गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..
प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.
खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.
प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).
वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?
तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
9 Dec 2014 - 5:35 pm | बोका-ए-आझम
मुळात बायकोबरोबर खरेदीला गेलातच कशाला? मी माझ्या लग्नाआधी एकदा गेलो होतो त्यानंतर आजतागायत गेलेलो नाही त्यामुळे हे असे प्रसंगच येत नाहीत!
9 Dec 2014 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात बायकोबरोबर खरेदीला गेलातच कशाला?
लोकांचे नवरे बघा कसे बायकांना घेऊन जातात खरेदीला तुम्हाला सोबत यायला काय होतं ?
तुम्ही नका निवड करु कपड्यांची पण सोबत यायला काय हरकत असते असं टोमणे नै आले का वाटेला.
वहिनीला नमस्कार सांगा. (ह.घ्या)
मी माझ्या लग्नाआधी एकदा गेलो होतो त्यानंतर आजतागायत गेलेलो नाही त्यामुळे हे असे प्रसंगच येत नाहीत!
पहिल्या प्रसंगाला असं काय घडलं की ज्यामुळे आजतागायत त्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. प्लीज वृत्तांत (व्य.नि.नेही चालेल) :)
-दिलीप बिरुटे
9 Dec 2014 - 6:50 pm | मनिमौ
माज आला आहे का हे विअरायच ना. सोलापुर मधल्या पवार साडी चा फार छान अनुभव आहे. ५ मजली दुकान अणी खुप मोठे. (पुण्यात पण नाही ह इत्के ) विक्रेते खुप मनपासुन माल दा़खवतात. आइ ला वाढदिवसाच साडी आणायला बहीण व मी गेलो होतो. १०० साद्या दाखायल्या न कन्टाळता.
9 Dec 2014 - 6:51 pm | मनिमौ
आम्ही २ घेतल्या :)
9 Dec 2014 - 6:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१०० साड्या पाहून एकही न घेता निघालो असं असतं तर दूकानदार आणि आपलं दोघांचं मन:पूर्वक अभिनंदन केलं असतं :(
-दिलीप बिरुटे
9 Dec 2014 - 8:10 pm | रुस्तम
=D =) =D
9 Dec 2014 - 7:00 pm | स्वधर्म
हा प्रकार अजब असतो. पण अपमान होतो कधीतरी. मनाला लाऊन घेऊ नका. चांगल्या सूचना मिळाल्यात.
9 Dec 2014 - 7:22 pm | कानडाऊ योगेशु
अश्या प्रसंगात माझी जाम गोची होते. काहीही केले तरी मनस्ताप ठरलेलाच आहे म्हणजे अपमान सहन केला तर का सहन केला ह्या विचाराने त्याचा वचपा काढला तर पुन्हा असे का रिअॅक्ट झालो म्हणुन.
एकदा मंडईत टोमॅटो घेत होतो. अर्धा किलोचे टोमॅटो घेतले व दुकानदाराने एका पोलिथिन मध्ये ते दिले. मला ते कमी वाटले म्हणुन पुन्हा अर्धा किलो घेतले.दुकानदार आधीच्याच पिशवीत ते टाकणार होता पण ती तशी जड झाल्यने मी त्याला म्हटले कि बाबा दुसर्या पिशवीत दे ते. तसे करायला त्याने नकार दिला. मी त्याला सांगितले कि तू असे समज कि मी तुझ्याकडुन आधी टोमॅटो घेतलेच नाहीत तर तुला नव्याच पिशवीत द्यावे लागतील. हे तर्कट ही वाया गेले व शेवटी त्याला पिशवीचे एक का दोन रुपये देताना ही घे भीक देतोय असे म्हणालो तेव्हा तो इतका हिस्टेरिक झाला कि त्याने माझ्या हातातुन पिशवी घेऊन ती फाडुन (त्यातले टोमॅटो परत ढिगार्यावर ओतत) पैसे परत केले. बिचार्याला असे काही बोलायची खरेच गरज होती का हा विचार नंतर माझ्या मनात सतत येत राहीला.
दुसर्या एका प्रसंगात एका मारवाड्याच्या दुकानात कागदाच्या प्लेट्स घेताना मी त्या निवडुन घेत होतो (मला त्या डेकोरेशन साठी हव्या होत्या) तर दुकानदाराने "ऐसे मत करो" असे उर्म्टपणे म्हणत हातातुन घेतल्या होत्या तेव्हा मी त्याला एक कचकचीत हिंदी शिवी हासडुन तिथुन सटकलो होतो पण नंतर लक्षात आले कि तिथे एक छोटा मुलगा ही होता दुकानदारासोबत. बहुदा त्याचाच मुलगा असावा. मुलासमोर बापाला अशी वागणुक दिल्याने मला ह्या गोष्टीचा फार मनस्ताप झाला. त्यामुळे नंतर मी कधेही असे रिअॅक्ट न होण्याचे ठरवले. अपमान (?)झटकणे तुलनेने कमी मनस्ताप देणारे असावे असे माझे मत बनले आहे.
10 Dec 2014 - 6:36 pm | सखी
प्रतिसाद आवडला, हेही खरं आहे. विशेषत: पहिल्या प्रसंगात त्या माणसाला दारिद्र्याचे चटके बसले असतील, हे त्यानिमित्ताने आठवले Don't judge people, you never know what kind of battle they are fighting.
अर्थात त्याचा अर्थ असा नाही की कोणीही यावे आणि आपला अपमान करावा तेव्हा उत्तर दिलेच पाहीजे, सर्वांच्या बाबतीत ते एकसारखे होणार नाही हा कळीचा मुद्दा.
9 Dec 2014 - 8:02 pm | रेवती
शॉपिंगची फारशी आवड नसल्याने माझ्यावर ती वेळ आली नाही. साधारण दहाव्या मिनिटाला खरेदी झालेली असते. याचा अर्थ हे फार कौतुकास्पद आहे असे नाही. आपल्या आवडीची वस्तू मिळेपर्यंत ज्यांना फ़िरण्याचा उत्साह असतो अशा उत्साही लोकांचे हे एक मला आवडते.. बरे, ती वस्तू फुकट घेणार नसतो आपण! कपडे, दागिने यासारख्या आवडी निवडीवर अवलंबून असलेल्या गोष्टी तर पेशन्स नसेल तर विकूच नयेत. सरळ धान्याचे दुकान काढावे व त्यातील त्रास सहन करावेत. एकतर आजकाल कपडा कैच्याकै महाग झालेला मी ऐकतीये. ते खरे असेल तर दुकानदाराचा शब्द ऐकून घेऊ नये. पैसे देऊन अपमान कुणाच्या काकानं करून घ्यायला सांगितलाय. माझ्या नवर्याला दुकानदार काही बोलला तर त्याची परतफेड मी केलीच समजा! शिवाय पुन्हा तिथे कधी जाणार नाही आणि हे त्याला मी साम्गीन. माझा अपमान नाही फसवणूक मात्र झालीये. त्याला मी त्याची जाणीव करून दिली व ती फसवणूक जमेल त्यावेळी लोकांना सांगता असते. नौवारी साडी शिवून घेणे याची काही वर्षांपूर्वी बरीच फ्याशन होती . मलाही तशी साडी शिवून घ्यायची होती . आता माझी उंची त्या मनुष्याच्यामते जास्त आहे. त्याला काय करायचे? बाबारे, तू मापे घे आणि पावती फाड! यापेक्षा जास्त काम नाही बोलायचे! शेवटी साडी कमी उंचीची शिवली गेली . दुरुस्त करून द्यायला तयार नाही . मग आमचे वाद झाले. नंतर दुसर्या दुकानात साडी शिवण्याबद्दल विचारले असता त्याने उंचीचे कारण काढले व दोन साड्या आणा म्हणून सांगितले. भारतात काय पाच फूट आणि साडेचार इंच उंचीच्या बायका नाहीच्चेत की काय? बरे एवढे करून मी काही जाड नाही . मग उरलेली साडी परत करणार नाही म्हणाला. शेवटी नाहीच घेतली . जी चुकीची शिवली गेलीये ती मात्र पडून आहे.
9 Dec 2014 - 8:17 pm | सत्याचे प्रयोग
पुण्यात दवाखान्यात चप्पल गेली होती चोरीला मग १ साधी चप्पल घेनेस गेलो चप्पल काय आवडणा दुकानदार लागला लायकी काढायला मग दाखवला पुणेरी बाणा फेकले क्रेडीट कार्ड,ATM कार्ड बोल दुकानाची किमत ? चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्याचा
9 Dec 2014 - 9:44 pm | खटपट्या
तुमच्या एटीएम कार्डात एवढे पैसे होते ?
