>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
>>> शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.
सविस्तर विश्लेषणासाठी वाचा - http://www.onkardanke.com/2014/11/blog-post.html
प्रतिक्रिया
9 Nov 2014 - 7:45 am | खटपट्या
सहमत
शिवसेनेचे अजब तर्कट अजुनही संपलेले नाही. आभ्यासु सुरेश प्रभू यांना डावलून अनिल देसाईंचे नाव पुढे केले गेले आहे. प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय. मागे जेव्हा प्रभू केन्द्र सरकारात होते तेव्हाही त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्यास सांगण्यात आला. पैशाचं राजकारण केल्याशिवाय आणि मातोश्रीचे उम्बरठे झिजवल्याशिवाय शिवसेनेत मोठे होता येत नाही हेच खरे.
9 Nov 2014 - 1:09 pm | सतिश गावडे
>> प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय.
सुरेश प्रभू आता कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत याचा कुणी खुलासा करेल का? कालपासून त्यांच्यासंबंधी बातम्या वाचतोय मात्र ते कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत हे कुठेच वाचायला मिळाले नाही.
9 Nov 2014 - 1:19 pm | प्रचेतस
प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे असूनही सध्या पक्षात सक्रीय नाहित. पण माणूस अतिशय हुशार आहे, अनुभवी आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे.
पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. त्याच बरोबर मंत्री मंडळात अत्यंत सुयोग्य माणसे मोदी नेमस्तपणे नेमत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते.
9 Nov 2014 - 1:57 pm | सतिश गावडे
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे.
अर्थात पर्रीकर देशाच्या संरंक्षणमंत्री पदाला न्याय देतील यात शंका नाही. आजच्या राजकारण्यांमध्ये उच्चशिक्षीत असूनही आपल्या साधेपणामुळे ते लक्षात येतात.
9 Nov 2014 - 2:38 pm | विश्वजीत भोसले पाटील
सहा महिन्यात एकही मंत्री चमकदार कामगिरी करु शकलेला नाही ,त्यामुळे पर्रीकरांना घेतले.महागाई वगैरे काँग्रेसच्या काळातले प्रश्न जैसे थे आहेत.
9 Nov 2014 - 10:27 pm | क्लिंटन
आश्चर्याची काय गोष्ट त्यात? मुख्यमंत्रीपदावरून केंद्रीय मंत्रीमंडळात जाणे आणि केंद्रीय मंत्रीमंडळातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जायचे प्रकार कित्येक वेळा झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण १९६२ च्या चीन युध्दानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले.तीच गोष्ट १९९१ मध्ये शरद पवारांची. १९८८ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात अर्थमंत्री म्हणून गेले. २००० साली राजनाथसिंग असेच उत्तर प्रदेशात गेले. त्याच वर्षी नितीशकुमारही आपले औटघटकेचे मुख्यमंत्रीपद सांभाळायला बिहारमध्ये गेले होते. नारायणदत्त तिवारी, भजनलाल, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी या अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी राज्यातील पदांचे राजीनामे देऊन केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?
9 Nov 2014 - 10:56 pm | सतिश गावडे
आमचा तुमच्या एव्हढया अभ्यास नाही हो राजे. मात्र आमच्या आश्चर्याच्या निमिताने तुम्ही हा प्रतिसाद दिला आणि चार गोष्टी अजून कळल्या. :)
10 Nov 2014 - 3:37 pm | बोका-ए-आझम
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्रालय सोडून बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून गेल्याच की. पृथ्वीबाबा पण पीएमओ मधूनच राज्यात आले होते.
9 Nov 2014 - 8:27 pm | चौकटराजा
नरेंद्र मोदीना सरकार चालविण्याचे पुरेसे गांभीर्य आहे. आजही झालेल्या यादीत उच्च शिक्षित माणसे आहेत. सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे. भाजपा पार्टी विथ डिफरन्स नसेलही पण मोदी लीडर विथ डिफरन्स दिसू लागले आहेत.
