चिकन करी

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
30 Nov 2014 - 6:09 pm

साहित्य:

चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती:

१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.

c1

३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.

आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.

c2

c3

c4

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

30 Nov 2014 - 7:40 pm | रुस्तम

अप्रतिम...

स्वप्नज's picture

30 Nov 2014 - 7:54 pm | स्वप्नज

फोटु पाहून तोंडाला पाणी सुटलेय...

रेवती's picture

30 Nov 2014 - 8:25 pm | रेवती

छान फोटू व सोपी कृती आहे. मलाही जमू शकेल. मसाला परतण्यापर्यंत नक्कीच करू शकीन. पुढील कृती नवरा करेल. चिकनचे तुकडे किती इंचाचे करावेत? घरचा मसाला म्हणजे कोणता मसाला? मी गोडा मसाला वापरते तो की कांदा लसूण मसाला? वरील प्रमाणात (२ च.) तिखट वापर्ल्यास फार तिखट होत नाही ना?

थँक्स रेवती ताई. हो अगं चिकनचे साधारण मिडियम साईजचे तुकडे करायचे आणि चिकन विथ बोन घे. बोनलेस नको.
घरचा मसाला म्हणजे आपण एक घरगुती गरम मसाला बनवतो तो. तो मसाला नसेल तर रेडिमेड meat मसाला मिळतो तो हि चालेल. तिखटाचे म्हणशील तर हे मिडियम स्पायसी होते. तुला पाहिजे असेल तर तु तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करु शकतेस.

आणखी म्हणजे चिकन स्किन असलेले की नसलेले आणायचे? हे सगळे कुकरमध्ये शिजेल का?

मला स्वतःला चिकन स्किन सोबत आवडते. पण तुला नको असेल तर स्किन नाहि वापरली तरी चालेल. हो कउकर मधे नक्की शिकेल. पण ताई, कुकर मधे शिजवायची काहि गरज नाहि. चिकनचे मिडियम साईज पिसेस असल्यामुळे अगदी १० मिनिटांत चिकन शिजते. मटणाला खुप वेळ लागतो. उलट कुकर मधे शिजवल्यावर चिकनचा जास्त शिजते आणि त्याचा मग गाळ होउन जातो. so, कुकर मधे नको शिजवुस.

रेवती's picture

1 Dec 2014 - 4:47 am | रेवती

ठीक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2014 - 10:59 am | प्रभाकर पेठकर

कोंबडीच्या त्वचे मध्ये आणि खाली भरपूर चरबी असल्याकारणाने त्वचा विरहीत कोंबडी वापरणे जास्त आरोग्यकारक असते.

रेवती's picture

6 Dec 2014 - 10:12 pm | रेवती

ओक्के.

मुक्त विहारि's picture

30 Nov 2014 - 11:16 pm | मुक्त विहारि

तोंपासू...

खटपट्या's picture

1 Dec 2014 - 12:34 am | खटपट्या

तोंपासू पाक्रू
आजच करुन बघतो. रविवार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

1 Dec 2014 - 1:08 am | प्रभाकर पेठकर

छान दिसते आहे पाककृती. नक्कीच चविष्ट असणारच.

फक्त मला वाटतं जे आख्खे गरम मसाले दिले आहेत (जे नंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत) तेच मसाले कमी अधिक प्रमाणात बाजारच्या आणि घरच्या गरम मसाल्यात असतात. तेंव्हा ते मसाले (बाजारी आणि घरचे पावडर मसाले) वेगळे मिसळण्यापेक्षा आख्ख्या गरम मसाल्याचेच प्रमाण वाढवून घेतल्यास ताजा वाटलेला मसाला पदार्थाला अधिक चांगली चव देईल असे वाटते.

वेगवेगळ्या तिखटांच्या रंगात, तिखटपणात आणि चवीत फरक असतो. त्यामुळे आपल्या वापरातील तिखटाचे हे सर्व गुणधर्म आपल्याला माहित असल्याने पाककृतीत दिल्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण घेण्यापेक्षा आपल्या घरच्या तिखटाच्या अनुभवानुसार प्रमाण जुळवून घ्यावे.

