1
माझ्या भिडस्तपणाच एक उदाहरण-
मागच्या आठवाड्यात मी एक फळविक्रेती बाई ४५-५० ची तिच्या पोराबरोबर बघितली. अननस घ्यावसं वाटलं. मी गेलो. कितीला म्हणून विचारलं 50 रु. बरं बाबा 50 रुपये तर 50 रूपये. मी भाव वगैरे करु शकत नाही. कारण कमी केले तर तिला गंडवल म्हणून वाइट वाटतं अन् महाग पडलं तर आपण लुबाडले गेलो म्हणून. असो. एक अननस निवडलं. तीच म्हणाली कापून देऊ का? मग माझ्या लक्षात आले की कापायचे पण आहे म्हणून. म्हटलं द्या. 30-35% अननस माझ्या डोळ्यासमोर खराब निघाला. आता काय करावे? ती बाई थोडी भितीने(नवीन द्यावे लागेल की काय म्हणून) माझा अंदाज घेउ लागली. तरीपण तिचं कापणं चालूच. शेवटी मीच म्हटलं मावशी खराब निघालयं की हो. मग कसनुसं हसत ती म्हणाली थोडसचं निघालय. मी थोडा गरीबी/हताश चेहरा घेऊन पँकिंग संपण्याची वाट बघत बसलो. शेवटी तिला दया आली? की गिल्ट आला तिच्या मनात? कोणास ठावूक? जे काही असेल ते मी complete surrender केल्यामुळंच होतं. मग तिने तिच्या पोराला विचारल (नेहमी ही एकटी बाईच सगळ साम्भाळते पण आज पोराला विचारले) ह्याचं अननस खराब निघाले , काय करायच? पोरगं म्हटलं किती ? ती म्हटली थोड जास्तच निघालयं. बर मग दहा रुपये कमी कर. आता तिच्या चेहऱ्यावर justice has been done टाईप आनंद परतला. पण रात्रीची वेळ , सुट्टे दहा नव्हते, त्यामुळे एक संत्र गळ्यात मारलं(जे आंबट निघालं).
--------
आणी लोक म्हणतात अत्याचार शारीरिकच(उदा. रेप, मारहाण) असतो मानसिक(दबाव, blackail,dominance) वगैरे skills (?) develop करावी वगैरे लागतात. करा आमच्याच डोक्याचा भुगा.
-------------
मग असलेली आयुधे वापरुन domina
te/authoritize/lead केला तर काय वाईट?
1. राजकारण्याने जनतेला भुलवून(?)- स्वप्न दाखवून /आश्वासन देउन/ काही काम करुन- काही काम बुडवून जनतेची मते घेतली तर काय वाईट? मोदीनी कोणत्याही माणसाला निवडून आणताना तो कामे करेल की नाही हा विचार केला असेल की तो निवडून येईल का? हा विचार केला असेल. उदा. मोदी,मायावती,सोनिया सगळेच. 2. गि.कु. आपल्या अग्रलेखात आठवड्यात सहापैकी सरासरी 1.5 वेळा "करलो दुनिया मुठ्ठी मे" करतात. ते काय म्हणून ब्वा. लायसेन्स राजात रि-अलायन्सने केल असेल काहीतरी(?) मग दुसर्यांच्यात दम/कॉन्फिडन्स/ मर्दानगी नव्हती? आता कुठं काय करतेय? उगीचच ie च्या रामनाथ गोयंकाची फँमिली(express family) दुश्मनी पुढच्या पिढीत व मराठी आवृत्तीत पण बघायला मिळावी? शेतकर्यानी जशी धंद्यात रिस्क घेतली पाहिजे तशी संपादकानीसुद्धा झालं गेलं विसरुन पुढं बघायला शिकावं. 3. एखादा महानायक येतो 2५% जमातीला वर नेतो(आरक्षण देतो). Obviously सगळी equations change होणारच. संख्यात्मक ताकद(लोकशाही म्हणतात ती यालाच) वापरुन dominant झाला हा समाज(अर्थातच थोडेच लोक top ला पोहोचणार. उच्चवर्णीयातसुद्धा सगळेच पुढं (?) नाहीयेत. पण त्यांच्या मागासपणाच प्रतीक म्हणून तळातल्यांकडेच का बोट दाखवायचे? Bjp ला पाठिम्बा देणारा उच्चवर्णीय/ उच्चवर्गीय का पाठिम्बा देतोय? सामाजिक न्यायाच्या पांचट सबबीखाली/उदात्त धोरणाखाली बळी कुणाचा गेला? संधी नव्याने निर्माण केल्या गेल्या का? ह्यांच्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला का? त्या individual ची संधी हिरावून घेतली, मग त्याने पुढे काय केले? त्याने ते accept केले? मनापासून की मारून मुटकून? सरकारी नोकरीत आरक्षण म्हणजे पोटापाण्याची सोय असा समज निर्माण तर झाला नाही ना? 