सेनेने एमायएम चे खुसपट काढून हिंदुत्व सांभाळणार असल्याची नवीच अट भाजप साठी शोधून काढली आहे. सेना काय किंवा मनसे काय यांच्या डी एन ए तच विकासाचे राजकारण दिसत नाही.
9 Nov 2014 - 8:42 pm | यश राज
सेनेचे चाळे बघून आता युती नको पण 'शिवसेना' आवर असे खेदाने म्हणावे लागतेय.
9 Nov 2014 - 9:43 pm | सतिश गावडे
माध्यमांमधल्या बातम्या वाचून/ऐकून पॉवर* गेम चालू आहे हे लक्षात येतंय. मात्र नक्की कोण कुणाला खेळवतंय काही कळत नाही.
*इथे श्लेष अभिप्रेत नाही. हा शब्द "पॉवर" असाच वाचावा. :)
9 Nov 2014 - 10:19 pm | क्लिंटन
सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे.
सुरेश प्रभूंना मंत्रीपदी नेमून मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पूर्वी वाजपेयी सरकारमध्येही त्यांनी चांगले काम केले होते.ते वाजपेयींचे मर्जीतले मंत्री होते.तरीही बाळासाहेबांच्या हट्टाखातर सुरेश प्रभूंना राजीनामा द्यावा लागला.ते मंत्रीमंडळातून गेले हे स्वत: वाजपेयींना फार आवडलेले नव्हते ही गोष्ट स्पष्टच होती. नंतरच्या काळात सुरेश प्रभू कागदोपत्री शिवसेनेचे सदस्य असले तरी पक्षात फारसे सक्रीय नव्हते.मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सुरेश प्रभूंना जी-२० परिषदेसाठी महत्वाची जबाबदारी दिली.आणि आता सरळ त्यांना भाजपमध्ये सामील करून घेऊन उध्दव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून मंत्रीच करून घेतले. एकतर सुरेश प्रभू हा एक चांगला माणूस मंत्रीपदी आला हे चांगले झालेच. आणि दुसरे म्हणजे उध्दव ठाकरेंना आपण फारसे महत्व देत नाही हा पण एक सिग्नल मोदींनी दिलाच.
सेना-भाजप युती तुटून दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. मोदींना अफझलखान, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहा वगैरे म्हणूनही झाले.तरीही अनंत गीते मंत्रीपदी कायम आहेतच.उध्दव ठाकरेंना न जुमानता सुरेश प्रभूंना मंत्री केले तरीही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला उध्दव ठाकरे अजूनही सांगितलेले नाही.सत्तेचे लोणी उध्दव ठाकरेंनाही खरे तर मनातून हवे आहे.पण प्रचंड इगो आडवा येत आहे म्हणून काहीतरी करून एखादे ’फेस-सेव्हर’ त्यांना हवे आहे.शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकविले, आम्ही सत्तेवर लाथ मारू वगैरे राणा भीमदेवी वल्गना करूनही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितलेले नाही आणि अजूनही ’राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर’ हे शेपूट कायम ठेऊनच ’आम्ही विरोधी पक्षात बसू’ असे म्हणणे चालू आहे. राष्ट्रवादीचे काही होईल ते होऊ दे,आम्ही विरोधातच बसू, आम्हाला तुमच्याबरोबर सत्ता नको, हा घ्या गीतेंचा राजीनामा असे उध्दव ठाकरेंनी खणखणीतपणे म्हटले असते तर त्यांची विश्वासार्हता आणि मान टिकून राहिला असता. या वागण्यातून नक्की कोणत्या प्रकारचे संकेत उध्दव देत आहेत? शिवसेनेच्या वाघाचे मांजरच नाही तर ससा करायची योग्य वेळ आहे हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले नसेल तर नवलच.
9 Nov 2014 - 10:40 pm | hitesh
राणा भीमदेवी थाट हा शब्दप्रयोग ऐकला आहे.
पण हे राणा भीमदेवी म्हणजे नेमके कोण ?