9 Dec 2014 - 8:24 pm | बाबा पाटील
एका टीव्हीच्या मॉल मध्ये एका दिडशहाण्या अटेंडटने असच काहीतरी बडबडला होता,आमच्या पाटलीणबाईनी दुसर्याच क्षणाला कार्यकर्त्याच्या १८० च्या कोनात कानफाटीत मारली होती,मॅनेजरने येवुन पाय धरले,पाटील चुक झाली माफ करा,बात खतम.नाहीतर तासाभरात मॉलचा कार्यक्रम होता.
9 Dec 2014 - 9:44 pm | खटपट्या
बाबौ !! _/\_
10 Dec 2014 - 4:19 am | स्पंदना
पहेले लात, फिर बात और हो सके तो मुलाकात!!
11 Dec 2014 - 12:24 am | काळा पहाड
बराच वेळ हा काय प्रकार आहे हे ध्यानात येत नव्हतं. पण नंतर कळलं.
11 Dec 2014 - 12:32 pm | बाबा पाटील
१८० च्या कोनात कानफाटीत हा प्रकार असतो,मार खाणार्याला कमीत कमी ५ मिनिटेतरी काही कळत नाही.
11 Dec 2014 - 3:29 pm | काळा पहाड
:) हे वाचून हा प्रसंग आठवला: https://www.youtube.com/watch?v=abmXaIAtvyQ
11 Dec 2014 - 8:07 pm | बाबा पाटील
बायको *aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:*aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:*aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:
11 Dec 2014 - 8:08 pm | बाबा पाटील
स्मायल्या गळपाटल्या वाटतय
9 Dec 2014 - 9:39 pm | विवेकपटाईत
आयुष्यात कधी ही बायको बरोबर साड्या खरेदी करायला गेलो नाही. नाही तर आमची ही शोभा झाली असती....
9 Dec 2014 - 9:46 pm | खटपट्या
हे बोरिवलीचे दोन्ही दुकानदार दोन अक्षरी शहरामधून आले असावेत असा माझा दाट संशय आहे.
9 Dec 2014 - 11:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये करुया. प्रत्येकाने वेगवेगळे जाउन 10-15 मिनिटे खायची. शेवटी ग्रुप ने जाउन चिडवून दाखवायचे. एक ग्रुप फ़ोटो काढायचा वर तिथे. एसी फार छान हो तुमचा असे प्रत्येकाने म्हणायचे. कसा आहे प्लान ??
9 Dec 2014 - 11:52 pm | सखी
फक्त मिपाकरांच्याच डोक्यात अशा एकसेएक भारी कल्पना येऊ शकतात असं वाटतयं.
10 Dec 2014 - 4:12 am | सस्नेह
पहिली टीम पैजारबुवांची !
10 Dec 2014 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार
पण त्या आधि दोन महिने रोज त्या मॉल मधे वातावरण निर्मिती करण्यासाठी मला जावे लागेल.
तरच कट्ट्याच्या दिवशी आतिशबाजीचा कार्यक्रम करता येईल.
त्या मुळे दोन महिन्यांनंतरची तारिख ठरवा.
पैजारबुवा,
10 Dec 2014 - 9:32 am | टवाळ कार्टा
=))
10 Dec 2014 - 9:33 am | टवाळ कार्टा
त्याआधी सगळ्या अनाहितांना साड्या बघायला पाठवा...अट एकच...एकही साडी घ्यायची नाही
मग आपल्याला जायची गरजच उरणार नाही ;)
10 Dec 2014 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
टका,
ही आयडिया इंप्लिमेंट करण्या आधि एक प्रयोग करा.
मांजरी समोर दुधाने भरलेले पातेले ठेवायचे आणि तिला सांगायचे दुध प्यायचे नाही.
मांजरीने दुध प्यायले नाही तरच आपण तुमच्या आयडियेवर विचार करु.
पैजारबुवा,
10 Dec 2014 - 11:04 am | सस्नेह
आणि नख्या काढून अंगावर आली तर ? *lol*
10 Dec 2014 - 4:30 pm | टवाळ कार्टा
अग्गागा =))
10 Dec 2014 - 5:54 pm | प्यारे१
ह्या उदाहरणासाठी/ ऐवजी दुनियादारी पुस्तकातला एक असंसदीय किस्सा आठवला. असो!
10 Dec 2014 - 1:04 pm | दिपक.कुवेत
तुमच्या ह्या स्त्कार्यात पण कार्यक्रम तेवढा जुन मधला ठेवा तेव्हाच भारतवारी होणार आहे!!!
10 Dec 2014 - 10:33 pm | अभिजित - १
सुन्दर .. नक्कि करु ...
10 Dec 2014 - 4:25 am | स्पंदना
खरेदी हा प्रसंग माझ्या बाबतीत अक्षरशः साडेतीन अक्षरीच आहे.
मी फसते कधीकधी, पण मला आवडणार्या साडीची किंमत ही माझ्या मते नगण्य असते. परवा दुकानात शिरल्या शिरल्या एक पांढरी साडी दिसली. सेल्समनच अहो आणि जरा साड्या बघा म्हणुन मागे लागली, पण नाही, "ती साडी पॅक कर" येव्हढच सांगीतलं. अन कॅशीयरकडे गेले.
कधी कधी काहीच आवडत नाही. मग मी दाखवणार्याला तस सांगते. बर्याचदा, घ्यायलाच हवेत कपडे म्हणुन घेतले जातात, अश्यावेळी हा प्रकार नाहीये, तो प्रकार नाहीये अस म्हणुन वेगवेगळे चार प्रकार निवडते अन बाहेर पडते. दुकानदार मात्र सौजन्यशील असावा लागतो. जर्र्राआआआअ आवाज वाढला तर मात्र खैर नाही हे नक्की.
10 Dec 2014 - 4:33 am | रेवती
बरय ब्वॉ तुमचं!
साडी घ्यायला गेलं की मी आजूबाजूच्या लोकांकडे बघत बसते.
मी सगळ्यांचे सगळे कपडे हे घ्यायलाच हवेत म्हणून घेते.
तरी सध्या बरीच सुधारणा आहे. पूर्वी मैत्रिणी सांगायच्या की आता नवे कपडे घ्या, परवडत नसेल तर आम्ही वर्गणी काढतो. आता तशी वेळ येऊ देत नाही.
तुम्ही आमच्या शेजारी र्हायला या की तै!
12 Dec 2014 - 12:48 pm | काळा पहाड
हो ना, मी पण तेच करतो.
12 Dec 2014 - 6:30 pm | रेवती
मक्काय! तेच जास्त विंट्रेष्टींग असतय.
10 Dec 2014 - 10:12 am | जेपी
वाचनखुण साठवण्यापलीकडे फार काही करु शकणार नाही.
आरामात वाचतो.
10 Dec 2014 - 10:27 am | सामान्यनागरिक
येथे काही लोकांनी सूचवल्याप्रमाणे आपण फेसबुकवर त्याच्या अपमानाचा बदला जरुर घ्या ! आणि तुम्ही या लेखात त्या दुकानाचे नांव पत्ता पण टाकायला हवा होता. मला खात्री आहे की असे अनुभव इतरांणापण आले असतेल. तेही नक्कीच प्रतिसाद देतील. अजिबात सोडु नका त्यांना.
10 Dec 2014 - 10:29 am | मृत्युन्जय
कमाल आहे. पुण्यातले दुकानदार असे कधीच करायचे नाहित. लक्ष्मी रोडवरच्या दुकानातले साड्या दाखवणारे कमालीच्या सहनशीलतेने साड्या दाखवतात. बोलणे रोखठोक असु शकते पण माल घेतला नाही म्हणुन गिर्हाईकाचा अपमान करायचे नाहित.
मला जर खरेदी करता आली नाही तर मी दुकानदाराला स्प्ष्ट सांगतो कारण काय आहे ते. साडी चांगली आहे पण त्यासाठी मला १२००० घालवायचे नाहित हे देखील एकदा स्प्ष्टपणे सांगितले. त्याच्या चेहर्यात नाराजी दिसली पण मी खुप उघडपणे कारण सांगितलेले असल्याने तो अपमान करु धजावला नाही.
उपरोक्त प्रसंगातील दुकानदाराला मी नक्की काहितरी सुनावले असते हे खरे.
12 Dec 2014 - 12:13 pm | निलीमा
पुण्यातले दुकानदार सुद्धा असे आहेत .... एकदा एक ड्रेस मटेरियल घेण्यासाठी म्हणून दुकानात गेले ते ही लक्ष्मी रोडच बारका .. तर चार पाच ड्रेस दाखवून म्हणे यातला आवडला असेल तर घ्या. नाही आवडला म्हणाले तर म्हणे मग काय टाइम पास करत होता काय... मी शांत नाही बसले चांगले सुनावले
10 Dec 2014 - 10:30 am | वेल्लाभट
या प्रसंगांमध्ये तुम्ही अनेक गोष्टी करू शकत होतात; अनेक अजूनही करु शकाल.