Mrunalini's picture

1 Dec 2014 - 12:58 pm | Mrunalini

थँक्स काका,
हो, तुम्ही सांगता तसेही करता येईल, पण आपल्या घरच्या मसाल्याची अजुन एक वेगळी चव आणि रंग असतो. म्हणुन मी तोहि मसाला वापरला.

मृ, तुझे सुंदर सादरीकरण बघुन गेले गं!मस्त फोटो.भांडी आणि तो चमचा तर बेस्टच आहे! या पाकृत माझ्यासारख्याना ती छान छान भांडी पहाणे एवढाच पर्याय!!

सुहास झेले's picture

1 Dec 2014 - 8:42 am | सुहास झेले

जबरी :)

जेपी's picture

1 Dec 2014 - 9:29 am | जेपी

आवडल..
तेवढ टोमॅटो सोडल तर सेम टु सेम बनवने आवडत. :-)

स्पंदना's picture

1 Dec 2014 - 10:54 am | स्पंदना

काळा पहाड's picture

1 Dec 2014 - 11:10 am | काळा पहाड

चिकनच्या ऐवजी बटाटे चालतील काय? मी चिकन खात नै म्हून इचारलं.

स्पंदना's picture

1 Dec 2014 - 11:12 am | स्पंदना

सोया चंक्स पळतील, अन पनिर तर टणाटण उडेल.
काळजी न्हाय करायची.

हो. अपर्णा बोलतीये ते बरोबर आहे. पनीर, बटाटे, सोया चंक्स सगळेच मस्त लागेल. ट्राय करुन बघ एकदा.
खुप सोपी पाकृ आहे. सगळे वाटण एकदाच मिक्सर मधे फिरवले कि काम झाले.

पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे खुप धन्यवाद. :)

असं चान चान सजवलेलं आसेल तर आम्ही खायचं सोडून बघतच बसु. :)

सानिकास्वप्निल's picture

1 Dec 2014 - 2:35 pm | सानिकास्वप्निल

सादरीकरण व पाकृ आवडली +१
सध्या भारतवारीत रोज ताव मारत असल्यामुळे कमी जळजळ होत आहे ;)

पैसा's picture

1 Dec 2014 - 2:48 pm | पैसा

निगुतीने लिहिलेली पाकृ आणि सुंदर सादरीकरण!

इरसाल's picture

1 Dec 2014 - 3:27 pm | इरसाल

ह्या बै आल्या का पुन्हा जीव जळवायला....छान.
कुणीतरि सांगा ह्याना मार्गशिर्ष चालु आहे म्हणावे.....उम्म ! आमी नाय ज्जा !!!

इरसाल's picture

1 Dec 2014 - 3:29 pm | इरसाल

आम्ही काय घास्फुस वाले नाही त्यामुळे नो बटाटा, नो सोया, नो पनीर नो गवार भेंडी इत्यादी टाकिंग इसमें.

समीरसूर's picture

1 Dec 2014 - 4:01 pm | समीरसूर

यापेक्षा अधिक जीवघेणे काय असू शकेल? तो लालेलाल रस्सा, ते रश्शामध्ये दिमाखात डुंबणारे लुसलुशीत चिकन, तो एखाद्या लावण्यवतीच्या पाणीदार नेत्रांप्रमाणे आकर्षक भासणारा नाजूक तवंग, प्रमाणबद्ध दिसणारी ती भाताची मूद, केलॉग कॉर्नफ्लेक्सच्या जाहिरातीतील नायिकेच्या नितळ कमरेप्रमाणे मऊ-मुलायम भासणारी ती शुभ्र-मखमली पोळी...