9 Nov 2014 - 10:54 pm | बॅटमॅन
कुठेशीक वाचले त्यानुसार राणा भीमदेव या नावाचे ते एक नाटक होते, बहुधा १९२० च्या आधीचे. त्यातले ड्वायलॉक्स इ. लै आदळआपट छाप बॉम्ब्यास्टिक असावेत कारण त्यावरूनच पुढे हा शब्दप्रयोग रूढ झाला.
10 Nov 2014 - 8:14 am | सुनील
नाटक होते आणि त्यावरून शब्दप्रयोग आला, हे ठीक. पण राणा भीमदेव नावाची कुणी व्यक्ती भारतीय इतिहासात होऊन गेली होती काय? कुतुहल म्हणून विचारतोय.
10 Nov 2014 - 12:07 pm | बॅटमॅन
असेलही. पाहिले पाहिजे, माझ्या ऐकण्यात तरी अशी कुणी व्यक्ती नाही, पण यू नेव्हर नो. मध्ययुगीन गुजरात-राजस्थानात असेलही एखादा मायनर राजा.
10 Nov 2014 - 6:26 pm | प्रदीप
राणा भीमदेव ह्या नावाने गुगलून पहातां "Nationalism and Social Reform in in [sic] Colonial Situation" By Aravind Ganachari ह्या पुस्तकातील सदर नाटकाची माहिती देणारे पानच प्रस्तुत झाले. त्यानुसार, 'राणा भीमदेव' ह्या नावाचे नाटक, वासुदेव रंगनाथ शिरवळकर व विनायक त्र्यंबक मोडक ह्या द्वयीने १८९२ साली लिहीले होते.
आणि थोडे गंमतीशीर अवांतरः गुगलने राजा भीमदेव ह्यांविषयी माहिती दिली, त्यानुसार सदर नावाचा मुळचा गुजराती राजा, मुंबईचा मूळ राजा होय, त्याने माहिम येथे शहर स्थापन केले होते, म्हणे-- ही माहिती विकीपेडियावर दिसली. अर्थात ह्याविषयी खरेखोटे माहिती नाही. अलिकडची मुंबई- गुजराती- अफझल खान--- ह्या आरोळ्यांनी दुमदुमलेल्या वातावरणात ही माहिती मनोरंजक वाटली!
10 Nov 2014 - 7:22 pm | hitesh
भिमदेवाचं परकेपण काय घेऊन बसलात , खुद्द महाराजांचे पूर्वजही राजस्तानातुन आले... 'आधुनिक महाराजां'चे पूर्वजही मध्य प्रदेशातून आले.
11 Nov 2014 - 11:12 am | बॅटमॅन
वाह! माहितीकरिता धन्यवाद. :)
9 Nov 2014 - 7:49 am | जेपी
माई मोड ऑन-अरे ओंकारा,सगळा लेख इथेच द्यायचा होता की रे.आमच्या ह्यांना आता या वयात लांबचा प्रवास झेपत नाही.-माई मोड ऑफ
9 Nov 2014 - 8:23 am | hitesh
शिवसेनेवर लेख आह.. माई शब्दाने उगाच गैरसज व्ह्याला नको.
आडनावही लिहा.
..हितेश डुरसंगीकर
9 Nov 2014 - 3:29 pm | जेपी
हितेस भाई केम छे.
नानासाहेब गेल्याच कळाल.पोचवायला येता आल नाही.दुखा:त सहभागी आहे.
9 Nov 2014 - 6:39 pm | श्रीगुरुजी
आँ, नानासाहेब गेले? कुठे? कधी? कसे काय अचानक गेले? मला कसं कळलं नाही?
9 Nov 2014 - 7:34 pm | जेपी
ओ श्रीगुरुजी,
नाना गेल्याचे कळाल नाही.असले कसले मित्र ओ तुमी *wink*
चला एखादा श्रदांजली लेख लिहुन आदरांजली व्हावा.
*biggrin*
9 Nov 2014 - 7:52 pm | श्रीगुरुजी
नाना गेल्याचं मला खरंच समजलं नव्हतं. नक्की कोणत्या कारणाने ते गेले?
