हाही आता त्ञांचा बैंडबाजा वाजणार....)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Aug 2008 - 12:45 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या,
असा उदास होऊ नकोस.
अरे माझ्या हापिसातले लोक देखील मिपा वाचत असतात नियमीत. पण असे आहे की एकानेही सदस्यत्व घेतलेले नाही. पण मिपा नियमीत वाचून ज्ञानार्जन करीत असतात. याचा अर्थ ते इतर स्थळावर जातात असे नाही. पण ते सर्व ठीकाणि वाचत असतात. मग जर मिपा अशाप्रकारे मराठी वाचकवर्गाला आकृष्ठ करत असेल तर त्यांचे नुकसान नाही का होणार.
पुण्याचे पेशवे

अवलिया's picture

9 Aug 2008 - 5:39 pm | अवलिया

ईथे एवढी चिखलफेक नाही झालीये ..पण ती पुढे वाढु नये हीच आमची ईछा

मी पण सहमत आहे

तसा मी काही लेखक नाहि इतकेच काय मी प्रतिक्रिया पण खुप कमी लिहितो पण वाचन होते
( जनामनातले सोडून ते काय आपल्याला झेपत नाहि)

काही जणांना मी चांगलाच ओळखतो जरी ते मला ओळखत नसले तरी
त्यामुळे त्यांचे झालेले अधःपतन मन विषण्ण करुन जाते

कदाचित वैयक्तिक समस्यांमुळे असे होत असावे अशी शंका वाटते (ते जी कामे करतात त्या कामाच्या स्वरुपाबद्दल तसेच जिथे काम करतात त्या बद्दल मला संपुर्ण माहिती असल्यामुळे हे विधान करु शकतो)

तरी या डिप्रेशन मधुन अशा व्यक्ति सुखरुप सहिसलामत पुर्वीच्याच जोशात बाहेर याव्यात अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो

नाना

II राजे II's picture

9 Aug 2008 - 5:43 pm | II राजे II (not verified)

तरी या डिप्रेशन मधुन अशा व्यक्ति सुखरुप सहिसलामत पुर्वीच्याच जोशात बाहेर याव्यात अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो

वा ! अशीच काही शी प्रार्थना मी देखील देवा समोर करतो !

पुन्हा पुन्हा लिहीत आहे.. आपली सदविवेक बुध्दी जागृत ठेवली की असली वेळ येणार नाही .. की दुसरा कोणी आपल्यासाठी प्राथना करु लागेल.

तेव्हा खाली वाक्य जरा गर्भित अर्थाने घ्या.... शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया!
नानांशी सहमत!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 8:07 am | प्रकाश घाटपांडे

नाना शी सहमत आहे.
(स्वानुभवी)
प्रकाश घाटपांडे

जनरल डायर's picture

10 Aug 2008 - 2:19 am | जनरल डायर

मिपाचा ,ईथल्या लिखाणांचा,ईथल्या टोपण नावांचा ,तात्याचा निस्सीम चाहता
असेच म्हणतो

(हागणदारीला वैतागलेला) सोकाजीराव

घाटावरचे भट's picture

10 Aug 2008 - 2:40 am | घाटावरचे भट

नितिनराव,

आपला लेख आणि त्यातले विचार पटले. आपण मिपाकरांची ही जबाबदारी आहे, की मिपाच्या ह्या स्टेजला, मिपा वाढत असताना आपण सर्वांनीच काळजीपूर्वक वागले पाहिजे. झणझणीत आणि खमंग काही वाचायला मिळायलाच हवं, ती तर मिसळ्पावची खसियत आहे, पण त्याचबरोबर उत्तम दर्जेदार साहित्यही इथे दिसावं अशी आशा करायला हरकत नाही.

तात्या,
तुम्हाला सल्ले देण्याइतका मी मिपावर जुना नाही किंवा तुम्हाला जवळून ओळखतही नाही. पण इथे आल्यावर मला सर्वप्रथम भावलं ते इथलं अनौपचारिक वातावरण (लोकं स्वत:हून दुसर्‍याशी बोलतात, माझ्यासारख्या नवख्या सदस्याच्या प्रयत्नांचं कौतुक करतात) आणि त्या सोबतच चाललेली खुमासदार साहित्यनिर्मिती. पण तुम्हीच मन नाही म्हणून कसं चालेल? मालकांनीच मिपा सुधारायचा प्रयत्न सोडला तर कसं होणार????
आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही, अन ह्या असल्या गोष्टी मनावर घेता???

