पोलिश घावन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in पाककृती
7 Aug 2008 - 8:49 pm

ही पाककृती साभार एका पोलिश मित्राकडून!

साहित्य: २ मोठ्ठे बटाटे, १ मोठ्ठा कांदा, अर्धी वाटी कणीक, १ अंडं, तिखट, मीठ, पाणी गरजेनुसार, आणि भरपूरसं तेल

कृती: प्रथम बटाटे आणि कांदे किसून घ्यावे. त्यात अंडं फेटून टाका. त्यात कणीक घाला. (साधारण घावनांच्या पीठाप्रमाणे याची घनता/viscocity असू देत. त्यामुळे जरुरीनुसार पाणी/कणीक घाला.) त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट, आवडत असल्यास मिरी घाला.
थोड्याशा खोलगट तव्यावर तेल तापलं कि त्यात हे मिश्रण घावनांप्रमाणे ओतून दोन्ही बाजूंनी शिजवा. कडा बय्रापैकी कुरकुरीत होतात.
याच्याबरोबर दही (/sour cream) चांगलं लागतं. आवडत असतील तर ग्रिल्ड अळंबी (मश्रूम) पण याच्याबरोबर घ्या.
आणि हादडा!

अवांतरः म्हणे पोलंडमधे हा एकदम प्रसिद्ध स्नॅक आयटम आहे.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

7 Aug 2008 - 8:52 pm | प्राजु

वाटते तरी चांगले आहे. श्रावण संपला की करून बघायला हरकत नाही. हे ब्रेड सोबत चांगले लागेल का? म्हणजे ऑमलेट प्रमाणे??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 8:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तरी पावाबरोबर कधी नाही खाल्लं ... आधीच बटाटा आणि कणीक घातल्यावर वर पुन्हा पाव म्हणजे ...!
मला त्याच्याबरोबर दही आणि मश्रूमच बरे वाटले. चवही येते आणि पोषणाच्या दृष्टीनेही बरं!

प्राजु's picture

7 Aug 2008 - 9:00 pm | प्राजु

यासोबत दहि घेताना, त्यात जर काकडी गाजर बारिक चिरून घातले म्हणजे रायते केले तर मस्त लागेल बहुतेक.
यमीताई.. आमच्या घरात, डोसे, घावन , आंबोळ्या, धिरडी हे असले प्रकार म्हणजे सतत चालूच असतात. कंटाळा येतो सारखे सारखे तेच करून. आता ही एक नवी आहे पद्धत करून बघेन.
स्वगत : श्रावण संपेपर्यंत थांबावे लागेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

7 Aug 2008 - 9:12 pm | सहज

यमे यम्ज वाटतय. :-)

पोलीश लोक आपली गव्हाची कणीक [होलव्हीट वाली] की मैदा [रिफाईंड व्हीटफ्लार] वापरत असतील ?

प्रियाली's picture

7 Aug 2008 - 9:19 pm | प्रियाली

करून बघायला हरकत नाही. करावाच म्हणते. ;)

हॅश ब्राऊन्स + ऑम्लेट + ब्रेड असे काहीसे दिसते.

पोलीश लोक आपली गव्हाची कणीक [होलव्हीट वाली] की मैदा [रिफाईंड व्हीटफ्लार] वापरत असतील ?

हम्म! पोलंडला गहू उगवतो, कदाचित कणिक माहित असावी पण तिखटाचं काय? तिखटा ऐवजी मिरपूड चालेल किंवा मिरच्या-कोथिंबीर टाकली तर इंडो-पोलीश पाककृती होऊन जाईल.