त्यांचे बरेच डूआय आहेत. त्यामुळे ते अजरामर आहेत. प्रस्तुत लेखाच्या लेखकाचा जन्म केवळ १ दिवसांपूर्वी झालेला आहे. कदाचित नाना?
9 Nov 2014 - 7:57 pm | श्रीगुरुजी
हे नाना नाहीत. यांचा ब्लॉग खूप जुना आहे. ब्लॉगवर चांगले लेख आहेत.
9 Nov 2014 - 8:11 pm | hitesh
ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे
9 Nov 2014 - 8:55 pm | जेपी
ना ना करते प्यार तुम्ही>>>
आयला,
दोस्ताना पार्ट टु का
=))
9 Nov 2014 - 5:06 pm | hitesh
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले.....
.......
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा
त्याना स्वराज्य निर्माण करायचे होते.
..........
हिंदवी हा शब्द महाराजांनी वापरला होता का?
की तो नंतर कुणीतरी घातला ?
9 Nov 2014 - 8:07 pm | श्रीगुरुजी
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र |
एकताचा पप्पा जितेंद्र, दोन बायकांचा दादला धर्मेंद्र |
बॉलिवूडमध्ये विजयेंद्र, वसईत हितेंद्र |
मराठी चित्रपटात गजेंद्र (अहिरे), ज्युबिलीस्टार राजेंद्र (कुमार) |
क्रिकेटमध्ये वीरेंद्र, स्वर्गात देवाधिदेव इंद्र ||
9 Nov 2014 - 9:02 pm | hitesh
काँग्रेस म्हणजे मरुन पडलेला साप असे उठाकरे बोल्ले होते.
अआता यांची सेना धड मरतही नाही धड जगतही नाही.
10 Nov 2014 - 5:21 am | चौकटराजा
रात्री उशीरा भाजपाने असे स्पष्ट केले आहे की ज्याअर्थी राष्ट्रवादी च्या पाठिंब्या बाबत " तात्विक" मुद्दा सेनेने उकरून काढला आहे त्याअर्थी आता चर्चा फक्त तात्विकच होउन शकते. सत्तेच्या सारीपाटात सेनेला रस नाही असा संदेश जनतेला भाजपाने
सेनेकडून दिला आहे. सबब भाजपा आता सांगून मोकळे होईल की आम्ही रा का चा पाठिंबा घेत नाही आता झाले तुमचे
" तात्विक" समाधान ? चला आता देतो ती मंत्रीपदे घ्या नि गुमान लालदिवे मिरवा. राज व उद्धव ठाकरे ही मडकी राजकारणात किती कच्ची आहेत हे सगळ्याना दिसून आले आहे. मोदी शहा देवेंद्र या त्रिकूटाने मातोश्रीला चेकमेट दिला आहे.
10 Nov 2014 - 10:19 am | आनन्दा
परफेक्ट -- साध्या मराठीत याला हात दाखवून अवलक्षण असे म्हणतात.
10 Nov 2014 - 12:33 pm | hitesh
धनुष्यबाण दाखवून अवलक्षण !
आमचा 'हात ' बिचारा का मध्ये आणायचा ?
10 Nov 2014 - 2:44 pm | विजुभाऊ
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले.
इतके मोठ्ठे विनोदी वाक्य आजतागायत वाचनात नाही.
शिवजीमहाराजानी संगठीत केले ते केवळ कोण्या एका धर्माच्या जातीच्या लोकाना नाही तर परकीय आक्रमकाना मोडून काढून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यात परकीयाना साथ देत असलेया आडव्याजाण्यार्या हिंदुना सुद्धा त्यानी मोडूनच काढले. जेथे शौर्य दिसले त्याचे त्यानी कौतूकच केले. शिवाजी महाराजाम्च्या सैन्यात मुसलमान सैनीकदेखील होते. शिवाजी महाराजानी त्यांच्याबद्दल कधीच दुजाभाव दाखवला नाही. तेंव्हा शिवाजी महाराजानी केवळ हिंदू एकत्र केले असा सोयीस्कर अपप्रचार थांबवा.