१) तिथल्या तिथ्थे उत्तर (करु शकत होतात)
२) आवाज अप, भाषेची लेव्हल डाउन. अर्थात, सिच्युएशन बघून व तत्वात बसत असल्यास (करु शकत होतात)
३) मालकाशी बोलणे. हा तसा सभ्य उपाय. यात तुमची बाजू स्ट्राँग राहते, तुम्ही लेव्हल न सोडल्याने. (करू शकत होतात)
४) वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे बाकी गि-हाईकं जातील अशी वक्तव्य करणे उदा. तसंही तुझ्या दुकानात आवडण्यसारखं काय आहे? जुनाट आहेत सगळे कपडे, मूर्ख म्हणून इथे आलो. इत्यादी. (करू शकत होतात)
५) कन्झ्यूमर फोरम मधे तक्रार (करू शकता) जरीही तुम्ही तिथून काहीही खरेदी केली नसली तरीही ग्राहक संघाकडे ही बाब नोंदवता येते माझ्या फुटकळ माहितीप्रमाणे.
६) पेपरात हा अनुभव देणे (करू शकता)
७) जिथे तिथे उगाच विषय काढून त्या दुकानाबद्दल वाईट सांगणे. अर्थात हेही तत्वात बसत असल्यास. याने मानसिक समाधान मिळू शकेल. मिळेलच असं नाही. (करू शकता)
८) विसरून जा. पुढच्या वेळी मात्र तलवार काढा. मुंबई आहे साहेब. दबला तो संपला. (करू शकता. मी म्हणतो कराच.)
10 Dec 2014 - 12:46 pm | संजय क्षीरसागर
आपला हेतू जर शुद्ध असेल (म्हणजे खरेदी) तर दुकानदारानं अपमान करणं म्हणजे, त्यानं स्वतःचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढणं आहे. तस्मात, त्याचा आपल्यावर परिणाम करुन घेण्यात हाशिल नाही.
आता राहिला मुद्दा प्रत्युत्तराचा. एकदा पोझिशन क्लिअर झाली की दुकानदाराला दोन वेळा संधी देता येते. ती अशी :
आपण : तुमचा गैरसमज होतोयं. आम्ही खरेदीसाठीच आलो होतो, टाईमपाससाठी नाही.
दुकानदार : (समजूतदार असेल तर) : सॉरी !
(समजूतदार नसेल तर) : `.........' (पुन्हा अपमान)
आपण : येणारा प्रत्येक जण दरवेळी खरेदी करेलच असं नाही मालक
दुकानदार : (समजूतदार असेल तर) : सॉरी !
(समजूतदार नसेल तर) : `.........' (पुन्हा अपमान)
आपण : तुम्ही जर तुमचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढणार असाल तर तुमची मर्जी, पण अशानं पुन्हा कधीही तुमच्या दुकानात येणार नाही! (विषय संपला !!)
10 Dec 2014 - 1:49 pm | मी-सौरभ
काय छान संवाद आहे.
हा वाचून मला पाचवीत असताना ईंग्रजीच्या पुस्त्कातला खालील संवाद आठवला..
A: Good morning B
B: Good morning A, How are you?
A: I am fine thank you & how are you?
आमच्या बाई याची घोकंपट्टि का करुन घ्यायच्या कोण जाणे :(
10 Dec 2014 - 1:53 pm | प्रसाद गोडबोले
=))
संक्षींना संक्षी ष्टाईल उत्तर =))
10 Dec 2014 - 5:51 pm | बॅटमॅन
अगदी अगदी =))
10 Dec 2014 - 5:45 pm | vikramaditya
एकदा दुकानदार आपला अपमान करु शकतो ह्याची बेशर्त स्वीक्रुति केली की विषयच संपला. नाही का?
10 Dec 2014 - 1:51 pm | मोदक
इतका पंचनामा झाला आहे तर त्या दुकानाचे नांव आणि मॉलचे नाव द्या येथे... ;)
10 Dec 2014 - 3:55 pm | सिरुसेरि
सोलापुरजवळ , कर्नाटक हद्दीमध्ये चडचण गाव आहे . तिथेही खुप मोठे कापड मार्केट आहे . कापड , कपडे एकदम रिसनेबल किमतींमध्ये मिळतात . महाराष्ट्र , कर्नाटक दोन्हिकडुन तिथे गर्दी इतकी असते की कुणाला भांडायलाही वेळ नसतो .
10 Dec 2014 - 4:19 pm | योगी९००
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार...!! सर्वांनाच उत्तर देणे शक्य नाही पण सर्व प्रतिसाद वाचून मला काय वाटले ते थोडक्यात मांडतो..
बर्याच जणांनी तुम्ही गप्प का बसला असे विचारले. काही जणांनी गप्प राहिल्याबद्दल कौतूकसुद्धा केले. माझा मुळचाच स्वभाव "ऐकून घेणार्यांपैकी" आणि थोडाफार भिडस्त असल्याने बर्याच वेळेला कोणी तोंडावर अचानक काय बोलले तर
मला अजिबात उत्तर देता येत नाही. बर्याच वेळेला असे झाले की नातेवाईकांनी उगाचच मारलेल्या टोमण्यांवर किंवा कोणी काही अचानक तिरसट बोलले असता मी अजिबात उत्तर देऊ शकलो नव्हतो. कारण अशा वेळी मला काय बोलावे हे सुचतच नाही. नंतर बरेच काही सुचते आणि मी तावातावाने बोलतो सुद्धा (पण मनातल्या मनात....अशी उलट उत्तरे दिल्याची दिवास्वप्ने खुप पहातो).
आता या बोरीवलीच्या दुकानात दोन्ही वेळेस तसा मी खरेदीसाठी निरूत्साहीच होतो. दुसर्यावेळी उसना का होईना पण उत्साह दाखवत होतो. दुकानदाराने "एसी, टाईमपास" असले बोलणे मात्र बरोबर वाटले नाही. पण मी निरूत्साही असल्याने ५०% दोष मलाच घेतो आणि दुकानदारास माफी देऊन टाकतो. (त्याने जरी मागितली नसली तरी...).
राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे? त्या दोन्ही दुकानांत इतकी गर्दी असते की आमच्यासारख्या शंभर लोक गेली नाही तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही. कदाचित यामुळेच त्यांना एकप्रकारचा माज आला असावा. फेसबुक/वॅट्सअॅप मुळे उलट निगेटीव्ह पब्लिसिटी मिळून कदाचित त्यांचा धंदा अधिक चालेल.
पण या धाग्यामुळे आणि मिपाकरांच्या प्रतिसादांमुळे काही गोष्टी शिकल्यासारखे वाटते. आता तशी वेळ दुकानात परत जर आली तर मी भांडण करेन की नाही ते माहीत नाही पण गप्प मात्र नक्कीच नाही बसणार. (पण मुळ म्हणजे तशी वेळ न आणण्याचा प्रयत्न करीन.) तेव्हा सर्वांचे परत एकदा आभार...!!
बाकी (आपल्याच) बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
10 Dec 2014 - 4:48 pm | मोदक
राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे?
बरेच काही होते. आणि काही झाले नाही तरी "ग्राहक असे असे वागू शकतो" हे त्या दुकानाच्या (आणि जर फ्रँचाईसी असेल तर मुख्य कंपनीच्या) लक्षात आले तरी बस्स आहे.
अवांतर - एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्या तिसर्या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले.
कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली.
पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला.
यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते.
मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला.
फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)
10 Dec 2014 - 5:06 pm | योगी९००
या इथे तुम्ही हवा तो प्लॅन घेण्यासाठी पैसे गुंतवले होते आणि सर्व गोष्टींचा तुमच्याकडे पुरावा होता. माझ्या केस मध्ये कोठलाच आर्थिक व्यवहार झाला नव्हता.
तसेच ती दुकाने airtel सारखी ब्रॅडेड सुद्धा नव्हती. सुरत, गुजरात किंवा राजस्थान येथून चांगल्या प्रकारच्या माल आणून इकडे विकणारी तशी हजारो दुकाने मुंबईत आहेत. बोरीवलीतील त्या मॉल मध्ये तशी २५-३० दुकाने असतील. या कारणांंमुळे फेस्बूकवरील बदनामीचा त्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही.