एक प्रश्नः बटाटा किसून घातला तरी बटाटा शिजण्याचा वेळ हा कांदा किंवा कणिक, अंडे शिजण्यापेक्षा अधिक असावा(?) बटाटे कच्चे नाही का राहात? की अर्ध-कच्चे (Par cooked) हवे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पोलंडला गहू उगवतो, कदाचित कणिक माहित असावी
युकेमधे जे 'मल्टिपर्पज फ्लार' मिळतं ते त्यानी आधी वापरलं (मी पोलंडला गेले नाही आहे); पण नंतर 'ऑन डिमांड', अचानक बनवण्याची वेळ आल्यावर मग जे काही उपलब्ध होतं ते, म्हणजे कणीक, वापरल्यावर ते पीठ वापरणं बंदच केलं. माझ्या मते तिथे मैद्यापेक्षाही जास्त कणीकच वापरली जात असावी.
तिखटा ऐवजी मिरपूड चालेल किंवा मिरच्या-कोथिंबीर टाकली तर इंडो-पोलीश पाककृती होऊन जाईल.
तिखटाऐवजी तो सुरुवातीला काहीतरी तसंच लाल दिसणारं, किंचित वेगळ्या चवीचं जिन्नस वापरायचा. पण (पुन्हा भारतीय...) मिसळणाचा डबा पाहिल्यावर मात्र तिखटच वापरायला सुरुवात केली.
मिरची-कोथिंबीर मस्त लागेल असा माझा अंदाज आहे. पार्सलीपण चांगली लागते.
(जरा शाईन मारून घ्यावी: क्रीमऐवजी दही खावं ही माझी ऍडिशन!)

एक प्रश्नः बटाटा किसून घातला तरी बटाटा शिजण्याचा वेळ हा कांदा किंवा कणिक, अंडे शिजण्यापेक्षा अधिक असावा(?) बटाटे कच्चे नाही का राहात? की अर्ध-कच्चे (Par cooked) हवे का?

नाही, शिजायचे बटाटे. (मी स्वतः कधी संपूर्ण, स्वतंत्रपणे नाही बनवून पाहिलेले), पण तो हे जवळजवळ तळायचाच! म्हणजे हे घावन साधारण आपल्या थालिपीठाएवढे जाड असायचे आणि त्याच्या अर्ध्या जाडीएवढ्या उंचीचं तेल तव्यात असायचं. पण कमी तेलातही, झाकण ठेऊन शिजले होते.

मी काही स्वयंपाकतज्ञ नाही त्यामुळे जरा तिखट-मीठ इकडे-तिकडे झालं तर सांभाळून घ्या (नेहेमीप्रमाणे)!

मेघना भुस्कुटे's picture

8 Aug 2008 - 6:48 am | मेघना भुस्कुटे

आता या वीकेण्डला करून पाहते. मस्त वाटतंय आणि मुख्य म्हणजे सोपं. पण तव्याला चिकटत वगैरे नाही ना ग? माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाहीय. :( जर पहिला घावन (तो की ते?) तव्याला चिकटला, तर पुढचं सगळं बोंबलतंच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 9:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेल जरा जास्त घाल म्हणजे चिकटणार नाही. पण तू नॉन-स्टीक वापरत नाहीस? तुझी चिकाटी खूप जास्त दिसते! ;-)

मेघना भुस्कुटे's picture

8 Aug 2008 - 9:53 am | मेघना भुस्कुटे

चिकाटी खूप जास्त दिसते!
खि:खि:खि:!
अग, इथे किती दिवस असणार माहीत नाही. त्यात काय काय जमवायचे? म्हणून. :) (आणि नॉनस्टिक घेऊन तरी मी काय दिवे लावणारेय ते माहिताय!)

रेवती's picture

7 Aug 2008 - 10:31 pm | रेवती

मुलांना सतत काहितरी नविन प्रकार लागतच असतात. मी ट्रेडर जोज् चे पॅनकेक मिक्स + हॅश ब्राऊन्स + चवीपुरती मिरची पेस्ट व मीठ एकत्र करुन त्याचे जाडसर उत्तप्पे करते. पीठ ताकात भिजवते. ह्यात व्हेरियेशन्स करता येतात. अंडे नसल्याने श्रावणातही करता येउ शकेल.