शिवाजी महाराजांवर "ते केवळ हिंदूंचे होते" असे म्हणून त्यांना संकुचीत करू नका
10 Nov 2014 - 5:38 pm | hitesh
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजपा सेना गळ्यात गळा घालुन फिरले . सत्तेचे लोणी येताच सेनावाले कमळीणीला औरंगजेब म्हणु लागले.
यांचे हे चाळे बघून , खुद्द महाराज चाङ्गले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाइट होता का , ही शंका आता भेडसावु लागली आहे.
10 Nov 2014 - 6:05 pm | प्रदीप
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले.
विजुभाऊ, तुम्हाला इतके साधे कसे समजत नाही? अनेक जुन्या धर्मग्रंथांचे जसे अनेकानेक अर्थ जाणकारांकडून लावले जातात, तसेच इथेही आहे ना?
आता हे खर्या शिवाजी महाराजांच्या संदर्भात आज होत आहे. काही वर्षांनी 'साहेबांच्या' म्हणण्याचेही असेच अनेकपदरी अर्थ आपणांस सांगण्यात येतील. जे जे येते, ते सर्व ऐकून/ वाचून सहन करण्याची शक्ति हवी!!
10 Nov 2014 - 2:50 pm | विजुभाऊ
सगळे फासे थोरल्या पवारांच्या अपेक्षेप्रमाणेच पडत आहेत.
कोंग्रेसला विरोधीपक्षनेतेपद मिळाले नाही
भाजप चे सरकार पडले नाही
सेने च्या वाघाचा ससा झालाय. सेना विरोधात बसली की सरकारात बसली काहीच फरक पडणार नाही.भाजप चे बळ वाढणार अन सेना पक्ष म्हणून पुढील निवडणूकीत असेल की नाही याचीच आता शंका यायला लागलीय.
थोरले पवार त्यांच्या भात्यातील अस्त्रे काढत नाहीत तोवर भाजपला पटावर योग्य दान पडलय असे वाटतय.
पवारानी एकाच खेळीत भाजप , सेना , काँग्रेस आणि अजित पवार असे बरेचजण गारद केलेले आहेत.
10 Nov 2014 - 3:02 pm | कलंत्री
शरद पवार साहेबांबद्दल कोणी काहीही म्हणोत, त्यांना परिस्थितीची यथार्थ अशी जाणिव आहे हे मान्य करावयालाच हवे. एकंदरीतच मतमोजणीचा कल पाहताच, सर्वच पक्षातील कटुता आणि अस्थिर राजकारणाच्या प्रवासाची शक्यता पाहता त्यांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा प्रकट केला. त्यामूळे सर्वच धुरीणांना काय करावे हेच समजेनासे झाले. त्यांचा त्यामागील दृष्टीकोन हा नक्कीच विधायक आणि परिपक्व असाच होता. निवडणूकीचा प्रचार आणि प्रत्यक्ष राज्य चालविणे या दोन वेगळ्या बाबी आहेत हे समजणारा हा पहिला असा नेता होता. राहिला भ्रष्टाचाराचा मूद्दा त्याला कितपत अर्थ आहे हे पूढील ५ वर्षात समजेलच.
इतर पक्षाची नेतेमंडळी अजूनही प्रचारभ्रमातून बाहेर यायला तयार नाहीत अथवा राज्याच्या स्थैर्याच्या मूद्द्याशी त्यांना देणे घेणे नाही असेही असावे अशी शंका घ्यायला बराच वाव आहे.
पवारांना विधायक दृष्टीकोनाचाच फायदा झाला असावा असे मला वाट्ते.
10 Nov 2014 - 3:46 pm | कपिलमुनी
तुमचा सेन्स ऑफ ह्युमर बेष्टच !!
