गाभा:
नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ? आपणास असा अनुभव असल्यास शेअर करावा.
( मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने लि़खाणातील चुकांसाठी माफी असावी. यापुढे मराठी लि़खाण सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल)
धन्यवाद,
प्रतिक्रिया
12 Nov 2014 - 10:44 am | रामदास
हे सांगण्याइतका मोकळेपणा तुमच्यात आलेला आहे हे (कदाचीत) स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे लक्षण आहे. माझ्या परीचयातील काही व्यक्ती हाय स्ट्रेस जॉब करत आहेत. यशस्वी आहेत. (दोन्ही अर्थाने)पण तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला मानावा हे योग्य असेल. खाजगी क्षेत्रातही लो स्ट्रेस जॉब असतात. मिपावर लिहीणे हा एक स्ट्रेसबस्टर आहेच.
13 Nov 2014 - 12:42 am | पिवळा डांबिस
सरकारी नोकरी ही बिन-स्ट्रेसची आणि खाजगी क्षेत्रातली नोकरी स्ट्रेसफुल असं सरसकटीकरण नाही करता येत. स्ट्रेस हा तुमच्या कामाच्या स्वरूपावर आणि पदावर अवलंबून असतो.
त्यामुळे रामदासांशी सहमत पण,
हे शीक्रेट फोडल्याबद्दल स्वामींचा निषेध!!!
:)
12 Nov 2014 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे
"असा फार महत्वाचा आणि जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारा सल्ला मिपाच नव्हे तर इतरही कोणत्या संस्थळावरून घेऊ नका." हा सल्ला देत आहे.
विषेशतः आरोग्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल... खासकरून काही विशेष समस्या आहेत अश्या परिस्थितीत... कोणतीही तज्ञ व्यक्ती खोलवर माहिती काढून घेतल्याशिवाय सल्ला देणार नाही.
जर सखोल माहितीशिवाय ठाम सल्ला देणारी व्यक्ती सापडली तर ती व्यक्ती नक्कीच तज्ञ नाही आणि तिचा सल्ला व्यवहारात आणण्यास धोका आहे असे समजावे.
अर्थात "आपल्या समस्यांबद्दल मिपामित्रांशी मोकळेपणाने चर्चा करायला" आणि "योग्य तज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठी काही संकेत मिळण्यासाठी" मिपा उत्तम संस्थळ आहे हे इथल्या पूर्वीच्या काही चर्चांवरून खात्रीने सांगू शकतो.
तुमच्या आरोग्यपूर्ण सुखकारक व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा !
12 Nov 2014 - 11:19 am | एस
अतिशय महत्त्वाचा सल्ला!
12 Nov 2014 - 2:47 pm | सतिश गावडे
अतिशय योग्य सल्ला.
13 Nov 2014 - 9:54 am | बार्नी
सल्ल्याबद्दल आभारी आहे. बाहेरच्या जगात कुणाला असा सल्ला विचारता येत नाही, लोक संशयाने बघतात . मिपावार एनॉनिमस राहण्याची सोय असल्याने विचारण्याचे धाडस केले , अंतिम निर्णय डॉक्टरांच्या व घरच्यांशी सल्लामसलत करुन घेइन. त्यामुळे काळजी नसावी.
12 Nov 2014 - 10:49 am | जेपी
मिपावर लिहिणे एक स्ट्रेसबस्टर आहे.+1
12 Nov 2014 - 10:54 am | विटेकर
मानसिक ताण हा आपल्या मनातच असतो , त्याचा बाहेरच्या परिस्थितीशी तसा फारसा संबंध असतोच असे नाही.
सुख, दु:ख याप्रमाणे ताण ही देखील मनाचीच एक अवस्था आहे. तुम्ही आता बरे झालेले आहात / पूर्ण बरे होण्याच्या वाटेवर आहात.( अर्थात यामधे तुमच्या डो़क्टरांचा शब्द अंतिम !)
आवडीचे क्षेत्र असेल तर ताण ही वाट्णार नाही. तेव्हा निन्धास्त रहा आणि स्वामी चिन्मयानंद म्हणतात तसे -
Carry your own environment with you !!
तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी म्हणून हार्दिक शुभेच्छा !
आणि यशस्वी झाल्यावर तुमचे अनुभव इथे मांडायला विसरु नका.
12 Nov 2014 - 10:58 am | कवितानागेश
तुम्ही याबद्दल Institute For Psychological Health किंवा अजून तशाच कुठल्या संस्थेकडून नीट सल्ला घेतलात तर जास्त योग्य होईल. मनोरुग्ण असले तरी प्रत्येकाची ताण घेण्याची ताकद वेगवेगळी असू शकते. तुम्ही काय काय काम करु शकता हे तुम्हाला नीट तपासूनच सायकेअट्रिस्त सांगू शकतील.