रेवती

आनंदयात्री's picture

8 Aug 2008 - 10:08 am | आनंदयात्री

श्रावण कटला की मारुन पाहु हात !!

मनस्वी's picture

8 Aug 2008 - 5:57 pm | मनस्वी

हेच म्हणते.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 11:12 am | विसोबा खेचर

अरे वा! एकदा करून खाल्ले पाहिजेत हे घावन...

धन्यवाद यमे...

तात्या.

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 12:17 pm | स्वाती दिनेश

हे घावन करून पाहिले पाहिजेतच यमूताई.वाचून तर मस्तच वाटत आहेत,
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही त्या मित्राला पंधरवड्यात एकदा आमच्यासाठी "सपर" बनवायला लावायचो (आणि बदल्यात मी पावभाजी बनवायचे).

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2008 - 12:27 pm | स्वाती दिनेश

सपर आणि पावभाजीचं एक्सचेंज मस्त,:)
स्वाती

पिवळा डांबिस's picture

8 Aug 2008 - 11:30 pm | पिवळा डांबिस

आयला, ह्ये नवीन दिसतंय!
आमची आत्तापोतूर समजूत आशी की म्हराटी पोलीस वडापाव (आनि अमेरिकन पोलीस डोनट) हादडतात! पन ह्ये येगळं दिसतंय!!!!
आता म्होरच्या येळंला बनीताईला घेऊन पुन्यातल्या चौकीत जाऊन ह्ये घावन खायालाच पायजे!!!!
:)
ह्.घ्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

काका, आपला मराठी वडापाव पण सायबाच्या देशात जाम हिट झाला होता. पण सायबांच्या पोलिसांचं माहिती नाही.

प्रियाली's picture

9 Aug 2008 - 7:02 pm | प्रियाली

पोलीश घावनाची मू़ळ पाककृती बदलून (अर्थात, तिची वाट लावून) इंडो+अमेरिकन+पोलीश प्यानकेक असं काहीसं मी आताच बनवून पाहिलं.

पण एकदम जबरदस्त झालं.

बटाटा ७-८ मि. उकळत्या पाण्यात घालून अर्धकच्चा शिजवला. कांदा, बटाटा किसून त्यात अंडं, तिखट घातलं. अर्धीवाटी कणिक घालण्याऐवजी पाव वाटी कणिक आणि पाव वाटी प्यानकेक मिक्स घातलं आणि घरगुती तुपावर श्यालो फ्राय केलं आणि सावर क्रिम सोबत गटकलं.

आता वरील वाट लावायचं कारण असं की - पोलीश प्यानकेकात गव्हाचं पीठ, बटाटा आणि कांदा म्हटल्यावर कन्यकेने "इइइइव!" वगैरे आवाज सुरु केले होते. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी असं केलं. परंतु, ते अतिशय आवडीने खाल्लं गेलं. त्यावरून मूळ पाककृतीबद्दल काही विश्लेषण ;)

  • हे घावन फक्त कणकेत बनवता यावं. कणिक चवीला चांगली लागली.
  • तेलात तळायचे नसेल तर बटाटा पार-कूक करावा.
  • तिखट या घावनात सुरेख लागते.
  • सावर क्रिमबरोबर क्षणार्धात गटकता येते.
सहज's picture

9 Aug 2008 - 7:09 pm | सहज

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

एकतर स्विस रोस्टीचे जबरी फॅन रोस्टी-सावर क्रीम फेव्ह डिश

पॅनकेक मिक्स डोके उत्तम पण आता म्हणताय फूल्टु कणीक चालेल तर नक्की..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 7:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला पण आता हे वाचून भूक लागली! थोडे मलापण पाठवून दे ना प्रियाली तै! प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ... ;-)

तिखट या घावनात सुरेख लागते.
मलापण त्यात मिरपूड नाही आवडत!