10 Dec 2014 - 5:10 pm | मृत्युन्जय
कृपया त्या दुकानाचे नाव आणि पत्ता व्यनि करावे. कधी बोरिवलीस गेलोच तर त्या दुकानात जाउन तासभर बसुन खरेदी न करता परत येइन. काही बोललाच गडी तर माझी आणि इतर गिर्हाइकांची किमान तासभर करमणूक तरी होइल.
10 Dec 2014 - 4:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
बाकी (आपल्याच) बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
यातला (आपल्याच) हा शब्द काढता आला तर उत्तर देणे सोपे होईल.
नायतर आमचा पास.
पैजारबुवा,
10 Dec 2014 - 5:09 pm | योगी९००
मिपा सोबत ५ वर्ष्यापेक्षा जास्त काळ झाला. त्यामुळे मिपाकर कोठे पकडतील त्याचा नेम नाही म्ह्णून शक्य तेथे काळजी घेतो.
म्हणून (आपल्याच) हा शब्द टाकला. नाहीतर कोणाच्या म्हणून प्रश्न आला असता....
पण हा प्रश्न असाही मला विचारता आला असता..(generic question)
बायकांबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
10 Dec 2014 - 5:35 pm | रेवती
बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह दाखवणे फार कमी जणांना जमते. तुम्हाला उत्तर मिळेलच असे नाही. मिळाल्यास तुम्ही नशीबवान आहात. वर इतके चर्चा झाली पण या प्रश्नाची तड लागली का? क्वचितच कोणी याबद्दल बोलले.
10 Dec 2014 - 5:38 pm | दिपक.कुवेत
तो आपला आपणच कमवावा लागतो....कुणाच्या मार्गदर्शनाने नाहि. तेव्हा ऑल दि बेस्ट.
10 Dec 2014 - 6:18 pm | योगी९००
तो आपला आपणच कमवावा लागतो....कुणाच्या मार्गदर्शनाने नाहि. तेव्हा ऑल दि बेस्ट.
मी उत्साह कमवायण्यासाठी नाही विचारत आहे. तो मला कमवता येणारच नाही. (वय झालं आता..). कसा दाखवावा असे म्हणतो (जरी नसला तरी..)
11 Dec 2014 - 4:19 am | मुक्त विहारि
ह्याचे उत्तर फार पुर्वीच पुलंनी दिले आहे की...
कुठल्याही दुकानात गेलो की अंग बघायचे.अंग जितके गोरे, तितके उत्तम.त्या अंगाकडे टक लावून बघत बसले (टायमिंग साधारण १ सेकंद) की बायकोचे अंग फुरफुरते आणि तुम्हाला खरेदीतला लिंबू-टिंबू समजून घरात बसवण्यात येते.
समजा हा पण उपाय वाया गेला तरी, मुकाट जायचे, बायकोला कुकर हवा असेल तर आपण भांडी बघायला सुरुवात करायची.बायकोने कुकर पसंत केला, तर आपण लगेच चेहर्यावर आनंद दाखवायचा आणि म्हणायचे," मी पण हाच घे.म्हणणार होतो.माझ्या मैत्रीणीकडे पण हाच कूकर आहे."
ह्या २ उपायात काम भागेल.... नाहीच भागले तर या आमच्या डोंबोलीला, बाबांची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो.
आज-काल आमचे बाबा खरेदी-शास्त्रातील सप्त-पदी लिहायचा विचार करत आहेत.
(मित्रा, वरील उपाय अजिबात करू नकोस.मी असाच टाइमपास म्हणून प्रतिसाद लिहीला आहे.)
10 Dec 2014 - 6:50 pm | तिमा
उत्साह
कसा दाखवावा असे म्हणतो (जरी नसला तरी..)
अजून एक मार्गः असा कोणी अपमान केल्यावर खो ख्खो हंसत सुटावे. मधून मधून अपमान करणार्याकडे बोट दाखवून जोरजोरांत हंसावे. अपमान करणारा एकदम गोंधळून जातो आणि त्याचा 'मोरु' होतो.
10 Dec 2014 - 8:44 pm | शिद
आमच्या बाबतीत असा किस्सा झाला असता तर मी तर त्याला शिव्या घातल्याच असत्या पण बायकोने तर उभा सोलला असता त्याला. एकतर पैसे देवून सामान विकत घेणार मग फुकटचा माज का सहन करावा?
आता झालं ते झालं पण पुढच्या वेळी असाकाही प्रकार घडला तर असाच सुक्का सोडू नका कोणाला.
अवांतरः Men will be men ;)
10 Dec 2014 - 10:30 pm | बहुगुणी
11 Dec 2014 - 8:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अजिबात सोडायचा नव्हता त्याला. उलटं त्याच्याचं दुकानात त्याच्यावर चार गिर्हाईकांसमोर बाउन्सर टाकायचे. त्याला कोणाच्या जीवावर दुकान चालतं हे दाखऊन द्यायचं आणि वरुन असल्या दुकानात खरेदी करण्याएवढी वाईट परिस्थिती आली नाही असं म्हणुन बाहेर पडायचं. भांडखोर रिक्षावाले, सुट्ट्या पैशावरुन अक्कल काढणारे कंडक्टर, भुरटे दुकानदार, आपल्या बाईक ला कट मारुन जाणारे दुसरे बाईकवाले, पचापचा थुंकणारे ह्यांना कधीचं सरळं सोडायचं नाही. त्यांना त्यांची लायकी जागेवर दाखऊन द्यायची.
एकदा आम्ही निगडी प्राधिकरणमधल्या फायर ब्रिगेड वाल्या चौकातल्या एका दुकानामधे जॉगिंग ट्रॅकपँट्स आणायला गेलो होतो. चार पँट काढायला लावल्या (रॅकवरुन हो) तर म्ह्णला की तुला परवडणार नाही म्हणुन. तिथल्या तिथे गर्दीमधे आवाज चढवुन त्याचा पगार, शिक्षण आणि लायकी काढली, उद्धटपणा केला म्हणुन अजुन २-३ गिर्हाईकं घालवली. त्या दुकानाचा शेठ \ कॅशियर जो कोण असेल तो नंतर बाहेर येऊन सॉरी वगैरे म्हणायला लागला तेव्हा त्याला आम्ही सांगीतलं की मी तर खरेदी करणार नाहीच वरुन ओळखीमधल्या सगळ्यांना ह्या **कडे खरेदी करु नका म्हणुन सांगीतलं
11 Dec 2014 - 11:38 am | सुबोध खरे
+ १०००
आपण काही चिंचोके मोजत नाही कि दुकानातील विक्रेता किंवा मालक यांनी आपली लाज काढावी. आपला आवाज बुलंद असेल तर मेक्डोनाल्द चा मालक सुद्धा नम्र होतो मग त्याचे विक्रेते किंवा म्यानेजर तर सोडाच.
मुलुंडच्या के एफ सी मध्ये गेलो होतो तेथे एक पार्टी चालू होती. मी आपल्या कुटुंबाबरोबर एका टेबलाशी बसलो. चार पाच मिनिटात एक वेटर येऊन मला जरा लवकर आटपा म्हणून सांगायला लागला. मी ताबडतोब त्याला वेळ विचारली. त्याने वेळ सांगताच मी त्याला बिलावरील वेळ दाखवली आणी सांगितले कि दहा मिनिटात मी जेवण आटपावे असे तुझे म्हणणे आहे काय? तुझ्या मानेजर ला बोलाव आणी लगेच तक्रार पुस्तक पण घेऊन ये. तो लगेच सोर्री म्हणायला लागला मी त्याला उंच आवाजात झाडून म्हटले कि पार्टीचे लोक पैसे देतात आणी मी काय फुकट खातो काय? तेथे शांतता पसरली पार्टीतील लोकपण बघायला लागले. म्यानेजर धावत आला आणी मला मनापासून माफी मागू लागला. मी त्याला झालेला प्रकार सांगितला आणी म्हटले मला इथला प्रमुख व्यवस्थापक कोण आहे त्याला भेटायचे आहे त्यावर तो म्हणाला साहेब मीच प्रमुख आहे मी त्याचे नाव पाहिले( ते गायकवाड होते). आणी म्हणाला साहेब तुम्हाला पाहिजे तितका वेळ बसा. मी त्याला उरलेली डीश पार्सल करून द्यायला सांगितली आणी तक्रार पुस्तक आणायला सांगितले. त्याने परत परत माफी मागितली. मी त्याला सांगितले कि गायकवाड साहेब तुम्ही केवळ मराठी आहात म्हणून मी लेखी तक्रार करीत नाही
अन्यथा मी असे सोडले नसते. गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतली. मला जाताना तीन SOFTY आईस क्रीमचे पार्सल दिले. मी त्याचे पैसे देऊ केले तेंव्हा ते म्हणाले साहेब हे आमच्या चुकीचे परिमार्जन म्हणून माझ्यातर्फे आपल्या मुलांना. त्याने कितीही सांगितले तरी पैसे घेतले नाही.