4. Obc नी फक्त संख्याबळ वापरुन सगळ्यांनाच मूर्ख बनविले. रपारप सगळी समीकरणं बदलली. ज्याने आपल्या जातीचा कधीच उल्लेख केला नव्हता. तो(PM)स्वतःला obc म्हणाला. Obc हा नवा उच्चवर्ण आहे किंवा होत आहे. मोदी-संघ/bjpच नात दोघांच्या सोयीचच आहे. पण उद्या फाटलच तर obc+काही sc/st+ इतर ह्यांच्यापुढे संघ-बिंघ टिकणार नाही.
5. इतर. Who should have dominance in marital relationship? breadwinner or homemaker? It goes without saying that money-maker will be dominant. But what about trophy wife or for that matter trophy children? I mean they are the real beneficiaries. In exchange for sex/food/good behaviour/obedience or all or nothing whatsoever(This happens. Someone can have affection for their darlings just because they 'belong' to them). Then dominance of sexual reationship/money making/caste/religion/class should be used without any kind of guilt.
6. As said earlier numerical dominance of caste can topple all equations. This applies to religion too. So crusade against two of minorities of this country but majorities in world i.e. Muslims and christians should be welcomed, I think. But buddhist(SC s15%) can not be touched because 13% muslim+3.5%christian+ 15% SCs will be too large to handle. 7.5% SCs do not care to which religion they belong? So all this is a sham to control or 'convert' others. I should join them but do I really matter to them? Are they gonna give me some share of dominance? Well, they are offering common hatred against a group of people without any kind of regret/guilt. Thank god(?) I do not belong to 'those religions' and I have a choice to make? Or do I?
7. काही अत्याचार/dominance समाजमान्य असतात. उदा. बॉसचे कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे. शिक्षिकानी मारून मुटकवून पोराकडून अभ्यास करवून घेणे. यातल्या dominant-subservient relationship चा विचार व्हायला हवा.
भीडस्तपणा, स्वानुभव व प्रश्न
गाभा:
प्रतिक्रिया
18 Dec 2014 - 3:13 am | hitesh
अननसापासुन आरक्षणापर्यंत.
संत्र्यापासुन सामाजिक विस्षमतेवर !
मस्त !
18 Dec 2014 - 3:17 am | hitesh
So crusade against two of minorities of this country but majorities in world i.e. Muslims and christians should be welcomed, I think.
...
:)
18 Dec 2014 - 3:43 am | येडाफुफाटा
हो पण ते उपरोधिकपणे म्हटलं आहे. गैरसमज होउ नये म्हणून क्लियर करतो.
18 Dec 2014 - 4:13 am | hitesh
उपरोधिकपणेच आहे. आले लक्षात.
18 Dec 2014 - 4:24 am | hitesh
अननस घेआना अख्खा घेतच नाही.. कापलेल्या चकत्याच घेतो.
आणि संत्री घेताना आमच्याकडे छोटी दहा रुपयाला पाच वाली मिळतात ती घेतो. ती कधीच आंबट निघत नाहीत.
अॅपल मात्र बर्याचदा फोफसं निघतं .. तोच एक प्रश्न आहे.