11 Nov 2014 - 9:55 am | कलंत्री
आजच्या काळात प्रत्यक्ष आपल्या सावलीचा सुद्धा भरोसा ठेवता येत नाही तेथे शरद पवारांच्या अश्या वर्तणूकीने भले भले हबकले आहेत. तरीपण शरदपवारांबद्दल आदर वाढला असे नमूद करावेसे वाटते.
10 Nov 2014 - 3:09 pm | चौकटराजा
पवाराना आता काँगेसशी सलगी करण्यात रस नाही. त्यान कळून चुकले आहे की काही झाले तरी राष्ट्रवादी देशव्यापी पक्ष आपल्या हयातीत होत नाही व त्याना असेही वाटतेय की भाजपा वर्धिष्णू राहील. सबब आपला शत्रू क्रमांक १ शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे हे पवारानी ठरवले आहे. संपवायचेच असेल तर भाजपा कॉंग्रेस या देशपातळीवरील पक्षाना संपविण्यापेक्षा
शिवसेना संपविली पाहिजे म्हणजे प्रादेशिक पातळी वरील " स्पेस" आपल्याला मिळेल.
10 Nov 2014 - 3:00 pm | दुश्यन्त
राज्यातले देवेंद्र हे 'पवारालंबी' असणार आहेत. (टीव्हीवर चर्चेत भाऊ तोरसेकर हा शब्द वापरत आहेत). राज्यात भाजप- राष्ट्रवादी हि छुपी युती लोकांसमोर आणणे यासाठीच उठा वेळकाढूपणा करत आहेत.सेना विरोधातच बसणार आहे. राज्यातले सरकार पवारांच्या मर्जीने तरणार आणि पवारांना पाहिजे तेव्हा मध्यावधी निवडणुका लागणार.
10 Nov 2014 - 8:18 pm | भाते
अरे वा छान! मग त्या माईचे काय झाले? ती आहे का अजुन? सगळ्या मिपाकरांना अरे तुरे करणारी माई नानापेक्षा वयाने (अकलेने/बुद्धीने) जेष्ठ असणे अजिबात शक्य नाही! :) त्या (स्वातंत्र्यपुर्व काळातही) माईने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नानाशी लग्न केले! छान! :)
मग हा नविन डूआयडी त्यांचा नातू कि पणतू?
एकदा ह्या (नाना एकदाचा टपकला आहे असे गृहित धरून) माई आणि समस्त डूआयडी यांना एकत्र कट्टयाला बोलावुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे!
10 Nov 2014 - 8:52 pm | सिद्धेश महाजन
हा नाना कोण?
10 Nov 2014 - 9:46 pm | आदूबाळ
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना...
तनन तनन तनन दीम तरन दे रे ना...
एक तेचि नाना.
(अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)
11 Nov 2014 - 10:26 am | जेपी
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना...
*ROFL*तनन तनन तनन दीम तरन दे रे ना...
एक तेचि नाना.
(अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)
मी घेऊ का ? *wink*
10 Nov 2014 - 9:36 pm | चौथा कोनाडा
थोडक्यात भाजप- शाखा: महाराष्ट्र, हायजॅक करायचा मे. घड्याळजी आणी कंपनीचा फ्युचर रोडमॅप आहे. ( कॉंग्रेस, महाराष्ट्र शाखा हायजॅकचा बराच प्रयत्न झाला, पण फांदीच तुटली ना राव ! आता झाडही मुळापासून हलू लागलेय, दुसर्या झाडाला लटकणे क्रमप्राप्त आहे )
भाऊ तोरसेकरानी त्या कार्यक्रमात खुपच कळकळीने मत प्रतिपादन करत होते. सर्वान्मधे त्यानीच इम्प्रेस केले.
12 Nov 2014 - 1:25 pm | hitesh
सेना विरोधी पक्षात बसणार.
अभिनंदन
12 Nov 2014 - 3:50 pm | बापू नारू
महाराष्ट्राला मनमोहन मिळाला ,याचा रिमोट दिल्लीत आहे..
12 Nov 2014 - 4:22 pm | जेपी
दिल्लीत नाय वो बारामती मध्ये आहे.
रिमोट चा सेल किती चालेल बघावे लागेल