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 4:33 am | विसोबा खेचर

पण इथे आल्यावर मला सर्वप्रथम भावलं ते इथलं अनौपचारिक वातावरण

धन्यवाद भटराव!

पण तुम्हीच मन नाही म्हणून कसं चालेल? मालकांनीच मिपा सुधारायचा प्रयत्न सोडला तर कसं होणार????

सध्या मन नाही इतकंच म्हटलं आहे, प्रयत्न सोडला आहे असं नव्हे!

आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही, अन ह्या असल्या गोष्टी मनावर घेता???

तसं नाही हो, परंतु ठराविक लोकांना अनेक फाट्यावर मारूनही त्यांच्या मर्कटलीला सुरूच असतात याची अंमळ गंमत वाटते! असो, तूर्तास त्यांना तरी मिपशिवाय कोण आहे? काय सांगावं, उद्या यातूनच एखाद्याला स्वत:चे वेगळे संस्थळ काढायचे सुचेल अन् मराठी आंतरजाल अधिक सशक्त होईल. मलाही त्या संस्थळावर अधनंमधनं हजेरी लावायला नक्कीच आवडेल! :)

आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही,

ते तर आहेच! आणि यापुढेही मारीन! :)

असो, आता संपवा हा विषय! मध्येच कुणीतरी काहीतरी हागून गेला की मिपावर हा विषयही डोकावतोच व वेगवेगळी मतमतांतरे ऐकायला मिळतात. अर्थात, मिपाचे खरे हितचिंतक कोण हे मला अधिक चांगल्या रितीने समजायला मदत होते हा भाग निराळा! ;)

आपला,
(सात भिकारचोट) तात्या.

अवांतर १) :

साला, तूर्तास आपण एकदम मुडात आहोत. आज पहाटे तीन पर्यंत मित्रमंडळीत झकासपैकी गाण्याची मैफल झाली. मजा आली! नंद रागावर भरभरून बोललो, त्यातली मला माहिती असलेली सौदर्यस्थळे प्रात्यक्षिकात दाखवली आणि त्याच रागातलं 'तू जहा, जहा चलेगा, मेरा साया साथ....' हे गाणं जमेल तितकं उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. इतरही काही गायलो. साला गायला मजा आली, पब्लिक खुश झालं, आपणही खुश झालो! माफक मद्यपान केलं, आणि झकासपैकी बिर्याणीही चापली! :)

आपला,
(गाण्यातला, खाण्यातला, पिण्यातला!) तात्या.

अवांतर २) :

स्वगत : चला! १५ ऑगस्ट जवळ येतोय, काही संस्थळांच्या मालकांना वर्धापनदिनाच्या भरभरून शुभेच्छांचे विरोप पाठवायचे आहेत! स्मरणाकरता शेंडीला अंमळ गाठच मारून ठेवली पाहिजे! ;)

आपला,
(राजकारणी!) तात्या.

पिवळा डांबिस's picture

10 Aug 2008 - 3:29 am | पिवळा डांबिस

लिहिता येत नाही म्हणता, पण वर अगदी सुसूत्रतेने आणि मुद्देसूदपणे लिहिलंय की तुम्ही! :)
तुम्ही माझं नांव घेऊन टीका केलीय तेंव्हा उत्तर देणं भागच आलं....

मिपाचा तुम्हाला जितका जिव्हाळा आहे तितकाच आम्हालाही आहे. आमची वाटचाल जर न्याहाळली तर मिपावर आम्ही विधायकच स्वतंत्र लिखाण केलेले आहे. मिपावरचं वातावरण जेंव्हा तणावपूर्ण होतं तेंव्हा तो ताण कमी करण्यासाठी (कविता हा आमचा प्रांत नसतांना) विडंबक कविताही प्रकाशित केलेल्या आहेत. लोकांच्या चेहर्‍यावर हसू फुटावं, चिडाचिड कमी व्हावी हाच त्यामागचा उद्देश आहे. तुम्हाला ठाऊक नसेल पण मिपामालकांना माहिती आहे की जेंव्हा वेळ पडली तेंव्हा मिपाची बाजू घेऊन भांडलेलोही आहोत. तेंव्हा आमच्या मिपाप्रेमाच्या पातिव्रत्याबद्दल शंका घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये.....