केळी , पेरु , आंबा चिकु सीतफळ हेही कधी त्रासदायक ठरत नाहीत.
.... त्या कर्मण्याच्या धाग्यावर मी बोल्लो होतो .. ईथे कर्मण्य आणि कर्मविपाकाचे तत्वद्न्न्यान सांगणारे तत्वद्नानी लोक आरक्षणाच्या धाग्यावर मात्र आरक्षण कसे अन्यायकारक आहे हे ओरडुन रडुन सांगतात तेंव्हा मला हसु येते.
आणि आज लगेच आरक्षणविरोधात धागा निघालाही !
असो... फळ विकत घेणे हे तुमचे कर्तव्य आहे, फळाची अपेक्षा मात्र ठेऊ नकोस असे भगवंतच बोलुन गेलेत. श्रीकृष्णार्पणमस्तु.
18 Dec 2014 - 6:23 am | येडाफुफाटा
Though sentiment seems to be against reservation, it is not like that(well at least in this case). I am saying that upper caste/class will cry(maybe rightfully) about merit(so called?) Then lower caste/class cries(maybe rightfully) about injustice(so called). But I am talking about urban 'backwards' who were born and brought up in metros and district and taluka places where no untouchability can exist and existed very rarely in the past. But this portion of backward class along with 2nd/3rd generation reservation beneficiaries are reaping all benefits. But when I say this you counter with "so bloody what? At least 'one of us' is getting it. These are peaople who will cry for resetvation but in the name of 'javkheda'/'khairlanji'. Beneficiaries once out of their caste-class circle never returns to uplift others. This is equivalent to polticians who ask for fund in the name of poor people only to be used by themselves.
I weep when I read some PIO got selected as supreme court judge/chief surgeon etc. I mean they could have been here doing same service. But whatever... Everybody seems contended with reserved (mostly clerial) jobs. Very few gets in private companies (I agree they are equally bad) but they never reach actual plum posts.
18 Dec 2014 - 6:37 am | hitesh
I weep when I read some PIO got selected as supreme court judge/chief surgeon etc. I mean they could have been here doing same service. But whatever... Everybody seems contended with reserved (mostly clerial) jobs. Very few gets in private companies (I agree they are equally bad) but they never reach actual plum posts.
....
पूर्ण प्याराग्राफच आक्षेपार्ह आहे.. मॅए स्वतः डॉक्टर आहे. रिजर्वेश्नमधुन झालेले डो. व ओपनमधुन झालेले डॉ. यांच्या गुणवत्तेत फरक नसतो. हे मी अभिमानाने सांगु शकतो. खाजगी प्रॅक्टिस , सरकारी नोकरी , लेक्चररशिप सर्वात ते गुणवत्तपूर्वक काम करत आहेत. एखादा अपवाद असेलही , पण तसा अपवाद ऑपंमध्येही असतो.
ओपनचे डॉ. चांगले असतात व रिजर्वेशनचे वाइट असा काही तुमचा डेटा असेल तर जरुर सांगा. ऐकण्यास उत्सुक आहे.
18 Dec 2014 - 7:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
असं बोलणं म्हणजे मुर्खपणाचं होईलं असं वाटतं नाही का हितेश साहेब. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो कुठल्याही जातीचा असो त्याच्याकडुन कामं होणारचं. एखाद्याकडे गुणवत्ताचं नसेल तर तो ओपन आहे का कुठल्या जातीचा ह्यानी काय फरक पडणारे? जेव्हा त्या व्यक्तीचं खरं स्वरुन लोकांसमोर येईल तेव्हा लोकं का जातीलं त्याच्याकडे?
आरक्षण हा गरजु लोकांसाठी असलेलं शस्त्र नसुन गरजु राजकारण्यांसाठी असलेलं व्होटबँकेचं चिलखत आहे. आता राजकारणामधेचं सांगतो. आरक्षित समाजाचे एक सोलापुरकडचे नेते कसं वागतातं बोलतातं आणि एका आरक्षणवादी पक्षाचे महामहिम चारचौघांमधे स्वतःचीच कशी इज्जत काढुन घेतात ह्याचं उदाहरण आपल्याकडे आहेचं.