एखादी शनिवारची संध्याकाळ रमणीय, मनोरम, अविस्मरणीय व्हावी ती अशा जेवणाने. गरमागरम पोळीचा कुस्करा करून त्यात हा रस्सा ओतावा. लुसलुशीत चिकनचे तुकडे त्यात कुस्करावे; लिंबू पिळावे आणि ताज्या कांद्याच्या फोडी तयार ठेवाव्यात. हळूहळू गप्पा मारत मारत भोजनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. अधून-मधून आवडत्या पेयाचे घुटके असल्यास सोने पे सुहागा, दूध मे शक्कर...पेय काहीही असू शकेल. एखादी उंची वाईन, स्कॉच, एखादे रम्यरंगीत कॉकटेल, लिंबूमिश्रित वायाळ व्होडका, ज्यूस...आवडीप्रमाणे. मला असे जेवत असतांनाच आवडीच्या पेयाचा आस्वाद घ्यायला आवडतो. आधी भसाभसा पेय (कुठलेही) प्यायचे, बकाबका शेव-चकल्या, कबाब-बिबाब हादडायचे (जे पितात त्यांच्या बशीतले) आणि मग सगळी भूक मेल्यावर कसेबसे जेवण खायचे हा प्रकार फारच गुत्तासम वाटतो. कट टू रम्य शनिवार संध्याकाळ...अगदी मंद संगीत चालू आहे. गप्पांचा फड जमलेला आहे. "तुमच्याकडे पीएमची एक्स्पीरीयन्स लेव्हल काय आहे? डॉट नेटचे प्रोजेक्ट्स असतात का? जावाचे? पीएमपीला व्हॅल्यू आहे का? नवीन अँड्रॉईड पाहिला का? आयफोन ६ पाहिला का? तुमच्याकडे एफएसाय व्हर्टिकल कसं आहे? आणि एसेपी हॉरिझाँटल आहे का?" असल्या गप्पा नसल्या तर अधिक बरे! अशी ही निवांत संध्याकाळ रात्री १२-१ पर्यंत रंगावी आणि कलकत्ता पान चघळत असतांना पानाच्या स्वादासारखी तिखट-गोड होऊन जावी...

हाहाहा.. अप्रतिम समिरसुर, खुप सुंदर प्रतिसाद. थँक्स. :)
आता पुढचा शनिवार अशा प्रकारेच साजरा केला जाईल. ;)

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2014 - 11:07 am | प्रभाकर पेठकर

समीरसुर साहेब,

तुमची आवड कळली आणि सहमतही आहे. पण.....

आधी भसाभसा पेय (कुठलेही) प्यायचे, बकाबका शेव-चकल्या, कबाब-बिबाब हादडायचे (जे पितात त्यांच्या बशीतले) आणि मग सगळी भूक मेल्यावर कसेबसे जेवण खायचे हा प्रकार फारच गुत्तासम वाटतो.

दूसर्‍यांच्या आवडीला इतकी हिणकस विशेषणं लावून कमी लेखणं कांही आवडलं नाही, बघा.

वैभव जाधव's picture

1 Dec 2014 - 4:36 pm | वैभव जाधव

खत्तरनाक डिश.
काय दिसतेय ते अप्रतिम. चवीला तसेच अप्रतिम असणार. भारीच.

मनीषा's picture

3 Dec 2014 - 11:40 am | मनीषा

चिकन करी छानच दिसते आहे.
तांडुळाची भाकरी सुद्धा ...

मनीषा's picture

3 Dec 2014 - 11:42 am | मनीषा

.... तांदुळाची

Maharani's picture

3 Dec 2014 - 1:20 pm | Maharani

अप्रतिम सादरीकरण....

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 1:37 pm | बॅटमॅन

अप्रतिम!!!!

वाचून "च्यायला एवढं सोपं आहे होय?" असे वाटते, पण तो सोपेपणा आभासी आहे हेच खरे.