11 Dec 2014 - 1:06 pm | मोदक
गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतली
या प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर..
१) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे..
किंवा
२) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...)
पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते.
उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो.
अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो..
व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे..
अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(
11 Dec 2014 - 1:21 pm | टवाळ कार्टा
अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा त्या व्यक्तीशी शांतपणे बोलून पहावे...ऐकला तर ठिक...नाहीतर त्याला सरळ सांगावे की तुझ्या वरिष्ठांशी बोलायचे आहे (हे सुध्धा शांतपणे)...यावेळेस जर तो नीट बोलला आणि चूक सुधारली तर सोडून द्यायचे...पण जर उलट बोलला तर मग "नीट" अक्कल काढावी
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय? :)
11 Dec 2014 - 2:10 pm | मोदक
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?
हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही.
आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.
11 Dec 2014 - 3:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?
कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल!
"ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !
11 Dec 2014 - 3:59 pm | टवाळ कार्टा
ते कदाचीत "परंपरा" जपत असावेत ... तो आग बुझवायला येणार्या अग्निशमक दलाचा किस्सा कदाचित खराही असू शकेल ;)
11 Dec 2014 - 4:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुलंच्या भाषेत सांगायचे तर "आपल्या निष्कारण उद्धटपणाची आणि उर्मटपणाची शरम वाटणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे" अशी पूर्ण मानसिक तयारी असल्याशिवाय त्या दुकानात काम करायला सक्त बंदी आहे. ;)
11 Dec 2014 - 4:07 pm | मोदक
पैजारबुवांना चितळेंची सुपारी द्यावी काय..?? ;)
11 Dec 2014 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयड्याची कल्पना ब्येष्ट आहे ! पण ही केस पारंपारिक "जित्याची खोड... " टाईपची असल्याची धोक्याची सूचना देणेही आवश्यक आहे ;) :)
11 Dec 2014 - 4:12 pm | टवाळ कार्टा
आख्खी मिपाग्यांग घेउन आत शिरायचे...आपण कोणालाही ओळखत नाही असे दाखवायचे...उगाच इकडच्या-तिकडच्या पदार्थांकडे नुस्तेच आशाळभूताचे भाव आणून बघत बसायचे..."ठिणगी" पडली की सगळे मिळून तुटून पडायचे :)
11 Dec 2014 - 4:13 pm | हाडक्या
बुझवायला नाय हो, विझवायला .. टका तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राव..
(बाकी किसा पण सांगा इथेच)
11 Dec 2014 - 4:25 pm | टवाळ कार्टा
"आग बुझवणे" हे कदाचित चुकीचेही (किंवा चुकीचेच) असेल पण तसे बोलताना ऐकले आहे काही जणांना
किस्सा
एकदा दुपारी ११:५५ am ला चितळ्यांच्या दुकानात आग लागते...कोणीतरी फोन करुन अग्निशमन दलाला बोलावतात...अग्निशमन दल १० मिनीटांत आल्यावर बघतात तर मालक दुकान बंद करत असतो आणि सांगतो "आता ४ pm ला दुकान उघडल्यावर या"
11 Dec 2014 - 4:37 pm | प्यारे१
>>> एकदा दुपारी ११:५५ am
च्यायला! १२ ते ४ केलं का काय? दुपारच्या सुट्टीचं टायमिंग १ ते ४ होतं ना???
11 Dec 2014 - 4:41 pm | टवाळ कार्टा
आय माय स्वारी... १ ते ४ असेच वाचावे
11 Dec 2014 - 4:43 pm | टवाळ कार्टा
रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस "जाज्वल्य अभिमान" म्हणतात तो हाच असावा... सांगोवांगी खर्या-खोट्या किस्स्यात सुध्धा १ ते ४ ही वेळ चुकत नाही =))
11 Dec 2014 - 4:53 pm | प्यारे१
असाच रजनीकांतचा किस्सा वाचला होता.
दुपारी १ ला शटर बंद करायला लागलेल्या चितळ्यांच्या दुकानात घुसू पाहणारा रजनी मार खाऊन परत जातो वगैरे!
बाकी एखाद्या गोष्टीसाठी एवढी *व*व (चिवचिव आहे ते) आमच्याकडून होणार नाही.
मिळाली ठीक, नाही मिळाली तर उत्तम. उगा डोक्याला शॉट!
11 Dec 2014 - 7:11 pm | टवाळ कार्टा
तुमची चिवचिव समझली ;)
11 Dec 2014 - 4:43 pm | काळा पहाड
आग विझवण्यासाठी अग्निशमन वाल्यांना पण टॅग वाली कूपन्स घेवून सोडतात काय पहायला हवं.
12 Dec 2014 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
11 Dec 2014 - 4:11 pm | प्रसाद१९७१
तरी पण चितळे ची सर्व दुकाने जोरात चालू आहेत. नविन काढलेली फ्रँचॅजी पद्धतीची दुकाने पण जोरात चालू आहे.
दर्जा कायम ठेवणार्याला ( तो सुद्धा खाण्याच्या पदार्थांचा ) धंद्याला मरण नाही.
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.
11 Dec 2014 - 4:17 pm | मोदक
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.
मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते.
गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.
11 Dec 2014 - 4:37 pm | नाखु
जावूदे माज आणि अभिमान याच्यात काही फरक असतो तो या अडाण्यांना समजेल तो सुदीन!!
बिग सिनेमा-आणि फेम गणेश्मध्ये "गाव" गोळा केलेला.
एकपडदा प्रेमी प्रेक्षक.
ना.खु.
11 Dec 2014 - 4:52 pm | मोदक
जागो ग्राहक जागो वर टाका किस्सा...
दोन हेतू.. आमच्या धाग्याची झैरात आणि अधिक माहिती मिळेल. ;)
11 Dec 2014 - 4:55 pm | बॅटमॅन
"परांजपे" डोळे झाकून घेणे परवडणारे किती पुणेकर आहेत म्हणे? नै म्हणजे कोपर्यावरच्या गाडीवरनं दाबेली घेतल्यागत उल्लेख होता म्हणून विचारलं.
11 Dec 2014 - 5:24 pm | प्रसाद१९७१
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे वाया जाणार नाही ह्याची खात्री बाळगुन.
वेटींग लिस्ट असते अनाउंस पण न झालेल्या स्कीम साठी, लोक एक दोन लाख भरुन नाव नोंदवून ठेवतात.
11 Dec 2014 - 5:29 pm | बॅटमॅन
मराठी कळते ओ आम्हांला.
होक्का, नवीनच माहिती कळाली. पण मेन मुद्दा सोडून सगळं काही आहे. मुद्याचं काय?
11 Dec 2014 - 5:47 pm | प्रसाद१९७१
बरे झाले सांगीतलेत.
11 Dec 2014 - 5:34 pm | काळा पहाड
पुण्यनगरीतले पुण्यवान काय करतील हे ब्रम्हदेवालाही सांगणं अवघड आहे. डीएस्के आणि परांजपे यांनी झोपड्या जरी बांधून विकल्या तरी डोळे विकून घेणारे लोक आहेत. डिएस्के नी चाकणच्या एका शेतात सुरू केलेला प्रोजेक्ट मी पहायला गेलो होतो. अरेरे. जिथे बाजूला काहीच नाही तिथे बाकिच्यांच्या पेक्षा जास्त दराने विकून सुद्धा बुक करणारे लोक होते.
11 Dec 2014 - 5:46 pm | प्रसाद१९७१
@बॅट्या - ह्यालाच मी डोळे झाकुन घेणे म्हणत होतो, तुम्हाला उदाहरण मिळाले. पण लोक असे बूकींग करतात कारण खात्री असते.
माझा स्वताचा परांजपे चा अतिशय चांगला अनुभव आहे. का.पा. म्हणतात तसे नुस्ती जमिन असताना, मी २२०० च्या रेट नी फ्लॅट बूक केला होता, कुठलेही कागदपत्र नव्हते आणि फक्त २५००० दिले होते. नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू होयला २ वर्षाचा उशीर झाला. मधल्याकाळात रेट ४००० झाला होता. तरी पण मला २००० च्याच रेट नी फ्लॅट मिळाला कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्र नसताना. मला परांजपे २५००० व्याजा सकट परत करुन नविन रेट नी बूक कर असे म्हणु शकला असता.
12 Dec 2014 - 10:58 am | योगी९००
प्रतिसादा बद्दल धन्यवाद...!!
एक कळले नाही की तुम्ही २२०० च्या रेटने फ्लॅट बुक केला पण दोन वर्षानंतर २००० च्याच रेट ने मिळाला.