18 Dec 2014 - 3:44 pm | येडाफुफाटा
करेक्ट. गरजू बसलेत ग्रामीण भागात. अन् कोणत्याही बाबतीत practical असणारे , सगळ्या सुविधांचा यथेच्छ उपभोग घेणारे शहरी किंवा ग्रामीण सुस्थितीत असणारे तथाकथित मागासवर्गीयच याचा maximum लाभ घेतात.
18 Dec 2014 - 4:08 pm | येडाफुफाटा
रिजर्वेश्नमधुन झालेले डो. व ओपनमधुन झालेले डॉ. यांच्या गुणवत्तेत फरक नसतो. हे मी अभिमानाने सांगु शकतो. खाजगी प्रॅक्टिस , सरकारी नोकरी , लेक्चररशिप सर्वात ते गुणवत्तपूर्वक काम करत आहेत. एखादा अपवाद असेलही , पण तसा अपवाद ऑपंमध्येही असतो.
--
ह्यात वादच नाही त्याचा परिपुर्ण अभ्यास असेल तर तो गुणवत्ताधारक असणारच ना. अन् केला नसेल तर नसणार. अहो पण त्यांची गुणवत्ता तुमच्यापेक्षा जास्त नसली तरी कमी पण नाही ना. मग त्यांना इथेच संधी दिली तर काय वाईट. पण केवळ दुसर्याला संधी दिली म्हणून तो जिथे संधी मिळेल तिथे गेला. असे अनेक लोक गेले सोडून. इथ उलट तसल्याना इथं काम करायला प्रोत्साहन दिलं तर अजून सुविधा उपलब्ध होईल ना लोकाना.
Reservation म्हणजे APMC कायद्यासारखं केलय. शेतकर्याच्या कल्याणासाठी म्हणायच अन् गब्बर शैतकरी फायदा घेतात.(थोड्याफार गरजू शेतकर्याना पण फायदा होतोच. अन त्यांच्या नावाखाली हे फायदे घेतात. वरून सान्गायच आपली union आहे त्या दुसर्या दलाल/मारवाड्याकड जाउ नको. 'ते' लई वाइट असतात.)
दोनशे वर्ष भारतावर राज्य केल म्हणून आज ब्रिटिश लोकाना मारायला लागलो तर चूक कोण करतयं.
18 Dec 2014 - 6:40 am | hitesh
Beneficiaries once out of their caste-class circle never returns to uplift others
....
हे तर अतिशयच भोंगळ वाक्य. तूम्ही तुमच्या जातीतील किती लोकांचा उद्धार केलाय ?
18 Dec 2014 - 3:27 pm | येडाफुफाटा
नाही केलं. (आणी कोणत्या जातीच्यावर अन्यायपण नाही केला.) कारण जातीतून मला काहीच मिळत नाही. जी व्यक्ती जातीमुळे फायदा घेते तिने तर ऋण व्यक्त करायचे जास्त प्रयत्न करायला हवेत. मी एका पायावर जात सोडायला तयार आहे. उदा. हिंदू धर्मामुळे मला काहीच फायदि नसल्याने किंवा कोणा परधर्मीयाच्या आया-बहिणीला taunt करणे/त्यांच्या लग्नसंस्था/त्याची जास्त मुले असलच सारख काढत बसण्यास रस नसल्याने मला गर्व नाही आहे मी हिंदू असल्याचा. आपण दोघ मिळून अधर्मी- धर्म काढला तरी मला आनंद आहे. त्यात जात नको,लिंगभेद नको काहीच नको.
पहिल्यांदा थोडं odd वाटेल. वाळीत पण टाकले जाउ. पण बघू काय होतयं ते.
18 Dec 2014 - 5:42 pm | hitesh
तुमच्या जातीने तुम्हाला काहीच दिले नाही हा तुमचा भ्रम आहे.
तो मागासवर्गीय होता आणि तुम्ही नाही हा तुमच्या जातीने तुमच्या पुर्वजाना आणि तुम्हाला करुन दिलेला फायदाच आहे ना ?