खेकडताणीसिंह's picture

8 Dec 2014 - 5:10 pm | खेकडताणीसिंह

प्रथमच चिकन करी करून बघितली ..दिलेल्या कृतीप्रमाणे उत्तम झाली फक्त टोम्याटो घेतले नाहीत ...शाकाहारी असून देखील बायकोला खूप आनंद झाला ...एक वेळ स्वयंपाकाला सुट्टी मिळाली म्हणून :)

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:26 pm | दिपक.कुवेत

एका दमात काय तुमचा आयडि बोलता येत नाहिये...अर्थात हा सर्वस्वी तुमचाच चॉईस आहे म्हणा तरीपण

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 12:29 pm | टवाळ कार्टा

कुठे जाऊन मोठ्याने शिमगा करायचा आहे काय ;)

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:31 pm | दिपक.कुवेत

:D

अरे वा,... मस्त खेकडताणीसिंह. :)

निलीमा's picture

9 Dec 2014 - 5:00 pm | निलीमा

अप्रतिम!!!! *OK*

शेवटचा फोटो अप्रतिम आला आहे. *good*

अनन्त अवधुत's picture

17 Dec 2014 - 4:44 am | अनन्त अवधुत

पाकृ एकदम सोपी आहे. मी करून पाहिली.
धन्यवाद Mrunalini
मी केलेले बदल:
चिकन ऐवजी दम आलू घेतले.
हे छोटे बटाटे तासभर दही, धणे पावडर, तिखट , मीठ आणि किसलेले आले याच्या मिश्रणात बुडवून ठेवले (सालीसकट).
शिवाय कांदा आणि टोमॅटो वाटण करण्याआधी परतून घेतले.

अरे वा.. बटाटे घालुन पण छान लागत असणार. ट्राय करायला पाहिजे. थँक्स. :)
आपण एरवी कांदा-टोमॅटो परतुनच घेतो. हि पाकृ एकदम सोपी आणि पटकन होण्यासाठी मी कच्चेच वाटले होते आणि मग तेलावर परतले. :)

चेतन677's picture

4 Jan 2015 - 9:12 pm | चेतन677

खुप सोपी पध्दत आहे.पण चिकन शिजवण्यासाठी किती वेळ ठेवावे??

चिकनचे मिडियम साईजचे तुकडे असतील तर शिजायला १० मिनिटे पुरतात.
पण जर ती गावरान कोंबडी असेल तर त्याला जास्त वेळ लागतो.

रेवती's picture

27 Jan 2016 - 8:20 am | रेवती

मृणालिनी,
हो, नाही म्हणताना वर्षभरापेक्षाही जास्त काळाने ही रेसिपी आज करून पाहिली. बर्‍याच चुका केल्या व पुढील वेळी त्या न करण्याच्या नोंदी करून ठेवल्या. वन जार वाटण सोपे आहे पण तेल सुटेपर्यंत परतताना नानी, दादी आमच्याच नव्हे तर शेजार्‍यांच्याही आठवल्या. मग नवर्‍याने मदत केली. त्यानेच चिकन ड्रमस्टिक्स स्कीन काढून तयार केल्या. परतण्याचा पेशन्स संपण्याच्या क्षणी वाटणाला तेल सुटलेय असे मानले. ते खरेच सुटले होते पण मी तेल आधी कमी घातल्याने ते कमी दिसत होते. मग त्यात ड्रमस्टिक्स घालून नवर्‍याने बरीच परतापरती केली. पाच मिनिटे झाकून शिजवले तरी पाणी काही सुटेना. मग वरून थोडे अ‍ॅडवले. त्यास उकळी फुटेना. मग ते प्रेशर पॅनमध्ये ट्रान्सफर केले. आणखी अर्धी वाटी पाणी घालून तीन शिट्ट्या आणल्या. कुकरच्या विश्रांतीनंतर तो उघडला. सर्व प्रकरण व्यवस्थित शिजले होते. त्यात मीठ घालायचे विसरले होते, तिखट कमी पडले होते. तू दिलेले प्रमाण अगदी बरोबर आहे. मग नवर्‍याने तिथेही मदत केली. बेसिक इनग्रेडियंटसमध्येच विसराविसरी झाली होती त्यामुळे वरून कोथिंबीर भुरभुरवणे वगैरे स्वप्नातच राहिले. आता पुढीलवेळी सुधारणा करण्यात येईल.
तेल जास्त घालणे,
लाल तिखट जास्त घालणे,
मीट मसाला दुकानातून आणून ठेवणे (व तो घालणे),
मीठ घालणे,
आणखी पाणी चालले असते, ते घालणे.

धन्यवाद.