तुम्ही बीटेक पूर्ण केले आहे, तर तुमची मानसिक स्थिती नक्कीच चांगली आहे. आणि कदाचित सुधारूही शकेल.
माझ्याही बघण्यात स्किझोफ्रेनिक असलेले पण व्यवस्थित काम करणारे लोक आहेत. त्यांना फार क्वचित औषधे घ्यायची वेळ येते.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
12 Nov 2014 - 2:03 pm | hitesh
मानसिक आजार असुनही करियर शक्य आहे.
किंबहुना करियए करताना मिळणारा आर्थिक सपोर्ट व आनंद यातुन तुमच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळेल.
माझा एक एम बी बी एस मित्र स्प्लिट पर्सनॅलिटीचा शिकार होता. कॉलेजचे पहिलेच वर्ष झाले आणि व्याधीमुळे त्याने कॉलेज सोडले. उपचारात ११ वर्षे निघुन गेली. त्यानंतर त्याने उरलेले शिक्षण पुर्ण केले. सध्या करियर लग्न करुन व्यवस्थित आहे.
12 Nov 2014 - 2:05 pm | टवाळ कार्टा
:)
12 Nov 2014 - 2:22 pm | सूड
माऊ आणि इए यांच्या प्रतिसादांशी सहमत.
12 Nov 2014 - 3:46 pm | आदूबाळ
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये न्यूरोडायवर्सिटी असली तरी समान संधी दिल्या जातात. इतकंच नव्हे तर सहकार्यांना न्यूरोडायवर्स व्यक्तींशी कसं वागायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. अॅस्पर्जर सिंड्रोम असलेल्या व्यक्तीबरोबर मी नेहेमी काम करतो.
मुद्दा हा आहे, की संधी असतात. ती तुम्ही घ्यायची की नाही हा अर्थातच तुमचा निर्णय आहे - आणि त्यासाठी लीमाऊजेट यांचा सल्ला अत्यंत योग्य वाटतो.
12 Nov 2014 - 4:01 pm | प्रसाद१९७१
सरकारी नोकरीत ताण तणाव नसतात हा गैर समज आहे. तुम्ही COEP मधुन शिकला आहात. तुम्ही काही सरकारी कारकुन नक्कीच होणार नाही.
म्हणजे सरकारी नोकरी मिळवली तरी ती जबाबदारीचीच असेल.
Class 1 सरकारी नोकरी फार अवघड आहे. त्यातील ताण तणाव खाजगी नोकरी पेक्षा जास्त असतात. १२-१४ तास काम असते आणि लायकी नसलेल्या राजकीय गुंडांकडुन अपमान सहन करायला लागलो. तसेच आपली मुल्ये जपण्याचा पण मानसिक त्रास असतो.
12 Nov 2014 - 5:21 pm | hitesh
सहमत
13 Nov 2014 - 12:34 am | बोका-ए-आझम
आधीच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. एका अत्यंत गंभीर समस्येला तोंड देऊन त्यातून बाहेर येणं ही एक असामान्य गोष्ट आहे. भल्याभल्यांना ते जमत नाही. आपण ते केले आहे. याचा अर्थ आपण लढाऊ आहात आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. स्वतःच्या मनाएवढं अाव्हान जगात दुसरं कुणीच तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही जर त्याचा मुकाबला केलेला आहे, तर बाकीच्या गोष्टीही सहज करु शकाल. ज्या अंत:प्रेरणेने तुम्ही इथे लिहायला सुरुवात केली तीच प्रेरणा तुम्हाला योग्य सल्ला देईल. थोडक्यात, जे तुम्हाला योग्य वाटतं, मनापासून करावंसं वाटतं, जे करताना आनंद मिळतो ते करा! मनापासून शुभेच्छा!
13 Nov 2014 - 12:50 am | मुक्त विहारि
रामदास, इ.ए., लीमाउजेट, विटेकर, बोका-ए-आझम आणि प्रसाद१९७१ यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहेच.
तरीपण जमल्यास, ए ब्युटीफूल माइंड, हा सिनेमा जरूर बघा.
बिंधास्त र्हावा...मजेत आयुष्य जगा...
13 Nov 2014 - 1:50 am | खटपट्या
अजून एक, जमल्यास कट्ट्याला हजेरी लावा :)
13 Nov 2014 - 8:16 am | मुक्त विहारि
ते तर आहेच...
लवकरच आम्ही "संसारसुखाचे मुलमंत्र" हा ग्रंथ प्रकाशीत करणार आहोत.त्यातलेच एक कवन....