मागासवर्गीय लोक त्यांच्या बंधुसाठी काही करत नाही हे तुम्ही कसे ठरवलेत ? सगळ्या मागासवर्गीयानी त्यानी केलेल्य सत्कृत्याचा दरवर्षी तुम्हाला ताळेबंद द्यायचा की काय ?
18 Dec 2014 - 5:47 pm | hitesh
तुम्ही आज जात सोडायला तयार आहात कारण त्या जातीचा आता तुम्हाला नोकरी मिळायला उपयोग राहिलेला नाही.
पण ज्या काळात उच्चवर्णीय जात असली की फायदा होत होता त्या काळात उच्चवर्णीयानी जात सोडली का ?
आज त्याना त्यांच्या जातीमुळे फायदा होत असेल तर त्यानी ती का सोडावी ?
18 Dec 2014 - 6:21 pm | येडाफुफाटा
करेक्ट. माझ्या हिंदू(83%) असण्याने मला इतर धर्मीयाच्या भावना दुखावता येत असतील/त्यांच्या लैंगिकतेबद्दल कमेंट पास करायला मिळत असतील तर मी का करू नये. मला माझ्या जातीमूळे हूंडा/मान मिळत असेल तर तो मी का घेऊ नयै. पुरूष असल्याने मला घरी कधी काम लावली गेली नाहीत तर मग या 'मर्द'पणाचा वापर का करु नये? टँक्स illegally वाचवता येत असताना legally का भरावा? आणी एवढ करून मग मी जात मानत नसेन तर माझा सगळीकडूनच तोटा की हो? मी जात मानावी का नाही हे स्पष्टपणै सांगा. जमल्यास का मानावी किवा का मानु नये ते ही सान्गा.
18 Dec 2014 - 6:30 pm | काळा पहाड
हो ना.. हे दोन्ही कडून बोलणार. जातीयवादी म्हणून पण टीका करणार आणि यांना फायदा होतोय म्हटल्यावर हेच लेक्चर पण देणार की आता फायदा होतोय तर का घेवू नये.
18 Dec 2014 - 4:35 am | रामपुरी
"करा आमच्याच डोक्याचा भुगा"
18 Dec 2014 - 6:38 am | जेपी
हितेस भाय,
तेवढ धाग्याकर्त्या विंग्रजीच मराठीत रुपांतर द्याला सांगा.
जरा आमाला कळल.
मग कर्म धर्म आरक्षण वर चर्चा करु.कस्स!!!
18 Dec 2014 - 10:22 am | hitesh
फळ सिलेक्ट कुणी केलं होतं ? खाणार्याने की विकणार्याने ?
मग कापल्यावर फळ बाद निघाले तर विक्रेत्याने नुकसान भरपाई का द्यायची ? विकरेत्याच्या हातुन फळ खाली पडुन फुटले / खराब झाले तर त्याने नुकसान भरुन द्यावे हे मान्य करता येईल.
मूळात विक्रेत्याकडुन नुस्कान भरपाईची अपेक्षा करणं हेच या केसमध्ये चुकीचे वाटते. मग पुन्हा त्या नुकसान भरपाईच्या मोबदल्यात एक संत्रं घ्यायचं .. आणि तेही आंबट निघाले म्हणुन पुन्हा तक्रार !
आणि वर पुन्हा आम्ही ओपनमधले ... म्हणजे गुणी बाळं .. याची आरतीही ओवाळुन घ्यायची !
उद्या एखाद्याला मूल झाले आणि वर्षभरानंतर कळले की त्याला आतुन प्रॉब्लेम आहे , डिलिवरी करणार्या डॉक्टरने भरपाई द्यायची का ?
18 Dec 2014 - 10:32 am | टवाळ कार्टा
म्हणून ज्युस प्यावा...चांगले / खराब काहिही समजत नाही
18 Dec 2014 - 11:01 am | खटपट्या
दुकानात चांगला माल ठेवण्याची जबाबदारी विक्रेत्याची आहे/असते/असावी.
