वरदायिनी कालिका

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in भटकंती
18 Dec 2014 - 3:17 pm

देवी

वरदान काळकाई ऊर्फ वरदायिनी कालिका ह्या देवी चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जवळ मुंबई-गोवा हायवे नजीक धामणी गावी आहे . या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे. परंतु आजतागायत ते प्रसिद्धीस आलेले नसून प्रसिद्धी-पराङ्ग्मुख आहे. या देवळानजिक एक नयनरम्य धबधबा असून पावसाळ्यात जुलै -औगस्ट महिन्यात अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते . देवीची मूर्ति चतुर्भुज असून सिंहासनाधिष्ठित आहे . या ठिकाणी 1995-1997 दरम्याने सहस्रचंडी सारखी अद्भुत अनुष्ठाने झालेली आहेत . हे देवस्थान अतिशय जागृत असून फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि वटपौर्णिमा तसेच नवरात्रात या देवीचा उत्सव असतो . जिज्ञासू भाविकांनी जरूर लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया

इरसाल's picture

18 Dec 2014 - 3:34 pm | इरसाल

या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे.

कळले नाही कृपया प्रकाश पाडावा.

बॅटमॅन's picture

18 Dec 2014 - 3:36 pm | बॅटमॅन

म्हणजे देवतांमध्येही जागृतपणाची उतरंड असते की काय? जागृत होण्याचा थ्रेशोल्ड ०.५, ०.६ वगैरे? आम्ही तर बॉ सर्व देवतांना अतींद्रिय की कसलीशी शक्ती असते असे ऐकून होतो.

या ठिकाणी आपण गेला आहात का ?
बाकी फोटोत देवीच्या मागे आणि देवीच्या चरणांखाली श्रीयंत्र दिसत आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt
Oil's Price Decline Weighs On High Yield Debt
U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

प्रचेतस's picture

18 Dec 2014 - 3:37 pm | प्रचेतस

मूर्ती कालिकेची आहे असे म्हणता तरी फोटो लक्ष्मीचा का टाकलाय?

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 3:41 pm | टवाळ कार्टा

असे विचारले की आपण पाखंडी ठरतो हे माहित नाही का....देव म्हटला की गप नमस्कार करायचा...बाजूला काय चालू आहे त्यांचे ते बघून घेतील...असे विचारायचे नसते हे माहित नाही का?

प्रचेतस's picture

18 Dec 2014 - 3:51 pm | प्रचेतस

देव नाही ओ. देवी..................!!!!!!!!!!!!!!!

इरसाल's picture

18 Dec 2014 - 3:42 pm | इरसाल

http://2.bp.blogspot.com/-A7ypUKuk394/Tv1o7LNukaI/AAAAAAAAACI/yHcXtXrU8tY/s1600/Aviary%2Bwikimapia-org%2BPicture%2B2.png

खटपट्या's picture

19 Dec 2014 - 3:46 am | खटपट्या

नवलाई आणि नवलादेवी या एकच आहेत का?
माझ्या ग्रामदेवतेचे नाव नवलादेवी आहे. म्हणजे नक्की कोणती देवी ?

वल्लीशेट आणि अन्य जाणकारांकडून माहीतीची अपेक्षा !!

मुळात ८५ सालच्या काढलेल्या डॉक्युमेंटरीत वैष्णोदेवीचे आताचे देऊळ नाहीये .मोठाल्या धोंड्यांत एक शेरोवालीचा फोटोफ्रेमवाल्याकडचा फोटो ठेवलेला दाखवतात थंडीच्या दिवसांत इथे आणि शिवखोरी त साधू लोक जाऊन बसत असत.

मंदार कात्रे's picture

19 Dec 2014 - 1:03 am | मंदार कात्रे

सदरहू देवीची मूर्ती वर दिलेल्या चित्राशी मिळतीजुळती आहे. प्रत्यक्ष फोटो सध्या उपलब्ध नाहित , उपलब्ध झाल्यानंतर टाकतो.

मंदार कात्रे's picture

19 Dec 2014 - 1:04 am | मंदार कात्रे

वर दिलेल्या म्हणजे मूळ पोस्ट मधल्या चित्राशी मिळतीजुळती

सिरुसेरि's picture

19 Dec 2014 - 7:20 pm | सिरुसेरि

"देउळ - तु झोप मी जागा आहे" ची आठवण झाली .