येथे २००० काय आहे? २००० सालच्या २२०० च्या रेटने की २००० रू. च्या रेटने?? जर २००० रू असेल तर पहिल्या २२०० चे काय?
12 Dec 2014 - 12:50 pm | थॉर माणूस
अरे वा!!! उत्तम! काय व्यावसायिकता आहे नै? नाही, राणीच्या देशातनं आणलेला माल ओतायला ठीक आहे. पण भाड्याच्या घरात रहात असलेल्या गरजुने तिथे फ्लॅट बूक केला आणि त्याला तो किमान २ वर्ष उशीरा मिळाला तर फायनान्शीअली (त्याहीपेक्षा मानसीक आणि कौटुंबिक बाजूने) काय फरक पडतो माहिती आहे का?
म्हणजे थोडक्यात काय, कायद्याची आयमाय झाली की नाही झाली ते गेलं चुलीत. आपल्याला हवे ते होतंय यात समाधानी. :) वास्तू दोन वर्षे उशीरा मिळाली यापेक्षा आहेत ते २५००० बुडवले नाहीत त्याचे कौतुक.
मला स्वतःला परांजपे, डीएसके, चितळे वगैरेंचा राग, लोभ वगैरे काही नाही पण हे असले मेंढराच्या कळपातले लोक उगाच नाचताना दिसले कि जाम मजा वाटते. नाही, असतील हो कदाचित ते चांगले. पण म्हणुन उगाच डोक्यावर घेऊन काय नाचायचं? मी स्वतः दोन वेळा फ्लॅट चे व्यवहार केलेत, दोन्ही वेळेस वेगळे बिल्डर आणि दोन्हीचा अनुभव चांगला आहे (एकाने दिलेल्या वेळेच्या ४ महिने उशीरा फ्लॅट दिला तर झापला होता त्याला. दुसरा वेळेत मिळालाय). तरीही समोरच्याने सल्ला मागितला तर त्याची आवड, बजेट वगैरे बघुन (सल्ला देण्याला अर्थ असेल तर) मगच माझे मत देतो. उगाच डोळे झाकून इकडे जा तिकडे जा असलं काही करत नाही.
14 Dec 2014 - 6:59 pm | आनंदी गोपाळ
पण बेसिकली ते अवतरणचिन्हांतले "परांजपे" "गाडगीळ" अन "चितळे" हा मुद्दा आहे.
यालाच इंग्रजीत म्युच्वल रुब्रिफिकेशन अर्थातच एकमेकांची लाल करणे असे म्हणतात ;)
15 Dec 2014 - 10:12 am | अनुप ढेरे
आनंदी गोपाळराव, इथे कोण कोणाची आणि का लाल करत आहे यावर जरा प्रकाश टाकाल का?
15 Dec 2014 - 11:19 am | प्रसाद१९७१
फक्त डॉक्टर साहेबांना खरा मुद्दा समजला.
:-)
11 Dec 2014 - 4:26 pm | अनुप ढेरे
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते.
बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.
11 Dec 2014 - 4:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या दुकानात सरळ साधे मराठी, सरळ साध्या (उर्मटपणा अथवा गुर्मी नसलेल्या) स्वरात बोलतात असा अनुभव असलेले एक गिर्हाईक सापडल्याने ड्वाळे पानाव्ले... आता सुर्याने उद्यापासून पश्चिमेकडे उगवायला सुरूवात न केल्यास त्याच्यावर अजामिनपात्र आरोपांसहित खटला भरायला हरकत नाही ! +D
11 Dec 2014 - 5:49 pm | पैसा
मी एकदा डेक्कनवरच्या चितळ्यांकडे गेले होते. तिथे हातात ती जगप्रसिद्ध पाटी ठेवली. साहजिकच मी गोंधळले. आणि कॅश काउंटरच्या माणसालाच विचारलं, "हे प्रकरण कसं वापरायचं आणि दुकानात खरेदी कशी करायची?" त्यावर त्याने चक्क सहास्य वदनाने ती पाटी कशाकरता ते नीट सांगितलेच, एवढेच नव्हे तर बाकरवडीचा काउंटर कुठे तेही व्यवस्थित दाखवले!
11 Dec 2014 - 6:32 pm | मोदक
त्याला पाटी नाही, टोकन म्हणतात.
सोबत वल्ली होता काय..? चितळे त्याला घाबरले असतील. ;)
11 Dec 2014 - 7:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे ! आज एका मागोमाग दोन धक्के ?! जगबुडी जवळ येत असल्याची लक्षणे हो सगळी ही ;)
11 Dec 2014 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते.
आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;)
बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.
असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :)छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1*
(वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )
11 Dec 2014 - 6:26 pm | रेवती
चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज टंकता येत नाहॆये.
11 Dec 2014 - 10:02 pm | रेवती
चितळ्यांकडून पुपो विकत घेतल्या. दोन दिवसात संपवावे हा नियम लिहिलेल्या असतो असे अंधुकसे आठवते. ३०तासात बुरशी आली. फोन केला. नाव लिहून घेतले त्यांनी व येऊन घेऊन जावा म्हणाले. त्यानंतर भारतात जायला जमले नाही. पण आता त्यांच्याकडून घेणार नाही. त्यापेक्षा चाम्गली पुपोवाले आहेत. शिवाय आपणही करू शकतोच. इस्पिक एक्काजी म्हणतात तसे अवलंबित्व कामाचे नाही. त्याने दुकानदार माजतात. लोकही राम्गेत दरवेळी येतातच असे नाही. मग ते लोक वसवस करतात. (१० मिनितात एवढे ट्म्कले). जौदे राव!
13 Dec 2014 - 10:32 am | कंजूस
धंधा वाढला की 'बाहेरून खात्रीशीर व्यक्तीकडून करून आणणे '(आईटसोर्सिँग) सुरू करतात. आणखी धंधा वाढला की खात्री॰ इतकेजण मिळत नाहीत अथवा तो आणखी दुसऱ्या पातळीतले आउट॰ सुरु करतो. शिवाय कमिशनचे घोडे पुढे पळतच असते. पुढे आणखी गुजरातमधून गूळ, तेल, मप्र॰चा गहू आणि कर्नाटकातली चणाडाळ थोक भावात हडपसरच्या कोठीत येऊन पडू लागते. पुपो॰जाते नदीपात्रात आणि गिऱ्हाइकाला कात्रजचा घाट दाखवतात.
13 Dec 2014 - 9:01 pm | रेवती
हो. ते आहेच!
11 Dec 2014 - 6:56 pm | सुबोध खरे
मोदक साहेब
बहुतांशी अशा ठिकाणी कामावर ठेवताना त्यांना कसे वागायचे याचे व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे अशा तर्हेचे "हं, आटपा लवकर" सारखे आगाऊ वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही.( बर्याच वेळेस ते त्या पार्टीतील लोकांकडून जड बक्षिसी साठी केलेले "कर्तव्य"असते.) त्यामुळे अशा कारणासाठी त्याला आर्थिक दंड झाला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही.
मी गायकवाड साहेबाना स्पष्ट शब्दात सांगितले कि तुमच्या कर्मचार्याने माझ्या संध्याकाळचा पार विचका केला याची किंमत काय? मी जर माझ्या दवाखान्यातील रुग्णांना पुढे मागे करून( आज नको उद्या या इ. इ.) येथे कुटुंबाबरोबर एक संध्याकाळ आनंदात घालवायला आलो असता तिचा विचका कुणी केला आणि फक्त सोर्री म्हणाले तर चालेल काय? हि तेथे नीट न वागणाऱ्या वेटरला समज देणे आवश्यक आहेच. आपण आपल्या पत्नीसाठी एखादा ड्रेस शिवायला दिलात आणि त्या शिंप्याने त्याची वाट लावली तर आपण फक्त त्याचिं क्षमा याचना ऐकून गप्प बसता कि त्याला तो सुधारून व्यवस्थित करून द्यायला भाग पाडता.
11 Dec 2014 - 11:07 am | पाषाणभेद
वस्तू घेतांना त्याची किंमत, दर्जा आदींची तुलना करणे, दोन दुकांनांमधील भाव तपासणे हे ग्राहक हक्कात मोडते. याविरूद्ध एखाद्या दुकानदाराने बेजबदार वर्तन केल्यास त्यास फौजदारी खटला दाखल करता येतो याची जाणीव करून द्यावी.
बर्याच जणांच्या प्रतिक्रीया चांगल्या आहेत.
बाकी आमच्या साडी खरेदी करण्याचे प्रसंग आठवले.