आमचं म्हणणं इतकंच की जर कुणाला मिपावर काय चाललंय हे आवडत नसेल तर काही नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करा ना. त्यासाठी कोणी लेखक/ कवी असायची गरज नाही. इथे कोणीही पुल वा कुसुमाग्रज नाही. लेखन हा कुणाचाच पूर्णवेळ व्यवसाय नाही. तुम्ही संगीत, चित्र, शिल्प, अर्थकारण, राजकारण, समाजकारण कशाचीही चर्चा सुरु करू शकता! काहीच नसेल तर रोजच्या वर्तमानपत्रात वाचलेले किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला जाणवलेल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर 'काथ्याकूट' मध्ये चर्चा सुरु करा.....

काहीही करा पण या प्रोसेसमध्ये स्वतः सहभागी होऊन स्वतः काही नवी दिशा द्यायचा प्रयत्न करा. मी तुमचं दोन्ही बाहू पसरून स्वागत करतो......

पण तसं काहीहि न करता फक्त वाचनमात्र राहून अचानक एखादे दिवशी "हे काय चाललंय, आणि ते काय चाललंय" असे जाब विचारल्यासारखे वाटणारे वांझोटे प्रश्न उपस्थित करण्यात काय मतलब आहे? हृषिकेशने म्हटल्याप्रमाणे अशाने परिस्थिती सुधारत नाही तर आणखी चिघळते.

नुसतेच नेहमी लिहिणार्‍या ऍक्टिव्ह मेंबर्सकडून हाय अपेक्षा आहेत असे म्हणत राहू नका, स्वतः या क्रियेत सहभागी व्हा. आपलं लिखाण मनासारखं वठत नाहिये अशी जर शंका असेल तर तुमच्या आवडत्या अशा मिपावरच्या कुठल्याही लेखक/ कवीला व्यनि करून ते पाठवा आणि सुधारणा मागवा. माझी खात्री आहे की इथला कोणताही लेखक/कवी आपल्या फेलो मिपाकराला आनंदाने मदत करेल.

जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का?

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 4:11 am | विसोबा खेचर

सुंदर प्रतिसाद!

डांबिसाने गमत्याला दिलेला प्रतिसाद पटला नव्हता परंतु या वेळेस मात्र डांबिसाचा प्रतिसाद अधिक खुलासेवार असल्यामुळे नक्कीच पटण्याजोगा आहे! :)

आपला,
(प्रांजळ) तात्या.

सुनील's picture

10 Aug 2008 - 7:09 am | सुनील

सुरेख विवेचन.

जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का?

माझ्यापुरते म्हणाल तर, हे आता पाळण्याचे ठरवले आहे. इतके महिने केवळ प्रतिसादापुरता राहिला होतो. आता पुनः काही लिहिन म्हणतो. बघूया...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाका,

बरोब्बर बोललात.

जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का?
+१

आणि तुम्ही खरोखरच पॉझिटीव्ह विचार (आमच्या अपेक्षेप्रमाणे) मुद्देसूद मांडले आहेत.

आतापासून मी पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे पॉझिटीव्ह लिहिण्याचा प्रयत्न करेन!

प्राजु's picture

10 Aug 2008 - 4:06 am | प्राजु

नितिनजी,
अगदी प्रामाणिक आणि मनापासून लिहिलेलं आहे तुम्ही. पिडां काका म्हणतात त्याप्रमाणे अगदी सुसूत्रही लिहिलं आहे.
आपल्या भावना अगदी निट पोचवल्या आहेत आपण. मिपाची सदस्य आणि हितचिंतक म्हणून मी माझ्या परीने चांगल्यात चांगले लेख , व्यक्तीचित्र, कविता अगदी मनापासून लिहित आले आहे. आणि कोणी कितीही टिका करो अथवा नावे ठेवो मी इथले लेखन थांबवणार नाही हे नक्की.
कोणी काही वातावरण नासवणारे लेखन केले तर त्याला मी कधीही प्रतिसाद देऊन प्रोत्साहीत नाही केले आणि करणारही नाही. एका मर्यादेपर्यंत मजा असते नंतर अती तिथे माती होते हे मी पूर्णपणे जाणून आहे.

जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का?

हे मात्र खरं..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

10 Aug 2008 - 8:42 am | सर्किट (not verified)

इतिहासाची तमा नसे तर भविष्य तममय वाटतसे

(इति कवी सर्किट)

आजकाल येथे चिखलफेक, मिपाचे शत्रू, वगैरे असे अनेक वाक्प्रचार दिसताहेत.

हे सर्व लोक, म्हणजे असे वाक्प्रचार दाखवणारे, आजवर वाचनमात्र होते असे दिसते. आजच मिपाच्या जीवनमूल्याविषयी आपापले दात पुढे दाखवू लागलेले आहेत असे दिसते.

