झटपट घावन

ऋचा's picture
ऋचा in पाककृती
8 Aug 2008 - 1:32 pm

साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ.
कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे.
तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते.

टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 1:39 pm | विसोबा खेचर

अरे वा! टेल्कोची मालकीण ब्यॅक टू मिपा! :)

असो,

झटपट घावन अंमळ बरे वाटत आहेंत! :)

आपला,
(मुगाच्या घावनांचा प्रेमी) तात्या.

यशोधरा's picture

8 Aug 2008 - 1:45 pm | यशोधरा

मस्तच आहे!! सोप्पे अगदी!! करुन बघेन.

ऋचा's picture

8 Aug 2008 - 1:48 pm | ऋचा

ह्यात तुम्ही मोड आलेले धान्य (भिजाणं) घालु शकता.
अजुन पौष्टीक होईल.
:)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझे बाबा त्यात थालिपीठाची भाजणी आणि चिंच घालायचे. ते पण मस्त लागतं.

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 1:56 pm | विसोबा खेचर

तुझ्या बाबांच्या हातचा एकदा उपमा खाल्ला आहे! खूप छान करायचे! :)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व!