11 Dec 2014 - 12:21 pm | संजय क्षीरसागर
बायकोबरोबर खरेदीला जाणं हा आनंद सोहळा आहे. किती तरी अँगल्सनं, तिला काय खुलून दिसेल हे पाहाण्याची ती संधी असते. स्त्री विश्वात कायकाय नव्या फॅशन्स आल्यात तेही कळतं. प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. मी तर तिच्याबरोबर खरेदीची एकही संधी सोडत नाही.
जोपर्यंत दोघांना पटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही खरेदी करत नाही, पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. एकसोएक आयम आहेत तिच्याबरोबर केलेल्या खरेदीचे.
मग सरते शेवटी जेंव्हा दोघांनी मिळून खरेदी केलेली परिधानं लेवून ती आपल्याबरोबर एखाद्या समारंभाला येते तेंव्हा तिचं ते खुललेलं रुप, बस देखते रहो!
11 Dec 2014 - 12:30 pm | योगी९००
प्रयत्न केला जाईल...!!
प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे.
या वाक्याला मनापासून सलाम...!! कदाचित असे वागलो तर मॉलमध्येच एक खोली घ्यावी लागेल.
पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच.
लुटले जाण्याची शक्यता आहे...
अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार.
क्या बात है...दिल गार्डन गार्डन हो गया...!!
11 Dec 2014 - 12:41 pm | संजय क्षीरसागर
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही।
12 Dec 2014 - 10:17 am | संजय क्षीरसागर
तुम्हाला प्रतिसाद आवडला याचा अर्थच तुमच्याबाबतीत काही चांगलं घडण्याची शक्यता निर्माण झालीये. आणि कधी हवं असेल तर घरी येऊन पाहा, दृष्ट लागावी अशी रिलेशन्स आहेत.
संपादित
12 Dec 2014 - 11:24 am | संजय क्षीरसागर
दुकानदार त्याचं वैफल्य आपल्यावर काढतोयं त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही. ही कान्ट हँडल हिज बिझीनेस, दॅटस ऑल!
अशाच प्रकारे (जगात) सगळीकडे चाललेलं असतं. कुणी कशानं आणि कसं उसळेल याचा नेम नसतो. तुम्ही भिडस्त आहात त्यामुळे प्रत्युत्तर देत नाही, काही हरकत नाही. मी बिनधास्त टोलवतो! कारण दुसर्यांची जळजळ आपल्यावर घ्यायचं काही कारण नाही! एकदा आपला हेतू क्लिअर असला की कुणाला जुमानायचा काहीएक संबंध नाही.
12 Dec 2014 - 11:31 am | कवितानागेश
मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगितले होते त्यांना.
मॉल मध्ये दुकानाच्या भाड्यानीच दुकानदार गांजलेले असतात, म्हणून त्यांची टाळकी सटकलेली असतात.
तुम्ही माझाच मुद्दा का रिपिट करताय?
12 Dec 2014 - 3:55 am | स्पंदना
शक्यव्च नाही!!
मी सांगतो ना? मुर्खासारख काही निवडु नको. मी म्हणतो तेच चांगल दिसेल.
उगा बोगद्यात शिरु नको. घ्यायची अक्क्ल आहे का? अस म्हणत फकत आपलीच निवड लादायची आणि वर दोघांच्या संमतीने म्हणायच.
का ब्वा? ज्याने कपडे घालायचे त्याने स्वतः काही आवडल म्हणुन का नाही घ्यायच काही? का नाही कधी मधी मित्रांबरोबर जाउन थोडी खरेदी करायची? स्वतः साठी म्हणुन का नाही जगायच? बाहेर जगाला सांगायला जरी "आम्ही बरोबरच खरेदीला जातो" असलं तरी त्यात दबावशास्त्रच जास्त जाणवत. मी म्हणतो तेच घालायच, तेच खायच अन तसच वागायच हे करण्यासाठी कायम बरोबर असण महत्वाच असत.
त्यामानाने मला योगी ९०० परवडले. साधेसुधे, "अग ठरव ना तुझ तू" म्हणणारे!
12 Dec 2014 - 8:52 am | पैसा
आमच्याकडे पण एकमत असतं! फक्त माझं एकच मत! नवरा कधीतरी आईने नेसली आहे तशी साडी घे वगैरे म्हणतो, पण तसा तो स्वतःचे कपडे पण आणायचा आळस + निरुत्साह दाखवतो त्यामुळे मी खरेदीला कधीच त्याला बरोबर नेत नाही. त्याचं मत कधी नसतं याचा मला वैताग येतो बरेचदा, पण आता काय करणार?
(तशी मी पण सगळ्या अँगल्सने सुंदरच दिसते बरं का! पण तसं कधी चारचौघात सांगेल तर शपथ!)
12 Dec 2014 - 10:56 am | स्पंदना
तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको देऊ।
मला विचारशील तर आम्हा दोघांचा मिळून संसार आहे। कुणा एकट्याचा नव्हे। जशी मी त्याच्यावर अवलंबून आहे तितकाच् तो माझ्यावर। आणि हो बघा माझी पसंती म्हणून आम्ही दोघेही मिरवत नाही। बैल बेंदराला काढावा तसा मी त्याला मिरवत नाही अन बघा कशी सुन्दर दिसते ते तो कधी मिरवत नाही। चार चौघात चर्चा करायला तो काही बाजार नाही। संसार आहे। जेंव्हा लोक अगदी खाजगी गोष्टी सुद्धा चव्हात्यावर मांडतात ना तेंव्हाच् त्या नात्याला एकच "मी"एवहढीच् बाजू आहे ते लक्ष्अत येते।
दोघे ही कधी स्वतंत्र कधी मिळून निर्णय घेऊ शकतात अं त्या निर्णयाचा आदर राखतात तो संसार!!बाकी सारी दडपशाही!
14 Dec 2014 - 2:31 pm | vikramaditya
बॉस आपल्या ज्युनियर्सना सांगतो...
I am always ready for discussion... we will discuss and come to "MY" conclusion. Ok?
14 Dec 2014 - 10:33 pm | vikramaditya
श्री: अग, चल, शॉपींगला जायच ना?
सौ: आत्ता?
श्री: हो, गेल्या महिन्यात तु म्हणाली होतीस ना?
सौ: बरं चला.
श्री: हे आपले छान आहे ना? आपले विचार नेहेमी कसे जुळतात ना?
सौ: हं..
सौ: गेल्या महिन्यात मी म्हणाले की साडी घ्यायची..
श्री: छे! छे! अग आज लेगीन्ग्स घ्यायची आहेत.
सौ: काsssssय?
श्री: मी बघुन ठेवली आहेत. शनिवारी पिकनिकला तु कोणता टॉप आणि लेगीन्ग्स घालायची ते पण मी ठरवले आहे. आहे की नाही मी मनकवडा?
सौ: असेल...
श्री (प्रचंड खुश होवुन): नंतर बाहेरच जेवुया.
सौ: हो, माझी मैत्रीण सांगत होती की एक नवे चायनीज हॉटेल आहे तिथे जावुया.
श्री : अग वेडी की काय तु? मी आधीच माझ्या मित्राच्या हॉटेलात टेबल बुक केले आहे. ओके?
सौ: नेहेमीप्रमाणे तुम्ही म्हणाल तसे.
श्री(अति प्रचंड खुश होवुन): जानेमन, मी सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कश्या सोप्या केल्या आहेत. तु फक्त खुशीत राहायचे. आपल्या ह्याच एकमताने वागण्यामुळे लोक आपल्याला आदर्श जोडपे म्हणतात ना?
सौ: अच्छा? शक्यता आहे.
(इति लेखनसीमा)
15 Dec 2014 - 12:15 am | पैसा
*LOL*
14 Dec 2014 - 9:31 pm | प्यारे१
बेक्कार टोलावलाय.
13 Dec 2014 - 1:10 am | टीपीके
योगी आहात, जमले तुम्हाला. गुड. आम्हाला कधी जमते बघू
11 Dec 2014 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
२००+
11 Dec 2014 - 7:57 pm | आतिवास
धागा वाचून होईतोवर २०० प्रतिसाद झालेसुद्धा :-)
12 Dec 2014 - 12:05 am | खटपट्या
अजून चितळेंकडे जाण्याचा योग आला नाही. (एका मोठ्या आनंदाला मुकतोय मी)
अजुन एक धाडसी विधान, "माझी बायको मला साड्या आणि ड्रेस मटेरीयल घ्यायला घेउन जाते आणि मि सांगीतलेल्याच साड्या आणि ड्रेस घेते"
(कीतीही खोटे वाटले तरी वरील विधान सत्य आहे. माझा रंगांचा चॉइस चांगला आहे असे तीचे मत)
12 Dec 2014 - 1:52 pm | मदनबाण
आपलं बी असचं हाय... सर्व प्रथम मीच बायडीला सल्ला देतो की साड्या निवडण्याची घाई करु नकोस ! नाही पसंत पडत असेल तर बाजुच्या दुकानात जाऊ,पण जो पर्यंत पसंत पडत नाही तो पर्यंत काहीही घेण्याच्या भानगडीत पडू नकोस.