आणि पिडांकाकांचे नाव पुढे देताहेत. काकांचे नाव द्यावे नक्की. पण पिडांकाकांचे नाही.

इतिहासाची तमा नाही, हे नक्कीच.

कुठल्या काकांचे नाव द्यावे हे जर कळत नसेल, तर सोडा ना ! कळत नाही, हे स्पष्ट सांगा !

इथल्या अनेक काकांनी अनेक पुतण्यांना आजवर शहाणपणा (?) शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे आले, एक पिडाकाकांचे पुतणे !!!

हे असे लेख आणी प्रतिसाद जर मिपावर राहणार असतील, त्रा खरेच, मिपाचे अष्टप्रधानमंडळ झोपले आहे का ? हाच प्रश्न उरतो !

मिपाच्या जन्माचा उद्देश, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे जर कुणालाही जाणून घेता आले, तर असे प्रतिसाद येणार नाहीत, हे नक्की.

काय तात्या ?

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2008 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणी प्रतिसाद जर मिपावर राहणार असतील, त्रा खरेच, मिपाचे अष्टप्रधानमंडळ झोपले आहे का ? हाच प्रश्न उरतो !

अष्टप्रधान मंडळापैकी कोणालाही असे लेख,प्रतिसाद, उडवणे फार सोपे काम आहे. पण अशा चर्चेतील सहभागाबरोबर उत्तम लेखन करणे हा गढूळ वातावरणावर उत्तम पर्याय असतो. तेव्हा अधिक जोमाने उत्तमोत्तम लेखन व्हावे असे मिपामालकाबरोबर आम्हालाही प्रामाणिकपणे वाटते आणि ते होणारच आहे.

-दिलीप बिरुटे

एकलव्य's picture

10 Aug 2008 - 9:11 am | एकलव्य

सर... तुम्हीदेखील अष्टप्रधानांत आहात हे क्षणभर विसरलोच होतो. मुजरा!!

(राजदरबारापासून दूर - पण सरांच्या जवळ राहणारा) एकलव्य

सर्किट's picture

10 Aug 2008 - 9:14 am | सर्किट (not verified)

उत्तम लेखनाची ही तुमची व्याख्या असेल तर मग सगळे संपले !!!

काही दिवसांपूर्वी, आदरणीय सरपंचांनी "मिसळपावाविषयी मिसळपावावर लेखन होऊ नये" असे स्पष्ट खरडले होते, हे आम्हाला आठवतेय !

तसेच, धर्म, जाती ह्याविषयी देखील लिखाण होऊ नये, हेही खरडले होते.

तसे असूनही, हिंदूंविषयी मुसलमान धार्जिण्यांनी, आणी मुसलमानांविषयी हिंदू धार्जिण्यांनी वाट्टेलते लिहिलेले आजवरही इथे तसेच आहे. तुम्हा अष्टप्रधानांना नीट दिशा सरपंचांनी किंवा आणिबाणीच्या शासनकर्त्यांनी दिलेली नाही, हे स्पष्ट दिसले

मग, मिसळपावाविषयी मिसळपावावर लिहिलेले स्पष्ट दिशादर्शन केलेले असतानाही तुम्ही काही काढून टाकणार नाही, हे स्पष्ट दिसते आहे, असे दिसले कुणाला, तर काय बिघडले आहे ?

सरपंच, तुमचे दिशादर्शन स्पष्ट नाही, की तुमचे हे अष्टप्रधान मंडळ त्यांना दिलेल्या अधिकाराचे पालन करत नाही ??

काय हे ?

- सर्किट

(असे भाड्यांनो, तुम्हाला जर अधिकार मिळाले आहेत, तर त्याचा योग्य उपयोग करा ना ? उगाच व्यक्तिगत संबंध गढूळ होतील, ह्या विचारात का गुंतला आहात अजून ?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2008 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(असे भाड्यांनो, तुम्हाला जर अधिकार मिळाले आहेत, तर त्याचा योग्य उपयोग करा ना ? उगाच व्यक्तिगत संबंध गढूळ होतील, ह्या विचारात का गुंतला आहात अजून ?)

अधिकाराचा योग्य उपयोग कसा करावा त्याचे शहाणपण सुदैवाने आम्हाला आहे. ते शहाणपण आम्हाला तरी कोणी शिकवू नये.

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 9:18 am | विसोबा खेचर

या विषयावरील चर्चा आता थांबवण्यात आली आहे!

पुरे झालं आता!

सर्व मिपाप्रेमींचे आभार...

यापुढील येथील सर्व प्रतिसाद उडवले जातील...

तात्या.