जो करी ठराविक अंतारने कट्टे
त्याच्या करीयरला न लागे बट्टे
क्ठले पेय ते महत्वाचे नसे
तसेच कुठलेही खाद्य
काया-वाचा अन मनाने कट्टा करावा
आणि तो मित्रांच्या संगतीत उपभोगावा
कूठलाही विषय वर्ज्य नसावा
राजकारण आणि जातीभेदास मात्र थारा नसावा.
13 Nov 2014 - 4:48 pm | सूड
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)
13 Nov 2014 - 4:48 pm | सूड
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)
13 Nov 2014 - 5:08 pm | बॅटमॅन
६० उत्तराची कहाणी सुफळ व्हायची तर ५ उत्तरे का बरे पुरेशी होतात? बाकी ५५ उत्तरे कुठे गेली?
13 Nov 2014 - 10:04 am | बार्नी
सिनेमा बघितला आहे. त्यात schizophrenia ला खूपच जास्त रोमांटिसाइस करून दाखविले आहे , John Nash चे वैयक्तिक जीवन बरेच वेगळे होते, तरी पण उत्तम सिनमा. आमच्यासारख्या लोकांसाठी हा माणूस प्रेरणा आहे.
13 Nov 2014 - 9:29 am | सुबोध खरे
अनाहूत /आगाऊ सल्ला
बार्नी साहेब,
सरकारी नोकरीत तणाव कमी असतो असे नाही परंतु एक गोष्ट वस्तुस्थिती आहे कि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या कामा वर कितीही परिणाम झाला तरी आपल्याला नोकरीवरून काढून टाकले जात नाही. शिवाय आपण जोवर वैद्यकीय रजेवर आहात किंवा रुग्णालयात भरती आहात तोवर आपल पगार चालू राहतो. खाजगी नोकरीत तुम्हाला नवनिर्मिती ला जास्त वाव असेल किंवा तेथे पगारही जास्त मिळेल परंतु सरकारी नोकरीत ६ व्या वेतन आयोगानंतर पगार सुरुवातीला तरी खाजगी आस्थापनापेक्षा जास्त आहेत.
आपल्या नोकरीपुर्वी होणार्या वैद्यकीय चाचणीत आपल्याला बर्याच वेळेस आपल्या पूर्वीच्या आजारांबाबत माहिती विचारली जाते/ प्रतिज्ञापत्र (DECLARATION) द्यावे लागते. आपण आपल्याला स्किझोफ्रेनिया आहे हे लिहून दिल्यावर खाजगी आस्थापने आपल्याला नोकरी देण्यापूर्वी दोन वेळा विचार करतील हि वस्तुस्थिती आहे (निदान सुरुवातीला तरी.)अर्थात असे काही नाही हे आपण लिहून दिलेत तर गोष्ट वेगळी.
आणखी एक सुचवू इच्छितो. आपण जी नोकरी शोधाल ती आपल्या घराच्या जवळ( एकाच शहरात) असेल असे पहा कारण आपला आजाराचा पुनरुदभव होण्याची थोडीशी शक्यता असते आणी हि गोष्ट कुटुंबातील व्यक्तीच्या फार लवकर लक्षात येते. त्यामुळे आपला इलाज सुद्धा लवकर होतो आणी त्यामुळे आजार लगेचच बरा होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा आजार परत उद्भवतो आहे हे तो व्यक्ती स्वतः सांगू शकत नाही त्यामुळे मन खंबीर ठेवा इ. गोष्टीनी आपला आजार आटोक्यात येणार नाही. तेंव्हा आपल्याला आपल्या जवळच्या सख्ख्या नातेवाईकांच्या सान्निध्यात राहणे हे जास्त श्रेयस्कर आहे.
बाकी प्रत्यक्ष कोणती नोकरी करावी/ स्वीकारावी हे आपण आपल्या मनोविकार तज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे. एक गोष्ट मी आपणास सुचवू इच्छितो कि स्किझोफ्रेनिया हा आजार आहे म्हणून आपल्याला कोणतीही उंची गाठायला कोणताही अडथळा येणार नाही.माझ्या माहीतीतील( मला ३ वर्षे वरिष्ठ) असलेला डॉक्टर याच आजारातून बरा होऊन आज दक्षिणेतील मोठ्या शहरात प्रथितयश मनोविकार तज्ञ म्हणून नाव कमावून आहे.
आपल्याला आपल्या जीवनक्षेत्र / व्यवसायात(करियरला प्रतिशब्द सापडत नाही) यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
13 Nov 2014 - 5:27 pm | कपिलमुनी
कार्यक्षेत्र ??