चित्रा's picture

9 Aug 2008 - 7:29 pm | चित्रा

छान पाककृती. तुमचा मित्र ज्यू आहे का?
ही बहुदा ज्यू लोकांची पाककृती आहे. Potato latke नावाची. त्यांच्या सणावाराला करतात.
आपल्या साबुदाण्याच्या वड्यांसारखी दिसते -अर्थात कांदा वगळून!
करून पाह्यला पाहिजे..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 7:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही तो ज्यू नाही आहे. पोलंडमधे दुसय्रा महायुद्धानंतर अजूनही ज्यू लोकं आहेत? पण ही पाककृती मुळात ज्यू लोकांकडून घेतली असू शकते. दुसय्रा महायुद्धापूर्वी खूप ज्यू लोक होते ना? आणि कांदा घालण्याचं डोकं बहुतेक या मित्राचं/त्याच्या आईचं आहे, त्याच्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर असण्याची शक्यता बरीच जास्त वाटते.
पोलिश मधे याला प्लात्की (placki) म्हणतात.

भडकमकर मास्तर's picture

10 Aug 2008 - 1:47 am | भडकमकर मास्तर

हे घावन एकदम सुपरहिट झालेलं दिसतंय...
एकदा करून पहायला पाहिजे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर,

घावनांना सुपरहिट म्हटल्याबद्दल थ्यांकू! करून बघाच तुम्ही, 'खाण्यासाठी जन्म आपुला'!

बघा आणखी एक उदाहरण, 'परदेशी वस्तू' भारतात सुपरहिट होतात! ;-)
आता मी हे सगळं माझ्या त्या पोलिश मित्राला (भाषांतर करून) सांगितलंच पाहिजे.

(देशी) यमी

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 3:18 pm | प्रकाश घाटपांडे

या पोलिस घावनाच डेरिंग करावं का नाई असा ईचार डोस्क्यात चालु हाय. अदुगरच त्या पोलिसात आर्ध्याव डाव सोडुन दिला. त्यातुन ते कोकोचा दगुड माथ्याव बस्ला. बायकुला इचाराव त म्हन्नार तुह्या त्या पाच षष्ठांश काळ्या ठमीला अदुगर इचार कि बाई तु सोता केलय का?
(संभ्रमित)
प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 4:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.... पाच षष्ठांश काळ्या ठमीला ....
वो! मी काय काली नाय .... उगाच काय हो बोलून रायलात?

मी एकटीनी कधी नाही बनवून पाहिलेत. मित्राची आशिश्टंट म्हणून काम केलं आहे. तुम्हाला काही 'टिप' हवी असेल एवढीच की थोडे जाडे घातलेत घावन तर तेल जास्त लागेल, आणि थोडे (किंचितच) पातळ घातलेत तर कमी तेल पुरेल. आणि एक जनरल टीप अशी की तव्यावर काहीही बनवताना तवा गरम असलेला बरा! जसं भजी / वडे तळताना तेल गरम करून घेतो तसंच हे घावन बनवताना पण तेल गरम करून घ्या.

तुम्ही जर घावन/डोसे इत्यादी पदार्थ बनवले असतील किंवा नीट निरीक्षण केलं असेल बनवताना, तर काही प्रॉब्लेम येऊ नये. वड्या किंवा चॉकलेटही बनवणं तसं कठीण प्रकारात नाही मोडतं. पण तव्यावर घावन घालणं फारच सोपं आहे.

चंबा मुतनाळ's picture

13 Aug 2008 - 10:27 pm | चंबा मुतनाळ

यमूताई, तू धप्प गोरी आहेस ग, प्रकाशकाका तुझ्या उरलेल्या पाच षष्ठांश यमीबद्दल बोलतायत!
बाकी घावन सांगीतले पाहीजे हिला बनवायला घरी गेलो की!

इंटरनेटस्नेही's picture

19 Sep 2010 - 9:29 pm | इंटरनेटस्नेही

सोपी दिसतेय रेसिपी.. (कितीही सोपी असली तरी आम्ही स्वतः बनवणार नाहीच आहोत!)
आमच्या मातोश्रींना याची छापील प्रत देण्यात आली आहे!

(आळशी)