आमच्या तिर्थरुपांकडुन मी आत्मसात केलेल्या अनेक गुणांपैकी साडीची खरेदी हा एक. :)
आत्ता पर्यंत घेतलेल्या साड्यांपैकी प्रत्येक साडी तिला पसंत पडली आहेच, पण बाकीच्या स्त्रींयांनी या खरेदीचं भरभरुन कौतुक केल्यामुळे साडीच्या खरेदीला माझ्या मताची नोंद घेउन, माझ्या पसंतीची साडी घेणे तिला अत्यावश्यक झाले आहे... एव्हढेच नव्हे तर कुठल्या समारंभाला जावयाचे असेल तर... १० वेळा मला ३-४ वेळा वेगवेगळ्या साड्या दाखवुन यातली कुठली ? असं विचारंण हे नित्याच झालं आहे. ;)
जाता जाता :--- काही काळा पूर्वी वारली प्रिंटची मस्त साडी घेतल्यावर आणि तिचे तिच्या मैत्रिणी आणि इतर स्त्रीवर्गाने कौतुक केल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आठवते आहे.. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it
Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin'
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
12 Dec 2014 - 10:53 pm | खटपट्या
या फोटोमधे आहेत त्या कोण ?
12 Dec 2014 - 11:59 pm | रेवती
तुमची वहिनी. माझी सून.
13 Dec 2014 - 1:36 am | खटपट्या
:)
13 Dec 2014 - 9:41 am | मदनबाण
तुमची वहिनी. माझी सून.
हॅहॅहॅ... आज्जे ते मॉडल हाय बरं का... माझा काय बी रिलेशन नाय बाँ ! ;) असं मॉडल आमच्या नशिबी कुटं ! हाय ते सॅंपल "सहन" करुन दिवस काढायचे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..
13 Dec 2014 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
भाग्यवान अहात बाणराव तुमच्या कडे मॉडेल तरी आहे.
आम्हाला नुसते फोटु पाहुन उसासे टाकत गप्प बसावे लागते.
पैजारबुवा,
13 Dec 2014 - 10:07 am | मदनबाण
असं मॉडल आमच्या नशिबी कुटं !
हे वाचलं नाय का तुमी ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..
13 Dec 2014 - 10:13 am | ज्ञानोबाचे पैजार
आयमाय स्वारी.
मॉडेल बघण्याच्या नादात वाचायच राहुनच गेल.
पैजारबुवा,
13 Dec 2014 - 9:03 pm | रेवती
अच्छा! असे आहे काय? बघतेच आता!
12 Dec 2014 - 4:55 am | कंजूस
चितळेच्या दुकानासमोर मोठी रांग बाकरवडीसाठी. प्रत्येकाला एक किलोच देणयात येते. एक गिऱ्हाईक "तीन किलो." गडी "एक किलोच मिळेल." गि॰ "आमचं कुत्रं दुसरं काय खातच नाही."
12 Dec 2014 - 11:36 am | रुस्तम
12 Dec 2014 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
+D . +D . +D .
आम्ही जास्त हुशार आहोत... आमच्या कुत्र्याला असल्या वाईट सवयी लागू दिल्या नाहीत :) ;)
12 Dec 2014 - 5:51 am | गवि
मला सोबत नेले आणि दुकानदार जर्रा काही चुकीचे वागला बोलला तर मी तिथे सीन ऊर्फ इतर लोकांचे मनोरंजन फुकट करीन या अनुभवसिद्ध भीतीमुळे बर्याचदा माझे कपडेदेखील आमचे कुटुंबच डायरेक्ट खरीदून घरी घेऊन येते.
फक्त वादावादी परवडली..पण त्याहीपुढे जाऊन आपला पती दुकानदाराला बिझनेस मॉडेल,त्याच्या व्यवसायाचे उर्वरित भवितव्य, तो खरोखर टिकवायचा असेल तर काय मूलभूत करावे लागेल वगैरे डोस पाजण्यात
षॉपिंगपेक्षा दुप्पट वेळ खातो याची तिला जास्त धास्ती असते.
15 Dec 2014 - 5:08 pm | चिगो
अरे देवा !! =)) :D
12 Dec 2014 - 7:19 am | टिल्लू
अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी करतांना असाच उर्मट अनुभव आला. एका तळ/भुमीगत? दुकानात गेलो, मी एकटाच गिर्हाइक होतो, दोन-तिन पुस्तके घ्यायची होती, एक पुस्तक मागितले, काही हा नाही हू नाही, फोनवर बोलत बोलत ५-१० मि. नी आणुन दिले. तरी मी ते दुर्लक्ष करुन अजुन एक दुसरे पुस्त्क मागितले, परत तसाच अनुभव, पुस्तकाबद्द्ल वा आणखी काही माहिति विचारली तर चक्क दुर्लक्ष आणि फोनवर बोलणं चालू, हाताखलचा पोरगापण एक्दम 'बि़जी'.
आला राग घेतलेले पुस्तक तसेच ठेवले आणि गेलो निघुन, त्याच्या "काय झालं?" ह्या प्रश्नाला दुर्लक्ष करुन :)
12 Dec 2014 - 7:37 am | गवि
"..काय झालं" इतके दोन शब्द तुमच्याशी बोलला?
..नवखा असेल. तुम्हीही भाग्यवानच..
12 Dec 2014 - 8:33 am | खटपट्या
फोनवर बोलून झालं का? असं विचारायला पाहीजे होते. :)
12 Dec 2014 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोन करून विचारा, मग सांगतो. असं म्हणायला पाहिजे होतं ;)
12 Dec 2014 - 1:57 pm | टिल्लू
"काही नाही, वाचून झालं" अस तोंडापर्यंत आलेलं वाक्य तसच गिळलं. ;)
12 Dec 2014 - 11:22 am | कवितानागेश
योगीजी, पुढच्या वेळेस जाताना शक्यतो जिथे तरुण मुलं-मुली वस्तू/कपडे दाखवायला आहेत अशा ठिकाणी जा. त्यान्च्याशी सरळ मराठीत गप्पा मारायला सुरुवात करायची. मला आजपर्यंत अशा लोकांचा फार चांगला अनुभव आलाय. आपल्याला हवा असलेला प्रकार, रन्ग, पोत, आणि बजेट त्यांना सांगायचे समजावून... तेच नीट मदत करतात.
15 Dec 2014 - 11:02 am | संजय क्षीरसागर
ज्यांची इथल्या लेखनावर कुठे ना कुठे गोची झालीये ते स्कोर सेटल (पक्षी, उपमर्द) करायच्या, प्रतिक्षेतच असतात, मग विषय काहीही असो. त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नसावी की या प्रकारात, उपमर्द होण्याऐवजी ते उघडे पडतात. हे त्या दुकानदारासारखंच आहे, तो स्वतःचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढतोयं तर इतरेजन प्रतिसादातून व्यक्त होतायंत, पण मूळ कारण एकच आहे आणि ते लक्षात आलं की त्यामागची मानसिकता उघड होते.
सारांश काय? वैफल्यग्रस्त दुकानदार आपल्यावर राग काढत असेल तर त्याचा आपल्या आनंदात असण्याशी (जसे तुम्ही फोनवर गेम्स खेळत होतात), काहीएक संबंध नाही. आणि आपलं आपल्या पत्नीशी सुरेख नातं आहे, तिच्या सहवासाचा आनंद आपण लुटू शकतो (किंवा द अदर वे, ती तुमच्या सहवासात रमते) ही कल्पना ज्यांना असह्य होते, ते स्वतःचं फ्रस्ट्रेशन प्रतिसादातून व्यक्त करतात. जसा दुकानदाराच्या फ्रस्ट्रेशनचा आपल्याशी संबंध नाही, तद्वत, वैफल्यग्रस्त प्रतिसादांचा आपल्या रिलेशनशिपशी दूरान्वयेही संबंध नाही.
संपादित
22 Dec 2014 - 9:41 am | योगी९००
वैफल्यग्रस्त दुकानदार आपल्यावर राग काढत असेल
एका गोष्टीचा राग दुसर्यावर निघणे natural आहे. असे बरेचदा घडते. पण म्हणून कोणी prospects / customers वर राग काढणे म्हणजे अतीच होते.
15 Dec 2014 - 7:58 pm | चेतन677
तुम्ही दुकानदाराला सडेतोड उत्तर द्यायला हवे होते....आणि दुकानदारासाठी गिर्हाईक म्हणजे देव असतो