म्हणजे काय? हा मुद्दा कुठून आला ?
18 Dec 2014 - 11:03 am | खटपट्या
सॉरी दुसरा मुद्द (ओपनवाला) आलाय लेखामध्ये .
18 Dec 2014 - 2:42 pm | hitesh
हो हो.. अगदी बरोबर. दुकानदाराने शबरी आज्जीचा आदर्श घेऊन सगळी फळे चाखुन टेस्ट करुन ठेवायला हवीत.
:)
18 Dec 2014 - 11:09 am | आनन्दा
if(
){
मेंदूत केमिकल लोच्या झाला आहे.. डाक्टर असाल तर वेळेवर औषध घ्या, नाहीतर शरीरभर पसरेल.
}
18 Dec 2014 - 3:37 pm | येडाफुफाटा
नाही.पण कारण doctorने बाळ विकलेले नाही. ते deleiver करण्याची सेवा विकली आहे. (पण बाळाचे proper चेकअप् करतात ना डिलीव्हरीनंतर? काही बिघाड तर नाही ना म्हणून? त्यामुळे ती जबाबदारी तर पडेलच.) Internal problem check केले नसेल तर doctor म्हणजे well equiped ANM (midwife)च होईल ना?
18 Dec 2014 - 5:53 pm | hitesh
डॉक्टरने मुलात अंतर्गत दोष आहे का याची चाचपण्रे करायला हवी कारण तशा सुविधा उपलब्ध आहेत.
फळवाल्याने फळात आत दोस्ष आहे का हे कसे ठरवावे ? फळाचा एक्स रे किंवा सोनोग्राफी करुन ?
फळ निवडलेत तुम्हीच. म्हणजे वास स्पर्श दर्शन या माध्यमातुन दोस्श ओळखु येण्यासारखा नव्हता . नाहीतर तुम्हीच ते फळ रिजेक्ट केले असते. दुकानदारालाही ते समजले नाही हा त्याचा दोष होऊ शकत नाही.
18 Dec 2014 - 6:27 pm | काळा पहाड
अच्छा म्हणजे मी जो सॉफ्टवेअर कोड लिहिला (किंवा मी ज्या कोडला सपोर्ट करतोय) त्यात डिलिव्हर करताना काही प्रॉब्लेम होता का ते मला माहिती नव्हतं तर मी त्या जबाबदारीतुन मुक्त ना?
18 Dec 2014 - 6:32 pm | hitesh
कोड डिलिवॄ करण्याउर्वी तो तपासणे ही तिमचीच जबाबदारी रहाणार . नंतरही काही नुकसान झाले तर तीही तुमचीच जबाबदारी रहाणार.
ग्रा सं कायदा वाचायला हवा.
18 Dec 2014 - 6:41 pm | काळा पहाड
मग तोच कायदा भाजीवाल्याला आणि फळवाल्याला पण लावायला नको का? मी पैसे पण द्यायचे आणि तोटा पण सोसायचा? मी जी वस्तू घेतो त्याच्या क्वालिटीची काहिच गॅरंटी नै असं जगात कुठे असतं का? हां आता 'घ्यायचं तर घ्या नै तर फुटा' म्हणायचे पण दिवस गेले. लोक जागृत झालेत. पूर्वी नारळ नासका मिळाला तर वाण्याला परत द्यायची सोय नव्हती. आता देत नस्तील तर बिग बझ्झार मद्धे जातात.
18 Dec 2014 - 7:02 pm | येडाफुफाटा
हितेशजींच्या म्हणण्याप्रमाणे करायला गेल तर मी पुढच्याकडुन घ्यायला पाहिजे होत. पैसे पण दिले नव्हते. खराब निघाल्याने त्या पण काय बोलू शकल्या नसत्या.
18 Dec 2014 - 7:04 pm | hitesh
तेच म्या लिवलं .
ग्र सं कायदा वाचायला हवा.
18 Dec 2014 - 10:39 pm | hitesh
फळे व भाज्या ग्रा सं कायद्यात येतात का हे बघायला हवे.
ते येत असेल तर बुढ्ढीचे बाल गोड नसणे , बर्फाचा गोळा काडीवरुन खाली पडणे , फुगा फुटणे , चक्कर नीट न फिरणे याही तक्रारी या कायद्यात समाविष्ट कराव्यात .
18 Dec 2014 - 4:16 pm | येडाफुफाटा
सरकार कोण निवडून देतं जनता. मग एकदा निवडून दिल्यावर तिला बोलण्याचा काहीच अधिकार नाही? इंडिया म़च हरली की प्रेक्षक का शिव्या घालतात. इथ तर त्याना कोणी बोलविलेल नसत. Direct पैसे पण गेलेले नसतात. अन् तसही मी तिला काहीच बोललो नाही. फक्त इथं सांगितलं इतकच.
18 Dec 2014 - 10:31 am | मराठी_माणूस
हे काय आहे ?
18 Dec 2014 - 2:12 pm | वेल्लाभट
पानात वाढलेला 'नावडता पदार्थ आगोदर संपवून टाकायचा' ही शिकवण पाळता पाळता (नावडत्या) श्रीखंडाच्या चार वाटया खाऊन (आवडत्या) वांग्याच्या भाजीला न्याय देता आला नव्हता. भिडस्तपणामुळे. अर्थात; ही लहानपणची गोष्ट आहे. आताची नव्हे.
18 Dec 2014 - 2:24 pm | प्यारे१
नुकतं लग्न होऊन सासुरवाडीला गेल्यासही असा अनुभव येऊ शकतो.
नावडता पदार्थ हळूहळू खावा ही अनुभवानंतर आलेली अक्कल. :)
18 Dec 2014 - 3:09 pm | आनन्दा
अहो मी तर कारल्याची भाजी खाल्ली होती अशी.. बायकोने पिन मारली की याला कारल्याची भाजी आवडते म्हणून, आणि सासूबाई वाढतायत..
आणि मी खातोय अर्थात.
18 Dec 2014 - 3:21 pm | वेल्लाभट
म्हणून प्रसिद्ध आहे एक अशी गोष्ट कोकणात. आजोबांकडून वगैरे ऐकत आलोय
18 Dec 2014 - 7:16 pm | जेपी
भेंडी,दहीभेंडी,दहीकाला,कालवाकालव,कालवा निरीक्षक,निरीक्षक प्रेमी,प्रेमी युगल,युगल गीत,गीत रामायण,रामायण कथा,कथा शुक्रवारची
,शुक्रवारचा जुम्मा,जुम्मे का चुम्मा,चुम्मे का वादा,वादा ऐ आझम......
18 Dec 2014 - 7:27 pm | येडाफुफाटा
जबरदस्त. धुमधडाका.खतरनाक.थरथराट.झपाटलेला.दे दणादण.धडाकेबाज. माझा छकुला. :);):);):).
18 Dec 2014 - 7:29 pm | शिद
डॅम इट!!! (महेश कोठारे स्टाईल ;) )
18 Dec 2014 - 7:43 pm | येडाफुफाटा
:)
18 Dec 2014 - 7:50 pm | जेपी
डॅम इट,मांईड ईट..
ईट पिझ्झा,पिझ्झा बर्गर,बर्गर सॉस,सॉस भी कभी टमाटा था,टमाटा चिली,चिली चिकन,चिकन तंगडी,तंगडी पळाली,पळाली कुठे,कुठे काय,बर हाय,हाय फाय....
18 Dec 2014 - 8:00 pm | येडाफुफाटा
एक नंबर- dominance × subservience, subservience=wrong, dominance=right but wrong=injustice in past, right=injustice in present, so subservience = injustice in past and dominance = injustice in present
now justice vs social justice
justice = merit=subservient , social justice = reservation =dominant
hence merit due to injustice in past and resetvation due to injustice in present
18 Dec 2014 - 8:46 pm | जेपी
ते मराठीत लिवल तर आमच्या डोक्यात विज चमकल...
बाकी चालु द्या,